आठवी इतिहास 13 स्वातंत्र्यलढ्याची परिपूर्ती
1)स्वातंत्र्यानंतरही भारताचा काही भाग कोणत्या युरोपीय सत्तांच्या ताब्यात होता ?
उत्तर : स्वातंत्र्यानंतरही भारताचा काही भाग फ्रेंच पोर्तुगाल या युरोपीय सत्तांच्या ताब्यात होता.
––----------–-–---------------
(२) 'प्रजामंडळे' म्हणजे काय ?
उत्तर : 'प्रजामंडळे' म्हणजे संस्थानातील प्रजेच्या हितासाठी व त्यांना राजकीय अधिकार मिळावेत यासाठी काम करणाऱ्या जनसंघटना होत.
––----------–-–---------------
(३) अखिल भारतीय प्रजा परिषदेच्या स्थापनेचा कोणता परिणाम झाला ?
उत्तर : अखिल भारतीय प्रजा परिषदेच्या स्थापनेमुळे संस्थानांमधील चळवळीला चालना मिळाली.
––----------–-–---------------
(४) हैदराबाद संस्थानात कोणकोणत्या भाषक प्रांतांचा समावेश होता ?
उत्तर : हैदराबाद संस्थानात तेलुगु, भाषक प्रांतांचा समावेश होता. कन्नड व मराठी
––----------–-–---------------
(५) डॉ. राममनोहर लोहिया यांना पोर्तुगीज सरकारने हद्दपार का केले ?
उत्तर : डॉ. राममनोहर लोहिया यांनी गोव्यात मडगाव येथे बंदीहुकूम मोडून भाषण केल्यामुळे पोर्तुगीज सरकारने त्यांना हद्दपार केले.
––----------–-–---------------
'ऑपरेशन पोलो' हे सांकेतिक नाव कोणत्या | कारवाईला देण्यात आले होते ?
उत्तर : हैदराबाद संस्थान भारतात विलीन करण्यासाठी निजामाविरुद्ध जी पोलीस कारवाई करण्यात आली होती. सांकेतिक
संस्थानांच्या विलीनीकरणातील सरदार बल्लभभाई पटेल यांचे योगदान स्पष्ट करा. उत्तर : संस्थानांच्या विलीनीकरणासाठी
वल्लभभाई पटेल यांचे पुढील योगदान होते
(१) संस्थानिकांना विश्वासात घेऊन सर्व संस्थानिकांना मान्य होईल असा 'सामीलनामा' तयार केला. (२) भारतात सामील होणे संस्थानिकांच्या कसे हिताचे
हे. हे त्यांना पटवून दिले. (३) या आवाहनाला बहुसंख्य संस्थानिकांनी प्रतिसाद देऊन आपली संस्थाने भारतात विलीन केली.
(४) यांनी जुनागड व हैदराबाद या संस्थानांच्या
विलीनीकरणाचा प्रश्न कणखर भूमिका घेऊन सोडवला.
––----------–-–---------------
हैदराबाद मुक्तिसंग्रामातील स्वामी रामानंद तीर्थ यांचे योगदान स्पष्ट करा.
उत्तर : भारतातील सर्वात मोठ्या असणाऱ्या हैदराबाद संस्थानाच्या निजामाने आपल्या संस्थानात जनतेचे नागरी अधिकार नाकारले. या संस्थानाच्या मुक्तिलढ्यात स्वामी रामानंद तीर्थाचे पुढील महत्त्वपूर्ण योगदान आहे-
(१) संस्थान भारतात विलीन करण्यासाठी स्वामी रामानंद तीर्थ यांनी हैदराबाद स्टेट काँग्रेसची १९३८ मध्ये स्थापना केली.
(२) निजामाने या संघटनेवर बंदी घातली. या संघटनेला मान्यता मिळवण्यासाठी आणि लोकशाही हक्कांसाठी स्वामी रामानंद तीर्थाच्या नेतृत्वाखाली निजामाविरुद्ध लढा सुरू झाला.
(३) स्वामी रामानंद तीर्थ आणि त्यांच्या अनुयायांना तुरुंगात डांबूनही हा लढा चालूच राहिला.
(४) हैदराबाद संस्थान भारतात विलीन करावे, असा ठराव स्वामी रामानंद तीर्थाांच्या पुढाकाराने हैदराबाद स्टेट काँग्रेसने जुलै १९४७ मध्ये संमत केला.
(३) भारत स्वतंत्र झाला तरी भारताचा स्वातंत्र्यलढा
का संपलेला नव्हता?
उत्तर : (१) भारत स्वतंत्र होताना भारतात लहान- मोठी अशी सहाशेच्यावर संस्थाने होती.
(२) याशिवाय पोर्तुगीज व फ्रेंच सत्तांनी भारतातील काही भागांवरील सत्ता सोडून दिलेली नव्हती.
(३) या संस्थानांचे व वसाहतींचे भारतात विलीनीकरण करणे गरजेचे होते. म्हणून भारत स्वतंत्र झाला तरी भारताचा स्वातंत्र्यलढा संपलेला नव्हता.
––----------–-–---------------
हैदराबाद संस्थानात अनेक संस्थांची स्थापना
करण्यात आली.
उत्तर : (१) हैदराबाद संस्थानात तेलुगु, कन्नड व
मराठीभाषक प्रांत समाविष्ट होता.
(२) निजामाच्या एकतंत्री राजवटीत नागरी व राजकीय हक्कांचा अभाव होता.. (३) हे हक्क मिळवण्यासाठी हैदराबाद संस्थानातअनेक संस्थांची स्थापना करण्यात आली.
––----------–-–---------------
कासीम रझवी याने हैदराबाद 'रझाकार' संघटनेची स्थापना केली
उत्तर : (१) आपल्या लोकशाही हक्कांसाठी हैदराबाद संस्थानातील प्रजेने निजामाविरुद्ध लढा सुरू केला.
(२) जुलै १९४७ मध्ये हैदराबाद स्टेट काँग्रेसने हैदराबाद संस्थान भारतात विलीन करावे, असा ठराव केला; परंतु निजामाने भारतविरोधी धोरण स्वीकारून संस्थान पाकिस्तानात विलीन करण्याच्या हालचाली सुरू केल्या.(३) संस्थानातील प्रजेची भारतात विलीन करण्याची मागणी धुडकावून लावण्यासाठी कासीम रझवी याने निजामाच्या पाठिंब्याने 'रझाकार' संघटनेची स्थापना केली.
––----------–-–---------------
पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा :
(प्रत्येकी ४ गुण)
(१) गोवा मुक्तिसंग्रामाची सविस्तर माहिती लिहा. उत्तर : (१) गोवा, दीव-दमण, दादरा व नगरहवेली या प्रदेशांवर सत्ता असलेल्या पोर्तुगालने हा प्रदेश भारताच्या स्वाधीन करण्यास नकार दिला.
(२) हा प्रदेश मिळवण्यासाठी झालेल्या भारतीयांच्या लढ्यात डॉ. टी. बी. कुन्हा हे आघाडीवर होते.
(३) पोर्तुगीज सरकारविरुद्ध जनतेत जागृती घडवून
लढा उभारण्याच्या उद्देशाने डॉ. कुन्हा यांनी 'गोवा काँग्रेस समिती' व 'गोवा यूथ लीग' या संघटनांची स्थापना केली. (४) १९४६ मध्ये गोव्यात जाऊन भाषणबंदीचा हुकूममोडल्याबद्दल डॉ. कुन्हा यांना आठ वर्षांची कारावासाचशिक्षा सुनावण्यात आली.
––----------–-–---------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा