Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

सोमवार, २२ जानेवारी, २०२४

25 जानेवारी- दैनंदिन शालेय परिपाठ

 २५ जानेवारी- दैनंदिन शालेय परिपाठ

👉संपूर्ण अभ्यास पहिली ते दहावी 

प्रार्थना

 इतनी शक्ती हमें देना दाता... 

- श्लोक

 - ऐ आबरूदे गंगा, वो दिन है याद तुझको । इतरा तेरे किनारे, जब कारवाँ हमारा ।।

 -  मजहब नहीं सिखाता, आपस में बैर रखना । हिन्दी हे हम वतन है, हिन्दोस्ताँ हमारा ।। - महाकवी इकबाल हे महामहिमामयी गंगामाते, आम्हा आर्यांचे प्रवासी तांडे ज्या काळी तुझ्या किनाऱ्यावर आले व स्थिरावले, तो काळ तुला आठवतो ना ? कोणताही धर्म आम्हाला आपसात वैर करायला शिकवीत नाही. आम्ही सारे भारतीय एक आहोत आणि भारत ही आमची मातृभूमि आहे. 

→ चिंतन 

- मुलींना शिक्षण म्हणजे स्त्रीशक्तीचा विकास - शिक्षण मुलींचे - वेध प्रगतीचे यामुळे स्त्री शक्ती जाणीव जागृती होईल व मुलींमध्ये - हसरे घर, सुजाण पालकत्व, समानतेची भावना, स्वत्वाची जाणीव, शारीरिक - मानसिक निरोगीपणा, अन्यायाविरूध्द लढण्याची तयारी, स्वतःच्या पायावर इभे राहण्याची क्षमता, आत्मविश्वास, निर्भयपणा, आत्मसन्मान, निर्णयक्षमता; विचारक्षमता, हक्काचे शिक्षण, विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन दृढ होईल. सब पढ़ें सब बढ़ें • सर्व शिक्षा अभियान •

कथाकथन 

"विजयी विश्व तिरंगा प्यारा' विजयी विश्व तिरंगा प्यारा । झंडा ऊँचा रहे हमारा ॥धृ॥ सदा शक्ती सरसानेवाला, प्रेमसुधा बरसानेवाला, वीरों को हवनिवाला, मातृभूमिका तन-मन-मारा..... ।। १ ।। शान न इसकी जाने पाये, चाहे जान भलेही जाये, विश्वशांति करके दिखलाये, तब होवे प्रण पूर्ण हमारा ... ॥२॥ आमचा हा अत्यंत प्रिय असलेला तिरंगी झेंडा साऱ्या विश्वास विजयी होवो, तो सदैव उंच फडकत राहो. आम्हाला शक्ती देणारा, आमच्यावर प्रेमरूपी अमृताचा वर्षाव करणारा, भारतीय वीरांना आनंदित करणारा हा तिरंगी झेंडा आमच्या मातृभूमीचे सर्वस्व आहे. तो सदैव उंच फडकत राहो. आम्ही प्रसंगी आमचे प्राणही देऊ; पण या झेंड्याची प्रतिष्ठा (शान) कधीही कमी होऊ देणार नाही. हा तिरंगी झेंडा सान्या विश्वामध्ये शांताता स्तापित करील, तेव्हाच आमची प्रतिज्ञा पूर्ण होईल. तो सदैव च फडकत राहो. राष्ट्रध्वज सन १९३१ मध्ये राष्ट्रीय सभेने चरखांकित तिरंगी ध्वज 'राष्ट्रध्वज' म्हणून मान्य केला. राष्ट्रध्वजाचे केशरी, पांढरा व हिरवा हे तीन रंग धर्माचे निदर्शक नसून ते गुणांचे निदर्शक आहेत, असेही स्पष्ट केले. हे तिन्ही रंग पुढील गुणांचे आहेत. • केशरी - धैर्य, त्याग, शौर्य आणि समर्पण • पांढरा - सत्य, शांतता, पावित्र्य, साधेपणा व ज्ञान हिरवा समृध्दी, कृतज्ञता, प्रसन्नता आणि श्रध्दा. - भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा या ध्वजावर चरख्याऐवजी अशोकचक अंकित करण्यात आले दि. २२ जुलै १९४७ रोजी भारतीय घटना समितीने त्याला मान्यता दिली. सारनाथ येथील अशोक स्तंभावर कोरलेले ते धर्मचक्र आहे. आपले माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी पुढीलप्रमाणे राष्ट्रध्वजाचे महात्म्य वर्णिलेले आहे. 'ध्वज हा ऐक्याचे नि स्वातंत्र्याचे प्रतीक असतो. आपल्या ध्वजाचा मधला भाग पांढरा आहे. त्याचा काय अर्थ? पांढरा रंग प्रकाशाचा, सत्याचा व साधेपणाचा निदर्शक आहे. त्यावरील अशोक चक्र काय सांगते ? ते चक्र सद्गुणांची प्रगतीची व धर्माची खूण आहे. या ध्वजाखाली कार्य करतांना आपण धर्ममय राहू, सत्यमय असा याचा अर्थ आहे. आपल्या वर्तनाची ही सूत्रे असू देत. आज आपणास सर्व बाजूंनी आव्हान आहे. धर्माने ते आव्हान स्वीकारले पाहिजे. नाहीतर आपण मागे राहून जाऊ. या चक्राचा आणखी एक अर्थ आहे. चक्र म्हणजे गती. हे चक्र सांगते की, गतिमान राहा. डबक्यात बसून राहून नका. केशरी रंग हा त्यागाचा व नम्रतेचा निदर्शक आहे. हिरवा रंग तर या हरितश्यामल भूमातेचा. या ध्वजाखाली सर्वांना आधार मिळेल. या ध्वजाखाली उभे राहून सेवावृत्तीने व निरहंकारी वृत्तीने आपण पृथ्वीवर स्वर्ग निर्माण करू या. 

सुविचार 

• मातृऋण, पितृऋण, समाजऋण व राष्ट्रमण जन्मभर फिटत नाहीत.

दिनविशेष

 - मानवेंद्रनाथ रॉय यांचा स्मृतिदिन १९५४ : मानवेंद्रनाथ रॉय यांचे मूळचे नाव नरेंद्र भट्टाचार्य हे होते. शिकत असतांनाच दहशतवादी गटात सापडून, पोलिसांनी पकडू नये यासाठी ते अमेरिकेत गेले. तेथे मार्क्सचे तत्वज्ञानाचा दीर्घ अभ्यास करून ते मार्क्सवादी बनले. साम्यवादी चळवळीत शिरले. तेथे कार्य करून त्यांनी आंतरराष्ट्रीय कीती मिळविली. रशियन नेता लेनिनचा त्यांच्यावर विशेष लोभ होता. डॉ. महमूद हे टोपणनाव धारण फरून ते भारतात आले व सन १९३६ पासून मानवेंद्र रॉय या नावाने त्यांनी कार्य करण्यास सुरुवात केली. ते कुशल संघटक होते. त्या काळात लोकमान्यता पावलेल्या काँग्रेस पक्षाला सोडून त्यांनी 'रेडिकल डेमॉक्रेटिक' हा पक्ष काढला. प्रखर बुध्दिमत्ता, क्रांतिकारक विचार आणि तर्कशुध्द विचाररसणी यामुळे | अनेक भारतीय तरूण त्यांच्या विचारांनी भारावून गेले होते. त्यांनी इंग्रजीतून ग्रंथरचना केली असून त्यातील नवविचारांनी वैचारिक साहित्यात विशेष स्थान प्राप्त केले आहे. अशा या साम्यवादी विचारवंताचा आणि मानवतावादी नेत्याचा अंत २५ जानेवारी १९५४ रोजी डेहराडून येथे झाला. 

→ मूल्ये 

• स्वाधीनता, समता. 

→ अन्य घटना 

राजनीतीज्ञ सोनोपंत डबीर यांचा मृत्यू - १६६५

• विष्णुशास्त्री चिपळूणकर यांच्या 'निबंधमाला' या पहिल्या अंकाचे प्रकाशन - १८७४ 

• हिमाचल प्रदेशाला राज्य म्हणून मान्यता १९७१. विनोबाजी भावे यांचा 'भारतरत्न' हया सन्मानाने गौरव १९८२ मा मोरारजीभाई देसाई यांना 'भारतरत्न' - १९९१ 

👉संपूर्ण अभ्यास पहिली ते दहावी 

→ उपक्रम 

• क्रांतिकारकांची चरित्रे वाचा व संग्रहित करा.

 • देशभक्तिपर गीतांचा संग्रह करून पाठांतर करा. 

→ समूहगान 

जहाँ डाल डाल पर सोने की चिड़ियाँ करती हैं बसेरा.... - -गोवा, 


→ सामान्यज्ञान

 भारतातील विस्ताराने सर्वात मोठे राज्य मध्यप्रदेश, सर्वात लहान राज्य - सर्वात जास्त लोकसंख्या असलेले राज्य - उत्तरप्रदेश

 , • सर्वात कमी लोकसंख्या असलेले राज्य - सिक्कीम,

हायड्रोपोनिक्स शेती म्हणजे काय? त्याचे फायदे कोणते?


👉संपूर्ण अभ्यास पहिली ते दहावी 

*****************************************************************************

🛑  *संपूर्ण अभ्यास* 🛑

*पहिली ते दहावी अभ्यास, शिष्यवृत्ती, मराठी हिंदी इंग्रजी व्याकरण, गोष्टी,story साठी भेट दया*

*https://www.godavaritambekar.com/p/blog-page_47.html?m=1*

☘️☘️☘️☘️☘️☘️☘️

🔮 *वर्णनात्मक नोंदी 1ली ते 5वी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_99.html?m=1

🔮 *वर्णनात्मक नोंदी 6 वी ते 8वी*

https://www.godavaritambekar.com/p/5-8.html?m=1

📕📗📘📙📕📗📘📙

*✳️इयत्ता दहावी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_34.html?m=1

✳️ *इयत्ता नववी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_93.html?m=1

*✳️इयत्ता आठवी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_60.html?m=1

*✳️इयत्ता सातवी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_32.html?m=1

*✳️इयत्ता सहावी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_5.html?m=1

✳️ *इयत्ता पाचवी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_64.html?m=1

*✳️इयत्ता चौथी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_65.html?m=1

*✳️इयत्ता तिसरी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_26.html?m=1

*✳️इयत्ता दुसरी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_19.html?m=1

*✳️इयत्ता पहिली सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/i.html?m=1


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा