Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

शुक्रवार, ३ नोव्हेंबर, २०२३

5 नोव्हेंबर- दैनंदिन शालेय परिपाठ

 ५ नोव्हेंबर


→ प्रार्थना 

- ॐ असतो मा सद्गय तमसो मा ज्योतिर्गमय.


→ श्लोक 

- सुखाचिया लागीं करितों उपाव । तो अवघेंचि वाव दिसो येतें ।। करिता तळमळ मन हैं राहिना । अनावर जाणा वासना हे ।। अवघेचि सांकडे दिसोनियां आलें । न बोलावे ते भले कोणापुढें ।। चोखा म्हणे मी पडिलों गुऱ्हाडी । सोडवीं तातडी यांतूनिया -

-  संत चोखोबा जे काही सुख प्राप्त होण्यासाठी प्रयत्न केल जातात. कष्ट उपसले जातात. ते सर्व काही व्यर्थ असल्याचे दिसून येतात. माणसाच्या इच्छेला आवर घालता येत नाही. कितीही तळमळ केली तरी मन स्थिर राहत नाही. मला सर्व काही संकट दिसून आले आहे. याबाबत कोणापुढेही न बोलण्यात भलाई आहे, न बोललेले बरे होईल. चोखोबा म्हणतात हे देवा, मी या मोहात संसारात गुंतलेला आहे. तू यामधून माझी सुटका करावी


 

. → चिंतन -

 गोड-गोड बोलणारी माणसे पुष्कळ असतात. पण हितकारक व कटू सत्य बोलणारी व ऐकणारी माणसे दुर्मिळ असतात. महर्षी व्यासांनी 'महाभारत' हे महाकाव्य लिहिले त्यात भीष्म, कृष्ण, धृतराष्ट्र, धर्म, भीम, दुर्योधन, कर्ण, शकुनी, कुंती, गांधारी, विदुर आदि हजारों व्यक्तिरेखा आहेत. प्रत्येकाची विचारसरणी वेगळी. तरीही त्यांची मने एखाद्या तत्वावर एकवटलेली आहेत. मानवी जीवनाचा कडू गोडपणा त्यात ओतप्रोत भरलेला आहे. महाभारत हा आदर्श वचनांचा, सुभाषितांचा मोठा खजिना आहे. 'कामापुरता मामा आणि ताकापुरती आजीबाई' ही म्हण कार्य | सांगते? आपल्या फायद्यासाठी गोड बोलणे हा गुण सर्वत्र आढळतो. पण काही माणसे 'इष्ट असेल ते बोलणार व शक्य असेल ते करणार' अशा धारणांची असतात. जगाचे कल्याण होते ते अशा माणसांमुळेच. -महर्षी 

 


→ कथाकथन


 प्रेमळ हृदयात तिरस्काराला जागा नसते अबू उस्मान हॅरी हा एक महान संत होता. अतिशय सुस्वभावी व शांत होता. तो सर्वांशी प्रेमाने वागत असे आणि सर्वजण त्याच्यावरही प्रेम करीत. प्रेम द्यावे व प्रेम घ्यावे हीच अशा महान संतांची वृत्ती असते. कोणी काही कटु भाषण केले तरी त्याला वाईट वाटत नसे. एक दिवस तो बाजारपेठेतून शांतपणे चालला होता. सोबत त्याचा शिष्यवर्गडी होता. बाजारात फारशी गर्दी नव्हती. योगायोगाने | तो एका वाड्याजवळून जात होता. तोच वरून कुणी तरी राख फेंकली. ती नेमकी अबच्या डोक्यावर पडली. त्याच्या शिष्यांनी ते पाहिले तेव्हा ते रागाने लालबुंद झाले. आपल्या गुरूचा अपमान त्यांना सहन झाला नाही. ते ज्याने राख फेकली त्याची हजेरी घ्यायला निघाले. पण अबूने त्यांना अडविले. तो हसून म्हणाला, 'ज्या माणसाने हे कृत्य केले त्याचे उपकार तुम्ही मानले पाहिजेत. तुम्ही रागवता कशाला? ज्या डोक्यावर त्याने राख फेकली, त्या डोक्यावर त्याने जळते निखारे फेकायला हवे होते. ज्यावर त्याने राख फेकली त्याऐवजी त्याने आगच ओतली पाहिजे होती.' अबूची ही शांत वृत्ती पाहन । शिष्य मनात चांगलेच ओशाळले. त्यांचा रागही शांत झाला. तो म्हणाला, "संत होणे सोपे नाही. माणसाने क्रोधावर विजय मिळविला पाहिजे.” राबिया नावाची उच्च विचारांची संत होती. तिचे जीवन अत्यंत साधे सात्विक होते. तिचे हृदय प्रेमाने भरलेले होते. तिच्या पर्णकुटीचा दरवाजा सर्वांना नेहमी खुला असे. कुणीही भुकेला, तृषार्त माणूस कधी उपाशी जात नसे. ती कुणाकडूनही काही घेत नसे. एक दिवस ती पवित्र कुराण ग्रंथ वाचत बसली होती. कुराणातील सद्विचारांनी तिचे संतहृदय भरून येत होते. महंमद पैगंबराची वचने हृदयस्पर्शी आहेत. मानवतेचा झरा त्यात तुडुंब भरून वाहतो आहे. ती त्यावर विचार करीत होती. माणूस कसा लोभात पडतो, कसा दुसऱ्यांना फसवतो, कामवासनेने कसा पीडित होता, रागाने द्वेषाने कसा जळफळत राहतो. व्यसनाधीन मन, विकारवश मन कसे आवरावे. सारे जीवनभर तो धावपळ करीत राहतो. ज्या आई-बापाच्या पोटी जन्म घेतो त्यांच्याशी कृतघ्नपणाचे वर्तन करतो. आपल्या बायकोलाच तो एकमेव मित्र मानतो. तिचा गुलाम बनतो. तो बाईलबुध्दा बनतो. सासुरवाडीच्या माणसांना जवळ करतो. जन्मदात्या आई-बापांना उपाशी ठेवतो. स्वतः मौजमजा करीत राहतो. आळसात वेळ घालवितो. मायेच्या माणसांना दूर लोटतो. गरिबांना लुटतो. आई, बाप, गुरू, स्वामी कुणाविषयीच त्याला प्रेम वाटत नाही. ईश्वराचीही त्याला आठवण होत नाही. हे माणुसकीला काळोखी फासणारे दुर्गुण आहेत. कुराण एक पवित्र धर्मग्रंथ आहे. त्यात अनेक सुविचारांची सोन्याची खाण आहे, असे विचार राबियाच्या हृदयात खोलवर घुसले. माणसांची अधोगती पाहून तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. पण असे अनेक विचार वाचत असताना ती एकदम गंभीर झाली. कारण तिची नजर एका महत्वाच्या वाक्यावर खिळून राहिली. “अल्लाहसे मोहब्बत करो, और सैतानसे नफरत."- ईश्वरावर प्रेम करा पण सैतानाचा तिरस्कार करा. हे वाक्य वाचताच ती थबकली. 'सैतानसे नफरत करो' हे वाक्य तिने पेन्सिलीने काट मारून काढून टाकले. जवळ बसलेल्या माणसाने विचारले, "ताई! हे तू काय केलेस ? एक पवित्र धार्मिक ग्रंथ खराब केलास !” राबिया म्हणाली, “बर्खुरदार ! मी ग्रंथ खराब केला नाही. आपली चिंता दूर केली. यात लिहिले आहे सैतानाचा तिरस्कार करा. माझ्या हृदयात तिरस्काराला कुठेच स्थान नाही. मग मी सैतानाच्या तिरस्काराला कुठे जागा देणार ? प्रेममय जीवन कधीच दुसऱ्याचा है।



→ सुविचार

 • कितीही संकटे आली तरी सन्मार्ग सोडीत नाही, तोच खरा पुरूष. • तिरस्कार किंवा द्वेषाला सहानुभूतीने, निष्कपटतेने जिंका. 

 

→ दिनविशेष 

• मराठी रंगभूमी दिन १८४३ - इ.स. १८४३ च्या ५ नोव्हेंबरला सांगली येथे विष्णूदास भावे यांनी राजासमोर सीतास्वयंवर या स्वत लिहिलेल्या नाटकाचा प्रथम प्रयोग करून दाखविला. मराठी नाटकांचा प्रारंभ तेव्हापासून झाला असे मानले जाते. त्यानंतरही भाव्यांनी आणखी १० आख्याने तयार करून त्यांचे प्रयोग सादर केले व ते पुण्या-मुंबईतही लोकप्रिय झाले. त्यापूर्वी कनार्टकातील मंडळी येऊन श्रीकृष्ण चरित्रावर खेळ करुन दाखवीत. ते पाहिल्यानंतर सांगलीचे राजे चिंतामणराव पटवर्धन यांनी मराठीत असे करून दाखविण्यास प्रोत्साहन दिले. त्यानुसार विष्णुदास भाव्यांनी पहिला प्रयोग चिंतामणराव पटवर्धनांना करून दाखविला.


 → मूल्ये -

  • निर्भयता, राष्ट्रप्रेम, मानवता. 


→ अन्य घटना 

• पानिपतचे दुसरे युध्द - १५५६. स्वातंत्र्यसेनानी चित्तरंजनदास यांचा जन्म - १८७०

 • सर फिरोजशहा मेहता स्मृतिदिन - १९१५.


 उपक्रम - • फिरोजशहा मेहता यांची अधिक माहिती मिळवून ती विद्यार्थ्यांना कथन करा

 . • तुम्हास माहीत असलेल्या तीन झुंझा पत्रकारांची व त्यांच्या वृत्तपत्रांची नावे लिहा. • तुम्हाला माहिती असणाऱ्या मराठी नाटकांची पाच नावे लिहा. 


→ समूहगान 

• हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे ..... 


→ सामान्यज्ञान 

• 'उंट' हे वाळवंटातील जहाज आहे. वाळवंटातील लोकांना त्याचा खूप उपयोग होतो. वादळाच्या वेळी त्याच्या पाठीचा उपयोग करून वादळापासून बचाव करता येतो. उंटाची लीद इंधनाकरिता वापरली जाते. उंटाचे केस व कातडी यांनाही बाजारात मोठी मागणी असते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा