Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

बुधवार, ६ डिसेंबर, २०२३

15.ध्वनी

 15.ध्वनी


स्वाध्याय


प्रश्न. पुढील प्रत्येक प्रश्नासमोर दिलेल्या पर्याय-क्रमांकांपैकी अचूक उत्तराच्या पर्याय-क्रमांकाचे वर्तुळ रंगवा :




1. ध्वनिपातळी ------या एककात मोजतात.


(1) हर्ट्झ


(2) मीटर / सेकंद


(3) डेसिबल


(4) मिमी


उत्तर-डेसिबल

__________



2. ताणलेले रबर ताण सोडून दिल्यावर मूळ स्थितीत येते. या गुणधर्माला------ म्हणतात.


(1) वारंवारता


(2) दोलन


(3) आयाम


(4) स्थितिस्थापकता 


उत्तर-स्थितिस्थापकता

________________



3. दोलकाची लांबी वाढली की, वारंवारता--------


(1) कमी होते


(2) वाढते


(3) समान राहते


(4) अनियमितपणे कमी-जास्त होते


उत्तर-कमी होते

____________




4. सर्वसामान्य श्वासोच्छ्वासात ध्वनीची पातळी किती असते?


(1) 0 dB


(2) 5 dB


(3) 10 dB


(4) 60 dB


उत्तर-10 dB

___________




5. -----वारंवारता असलेल्या ध्वनीला अवश्राव्य ध्वनी म्हणतात.


(1) 20 Hz ते 2000 Hz


(2) 20 Hz ते 20000 Hz L


 (3) 20 Hz पेक्षा कमी


(4) 20000 Hz पेक्षा अधिक


उत्तर-20 Hz पेक्षा कमी

_________________





6. ध्वनीचे हवेतून प्रसारण होत असताना हवेत निर्माण होणाऱ्या उच्च दाबाच्या व उच्च घनतेच्या भागाला ------म्हणतात.


(1) विरलन


 (2) संपीडन


(3) ध्वनिपातळी


(4) वारंवारता


उत्तर-संपीडन

__________



7. कंपायमान अवस्थेत असलेल्या वस्तूच्या मध्यस्थितीपासून कोणत्याही एका बाजूस होणाऱ्या जास्तीत जास्त अंतराला त्या कंपनाचा----- म्हणतात.


(1) दोलनकाळ


(2) आयाम


(3) वारंवारता


(4) प्रत्यास्थता


उत्तर-आयाम

__________


8. दोलनकाळ -----या अक्षराने दर्शवतात.


(1) d


(2) dB


(3) Hz


(4) T


उत्तर-T

_______



9. 1004 Hz वारंवारता म्हणजे-----


(1) 1004 आवर्तने / सेकंद


(2) 1004 संपीडने/सेकंद


(3) 1004 विरलने/सेकंद


(4) 1004 तरंगलांबी


उत्तर-1004 आवर्तने / सेकंद

___________________



10. वेगळा घटक ओळखा.


(1) सतार


(2) व्हायोलीन


(3) गिटार


(4) बासरी


उत्तर-बासरी

__________



11. मानवामध्ये ध्वनी हा ,----निर्माण होतो.


(1) श्वासनलिकेमध्ये


(2) फुप्फुसांमध्ये


(3) स्वरयंत्रामध्ये


(4) कानांमध्ये


उत्तर-स्वरयंत्रामध्ये

____________




12. ध्वनीचे प्रसारण -----होऊ शकत नाही.


(1) वायूमधून


(2) स्थायूमधून


(3) निर्वात पोकळीमधून


(4) द्रवामधून


उत्तर-निर्वात पोकळीमधून

_________________




13. पुढीलपैकी कोणता प्राणी श्राव्यातीत ध्वनी ऐकू शकत नाही ?


(1) कुत्रा


(2) सी-लायन


(3) हत्ती

(4) वटवाघळे


उत्तर-हत्ती

________



14. पुढीलपैकी अचूक जोडी ओळखा.


(1) स्वर - नि 480 Hz →


(2) स्वरसा 426 Hz


(3) स्वरग 256 Hz


(4) स्वर-ध → 312 Hz


उत्तर-स्वर - नि 480 Hz 

__________________




15. दोलकाची लांबी वाढली की, त्याचा दोलनकाळ-------


(1) वाढतो

(2) कमी होतो


(3) अनियमित होतो


(4) काहीही फरक पडत नाही


उत्तर- वाढतो

_________



16. मनुष्यास------ ध्वनी ऐकू येतो.


(1) श्राव्यातीत


(2) अवश्राव्य


(3) श्राव्य


(4) 20000 Hz पेक्षा कमी वारंवारता असलेला


उत्तर-श्राव्य

_______





17.-----या शास्त्रज्ञाच्या सन्मानार्थ ध्वनीच्या पातळीच्या एककाला 'डेसिबल' (dB) हे नाव देण्यात आले आहे.


(1) थॉमस एडिसन


(2) डॉ. कार्ल लँडस्टेनर


(3) डिकास्टेलो


(4) अलेक्झांडर ग्रॅहम बेल


उत्तर-अलेक्झांडर ग्रॅहम बेल

____________________



18. पुरुषाचे स्वरतंतू जवळपास---- लांब असतात.


(1) 15mm


(2) 20mm


(3) 30 mm


(4) 10mm


उत्तर-20mm

___________



19.-----मधील कंप पावणाऱ्या हवेच्या स्तंभाची लांबी कमी- जास्त करून स्वरांची निर्मिती केली जाते..


(1) व्हायोलीन


(2) गिटार


(3) सनई


(4) सतार


उत्तर-सनई

_________



20. नादकाटा 20 सेकंदांत 10000 वेळा कंप पावतो, तर नादकाट्याच्या कंपनांमुळे निर्माण होणाऱ्या ध्वनीची वारंवारता----- एवढी असेल.


(1) 2,00,000 Hz


(2) 500 Hz

(3) 512 Hz


(4) 1 Hz


उत्तर-500 Hz

___________



21.----- 'n' या अक्षराने दर्शवतात.


(1) दोलनकाळ


(2) आयाम


 (3) वारंवारता


(4) दोलकाची लांबी


उत्तर-वारंवारता

____________




22. ध्वनीची तीव्रता ही ध्वनीच्या कंपनांच्या ------वर्गाच्या प्रमाणात असते.


(1) वारंवारतेच्या


(2) आयामाच्या


(3) दोलनकाळाच्या


(4) पातळीच्या


उत्तर-आयामाच्या

______________



23. 20000 Hz पेक्षा अधिक वारंवारतेच्या ध्वनीला ------ध्वनी म्हणतात.


(1) श्राव्यातीत


(2) अवश्राव्य


(3) श्राव्य


(4) मानवनिर्मित


उत्तर-श्राव्यातीत

____________



24. सर्वसामान्य दोघांतील संवादाच्या ध्वनीची पातळी किती असते?


(1) 0 dB


(2) 5 dB


(3) 10 dB


(4)60 dB


उत्तर-60 dB

___________



25. जर आयाम दुप्पट झाला, तर -------चौपट होते.


(1) वारंवारता


(2) ध्वनिपातळी


(3) ध्वनीची तीव्रता


(4) कंपनसंख्या


उत्तर-ध्वनीची तीव्रता

________________



26.ध्वनितरंगांची वारंवारता ----- या एककात मोजली जाते.


(1) मीटर (m)


(2) लीटर (1)


(3) हर्ट्झ (Hz)

(4) कॅलरी (Cal)


उत्तर-हर्ट्झ (Hz)

_____________





27.समुद्राच्या तळाची खोली मोजण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या 'SONAR' या पद्धतीत----- ध्वनी वापरले जातात.


(1) श्राव्य


(2) अवश्राव्य


(3) श्राव्यातीत

(4) 20 Hz पेक्षा कमी वारंवारता असलेले

उत्तर-श्राव्यातीत

_____________




28.मध्य सप्तकातील 'नि' या स्वराची वारंवारता ------असते.


(1) 480 Hz


(2) 482 Hz


(3) 426 Hz


(4) 312 Hz


उत्तर-480 Hz

___________


29. मानव-----या वारंवारतेचा ध्वनी ऐकू शकतो.


(1) 1 Hz Vo 20000 Hz.


(2) 20 Hz Vo 20000 Hz


(3) 1 Hz Vo 2000 Hz


(4) 20 Hz Vo 2000 Hz


उत्तर-20 Hz Vo 20000 Hz

______________________




30.ध्वनितरंगाची वारंवारता 512 Hz असल्यास दर सेकंदा -----विरलने तयार होतात.


(1) 256


(2) 512


(3) 1024


(4) 128


उत्तर-512

_______




31. वारंवारतेचे SI एकक ----आहे.


(1) डेसिबल


(2) मिमी


(3) हट्झ


(4) मीटर/सेकंद


उत्तर-हट्झ

________



32. एक नादकाटा 5 सेकंदांत 1000 वेळा कंप पावतो, तर त्यापासून निर्माण होणाऱ्या ध्वनीची वारंवारता किती?


(1) 5000 Hz


(2) 500Hz


(3) 200Hz


(4) 2000 Hz


उत्तर-200Hz

___________



33. ध्वनी प्रसारणासाठी माध्यमाची आवश्यकता असते, हे दाखवणाऱ्या प्रयोगात हंडीतील हवेचे प्रमाण जसजसे कमी होत जाते, तसतशी विदयुतघंटीच्या आवाजाची पातळी-------


(1) वाढत जाते


(2) कमी होत जाते


(3) नियमितपणे बदलत राहते


(4) अनियमितपणे कमी-जास्त होत जाते


उत्तर-कमी होत जाते

_______________




34. दिलेल्या आकृतीतील अचूक नावे दर्शवणारा पर्याय निवडा


(1) A→स्वरयंत्र, B→अन्ननलिका, C+ स्वरतंतू, D श्वासनलिका


(2) A अधिस्वर द्वार, B स्वरतंतू, C→ श्वासनलिका, D अन्ननलिका


(3) A अधिस्वर द्वार, B→स्वरयंत्र, C अन्ननलिका, D→ स्वरतंतू


(4) A→ स्वरयंत्र, B→ श्वासनलिका, C+ स्वरतंतू, D→ अन्ननलिका



उत्तर-A अधिस्वर द्वार, B स्वरतंतू, C→ श्वासनलिका, D अन्ननलिका

______________________




35. 'ध्वनीच्या प्रसारणासाठी माध्यमाची आवश्यकता असते, ' या प्रयोगाच्या निरीक्षणांचा / अनुमानांचा अचूक क्रम दिलेल्या पर्यायांतून निवडा :


(A) निर्वात पंप सुरू केल्यास हवेचे प्रमाण कमी कमी होत जाऊन विदयुतघंटीच्या आवाजाची पातळीही कमी कमी होत जाते.


(B) निर्वात पंप बंद असताना काचेच्या हंडीत हवा असेल या वेळी विदयुतघंटीची कळ दाबली असता तिचा आवाज हंडीच्या बाहेर येईल.


(C) ध्वनीच्या निर्मितीसाठी माध्यमाची आवश्यकता असते.


(D) निर्वात पंप बराच वेळ चालू ठेवल्यास हंडीतील हवा खूपच कमी होईल; त्यामुळे विदयुतघंटीचा आवाज अत्यंत क्षीण असा ऐकू येईल.



(1) (B) (C) (D) (A)


(2) (C) (D) (A) (B)


(3) (D) (C) (A) (B)


(4) (B) (A) (D) (C)


उत्तर-(B) (A) (D) (C)

___________________

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा