Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

मंगळवार, ४ जून, २०२४

3 जून दैनंदिन शालेय परिपाठ

3 जून दैनंदिन शालेय परिपाठ→ प्रार्थना

 ॐ असतो मा सद्गमय तमसोमा ज्योतिर्गमय..

 

. → श्लोक 

- सौजन्ये खुलते सुवैभव, खुले वाक्यसंयमें शूरता विद्या, ज्ञानहि, शांतिनें, सुविनयें, पात्री व्यये संपदा ॥

-  क्षान्तीनें प्रभुता, शमें तप, ऋजुत्वाने खुले धर्मही, सर्वा कारण आद्य, भूषण महा सच्छील हैं या महीं ॥ वैभव हे सौजन्याने शोभून दिसते, शीर्य हे वाणीच्या संयमाने शोभते; ज्ञान हे शांतीने, विद्या ही विनयाने, धन हे सत्पात्री दान देण्याने, तप हे न रागावण्याने, प्रभुता सत्ता ही क्षमावृत्तीने, धर्माचरण हे सरल वागण्यात हे सरल वागण्याने शोभते पण या सर्वांचे आद्य कारण व महान भूषण आहे शील! 


→ चिंतन

 आत्मविश्वास ही यशाची गुरुकिल्ली आहे. आत्मविश्वासाचे अंजन ज्याच्या डोळ्यात लकाकते, त्याला कोणत्याही अडचणीतून योग्य मार्ग दिसतो. जर आपण हाती घेतलेले काम है। हितकारक आहे, अशी आपली मनात खात्री असेल तर त्या कामाविषयी आपल्या मनात निष्ठा निर्माण होते. त्यालाच आत्मविश्वास प्राप्त होतो. आपण हे काम केलेच पाहिजे, असा ध्यास त्याला लागतो आणि मग अशा माणसाच्या गळ्यात यशोमाला खात्रीने पडते.


कथाकथन '

हुडेबाजाची वरात' : महाराष्ट्रातील सामाजिक सुधारणांच्या चळवळीला गती देणाऱ्या त्यागी व धाडसी समाजसुधारकात महात्मा फुले, गोपाळ ग. आगरकर, महर्षि कर्वे यांचेप्रमाणेच प्रबोधनकार केशव सी. ठाकरे यांचेही स्थान आहे. मुंबईतील दादर विभागात राहत असताना त्यांनी 'हुंडा विध्वंसक संघ' स्थापन केला होता. या संघाचे तरुण स्वयंसेवक सर्वत्र हेरांप्रमाणे फिरुन कुठला तरुण आपल्या लग्नात किती हुंडा घेतोय, याची अधिकृत | बित्तंबातमी मिळवीत व ती प्रबोधनकार व ठाकरे यांना पुरवीत. मग लग्नाच्या दिवशी आपल्या स्वयंसेवकांना बरोबर घेऊन, प्रबोधनकार ठाकरे त्या लग्नस्थळी जाऊन संबंधितांच्या ओळखीचा व रागाची पर्वा न करता त्या हुंडेबाज नवरदेवाची पार हुर्थी करीत. एकदा अशाच एका श्रीमंत वराने नवरीमुलीच्या बापाकडून हुंडा, मानपान, पोषाख आदीसाठी भरपूर पैसे उकळले होते. त्याबद्दलची माहिती प्रबोधनकारांना मिळाली. सुदैवाने त्या लग्नाला अगत्याने येण्याची कुंकुमपत्रिकाही त्यांना 'मुली' च्या वडिलांकडून आली होती. तीनुसार नवरा मुलगा | मंगलकार्यालयाकडे वाजतगाजत जाऊ लागला असता, प्रबोधनकारांनी त्या मिरवणुकीच्या पुढे थोडे अंतर ठेवून एका शृंगारलेल्या व कपाळाला मुंडावळी बांधलेल्या गाढवाची मिरवणूक सुरु केली. त्या गाढवाच्या पाठीवरुन दोन बाजूंना पुट्ट्याच्या दोन फलकांवर खऱ्या नवरदेवाने वधूपित्याकडून हुंडा व मानपानादीसाठी उकळलेल्या रकमांचे आकडे सुवाच्य व ठळक अक्षरांत लिहिले होते. ही 'जुळी' मिरवणूक दादरच्या हम रस्त्याने वाजतगाजत चालली होती. काही माणसे प्रबोधनकारांना शिव्या देत होती, तर काही इमारतीतून त्यांच्यावर व त्यांच्या स्वयंसेवकांवर फुले उधळीत होती. अशा तऱ्हेने तमाम दादरकरांच्या नजरा वेधीत ती 'जुळी' मिरवणूक मंगलकार्यालयाच्या प्रवेशद्वारापाशी गेली. तिथे जाताच, न्यायाधीशांच्या हुद्यावर असलेले त्या नवरदेवाचे एक भारदस्त नातेवाईक प्रबोधनकारांना दटावणीच्या सुरात म्हणाले, “आतापर्यंत तुम्ही आम्हाला जी सोबत केलीत ती पुरी झाली. आता या लग्नाच्या हॉलमध्ये जर तुम्ही प्रवेश केलात तर मी तुमच्यावर कायदेशीर कारवाई करीन. "यावर आपल्या खमिसाच्या खिशातील कुंकमपत्रिका बाहेर काढून प्रबोधनकार ठाकरे त्या गृहस्थांना ठणकावून म्हणाले, “काय हो, न्याय म्हणजे काय हे बिलकूल कळत नसूनही तुम्ही न्यायाधीश कसे काय झालात? वास्तविक नवऱ्यामुलीला जसा नवरा हवा असतो तशीच नवऱ्या मुलाला बायको हवी असते. मंग हुंडा, मानपान वगैरेच्या रुपानं नवऱ्यामुलाला नवरीमुलीकडून अशी खंडणी वसूल करणे ही गोष्ट न्यायात बसते का?" न्यायमूर्ती चिडून म्हणाले," ते वरपक्ष व वधूपक्ष पाहून घेतील; तुम्हाला येथे येण्याचे कारण काय?" त्यांचा तो प्रश्न ऐकून प्रबोधनकार ठाकरे, “ साहेब! या ठिकाणी मी काही उपरा म्हणून आलेलो नाही, तरी वधूपित्याकडून मला सहकुटुंब सहपरिवार लग्नाला येण्याचं छापील निमंत्रण आहे. म्हणून सहकुटुंब जरी इथे येणं जमल नाही, तरी मी माझ्या स्वयंसेवकांच्या परिवारासह अगदी कायदेशीरपणे आलेलो आहे." प्रबोधनकारांच्या या बिनतोड उत्तराने न्यायमूर्तीची वाचा एकदम बंद पडली.सुविचार -

 • 'हुंडा देणे घेणे कायद्याने गुन्हा आहे.'

  • यशस्वी होण्यासाठी गरज असते ज्वलंत इच्छाशक्तीची, सामान्य इच्छाशक्ती तर कोणाकडेही असते

  . • उद्योग, साहस, धैर्य, बुद्धी, शक्ती आणि पराक्रमी वृत्ती हे सहा गुण अंगी असतील तर देवही प्रसन्न होतो. 

 


→ दिनविशेष

 • महिला विद्यापीठाचा प्रारंभ - १९१६ : स्त्रीशिक्षणाच्या कार्याला महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी स्वतःला वाहून घेतले होते. जपानमध्ये | चालविल्या जाणाऱ्या महिला विद्यापीठाची माहिती त्यांना जेव्हा समजली तेव्हा अशा प्रकारचे विद्यापीठ भारतातही स्थापन करावे या विचाराने ते अगदी झपाटून | गेले. आपल्या परिचितांपुढे ही कल्पना त्यांनी मांडली तेव्हा त्यांचे स्नेही म. क. गाडगीळ यांनी प्रथम १०,००० रु. ची देणगी जाहीर केली. म. गांधीजींनाही ही योजना फार आवडली. ते तत्काळ विद्यापीठाचे वर्गणीदार सभासद झाले. प्रो. कर्वे यांनी भारतभर हिंडून अनेक सभासद व वर्गणीदार मिळविले. कुलपती म्हणून रामकृष्ण भांडारकर व कुलगुरु म्हणून रँग्लर र. पु. परांजपे यांनी काम पाहण्यास मान्यता दिली. कुलसचिव म्हणून प्रो. कर्वे यांची निवड झाली. | आणि 'भारतीय महिला विद्यापीठ' ही स्वतंत्र संस्था ३ जून १९१६ पासून कायदेशीरपणे अस्तित्वात आली. पुढे सन १९२० मध्ये सर विठ्ठलदास ठाकरसी |यांनी दरसाल साडेबावन्न हजार रुपये संस्थेला मिळत राहतील, एवढी देणगी दिली म्हणून संस्थेचे 'श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी विद्यापीठ' असे नामांतर करण्यात आले. अनेक विषयांच्या शाखा उपशाखांनी हे विद्यापीठ समृध्द झाले आहे. 


→ मूल्ये कर्तव्यदक्षता, श्रमनिष्ठा. 


→ अन्य घटना

 • महान चित्रकार व शिल्पकार कलामहर्षि बाबुराव पेंटर यांचा कोल्हापुर येथे जन्म १८९० सरहद्द गांधी खान अब्दुल गफारखान याचा जन्मदिन - १८९०

  • ऑलइंडिया रेडिओची स्थापना - १९३६

   •रिओडीजानीरो येथे पृथ्वी संमेलन १९९२ 

  • जागृतीकार भगवंतराव पाळेकर जन्म -१८८२ 

   

→ उपक्रम

 • महर्षी कर्वे यांच्या जीवनचरित्रातील कथा सांगा. महर्षी कर्व्यांचे विचार फलकावर लिहा. 

 

→ समूहगान

 बलसागर भारत होवो, विश्वात शोभुनी राहो.....


सामान्यज्ञान - 

• भारतातील 'पहिला' मान मिळविणाऱ्या काही महिला -

 • पहिली महिला राज्यपाल - सरोजिनी नायडू

  • पहिली महिला बॅरिस्टर - कार्नेलिया सोराबजी 

  • पहिली महिला राजदूत - विजयालक्ष्मी पंडित

   • पहिली महिला युनो अध्यक्ष - विजयालक्ष्मी पंडित

    • पहिली महिला पंतप्रधान - इंदिरा गांधी

     • पहिली महिला डॉक्टर - आनंदीबाई जोशी (१९)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा