10 .पेशी व पेशीअंगके
स्वाध्याय
प्रश्न. पुढील प्रत्येक प्रश्नासमोर दिलेल्या पर्याय क्रमांकांपैकी अचूक उत्तराच्या पर्याय-क्रमांकाचे वर्तुळ रंगवा :
1. ------या शास्त्रज्ञाने इ. स. 1665 मध्ये पेशीचा शोध लावला.
(1) रॉबर्ट हुक
(2) अॅन्टोन ल्यूवेन्हॉक
(3) एम. जे. श्लायडेन
(4) थिओडोर श्वान
उत्तर-रॉबर्ट हुक
____________
2. पेशीत रासायनिक अभिक्रिया घडून येण्यासाठी------ माध्यम आहे.
(1) प्रद्रव्यपटल
(2) पेशीभित्तिका
(3) पेशीद्रव्य
(4) रिक्तिका
उत्तर-पेशीद्रव्य
_________
3. -------क्रियेलाच बहि:परासरण किंवा रससंकोच म्हणतात.
(1) समपरासारी द्रावणातील
(2) अवपरासारी द्रावणातील
(3) विसरण
(4) अतिपरासारी द्रावणातील
उत्तर-अतिपरासारी द्रावणातील
_____________________
4. -----या पेशी अंगकामध्ये रंगसूत्रांचे जाळे असते.
(1) प्रद्रव्यपटल
(2) केंद्रक
(3) तंतुकणिका
(4) रिक्तिका
उत्तर-केंद्रक
________
5. प्राणिपेशीतील रिक्तिका या वनस्पतिपेशीतील रिक्तिकांपेक्षा
तुलनात्मकदृष्ट्या आकाराने---- असतात.
(1) मोठ्या
(2) लहान
(3) मध्यम
(4) सारख्याच
उत्तर-लहान
_________
6. सेल्युलोज व पेक्टिन या जटिल कर्बोदकांपासून----बनते.
(1) पेशीद्रव्य
(2) तंतुकणिका
(3) प्रद्रव्यपटल
(4) पेशीभित्तिका
उत्तर-पेशीभित्तिका
___________
7. पेशीतील पर्यावरण कायम राखण्याचे काम ------करते.
(1) गॉल्गीसंकुल
(2) तंतुकणिका
(3) प्रद्रव्यपटल
(4) केंद्रक
उत्तर-प्रद्रव्यपटल
___________
8. पुढीलपैकी कोणते पेशीअंगक फक्त वनस्पतिपेशीतच असते ?
(1) गॉल्गीपिंड
(2) हरितलवक
(3) तंतुकणिका
(4) रिक्तिका
उत्तर-हरितलवक
_________
9. अंतः परासरण क्रिया ---द्रावणात घडून येते.
(1) समपरासारी
(2) अवपरासारी
(3) अतिपरासारी
(4) मिश्र
उत्तर-अवपरासारी
___________
10.गुणसूत्रांवरील कार्यात्म घटकांना--- म्हणतात.
(1) पेशी
(2) जनुके
(3) केंद्रके
(4) रायबोझोम्स
उत्तर-जनुके
_________
11. ------'आतील बाजूने केंद्रकाला तर बाहेरील बाजूने प्रद्रव्य- पटलाला जोडलेली असते.
(1) आंतर्द्रव्यजालिका
(2) पेशीभित्तिका
(3) पेशीपटल
(4) agenturent 1200
उत्तर-आंतर्द्रव्यजालिका
________________
12. रक्तातील लोहरक्तकणिकांमधील (RBC) केंद्रके नष्ट झाल्याने '-----साठी अधिक जागा उपलब्ध होते.
(1) हिमोग्लोबीन
(2) कार्बन डायऑक्साइड
(3) पाणी
(4) तंतुकणिका
उत्तर-हिमोग्लोबीन
____________
13. ATP हे ऊर्जासमृद्ध संयुग--- तयार करते.
(1) केंद्रक
(2) लयकारिका
(3) तंतुकणिका
(4) लवके
उत्तर-तंतुकणिका
__________
14. पेशीतील गुणसूत्रांवरील कोणत्या कार्यात्मक घटकाद्वारे आनुवंशिक गुणांचे संक्रमण पुढील पिढीकडे केले जाते?
(1) तंतुकणिका
(2) आंतर्द्रव्यजालिका
(3) जनुक
(4) लयकारिका
उत्तर-जनुक
_________
15. 'जांभूळ' या फळाला जांभळा रंग .----- रंगद्रव्यामुळे प्राप्त होतो.
(1) क्लोरोफिल
(2) कॅरोटिन
(3) अॅन्थोसायनिन
(4) हरितद्रव्य
उत्तर-अॅन्थोसायनिन
_______________
16. ... या पेशीअंगकाला आत्मघाती पिशव्या म्हणतात.
(1) रिक्तिका
(2) केंद्रक
(3) लयकारिका
(4) तंतुकणिका
उत्तर-लयकारिका
____________
17. 1 मायक्रोमीटर =--------नॅनोमीटर.
(1) 10
(2) 100
(3) 1000
(4) 10000
उत्तर-1000
_________
18. पुढीलपैकी कोणती क्रिया पेशीची ऊर्जा वापरून चालणारी क्रिया आहे?
(1) विसरण
(2) पेशीय भक्षण
(3) अंत:परासरण
(4) बहि: परासरण
उत्तर-पेशीय भक्षण
____________
19.----- 'हे पेशीतील खावी अंगक आहे.
(1) केंद्रक
(2) गॉल्गीसंकुल
(3) लवके
(4) लयकारिका
उत्तर-गॉल्गीसंकुल
___________
20.------ या पेशीअंगकाला पेशीचे ऊर्जाकेंद्र म्हणतात.
(1) केंद्रक
(2) लयकारिका
(3) तंतुकणिका
(4) लवके
उत्तर-तंतुकणिका
__________
21. राष्ट्रीय पेशी विज्ञान केंद्र' या संस्थेचे कार्यालय कोठे आहे?
(2020)
(1) मुंबई
(2) दिल्ली
(3) नागपूर
(4) पुणे
उत्तर-पुणे
_______
22. इ.स. 1673 साली----- 'यांनी सूक्ष्मदर्शक बनवला.
(1) एम. जे. श्लायडेन
(2) थिओडोर श्वान
(3) अॅन्टोन ल्यूवेन्हॉक
(4) रॉबर्ट हुक
उत्तर-अॅन्टोन ल्यूवेन्हॉक
_________________
23. जनुकांद्वारे आनुवंशिक गुणांचे संक्रमण पुढील पिढीकडे करण्याचे कार्य----- या पेशी अंगकामुळे होते.
(1) प्रद्रव्यपटल
(2) तंतुकणिका
(3) रायबोझोम्स
(4) केंद्रक
उत्तर-केंद्रक
_________
24.------ हे अंगक प्राणिपेशीत नसते.
(1) पेशीद्रव्य
(2) प्रद्रव्यपटल
(3) तंतुकणिका
(4) पेशीभित्तिका
उत्तर-पेशीभित्तिका
_____________
25. पुढील उदाहरण कोणत्या क्रियेचे आहे? बेदाणे पाण्यात ठेवल्यावर काही वेळाने फुगतात.
(1) विसरण क्रिया
(2) समपरासारी द्रावणातील क्रिया
(3) अवपरासारी द्रावणातील क्रिया
(4) अतिपरासारी द्रावणातील क्रिया
उत्तर-अवपरासारी द्रावणातील क्रिया
_____________
26. पेशीवर हल्ला करणाऱ्या जीवाणू व विषाणूंना-----नष्ट करतात.
(1) तंतुकणिका
(2) लयकारिका
(3) रिक्तिका
(4) आंतर्द्रव्यजालिका
उत्तर-लयकारिका
_____________
27. हरितलवकाच्या पीठिकेमध्ये
-------नसतात.
(1) DNA
(2) आवश्यक विकरे
(3) रायबोझोम्स
(4) RNA
उत्तर-RNA
_________
28. पेशीच्या आतमध्ये विविध पदार्थांचे वहन करणाऱ्या अंगकाला -------म्हणतात.
(1) आंतर्द्रव्यजालिका
(2) केंद्रक
(3) पेशीद्रव्य
(4) लवके
उत्तर-आंतर्द्रव्यजालिका
______________
29. -----सौर ऊर्जेचे रासायनिक ऊर्जेत (अन्नात ) रूपांतर करतात.
(1) केंद्रक
(2) हरितलवके
(3) तंतुकणिका
(4) लयकारिका
उत्तर-हरितलवके
____________
30. हिरवे कच्चे टोमॅटो पिकल्यावर----- तयार झाल्याने लाल रंग येतो.
(1) कॅरोटीन
(2) लायकोपीन
(3) बिटालीन्स
(4) झॅन्थोफिल
उत्तर-लायकोपीन
_____________
31. पुढील उदाहरण कोणत्या क्रियेचे आहे?
फळांच्या फोडी साखरेच्या घट्ट पाकात टाकल्यास फोडीतील पाणी पाकात जाऊन थोड्या वेळाने त्या आकसतात.
(1) विसरण क्रिया
(2) समपरासारी द्रावणातील परासरण
(3) अवपरासारी द्रावणातील परासरण
(4) अतिपरासारी द्रावणातील परासरण
उत्तर-अतिपरासारी द्रावणातील परासरण
________________
32. पेशीत साठवलेल्या प्रथिने व मेद यांचे पचन------ उपासमारीच्या काळात करते.
(1) रिक्तिका
(2) लयकारिका
(3) तंतुकणिका
(4) गॉल्गीसंकुल
उत्तर-लयकारिका
____________
33.------या पेशी अंगकामुळे रिक्तिका व खावीपीटिकांची निर्मिती होते.
(1) केंद्रके
(2) आंतर्द्रव्यजालिका
(3) गॉल्गीसंकुल
(4) लयकारिका
उत्तर-गॉल्गीसंकुल
____________
34. कैमिलिओ गॉगी या शास्त्रज्ञाने 'काळी अभिक्रिया' हे रंजन तंत्र विकसित करून------ सखोल अभ्यास केला.
(1) जनुकांचा
(2) चेतासंस्थेचा
(3) पेशींचा
(4) गॉल्गीसंकुलाचा
उत्तर-चेतासंस्थेचा
____________
35. वनस्पतिपेशीमध्ये----- 'हे सर्वांत बाहेरचे आवरण असते.
(1) पेशीद्रव्य
(2) प्रद्रव्यपटल
(3) पेशीभित्तिका
(4) आंतर्द्रव्यजालिका 1330
उत्तर-पेशीभित्तिका
_____________
36. पुढीलपैकी अयोग्य विधान ओळखा :
(1) तंतुकणिका या ऊर्जासमृद्ध संयुग ATP तयार करतात.
(2) रिक्तिका पेशीचा परासरणीय दाब नियंत्रित ठेवतात.
(3) अवर्णलवकांमुळे फुले, फळे यांना रंग प्राप्त होतो.
(4) हरितलवके सौर ऊर्जा शोषून तिचे रासायनिक ऊर्जेत रूपांतर करतात.
उत्तर-अवर्णलवकांमुळे फुले, फळे यांना रंग प्राप्त होतो.
_________________
37. पुढीलपैकी कोणत्या अभ्यासासाठी सँटियागो काजल या शास्त्रज्ञाबरोबर कॅमिलिओ गॉल्गी यांना 1906 मध्ये नोबेल पारितोषिक मिळाले?
(1) रक्तगट शोध
(2) पाश्चरीकरण
(3) पेशी
(4) चेतासंस्थेची रचना
उत्तर-चेतासंस्थेची रचना
___________________
38. हरितलवकाच्या आकृतीतील थायलॅकॉइड हा भाग ओळखा.
(1) A
(2) B
(3) C
(4) D
उत्तर-D
_______
39. पुढील आकृतीतील वैज्ञानिक उपकरण कोणते?
(1) साधा सूक्ष्मदर्शक
(2) संयुक्त सूक्ष्मदर्शक
(3) दुर्बीण
(4) परिदर्शी
उत्तर-संयुक्त सूक्ष्मदर्शक
_______________
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा