Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

मंगळवार, ४ जून, २०२४

4 जून दैनंदिन शालेय परिपाठ

4 जून दैनंदिन शालेय परिपाठप्रार्थना 

देह मंदिर, चित्त मंदिर, एक तेथे प्रार्थना.....


 → श्लोक

  शील मुख्य नरामध्ये; टाकी जो तेच नाशुनी। काही अर्थ नसे त्याच्या धन - बांधव - जीवनी ॥

माणसाला (मनुष्यत्व देणाऱ्या गोष्टींमध्ये) मुख्य शील हे असते, पण तेच ज्याचें नष्ट झालेले तर असेल त्याच्या संपत्ति असण्याला, मोठे नातेवाईक असण्याला व जगण्याला सुध्दा काही अर्थ ठरत नाही.चिंतन

 दया करणे जे पुत्रासी । तेचि दासा आणि दासी तुका म्हणे सांगो किती । तेचि भगवंताची मूर्ती संत तुकाराम 

 जो माणूस मुलगा आणि नोकर यांच्याशी सारख्याच मायने वागतो त्याला साक्षात ईश्वरच समजावे, असे तुकाराम महाराज म्हणतात. माणसाचे मन दयाळू असेल, सर्वांना आपलेसे करून घेणारा गोडवा त्याच्या स्वभावात असला की तो सर्वांना देवाप्रमाणे वंदनीय वाटतो. अशा लोकांच्या मनात सर्वांबद्दल प्रेम असते. लहान - मोठा, गरीब - श्रीमंत असा भेदभाव नसतो. त्याला लोक मान देतात. त्याच्या एकेका शब्दांच मनापासून पालन करतात. धर्माचे अवडंबर न माजविता माणसाशी माणसाप्रमाणे वागणे हे जास्त महत्त्वाचे आहे.कथाकथन

 'निःस्वार्थी सखू आजी' एका छोट्या गावात एक म्हातारी राहत होती. गावाच्या बाहेर तिची झोपडी होती. या झोपडीत ती एकटीच राही. तिला कोणीच नातेवाईक नव्हते. पण गावचे लोक हेच तिचे नातेवाईक. तिचे नाव सखू, त्यामुळे सारे जण तिला सखूआजीच म्हणत. या सखूआजीचा व्यवसाय होता भाजीपाला आणि फुले विकण्याचा. तिच्या झोपडीच्या चहूबाजूंनी तिने बाग फुलवली होती. बागेत सुंदर सुंदर रंगाची फुले होती. बागेत फळे होती. अन् भाजीपाला होता. सखूआजी पहाटे पाच वाजता उठे. आपले सारे काम आवरून भाज्या, फुले, फळे तोडी आणि टोपलीत घालून गावात विकायला नेई. सखूआजीच्या बोलण्यामुळे आणि परवडेल अशा भावामुळे सारे जण तिच्या जवळचा भाजीपाला घेत. अशा या सखूआजीला स्वच्छतेचे भारी वेड. एवढ्या मोठ्या बागेत सुध्दा तिला काडी कचरा आवडत नसे. संध्याकाळी तिची बागेतील साफसफाई चाले. गळून पडलेली पाने, सुकलेली फुले, वाळलेल्या काड्या ती एकत्र करी. अन् लांब नेऊन फेके. तिचे झाडांवर भारीच प्रेम. स्वतःच्या मुलांना जपावं तशी ती झाडांना जपे. तिच्या या झाडांवरच्या प्रेमामुळे तिच्यावर वनदेवता प्रसन्न झाली अन् तिच्यासमोर प्रकट होऊन म्हणाली, 'सखू, मी तुझ्यावर प्रसन्न झाले. तुला काय मागायचं ते मागून घे.' वनदेवतेला वाटले, सखू आजी म्हणेल, ' हे वनदेवी, मला खूप संपत्ती दे, मोठा वाटा दे, मी ऐषआराम करू शकेन असे ऐश्वर्य दे.' पण सखूआजीने काय मागितले माहितीये? सखूआजी म्हणाली, 'हे वनदेवी, तू मला प्रसन्न झाली आहेस, तर मला एक वर दे.' जोपर्यंत माझे आयुष्य आहे, तो पर्यंत न थकता या झाडाची सेवा करीत राहीन असा वर दे.' वनदेवी हे ऐकून आश्चर्यचकित झाली अन् सखूआजीचा नि:स्वार्थीपणा तिला फार आवडला. ती म्हणाली, 'तथास्तु!' अन गुप्त झाली. आणि खरोखरच सखूआजीने शेवटपर्यंत झाडांची सेवा न थकता केली. 

 

→ सुविचार 

 • 'जोवर तुमची स्वतःवर श्रध्दा नाही, तो पर्यंत तुम्ही ईश्वरावर खरी श्रध्दा ठेवू शकणार नाही.'दिनविशेष

 बौध्द पंडित धर्मानंद कोसंबी स्मृतिदिन - १९४७ : धर्मानंद कोसंबी यांचा जन्म गोवा प्रांतातील साखळवळ या गावी सन १८७६ मध्ये झाला. तरुण वयातय त्यांच्या मनात बौध्द धर्माविषयी आकर्षण निर्माण झाले. त्यांनी घर सोडले. पुणे, ग्वाल्हेर, काशी येथे राहून संस्कृतचा अभ्यास केला. बौद्ध वाङ्मय हे पाली भाषेत असल्यामुळे ते गयेस राहून पाली भाषा शिकले. श्रीलंकेत व ब्रम्हदेशातील बौध्द विहारात राहून त्यांनी पाली भाषेतील मूळ ग्रंथांचा सखोल अभ्यास केला. अमेरिकेतील हार्वर्ड विद्यापीठातून त्यांना निमंत्रण आले. तेथे राहून त्यांनी 'विसुध्धिमग्न' या ग्रंथाचे संपादन केले. पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये, कलकत्ता विद्यापीठात तसेच रशियाच्या लेनिनग्राड विद्यापीठात त्यांनी पाली भाषेचे अध्यापन केले. - १९३० मध्ये ते म. गांधींच्या कार्यात समरस झाले. साबरमती सेवाग्राम या गांधी आश्रमातूनही काम करून त्यांनी दया क्षमा शांती या बौध्द 

 

 मूल्ये

  आदरभाव, कर्तव्यदक्षता.


अन्य घटना

 • शिवरायांची सुवर्णतुला - १६७४ समाजसुधारक महेंद्रनाथ स्मृतिदिन - १९३२

  • राष्ट्रसेवा दलाची स्थापना - १९४१

   • राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दुसरे सरसंघचालक मा. स. गोळवलकर गुरुजी यांचे निधन - १९७३

    • वेस्ट इंडिजचा क्रिकेटपटू ब्रायन लारा याने आठ डावात सात शतके ठोकून


→ उपक्रम

 गौतम बुध्दाच्या जीवनातील महत्त्वाच्या घटनांचे नाट्यीकरण करा.


समूहगान

  • हिंद देश के निवासी, सभी जन एक है.... 

  

→ सामान्यज्ञान -

 • १९८१ मधील जगाच्या लोकसंख्येच्या १५.२ टक्के लोकसंख्या भारतात होती. १९९१ मधील जगाच्या लोकसंख्येच्या १६ टक्केपर्यंत ही लोकसंख्या वाढली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा