जाहिरातीवर आधारित प्रश्न
( स्वाध्याय )जाहिरातीवर आधारित प्रश्न
प्र. पुढे दिलेल्या जाहिराती लक्षपूर्वक वाचा व त्याखालील प्रश्नांच्या उत्तराच्या योग्य पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा
जाहिरात 1
आनंदासाठी कला व कलेसाठी सोहळा
कलामंच व कलाप्रेमी मंडळ आयोजित
तालुकास्तरीय भव्य रांगोळी प्रदर्शन
(शाहुवाडी तालुक्यातील सर्व माध्यमांच्या शाळांतील मुलामुलींच्या कलागुणांचे प्रदर्शन)
विदयार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी अवश्य भेट दया.
*विशेष रांगोळी दालन*
पाण्यावरील व पाण्याखालील उत्कृष्ट रांगोळी कला
दिनांक: २४ डिसेंबर ते २७ डिसेंबर
वेळ : सकाळी ११ ते ६
स्थळ : वारणा विद्यालय, कोतोली ता. शाहुवाडी, जि. कोल्हापूर
1. रांगोळी प्रदर्शन कोणत्या स्तरावर भरणार आहे?
(1) शालेयस्तर (2) तालुकास्तर (3) जिल्हास्तर (4) राज्यस्तर
उत्तर:2) तालुकास्तर
2. रांगोळी प्रदर्शन किती दिवस सुरू राहणार आहे?
(1) तीन (2) पाच (3) चार (4) दोन
उत्तर:3) चार
3. रांगोळी प्रदर्शनाचे खास वैशिष्ट्य काय आहे?
(1) पाण्यावरील व पाण्याखालील रांगोळी
(2) विविध रंगांतील रांगोळी
(3) विद्यार्थ्यांनी काढलेली रांगोळी
(4) कलाप्रेमींनी काढलेली रांगोळी
उत्तर:1) पाण्यावरील व पाण्याखालील रांगोळी
📝( सरावासाठी जाहिरात )
__________________________
{ जाहिरात 2 }
स्वतःचे रक्षण स्वतः करा! अन् शरीरही लवचीक बनवा !!
कराटे शिका आणि निर्भय राहा
पंच, किक, थ्रो अशा अनेक कौशल्यांचे मार्शल आर्ट तज्ज्ञांकडून प्रशिक्षण
* सुट्टीतील खास कराटे वर्ग *
व्हाईट, यलो, रेड, ग्रीन व ब्लॅक बेल्ट यांचे प्रशिक्षण • आमच्या वर्गातील अनेक विद्यार्थ्यांची राज्यस्तरावर निवड
स्थळ : दत्तसेवा विद्यालयाचे भव्य प्रांगण
शुल्क : ३० दिवसांसाठी ₹६०० फक्त
* प्रथम प्रवेश घेणाऱ्या २० विद्यार्थ्यांना मोफत गणवेश संपर्क : ९०९६८XXXXX
खास बाब : राज्यस्तरावर निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक
1. वरील जाहिरात कशाशी संबंधित आहे?
(1) कुस्ती प्रशिक्षण (2) कराटे प्रशिक्षण (3) योगासने प्रशिक्षण (4) संरक्षण प्रशिक्षण
उत्तर:2) कराटे प्रशिक्षण
2. पुढीलपैकी कोणत्या कौशल्यांचे मार्गदर्शन प्रशिक्षणामध्ये होणार आहे?
(अ) पंच (ब) किक (क) थ्रो
(1) फक्त अ बरोबर (2) फक्त ब बरोबर
(3) अ आणि ब बरोबर (4) अ, ब आणि क बरोबर
उत्तर:4) अ, ब आणि क बरोबर
3. कराटे शिकल्यामुळे पुढीलपैकी कोणती गोष्ट होणार नाही?
(1) स्वतःचे रक्षण करता येईल.(2) शरीर लवचीक बनवता येईल. (3) मोफत गणवेश घेता येईल. (4) निर्भय बनता येईल.
उत्तर:3) मोफत गणवेश घेता येईल.
__________________________
( जाहिरात 3 )
त्वरा करा ! त्वरा करा !! त्वरा करा !!!
शालेय युनिफॉर्म स्पेशल विक्री भांडार
आदर्श गणवेश भांडार
रानडे रोड, दादर, मुंबई - २८
सर्व शाळांचे गणवेश मिळण्याचे एकमेव ठिकाण
आजच भेट दया.
आमची खास वैशिष्ट्ये : • कधीही न चुरगळणारे कापड • मजबूत शिलाई
• रंग न जाण्याची खात्री • विद्यार्थ्यांच्या मापाप्रमाणे गणवेश शिवून मिळतील.
खास ऑफर : तीन गणवेश घेतल्यास तिसरा गणवेश निम्म्या किमतीत
* ऑफर फक्त ३० जूनपर्यंतच *
1. वरील जाहिरात कशाशी संबंधित आहे ?
(1) पुस्तके (2) गणवेश (3) सहल (4) कापड
उत्तर:2) गणवेश
2. पुढीलपैकी कोणते वैशिष्ट्य जाहिरातीचे नाही ?
(1) न चुरगळणारे कापड (2) मजबूत शिलाई (3) रंग न जाण्याची खात्री (4) मोफत गणवेश
उत्तर:4) मोफत गणवेश
3. ही जाहिरात कोणत्या महिन्यात दिलेली नसावी ?
(1) जून (2) मे (3) ऑगस्ट (4) एप्रिल
उत्तर:3) ऑगस्ट
__________________________
{ जाहिरात 4}
पर्यावरणपूरक - इको फ्रेंडली
चित्ताकर्षक मखरांचे प्रदर्शन
पर्यावरण वाचवूया, गणेशोत्सव साजरा करूया
आकर्षक रंगांची, सुंदर डिझाइनची
सहज घडी करता येणारी लहान मोठी
माफक दरात___ मखरे
खास वैशिष्ट्य : कागदाच्या लगद्यापासून तयार केलेली मखरे. हेसुद्धा मिळणार : मनोहारी दागिने, माळा, कंठी, समई आणि उंदीरमामा
स्थळ : सोमवार पेठ, पुणे
वेळ: सकाळी १० ते रात्री १०
संपर्क : ९२८४९XXXXX
1. मखराचे पुढीलपैकी कोणते वैशिष्ट्य नाही?
(1) आकर्षक रंग (2) सुंदर डिझाइन (3) माफक दर (4) घडी न करता येणारे
उत्तर:4) घडी न करता येणारे
2. मखरासोबतच आणखी कोणत्या वस्तू तेथे मिळणार आहेत ?
(1) थर्माकोल, केळी (2) हार, फुले (3) कंठी, उंदीरमामा (4) गुलाल, फटाके
उत्तर:3)कंठी, उंदीरमामा
3. जाहिरातीत दिलेले खास वैशिष्ट्य कोणते ?
(1) माफक दर (2) कागदाच्या लगद्यापासून तयार केलेली मखरे (3) सुंदर डिझाइनची मखरे (4) सहज घडी करता येणारी मखरे
उत्तर:2) कागदाच्या लगद्यापासून तयार केलेली मखरे
__________________________
जाहिरात 5 }
सेल! अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने ३०% ते ५०% सूट सेल!
.शालेय गणवेश .शालेय स्टेशनरी . स्काऊट गाईड गणवेश.
.आर. एस. पी. गणवेश .सफेद सलवार व कुडता .शालेय शूज
स्थळ : शालेय वस्तू भांडार, लक्ष्मी रोड, पुणे दिनांक : १० ऑगस्ट ते १६ ऑगस्ट . वेळ : सकाळी १० ते रात्री ८ पर्यंत
1. 'अमृतमहोत्सव' किती वर्षांनी साजरा करतात?
(1) २५ वर्षे (2) ५० वर्षे (3) ७५ वर्षे (4) ६० वर्षे
उत्तर :3) ७५ वर्षे
2. खरेदी केलेल्या वस्तूंवर किती टक्के सूट आहे?
(1) 20% ते 40% (2) ३०% ते ५०%(3) 10% ते 30% (4) २०% ते ३०%
उत्तर:2) ३०% ते ५०%
3) सेलचा कालावधी किती दिवस आहे?
(1) एक आठवडा (2) १० दिवस (3) २ आठवडे
(4) ६ दिवस
उत्तर:1) एक आठवडा
__________________________
जाहिरात 6 }
सुवर्णसंधी ! सुवर्णसंधी !! सुवर्णसंधी !!
ग्रह-ताऱ्यांच्या साक्षीने__ निसर्गाशी एकरूप होऊया! आकाशदर्शन सोहळा
निःशुल्क प्रवेश
रात्रीच्या नभात चमचमणारे तारे
चंद्राचा तेजोमय प्रकाश
दूरच्या ग्रहांचा मोहक प्रवास
मर्यादित १०० विद्यार्थ्यांसाठी
खास दुर्बिणीतून सगळं काही आपल्या डोळ्यासमोर
दिनांक : २८ फेब्रुवारी
वेळ : सायंकाळी ६:३० ते रात्री १०:३०
स्थळ : चंद्रशेखर वेंकट रामन उद्यान, विरार पश्चिम.
विशेष बाब : खगोलशास्त्रज्ञांशी थेट संवाद, खगोल प्रश्नमंजूषा स्पर्धा व विज्ञान कुतूहल पुस्तक भेट
1. दुर्बिणीमधून कोणती गोष्ट पाहावयास मिळणार आहे? (1) चमचमणारे तारे (2) दूरच्या ग्रहांचा मोहक प्रवास. (3) तेजोमय चंद्र (4) पर्याय 1, 2 व 3 मधील सर्व
उत्तर:4) पर्याय 1, 2 व 3 मधील सर्व
2. आकाशदर्शन सोहळ्यातील विशेष बाब कोणती नाही ? (1) खगोलशास्त्रज्ञांशी थेट संवाद (2) खगोल प्रश्नमंजूषा स्पर्धा (3) विमानात बसण्याची संधी (4) विज्ञान कुतूहल पुस्तक भेट
उत्तर:3) विमानात बसण्याची संधी
3. आकाशदर्शन सोहळ्यात किती विद्यार्थ्यांना प्रवेश देणार आहेत ?
(1) शंभर (2) दोनशे (3) पन्नास (4) पाचशे
उत्तर:1) शंभर
__________________________
जाहिरात 7 }
बालनाट्य महोत्सव
कल्पनांना पंख ___अभिनयाला रंग
४ ते १४ वयाच्या बालप्रेक्षकांना हसवण्यासाठी
आपल्याच शहरात आनंद व कलाविष्काराचा संगम
दिवाळी सुट्टीतील मौजमजा
कलामंच बालचमू सादर करीत आहे दोन बालनाट्ये
अदृश्य होणारा राक्षस
जादूई चेटकीण
कलाकार : बालचमूचे यशस्वी कलाकार
दिनांक : २० ऑक्टोबर ते २४ ऑक्टोबर
वेळ : सायंकाळी ५ ते रात्री ९
स्थळ : बालरंगमंच, हनुमाननगर, कांदिवली पूर्व, मुंबई.
खास आकर्षण : अदृश्य राक्षस व जादूई चेटकीण सोबत सेल्फी काढण्याची संधी
1. बालनाट्य महोत्सव कोणत्या वयोगटातील मुलांसाठी आहे?
(1) ५ ते १५ वर्षे (2) ४ ते १४ वर्षे (3) ४ ते १२ वर्षे (4) ८ ते १६ वर्षे
उत्तर 2) ४ ते १४ वर्षे
2. बालनाट्य महोत्सव कधी होणार आहे?
(1) उन्हाळी सुट्टीत (2) नाताळच्या सुट्टीत (3) दिवाळी सुट्टीत (4) गणपतीच्या सुट्टीत
उत्तर: 3) दिवाळी सुट्टीत
3. बालनाट्य महोत्सवाचे खास आकर्षण कोणते ?
(1) अदृश्य राक्षस व जादूई चेटकीण सोबत सेल्फी
(2) चेटकीण सोबत फिरण्याची संधी
(3) अदृश्य राक्षस व जादूई चेटकीण सोबत अभिनय
(4) राक्षसासोबत कुस्ती खेळण्याची संधी
उत्तर :1) अदृश्य राक्षस व जादूई चेटकीण सोबत सेल्फी

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा