13.रासायनिक बदल व रासायनिक बंध
स्वाध्याय
प्रश्न. पुढील प्रत्येक प्रश्नासमोर दिलेल्या पर्याय क्रमांकांपैकी अचूक उत्तराच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा :
1. बर्फाचे वितळणे व पुन्हा गोठणे हा ------बदल आहे.
(1) परिवर्तनीय
(2) अनावर्ती
(3) रासायनिक
(4) नैसर्गिक
उत्तर-परिवर्तनीय
____________
2. ------रासायनिक बंध तयार करू शकत नाहीत.
(1) धातू
(2) अधातू
(3) हायड्रोजन
(4) राजवायू
उत्तर-राजवायू
__________
3.रासायनिक समीकरण पूर्ण करण्यासाठी रिकाम्या जागी पुढीलपैकी योग्य पर्याय निवडा :
MgO + → MgCl2 + H2O
(1) H2SO4
(2) H2
(3) Cl 2
(4) 2HC1
उत्तर-2HC1
__________
4. रासायनिकदृष्ट्या धुण्याचा सोडा म्हणजे------+
(1) Na2CO3
(2) Na2SO4
(3) NaHCO3
(4) NaOH
उत्तर-Na2CO3
____________
5. दिलेल्या रेणूंपैकी विदयुत संयुज बंध निर्माण करीत नसणारा रेणू------
(1) KCl
(2) HCl
(3) NaCl
(4) MgCl2
उत्तर-HCl
________
6. दुष्फेन पाणी सुफेन करण्यासाठी त्यात----- द्रावण मिसळतात.
(1) खाण्याच्या सोड्याचे
(2) क्षाराचे
(3) धुण्याच्या सोड्याचे
(4) साबणाचे
उत्तर-धुण्याच्या सोड्याचे
________________
7. पुढील प्रक्रियेतील परिवर्तनीय बदल ओळखा.
(1) आकाशातून उल्का पडणे
(2) मेण वितळणे
(3) आंबा पिकणे
(4) उष्णतेचे जास्त तापमानाकडून कमी तापमानाकडे वहन होणे
उत्तर-मेण वितळणे
___________
8. अभिक्रियेमुळे तयार होणाऱ्या नवीन पदार्थांना ------म्हणतात.
(1) अभिक्रियाकारके
(2) उत्पादिते
(3) उत्प्रेरके
(4) अभिकारके
उत्तर-उत्पादिते
__________
9. श्वसन ही आपल्या जीवनात सतत चालू असणारी ,-----प्रक्रिया आहे.
(1) भौतिक
(2) रासायनिक
(3) नैसर्गिक
(4) जैविक
उत्तर-जैविक
_________
10. कोणत्या धातूला रॉकेलमध्ये बुडवून 'ठेवावे लागते ?
(1) पोटॅशिअम
(2) कॅल्शिअम
(3) सोडिअम
(4) मॅग्नेशिअम
उत्तर-सोडिअम
___________
11. दोन संयुजा इलेक्ट्रॉन्सच्या संदानाने----- बंध तयार होतो.
(1) एक सहसंयुज बंध
(2) एक आयनिक बंध
(3) दोन सहसंयुज बंध
(4) दोन आयनिक बंध
उत्तर-एक सहसंयुज बंध
_________________
12.-----हे मूलद्रव्य आपल्या संयुजा कवचातून इलेक्ट्रॉन्स गमावते.
(1) हेलिअम
(2) आयोडीन
(3) क्लोरीन
(4) मॅग्नेशिअम
उत्तर-मॅग्नेशिअम
_____________
13. दिवस-रात्रीचे चक्र, समुद्राची भरती-ओहोटी ही दोन्ही उदाहरणे -------बदलाची आहेत..
(1) अनावर्ती
( 2)अपरिवर्तनीय
(3) आवर्ती
(4) रासायनिक
उत्तर-आवर्ती
__________
14. पुढीलपैकी कोणत्या क्रियेला रासायनिक बदल म्हणता येणार नाही ?
(1) श्वसन
(2) प्रकाश-संश्लेषण
(3) इंधनाचे ज्वलन -
(4) स्प्रिंग ताणणे
उत्तर-स्प्रिंग ताणणे
____________
15.----हा सर्व इंधनांमध्ये ज्वलन होणारा एक सामाईक पदार्थ आहे.
(1) क्लोरीन
(2) मॅग्नेशिअम
(3) कार्बन
(4) ऑक्सिजन
उत्तर-कार्बन
________
16. आयनिक बंध तयार होताना----- मध्ये अभिक्रिया होते.
(1) दोन धातू
(2) दोन अधातू
(3) धातू व अधातू
(4) मूलद्रव्यांची जोडी
उत्तर-धातू व अधातू
______________
17. रासायनिक समीकरण पूर्ण करण्यासाठी रिकाम्या जागी पुढीलपैकी योग्य पर्याय निवडा :
सायट्रिक आम्ल +------
→ कार्बन डायऑक्साइड
+ सोडिअम सायट्रेट
(1) सोडिअम कार्बोनेट
(2) पाणी
(3) हायड्रोक्लोरिक आम्ल
(4) सोडिअम बायकार्बोनेट
उत्तर-सोडिअम बायकार्बोनेट
____________________
18. धातू व अधातू यांपासून बनलेल्या रेणूंमध्ये ------आढळत नाहीत.
(1) आयनिक बंध :-
(2) सहसंयुज बंध
(3) विद्युत संयुजा बंध
(4) (1) व (3) दोन्ही
उत्तर-सहसंयुज बंध
______________
19.दुष्फेन पाण्यामध्ये साबणाचा फेस होत नाही, याचे कारण है। पुढीलपैकी ------आहे.
(1) कॅल्शिअम व मॅग्नेशिअम यांचे क्लोराइड आणि सल्फेट क्षार
(2) कॅल्शिअम व सोडिअम यांचे क्लोराइड आणि सल्फेट क्षार
(3) सोडिअम व मॅग्नेशिअम यांचे क्लोराइड आणि सल्फेट क्षार
(4) मॅग्नेशिअम व बेरिलिअम यांचे क्लोराइड आणि सल्फेट क्षार
उत्तर-कॅल्शिअम व मॅग्नेशिअम यांचे क्लोराइड आणि सल्फेट क्षार
__________________
20. ------च्या दोन अणूंमध्ये इलेक्ट्रॉन्सचे संदान होते, त्यामुळे दोन्ही अणूंचे इलेक्ट्रॉन द्विक पूर्ण होते.
(1) सोडिअम
(2) पोटॅशिअम
(3) हायड्रोजन
(4) मॅग्नेशिअम
उत्तर-हायड्रोजन
_____________
21. ------यांच्यामध्ये संयोग होऊन आयनिक संयुग तयार होते...
(1) हायड्रोजन आणि क्लोरीन
(2) हायड्रोजन आणि ऑक्सिजन
(3) पोटॅशिअम आणि क्लोरीन
(4) नायट्रोजन आणि ऑक्सिजन
उत्तर-पोटॅशिअम आणि क्लोरीन
________________________
22.ढोकळा मऊ, हलका व सच्छिद्र बनवण्यासाठी पुढे दिलेल्या पर्यायांतून अचूक पर्यायाची निवड करा.
(1) NaHCO3
(2) Na2CO3
(3) Ca(OH)2
(4) NaCl
उत्तर-NaHCO3
______________
23.सोडिअम क्लोराइड, मॅग्नेशिअम क्लोराइड ही ----- संयुगे आहेत.
(1) सहसंयुज
(2) आयनिक
(3) मिश्र
(4) कार्बोनेटची
उत्तर-आयनिक
___________
24.रासायनिक बंध तयार करताना अणू त्यांच्या----- चा उपयोग करतात
(1) प्रोटॉन्स
(2) न्यूट्रॉन्स
(3) संयुजा इलेक्ट्रॉन्स
(4) विदयुतप्रभार
उत्तर-संयुजा इलेक्ट्रॉन्स
________________
25.एका रासायनिक अभिक्रियेच्या वेळी आगकाडी धरल्यास ती पेटते आणि फट् असा आवाज येतो. या रासायनिक अभिक्रियेचे समीकरण ओळखा.
(1) CO2 + 2NaOH • Na2CO3 + H2O
(2) MgO + 2HCI (dil) → MgCl2 + H2O
(3) Zn + 2HCI (dil) → ZnCl2 + H2
(4) H2O2 → H2 + O 2
उत्तर-H2O2 → H2 + O 2
______________________
26. दोन अणूंमध्ये इलेक्ट्रॉन्सची देवाणघेवाण झाल्याने -----तयार होऊ शकत नाहीत.
(1) आयनिक बंध
(2) विद्युत संयुजा बंध
(3) सहसंयुज बंध
(4) कोणताच नाही
उत्तर-सहसंयुज बंध
_______________
27. आयनावर असलेल्या (+1) किंवा (-1) विदयुतप्रभारामुळे------ तयार होतो.
(1) एक सहसंयुज बंध
(2) एक आयनिक बंध
(3 ) दोन सहसंयुज बंध
(4) दोन आयनिक बंध
उत्तर-एक आयनिक बंध
___________________
28. CaCO 3 + 2HCI → A+B+C वरील अभिक्रियेतील A, B व C ओळखा.
(1) CaCl2 + CO2 + H2O
(2) CaCl 2 + 2CO2 + 2H2O
(3) CaCl 2 + 2CO2 + H2O
(4) CaCl2 + CO2 + 2H2O
उत्तर-CaCl2 + CO2 + H2O
_______________________
29.शहाबादी फरशी ही विरल हायड्रोक्लोरिक आम्लाने स्वच्छ करताना रासायनिक अभिक्रिया होऊन पुढीलपैकी कोणती तीन उत्पादने तयार होतात ?
(1) CaCO3, CO2, H2O
(2) CaCO3, Cl2, H2O
(3) CaCl2, CO2, H₂O
(4) CaCl2, CO2, H2
उत्तर-CaCl2, CO2, H₂O
_________________
30.प्रकाश संश्लेषणाची अचूक प्रक्रिया ओळखा.
(1) C12H22O11 + H₂O →2C6H12O6
(2) 6CO2 + 6H2O सूर्यप्रकाश CzH12O6 + 6O2
(3) 2AgCI सूर्यप्रकाश 2Ag + Cl2
(4) CaO +H,O → Ca(OH)2 + उष्णता
उत्तर-6CO2 + 6H2O सूर्यप्रकाश CzH12O6 + 6O2
______________________
31. पुढे दिलेली आकृती आयनिक बंध निर्मिती दर्शवते. आयनिक संयुग ओळखा.
(1) NaCl
(2) CaCl2
(3) BeCl2
(4) MgCl2
उत्तर-MgCl2
___________
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा