Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

शुक्रवार, २ फेब्रुवारी, २०२४

आठवी इतिहास नागरिकशास्त्र 2 भारताची संसद

 आठवी इतिहास नागरिकशास्त्र 

2 भारताची संसद


संसद
उत्तर : (१) राष्ट्रीय पातळीवरील शासन यंत्रणेच्या कायदेमंडळाला 'संसद' असे म्हणतात.
(२) संसदेत राष्ट्रपती, लोकसभा व राज्यसभा यांचा समावेश होतो. (३) भारताच्या संविधानानेच संसदेची निर्मिती केली आहे.
(४) संपूर्ण देशासाठी कायदे निर्माण करणे, अस्तित्वात असलेले कायदे रद्द करणे किंवा कायदयात दुरुस्ती करणे ही संसदेची मुख्य कामे आहेत.
---––--------------------------
(२) संविधान दुरुस्ती.
उत्तर : (१) संविधानातील तरतुदींत कालानुरूप काही बदल करावे लागतात, त्यासाठी काही प्रक्रिया करावी लागते, त्यालाच 'संविधान दुरुस्ती प्रक्रिया' असे म्हणतात.
(२) संविधानात बदल करण्याचा अधिकार फक्त
संसदेलाच असतो. (३) संविधानात बदल करण्याचा प्रस्ताव संसदेत मांडणे हीबाब महत्त्वाची असते.(४) या प्रस्तावानंतर संसदेत त्यावर चर्चा, विचारविनिमय होऊन विशिष्ट पद्धतीनेच संविधानात बदल केले जातात.
---––--------------------------
(३) खासदार.
उत्तर : (१) संसदेच्या सभासदास 'खासदार' असे म्हणतात.
(२) लोकसभेचे खासदार थेट जनतेकडून; तर राज्यसभेचे खासदार विधानसभेच्या सभासदांकडून निवडून येतात.
(३) आपल्या मतदारसंघातील जनतेचे प्रश्न, समस्या संसदेत मांडण्याचे काम खासदार करतात.
(४) कायदेनिर्मितीत संसदेचे खासदार सहभागी होतात
---––--------------------------

राज्यसभेचे सभापती.
उत्तर : (१) भारताचे उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे
पदसिद्ध सभापती असतात. (२) राज्यसभेचे संपूर्ण कामकाज पार पाडण्याची जबाबदारी सभापतींवर असते.
(३) सभागृहात शिस्त राखून नियमांप्रमाणे कामकाज
चालवणे हे राज्यसभेच्या सभापतींचे काम असते.
(४) सभागृहात चर्चा घडवून आणणे आणि चर्चेत सदस्यांना बोलण्याची संधी देणे ही जबाबदारी राज्यसभेच्या सभापतींची असते.
---––--------------------------
(२) लोकसभेचे अध्यक्ष.

उत्तर : (१) लोकसभेच्या निवडणुकीनंतर पहिल्या बैठकीत लोकसभेच्या अध्यक्षांची निवड होते. (२) लोकसभेचे सदस्य आपल्यातून एकाची अध्यक्ष
म्हणून निवड करतात. (३) लोकसभाध्यक्षांच्या मार्गदर्शनानुसार
व नियंत्रणाखाली लोकसभेचे कामकाज चालू असते. (४) नियमानुसार व निष्पक्षपातीपणे सभागृहाचे कामकाज चालवण्याची जबाबदारी लोकसभाध्यक्षांची असते.
---––--------------------------
(३) मंत्रिमंडळावर नियंत्रण.
उत्तर : (१) संसदेचे मंत्रिमंडळावर नियंत्रण असते.
कारण मंत्रिमंडळ आपल्या कामाबाबत संसदेला जबाबदार
असते. (२) संसदेचे सभासद विविध मार्गांचा अवलंब करूनमंत्रिमंडळावर नियंत्रण ठेवत असतात.
(३) संसदेला डावलून मंत्रिमंडळ कारभार करणार नाही, हे पाहण्याची जबाबदारी संसदेवर असते.
(४) लोकसभेने मंत्रिमंडळावर अविश्वासाचा ठराव
संमत केल्यास मंत्रिमंडळाला राजीनामा दयावा लागतो.
---––--------------------------
लोकसभेचे सदस्य कसे निवडले जातात ?
उत्तर : (१) लोकसभेची सदस्यसंख्या जास्तीत जास्त ५५२ इतकी असते.
(२) दर पाच वर्षांनी सार्वत्रिक निवडणुका होऊन जनतेकडून लोकसभेचे सदस्य निवडून येतात.
(३) देशातील सर्व समाजघटकांना प्रतिनिधित्व मिळावे, म्हणून अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती यांच्यासाठी काही जागा राखून ठेवलेल्या असतात.
(४) लोकसभेत अँग्लो इंडियन समाजास पुरेसे प्रतिनिधित्व नसल्यास त्या समाजाच्या दोन प्रतिनिधींची नेमणूक राष्ट्रपतींकडून केली जाते.
---––--------------------------
 लोकसभेच्या अध्यक्षांची कामे स्पष्ट करा.

उत्तर : लोकसभेच्या अध्यक्षांची कामे-
(१) संपूर्ण सभागृहाचे कामकाज निःपक्षपातीपणे व सुरळीतपणे चालवणे.
(२) लोकसभेच्या सभासदांच्या विशेष अधिकारांचे वहक्कांचे संरक्षण करणे.(३) लोकसभेच्या कामकाजविषयक नियमांचा अर्थ
लावून त्यानुसार कामकाज चालवणे.
(४) सभागृहाची प्रतिष्ठा राखणे.
---––--------------------------
(३) लोकसभेच्या निवडणुकांविषयी माहिती लिहा
.
उत्तर : (१) लोकसभा हे जनतेचे प्रतिनिधित्व करणारे सभागृह असल्याने दर पाच वर्षांनी लोकसभेच्या निवडणुका होतात.
(२) दर पाच वर्षांनी होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकांना 'सार्वत्रिक निवडणुका' असे म्हणतात.
(३) काही वेळा लोकसभा मुदतीपूर्वीच विसर्जित होते. अशा वेळी घेतल्या जाणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकांना 'मध्यावधी निवडणुका' असे म्हणतात.
(४) लोकसभेच्या सभासदाने सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यास वा त्याचा अपमृत्यू झाल्यास त्या मतदार संघात निवडणूक घेतली जाते, अशा निवडणुकांना 'पोट निवडणुका' असे म्हणतात. अशा रितीने विविध कारणांसाठी
---––--------------------------
राज्यसभेची रचना स्पष्ट करा.
उत्तर : राज्यसभेची रचना पुढीलप्रमाणे असते. -
(१) राज्यसभेची एकूण सदस्यसंख्या २५० इतकी असते
---––--------------------------
संसदेची कार्ये स्पष्ट करा.
उत्तर : संविधानाची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी आणि जनतेचे हित साधण्यासाठी संसदेला पुढील कामे करावी लागतात
(१) नव्या कायदयांची निर्मिती करणे व कालबाह्य कायदे रद्द करणे.(२) अस्तित्वात असलेल्या कायदयांत योग्य ते बद करणे.(३) भारताच्या संविधानात आवश्यक ते बदल व दुरुस्त्या करणे.(४) मंत्रिमंडळावर नियंत्रण ठेवणे.
---––--------------------------

(६) भारतीय संविधानात कोणत्या पद्धतींनी बदल
करता येतो ?

उत्तर : भारतीय संविधानात पुढील पद्धतींनी बदल करता येतो
(१) संविधानाच्या काही तरतुदी संसद साध्या बदलू शकते. बहुमताने(२) काही तरतुदी संसद विशेष बहुमताने बदलते.
(३) काही तरतुदींत बदल करण्यासाठी संसदेचे विशेष
---––--------------------------
लोकसभेला पहिले सभागृह म्हणतात.
उत्तर : (१) लोकसभेला संसदेचे कनिष्ठ आणि प्रथम सभागृह मानले जाते.
(२) लोकसभेचे सभासद थेट जनतेकडून निवडले जातात.
(३) लोकसभा हे देशातील लोकांचे प्रतिनिधित्व करणारे सभागृह असल्याने, लोकसभेला पहिले सभागृह असे म्हणतात.
---––--------------------------
(३) लोकसभा हे कनिष्ठ सभागृह असले तरी ते राज्यसभेपेक्षा श्रेष्ठ ठरते.
उत्तर : (१) लोकसभेचे सभासद हे जनतेकडून प्रत्यक्षपणे निवडले जात असल्याने लोकसभाच खऱ्या अर्थाने जनतेचे प्रतिनिधित्व करते.
(२) पैशांसंबंधीचे प्रस्ताव लोकसभेतच मांडले जातात व तेथेच ते मंजूर होतात. राज्यसभेला अर्थविधेयकाबाबत व फार कमी अधिकार असतात.
(३) राज्यसभेपेक्षा लोकसभेची सभासदसंख्या अधिक असल्याने संसदेच्या संयुक्त अधिवेशनात लोकसभेला दल अनुकूल असाच निर्णय होतो.

---––--------------------------

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा