12
स्वातंत्र्यप्राप्ती
स्वाध्याय
प्रश्न. पुढील प्रत्येक प्रश्नासमोर दिलेल्या पर्याय-क्रमांकांपैकी अचूक उत्तराच्या पर्याय-क्रमांकाचे वर्तुळ रंगवा :
1. सन 1930 मध्ये स्वतंत्र मुस्लीम राष्ट्राचा विचार कोणी मांडला ? }
(1) बॅरिस्टर महम्मद अली जीना
(2) डॉ. मुहम्मद इक्बाल
(3) चौधरी रहमत अली
(4) मौलाना आझाद
उत्तर-डॉ. मुहम्मद इक्बाल
__________________
2. वेव्हेल योजनेतील योग्य / बरोबर विधान कोणते ते ओळखा.
(1) 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताची फाळणी होऊन भारत व पाकिस्तान ही दोन स्वतंत्र राष्ट्रे अस्तित्वात येतील.
(2) अल्पसंख्यांकांचे प्रश्न भारताच्या स्वातंत्र्याच्या आड येणार नाहीत.
(3) केंद्रीय व प्रांतिक विधिमंडळांत दलित व अल्पसंख्याकांना योग्य प्रतिनिधित्व देण्यात येईल.
(4) संस्थानांवरील ब्रिटिशांचे सार्वभौमत्व संपुष्टात येईल.
उत्तर-केंद्रीय व प्रांतिक विधिमंडळांत दलित व अल्पसंख्याकांना योग्य प्रतिनिधित्व देण्यात येईल.
_________________
3. राष्ट्रीय सभेची उभारणी----- तत्त्वावर झाली होती.
(1) स्वातंत्र्याच्या
(2) हिंदुत्वाच्या
(3) चळवळीच्या
(4) धर्मनिरपेक्षतेच्या
उत्तर-धर्मनिरपेक्षतेच्या
_______________
4. वेव्हेल योजनेवर विचार करण्यासाठी भारतातील प्रमुख राजकीय पक्षांची बैठक----- येथे आयोजित करण्यात आली होती.
(1) दिल्ली
(2)कोलकाता
(3) सिमला
(4) मुंबई
उत्तर-सिमला
__________
5. व्हॉइसरॉयच्या कार्यकारी मंडळात मुस्लीम प्रतिनिधींची नावे सुचवण्याचा अधिकार केवळ मुस्लीम लीगला असावा, असा आग्रह कोणी धरला ?
(1) मुझफ्फर हुसेन
(2) महात्मा गांधी
(3) सिराज-उल-हसन
(4) बॅरिस्टर जीना
उत्तर-बॅरिस्टर जीना
_____________
6. ब्रिटिश पार्लमेंटमध्ये भारतीय जनतेचा भारतीय संविधान तयार करण्याचा अधिकार कोणी मान्य केली?
(1) स्टॅफर्ड क्रिप्स
(2) लॉर्ड अॅटली
(3) ए. व्ही. अलेक्झांडर
(4) पॅथिक लॉरेन्स
उत्तर-लॉर्ड अॅटली
____________
7. योग्य पर्याय निवडा :
'त्रिमंत्री योजने 'तील तीन ब्रिटिश मंत्री
(1) लॉर्ड अॅटली, स्टॅफर्ड, क्रिप्स, पॅथिक लॉरेन्स
(2) पॅथिक लॉरेन्स, स्टॅफर्ड क्रिप्स, ए. व्ही. अलेक्झांडर
(3) पॅथिक लॉरेन्स, लॉर्ड माउंटबॅटन, ए. व्ही. अलेक्झांडर
(4) ए. व्ही. अलेक्झांडर, स्टॅफर्ड क्रिप्स, लॉर्ड वेव्हेल
उत्तर-पॅथिक लॉरेन्स, स्टॅफर्ड क्रिप्स, ए. व्ही. अलेक्झांडर
___________________
8. तीन ब्रिटिश मंत्र्यांच्या शिष्टमंडळाने भारताच्या संदर्भात इंग्लंडची जी योजना आहे ती भारतीय नेत्यांसमोर मांडली; त्या योजनेस ------म्हणतात.
(1) क्रिप्स योजना
(2) लॉरेन्स योजना
(3) त्रिमंत्री योजना
(4) वेव्हेल योजना
उत्तर-त्रिमंत्री योजना
___________
9. ------यांनी द्विराष्ट्र सिद्धांत मांडून 'पाकिस्तान' या स्वतंत्र मुस्लीम राष्ट्राची मागणी केली.
(1) बॅरिस्टर महम्मद अली जीना
(2) चौधरी रहमत अली
(3) डॉ. मुहम्मद इक्बाल
(4) आगाखान
उत्तर-बॅरिस्टर महम्मद अली जीना
________________
10. मुस्लीम लीगने 16 ऑगस्ट 1946 हा दिवस ----- म्हणून पाळण्याचे जाहीर केले.
(1) अहिंसा दिन
(2) धार्मिक दिन
(3) प्रत्यक्ष कृतिदिन
(4) स्वातंत्र्य लढादिन
उत्तर-प्रत्यक्ष कृतिदिन
________________
11. महात्मा गांधी ---- प्रांतातील नोआखाली येथे शांतता प्रस्थापित. करण्यासाठी गेले.
(1) बंगाल
(2) पंजाब
(3) हैदराबाद
(4) जुनागढ
उत्तर-बंगाल
_________
12. हंगामी सरकारचे ----- हे प्रमुख होते.
(1) वल्लभभाई पटेल
(2) महात्मा गांधी
(3) पं. जवाहरलाल नेहरू
(4) बॅ. जीना
उत्तर-पं. जवाहरलाल नेहरू
__________________
13. सुरुवातीस ---- हंगामी सरकारमध्ये सहभागी होण्यास. नकार दिला.
(1) राष्ट्रीय सभेने
(2) मुस्लीम लीगने
(3) हिंदू महासभेने
(4) किसान संघटनेने
उत्तर-मुस्लीम लीगने
________________
14. भारतीय स्वातंत्र्याच्या आड---- प्रश्न येणार नाहीत, असे प्रधानमंत्री अॅटली याने भारतीयांना आश्वासन दिले.
(1) दलितांचे
(2) उच्चवर्णीयांचे
(3) अल्पसंख्याकांचे
(4) संस्थानिकांचे
उत्तर-अल्पसंख्याकांचे
_______________
15. इंग्लंडचे प्रधानमंत्री----- यांनी इंग्लंड जून 1948 पूर्वी भारतावरील आपली सत्ता सोडून देईल, असे घोषित केले.
(1) विन्स्टन चर्चिल
(2) लॉर्ड माउंटबॅटन
-(3) अॅटली
(4) लॉर्ड वेव्हेल
उत्तर-अॅटली
________
16. भारत व पाकिस्तान या दोन स्वतंत्र राष्ट्रांची निर्मिती करण्याची योजना----- यांनी तयार केली.
(1) लॉर्ड वेव्हेल
(2) स्टॅफर्ड क्रिप्स
(3) लॉर्ड माउंटबॅटन
(4) पॅथिक लॉरेन्स
उत्तर-लॉर्ड माउंटबॅटन
_______________
17. ब्रिटिश पार्लमेंटने भारताच्या स्वातंत्र्याचा कायदा केव्हा संमत केला?
(1) 15 ऑगस्ट 1947
(2) 18 जुलै 1947
(3) 14 ऑगस्ट 1947
(4) 17 जुलै 1947
उत्तर-18 जुलै 1947
_______________
18. कोणत्या योजनेच्या आधारे 18 जुलै 1947 रोजी इंग्लंडच्या पार्लमेंटने भारताच्या स्वातंत्र्याचा कायदा संमत केला?
(1) पॅथिक लॉरेन्स योजना
(2) स्टॅफर्ड क्रिप्स योजना
(3) ए. व्ही. अलेक्झांडर योजना
(4) माउंटबॅटन योजना
उत्तर-माउंटबॅटन योजना
_____________
19. -----नुसार 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले.
(1) माउंटबॅटन योजना
(2) त्रिमंत्री योजना
(3) वेव्हेल योजना
(4) भारतीय स्वातंत्र्याचा कायदा
उत्तर-भारतीय स्वातंत्र्याचा कायदा
________________
20. भारतीय स्वातंत्र्याच्या कायद्यातील तरतुदी या संदर्भानुसार चुकीचा पर्याय निवडा.
(1) 15 ऑगस्ट 1947 नंतर ब्रिटिश पार्लमेंटचा भारतावर अधिकार राहणार नाही.
(2) भारताची फाळणी होऊन भारत व पाकिस्तान ही स्वतंत्र राष्ट्रे अस्तित्वात येतील.
(3) केंद्रीय व प्रांतिक विधिमंडळांत मुस्लीम, दलित व अल्पसंख्याकांना योग्य प्रतिनिधित्व देण्यात येईल.
(4) भारतातील स्वतंत्र संस्थांनांवरीलही ब्रिटिशांचे सार्वभौमत्व संपुष्टात येईल.
उत्तर-केंद्रीय व प्रांतिक विधिमंडळांत मुस्लीम, दलित व अल्पसंख्याकांना योग्य प्रतिनिधित्व देण्यात येईल.
__________________
21.------ रोजी नथुराम गोडसे याने गांधीजींची हत्या केली.
(1) 30 जानेवारी 1948
(2) 31 जानेवारी 1948
(3) 30 जून 1948
(4) 30 जुलै 1948
उत्तर-30 जानेवारी 1948
________________
22. भारताचे शेवटचे व्हाइसरॉय----
(1) लॉर्ड वेव्हेल
(2) लॉर्ड माउंटबॅटन
(3) लॉर्ड रे
(4) लॉर्ड माँटेग्यू
उत्तर-लॉर्ड माउंटबॅटन
_____________
23. पुढील घटनांचा क्रम लावा :
(अ) माउंटबॅटन योजना
(ब) हंगामी सरकारची योजना
(क) त्रिमंत्री योजना
(ड) प्रत्यक्ष कृतिदिन पाळला.
(1) (क),(ङ),(ब),(अ)
(2) (ब), (अ),(ड),(क)
(3) (क), (ङ),(अ), (ब)
(4) (ड), (ब),(क), (अ)
उत्तर-(क),(ङ),(ब),(अ)
_______________
24. घटना व वर्ष यांच्या योग्य जोड्या जुळवा :
'अ' गट
(i) वेव्हेल योजना जाहीर
(ii) त्रिमंत्री योजनेतील मंत्र्यांची भारतभेट
(iii) भारत स्वतंत्र झाला
(iv) महात्मा गांधी यांची हत्या
'ब' गट
(अ) मार्च 1946
(ब) जानेवारी 1948
(क) जून 1945
(ड) ऑगस्ट 1947
(1) (i - अ);(ii - ब);(iii - ड);
(iv - क)
(2) (i - अ);(ii - क);(iii - ब);
(iv - ड)
(3) (i -क);(ii - अ);(iii - ड);
(iv - ब)
(4) (i - ब);(ii - अ);(iii - ड);
(iv - क)
उत्तर-(i -क);(ii - अ);(iii - ड);
(iv - ब)
___________________
25.सुरुवातीस हंगामी सरकारमध्ये सहभागी होण्यास कोणी नकार दिला होता?
(1) राष्ट्रीय सभा
(2) मुस्लीम लीग
(3) हिंदू महासभा
(4) किसान सभा
उत्तर-मुस्लीम लीग
______________&
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा