13.स्वातंत्र्यलढ्याची परिपूर्ती
स्वाध्याय
प्रश्न. पुढील प्रत्येक प्रश्नासमोर दिलेल्या पर्याय-क्रमांकांपैकी अचूक उत्तराच्या पर्याय-क्रमांकाचे वर्तुळ रंगवा :
1. भारत स्वतंत्र झाला, तेव्हा भारतात लहान-मोठी अशी 600 च्यावर ----होती.
(1) राज्ये
(2) खेडी
(3) संस्थाने
(4) शहरे
उत्तर-संस्थाने
____________
2. भारत स्वतंत्र झाला, तेव्हा संस्थनांबरोबरच भारतातील काही प्रदेश---- व ----यांच्या वर्चस्वाखाली होते.
(1) पोर्तुगीज व फ्रेंच
(2) फ्रेंच व डच
(3) पोर्तुगीज व इंग्रज
(4) फ्रेंच व अमेरिका
उत्तर-पोर्तुगीज व फ्रेंच
______________
3. भारतीय संस्थानांतील प्रजेच्या हितासाठी व त्यांना राजकीय अधिकार मिळावेत, यासाठी काम करणारी जनसंघटना-------
(1) जनमंडळे
(2) प्रजामंडळे
(3) लोकमंडळे
(4) प्रजाहक्क मंडळे
उत्तर-प्रजामंडळे
____________
4. संस्थानांच्या विलीनीकरणाचा प्रश्न मुत्सद्देगिरीने व खंबीरपणे कोणी सोडवला ?
(1) पंडित जवाहरलाल नेहरू
(2) लाल बहादूर शास्त्री
(3) डॉ. राजेंद्रप्रसाद
(4) सरदार वल्लभभाई पटेल
उत्तर-सरदार वल्लभभाई पटेल
________________
5. सरदार वल्लभभाई पटेल यांनी संस्थानिकांना विश्वासात घेऊन त्यांना सर्वांना मान्य होईल असा----- तयार केला.
(1) करारनामा
(2) हमीनामा
- (3) सामीलनामा
(4) स्वीकारनामा
उत्तर-सामीलनामा
_____________
6. जुनागड,-----व काश्मीर या संस्थानांचा अपवाद वगळता
सर्व संस्थाने भारतात विलीन झाली.
(1) औंध
(2) झाशी
(3) वडोदरा
(4) हैदराबाद
उत्तर-हैदराबाद
____________
7. जुनागड हे----- एक संस्थान होते.
(1) कच्छमधील
(2) सौराष्ट्रातील
(3) राज्यस्थानातील
(4) पूर्व गुजरातमधील
उत्तर-सौराष्ट्रातील
____________
8. हैदराबाद संस्थानामध्ये----- याची एकतंत्री राजवट होती.
(1) नवाब
(2) निजाम
(3) सुलतान
(4) मुघल
उत्तर-निजाम
__________
9. जुनागड संस्थान भारतात विलीन झाले; कारण-----
(1) नवाब पाकिस्तानमध्ये निघून गेला.
(2) नवाबाने सामीलनामा स्वीकारला.
(3) नवाब मारला गेला.
(4) नवाबाने पोलीस कारवाईत शरणागती पत्कारली.
उत्तर-नवाब पाकिस्तानमध्ये निघून गेला.
_________________
10. चित्रामध्ये दाखवलेली व्यक्ती कोणत्या घटनेशी संबंधित आहे?
(1) गोवा मुक्तिसंग्राम
(2) हैदराबाद मुक्तिसंग्राम
(3) जुनागड विलीनीकरण
(4) काश्मीर प्रश्न
उत्तर-हैदराबाद मुक्तिसंग्राम
______________
11. पुढील पर्यायांतील अयोग्य जोडी निवडा.
(1) तेलंगण - आंध्र परिषद
(2) मराठवाडा - महाराष्ट्र परिषद
(3) कर्नाटक - कर्नाटक परिषद
(4) आंध्र प्रदेश - आंध्र परिषद
उत्तर-आंध्र प्रदेश - आंध्र परिषद
___________________
12. हैदराबाद संस्थान भारतात विलीन करण्याची मागणी धुडकावून लावण्यासाठी रझाकार संघटनेची स्थापना कोणी केली ?
(1) निजाम
(2) नवाब
(3) कासीम रझवी
(4) राजा हरिसिंग
उत्तर-कासीम रझवी
______________
13.------ रोजी 'ऑपरेशन पोलो 'ने हैदराबादच्या निजामाविरुद्ध कारवाई केली.
(1) 13 सप्टेंबर 1948
(2) 17 सप्टेंबर 1948
(3) 13 सप्टेंबर 1947
(4) 15 सप्टेंबर 1948
उत्तर-13 सप्टेंबर 1948
_________________
14. हैदराबाद मुक्तिलढ्यात----- विशेष योगदान होते.
(1) प्रार्थना समाजाचे
(2) सत्यशोधक समाजाचे
(3) ब्राह्मो समाजाचे
(4) आर्य समाजाचे
उत्तर-आर्य समाजाचे
________________
15.------मुक्तिदिवस 'मराठवाडा मुक्तिदिन' म्हणून साजरा केला जातो.
(1) गोवा
(2) काश्मीर
(3) हैदराबाद
(4) जुनागड
उत्तर-हैदराबाद
____________
16-------हा हैदराबाद मुक्तिसंग्रामाचा दिवस मराठवाड्यात 'मराठवाडा मुक्तिदिन' म्हणून साजरा केला जातो.
(1) 13 सप्टेंबर
(2) 19 सप्टेंबर
(3) 2 ऑगस्ट
(4) 17 सप्टेंबर
उत्तर-17 सप्टेंबर
_____________
17. 'वंदे मातरम्' या चळवळीद्वारे----- मुक्तिलढ्यात सहभागी झाले. हैदराबाद
(1) शेतकरीही
(2) निजामाचे सैन्यही
(3) विदयार्थीही
(4) कामगारही
उत्तर-विदयार्थीही
______________
18. स्वतंत्र भारतात मराठवाड्याचा समावेश----साली करण्यात आला.
(1) 1947
(2) 1948
(3) 1949
(4) 1950
उत्तर-1948
_________
19. हैदराबाद स्टेट काँग्रेसला मान्यता मिळवण्यासाठी व लोकशाही हक्कांसाठी जो लढा झाला, त्याचे नेतृत्व कोणी केले ?
(1) नारायण रेड्डी
(2) नरसिंग राव
(3) स्वामी रामानंद तीर्थ
(4) स्वामी सहजानंद भारती
उत्तर-स्वामी रामानंद तीर्थ
_______________
20. काश्मीर भारतात विलीन करण्याच्या करारावर राजा---- याने स्वाक्षरी केल्यानंतर भारतीय लष्कर काश्मीरच्या रक्षणासाठी पाठवण्यात आले.
(1) करणसिंग
(2) कर्णीसिंग
-(3) हरिसिंग
(4) गुलाबसिंग
उत्तर-हरिसिंग
__________
21. 1949 मध्ये----- या फ्रेंच वसाहतीतील लोकांनी सार्वमतात भारताच्या बाजूने कौल दिला.
(1) कारिकल
(2) माहे
(3) चंद्रनगर
(4) गोवा
उत्तर-चंद्रनगर
___________
22. 19 डिसेंबर 1961 या दिवशी पोर्तुगिजांच्या ताब्यातील---- वसाहत भारतात विलीन झाली.
(1) दादरा-नगरहवेली
(2) पुदुच्चेरी
(3) चंद्रनगर
(4) गोवा
उत्तर-गोवा
_________
23. 1945 मध्ये ----- यांनी 'गोवा युथ लीग' ही संघटना मुंबईत स्थापन केली.
(1) डॉ. राम मनोहर लोहिया
(2) ना. ग. गोरे
(3) डॉ. टी. बी. कुन्हा
(4) पीटर अल्वारिस
उत्तर-डॉ. टी. बी. कुन्हा
________________
24. गोवा मुक्तिसंग्रामातील बंदीहुकूम मोडून मडगाव येथे भाषण कोणी केले ?
(1) डॉ. राम मनोहर लोहिया
(2) ना. ग. गोरे
(3) डॉ. टी. बी. कुन्हा
(4) पीटर अल्वारिस
उत्तर-डॉ. राम मनोहर लोहिया
___________________
25. गोवा मुक्ती आंदोलनातील ----हे एक धडाडीचे नेते होते.
(1) स्वामी रामानंद तीर्थ
-(3) मोहन रानडे
(2) गोविंदभाई श्रॉफ
(4) बाबासाहेब परांजपे
उत्तर-मोहन रानडे
_____________
26. 'आझाद गोमंतक दला 'च्या तरुणांनी 2 ऑगस्ट 1954 रोजी सशस्त्र हल्ला करून -----हा प्रदेश पोर्तुगिजांच्या सत्तेपासून. मुक्त केला.
(1) दीव व दमण
(2) गोवा
(3) दादरा व नगरहवेली
(4) चंद्रनगर व माहे
उत्तर-दादरा व नगरहवेली
_________________
27. गुजरातमधील दादरा व नगरहवेली येथील पोर्तुगीज वसाहती मुक्त करण्यासाठी----- दलाची उभारणी करण्यात आली.
(1) गुजरात युथ लीग
(2) रझाकार
(3) आझाद गोमंतक
(4) गुजरात काँग्रेस समिती
उत्तर-आझाद गोमंतक
_____________
28. -----मध्ये गोवामुक्ती समितीची स्थापना करण्यात आली.
(1) 1953
(2) 1954
(3) 1960
(4) 1961
उत्तर-1954
__________
29. संस्थानांमध्ये---. प्रभावामुळे राजकीय आंदोलनाला सुरुवात झाली.
(1) चंपारण्य सत्याग्रहाच्या
(2) कायदेभंग चळवळीच्या
(3) असहकार चळवळीच्या
(4) 'छोडो भारत' चळवळीच्या
उत्तर-असहकार चळवळीच्या
__________________
30.----हे भारतातील सर्वांत मोठे संस्थान होते.
(1) काश्मीर
(2) जुनागड
(3) हैदराबाद
(4) गोवा
उत्तर-हैदराबाद
____________
31. हैदराबाद संस्थानात पुढील भाषिक गटांचे लोक राहत होते.
(1) तेलुगु, कन्नड, मराठी
(2) तेलुगु, उर्दू, कन्नड
(3) तेलुगु, कन्नड, मल्याळी
(4) तेलुगु, मल्याळी, उर्दू
उत्तर-तेलुगु, कन्नड, मराठी
__________________
32. पुढीलपैकी कोणता प्रदेश फ्रेंचांच्या आधिपत्याखाली नव्हता ?
(1) पुदुच्चेरी
(2) चंद्रनगर
(3) कारिकल
(4) जुनागड
उत्तर-जुनागड
__________
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा