Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

मंगळवार, ४ जून, २०२४

2 जून दैनंदिन शालेय परिपाठ

2 जून दैनंदिन शालेय परिपाठ




प्रार्थना

 आई माझा गुरु, आई कल्पतरु, सुखाचा सागर आई माझी..... 

 

→ श्लोक

 देतों में ताप लवमात्र कभी दुज्यांस । पायां कधी न पडतां खलदुर्जनांस || देता न सोडुनि कधी पथ सज्जनांचे थोडे मिळेल तरि ते अतिथोर साचे ||

 दुसऱ्या कोणाला त्रास न देता, दुर्जनांच्या पाया न पडता, सज्जनांचा मार्ग न सोडता जे काय थोडेसे मिळेल, तेच पुष्कळ समजून समाधान मानणे हिताचे आहे. 

 

→ चिंतन 

- अन्यायाचे पिंजरे तोडून टाकल्याशिवाय मुक्ती होत नाही : माणसाला आयुष्यात अनेक प्रकारच्या घटनांना सामोरे जावे लागते. या घटन त्याच्या मनावर अनेक प्रकारचे परिणाम घडवितात. चांगल्या घटनांमुळे माणसाला उत्साह येतो, बळ येते. काही घटना माणसावर अन्याय करतात. प अन्यायाला जो भितो तो माणूसच नव्हे. माणसाने धैर्याने अन्यायाचा सामना करुन त्याचे अडथळे मोडून काढून पुढे जायला हवे तरच यशाचा मार्ग



कथाकथन

 पैशाचं झाड अनुप सारखा वडिलांच्या मागे ही वस्तु घेऊन द्या, ती वस्तु घेऊन या, असा हट्ट धरायचा, त्यामुळे ते त्याच्या नेहमीच्या मागण्यांनी हैराण व्हायचे. एके दिवशी त्याने घरच डोक्यावर घेतले. 'आताच्या आता मला खरोखरीचे विमान घेऊन या.' वडिलांनी त्याला खूप समजावल पण तो ऐकायलाच तयार होत नव्हता. त्यांनी त्याला सांगितले की, 'विमान घ्यायला पैशाचे झाड लागत ते आपल्याकडे नाहीय.' त्याचा पुन्हा प्रश्न 'पैशाव झाड कोठे मिळते?" त्याच्या वडिलांनी हात टेकले व संतापात त्याच्या कानात दोन लगावल्याच. तेव्हा तो रडत रडत बाहेर येऊन बसला, तो रडत असताना पाहून रस्त्याने जाणारे साधू यांबले व त्याला म्हणाले, 'काय रे बाळ, का रडतोस?' त्यावर तो म्हणाला, 'साधू महाराज मला खरोखरीचे विमान हवे आहे. बाबांकडे हट्ट धरला तेव्हा ते म्हणाले की, विमान घेण्यासाठी मोठ पैशाचं झाड पाहिजे. ते पैशाच झाड कोठे मिळेल याचाच विचार करतोय.' त्यावर साधू गालातल्या गालात हसते. त्यांनी बाळाला सांगितले की, 'बाळा, तुला पैशाचे झाड हवंय ना? ते मी तुला देतो.' असं म्हणून त्यांनी त्यांच्या पिशवीतून काही बिया काढल्या व त्या अनुपच्या हातात देऊन म्हणाले, 'बाळ त्या बिया जमिनीत पेर. त्यांना योग्य पाणी दे. त्यांची निगा राख. त्या बियांतून पुढे मोठे झाड तयार होईल.' एवढे बोलून साधू निघून गेले. इकडे बाळ खूप खूष झाला. पैशाचे झाड मिळाले. हे झाड मोठे झाले की, जोरजोराने हलवू व नागेल तेवढा पैसा गोळा करू. या आनंदाने तो बिया घेऊन बगिच्याकडे पळाला. जमीन खोदून त्या रोवल्या. त्यांना नियमित पाणी दिले, त्यांची व्यवस्थित निगा राखली. दिवसामागून दिवस गेले. त्या बियांची मोठ मोठी फुलाफळांची झाडे झाली. मुलगाही मोठा झाला. त्यालाही तोपर्यंत समजायला लागले की, पैशाचे झाड नसते. या फुला फळांना विकूनच पैसे येतील. म्हणून त्याने ती फुले-फळे गोळा केली बाजारात जाऊन पैसे घेऊन आला. पैसे मिळविण्यासाठी किती कष्ट घ्यावे लागतात, हे त्याला या घटनेतून समजले व या पुढे पैशाची उधळपट्टी करायची नाही हेही चांगलेच समजले.

 

 सुविचार

  उद्योगप्रियता, बुध्दिमत्ता व चिकाटी यामुळे कीर्ती व सद्भाग्य लाभते.' 

  


→ दिनविशेष इटालियन देशभक्त गरिवाली स्मृतिदिन १८८२ : गरिबाल्डी हा योर इटालियन योध्दा होता. गरिबाली देशभक्त मनीच्या - विचाराने प्रभावित होऊन 'यंग इटली' या संस्थेचा सदस्य बनला. मेक्सिकोमध्ये भूमिगत राहुन तेथून सतत १२ वर्षे त्याने राष्ट्रीय चवीत व अनेक सघात भाग घेतला. इटलीत परतल्यावर स्वयंपूर्ण सैन्य उभे करुन त्याने ऑस्ट्रियाविरुद्ध सतत ला दिला. १८६० साली गरिबाल्डीने एक हजार | निवडक स्वातंत्र्यसैनिक घेऊन चिखली बेटावर गनिमी पध्दतीने हा राज्य मुक्त केले. गरिबालीच्या गरुडझेपेमुळे व त्यात असलेल्या जनतेच्या पाठिंब्यामुळे थोड्याच वर्षात इटली मुक्त झाला. १८६६ साली त्याने व्हेनिशियाचा प्रदेश ऑस्ट्रियाच्या हातातून सोडविला. यावेळी गरिबाल्डीने अपूर्व त्याग केला. आपापसात युद्ध टाळण्यासाठी त्याने सेनापतीपद सोडून दिले व स्वतः जिंकलेला प्रदेश विनाअट सार्डिनिया राज्यात विलीन करून तो आपल्या गावी निघून गेला. 


→ मूल्ये

 स्वाधीनता, कर्तव्यदक्षता, राष्ट्रप्रेम, नियता

 

→ अन्य घटना 

थोर विचारवंत डॉ. श्रीकांत जियकार स्मृतीदिन -२००४ अक्रम यांनी टेलिफोनचा शोध लावला. १८६२ 


→ उपक्रम

 न. चि. केळकरांचे 'गॅरिडी' हे चरित्र वाचा. 

 

-> समूहगान 

-• सारे जहाँ से अच्छा हिंदोस्तों हमारा....


. → सामान्यज्ञान

 देश व त्यांचे स्वातंत्र्यदिन : बांगला देश -१७ डिसेंबर 

 • अमेरिका - ४ जुलै 

 • • फ्रान्स - १४ जुलै 

• इंडोनेशिया - १७ ऑगस्ट 

• श्रीलंका - ४ फेब्रुवारी म्यानमार (ब्रम्हदेश) -४ जानेवारी

 

जगातील सर्वात मोठी बेटे.


नाव-क्षेत्रफळ (चौ.किमी)स्थान

ग्रीनलँड (डेन्मार्कच्या मालकीचे बेट)उत्तर अटलांटिक महासागर

न्यू गिनी (पापुआ व इंडोनेशिया) ७,९२,५०० -आग्नेय पॅसिफिक महासागर

• बॅफिन लँड (कॅनडा) ५,०७,५००- आर्क्टिकमहासागर

सुमात्रा (इंडोनेशिया)२,२७,५८१-हिंदी महासागर 

व्हिक्टोरिया (कॅनडा) २,१८,१००-आर्क्टिक महासागर

• होन्शू (जपान२,२७,४१४ -पॅसिफिक महासागर

• बोर्निओ (इंडोनेशिया)७,२५,५००-आग्नेय पॅसिफिकमहासागर

• मादागास्कर (स्वतंत्र देश ) ५,८७,०००   -हिंदी महासागर

ब्रिटीश बेटे(युनायटेड किंग्डम) ४,२७,३००-उत्तर अटलांटिक महासागर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा