Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

शुक्रवार, ३ नोव्हेंबर, २०२३

4 नोव्हेंबर- दैनंदिन शालेय परिपाठ

 ४ नोव्हेंबर


प्रार्थना 

- देह मंदिर चित्त... 


 → श्लोक 

- - उत्तमः क्लेशविक्षोभक्षमः सोढुं न च इतरः । मणिः एवं महाशाणघर्षणं न तु मृत्कणः || जो श्रेष्ठ असतो तोच क्लेश व अस्वस्थता सहन करण्यास समर्थ असतो, इतर कोणी तसा नसतो. हिराच कसोटीच्या मोठ्या दगडावर सहन करू शकतो, मातीचा कण (म्हणजे गोळा किंवा ढेकूळ) ते सहन करू शकत नाही


. → चिंतन

 - झोपले अजून माळ तापवीत काया, असंख्य या नद्या अजून वाहतात वाया, अजून हे अपार दुःख वाट पाहताहे - बाबा आमटे स्वातंत्र्य मिळाले. देश स्वतंत्र झाला. स्वराज्य मिळाले पण त्याचे सुराज्य झाले का? हे दिसणारे उघडे बोडके डोंगर, पाणी वाया घालवत वाहणाऱ्या नद्या आपणास काय सांगू इच्छितात ? देशातील दैन्य दूर कसे होणार ? दुःख दूर कोण करणार ? याचे उत्तर आपणच कृतीने दिले पाहिजे. त्याची प्रेरणा देणारी थोर पुरूषांची चरित्रे वाचली तरी पुरे. क्रांतिकारकांच्या बलिदानाचे स्मरणही सुराज्य करण्याची शक्ती देते ते विसरू नका.


कथाकथन 

- रमजान ईद - प्रसन्नता किंवा आनंद म्हणजे ईद. हा मुस्लिम बांधवांचा प्रमुख सण असून रमजानचा महिना संपल्यानंतर, पण शब्बाल महिन्याच्या पहिल्या तारखेस साजरा केला जातो. या सणाचा व चंद्राचा घनिष्ट असा संबंध आहे. कारण ईदचा निर्णय चंद्रदर्शनानंतरच केला जातो. उपवासातून मुक्तता व आनंदापूर्वीची शुभसूचना चंद्रावर अवलंबून असते. त्यामुळे 'ईद का चाँद' हा वाक्प्रचारच बनला आहे. कवी, लेखकांचे तर 'ईद का चाँद' वर अपूर्व असे प्रेम दिसून येते. पूर्वी ईद दोन दिवस साजरी केली जात असे. इस्लामच्या आधी 'ईद जहालिया' नावाची ईद होत असे. एक छोटी गोष्ट आहे. एक माणूस ईदच्या दिवशी हजरत अल्लाच्या घरी गेला असता, त्याला शिळी पोळी खात असताना पाहिले. त्याला आश्चर्य वाटले. म्हणून त्याने विचारले, "हजरत, आज ईदसारखा सण आहे. आणि आपण शिळी पोळी खात आहात?" ह्यावर हजरत म्हणाले, “अरे, ज्याचा रोझा (उपवास) परमेश्वराने स्वीकारला आहे, ज्याचे गुन्हे माफ झाले आहेत, जे प्रयत्न करून यशस्वी झाले आहेत, अशा लोकांची आज ईद आहे." या दिवशी प्रत्येक मुस्लीम कुटुंबात उत्साहाचे वातावरण असते, तीन-चार दिवस अगोदरच घरे स्वच्छ, टापटीप करून ठेवलेली असतात. सर्वत्र सुगंधी वातावरण असते. घरातील सर्व मंडळी नवीन कपडे घालतात. नातेवाईक-मित्रांच्या घरी जाऊन आनंदाने भेटी गाठी देऊन ईदच्या भेटी देतात. खीर, शेवयांसारखे गोड पदार्थ केले जातात. या दिवसाचे दुसरे महत्व म्हणजे, हा दिवस दानधर्म करण्यासाठी आहे. ज्यांच्याजवळ साडेसात तोळे सोने किंवा ५२ तोळे चांदी असेल त्याने दानधर्म करणे आवश्यक मानले आहे. श्रीमंत-गरीब कुणीही असो, प्रत्येकास १।।। किलो गहू आणि २ ।।। किलो जवाइतकीच किंमत द्यावी लागते. हे दान नातेवाईक, शेजारी किंवा गरीब माणसाला दिले जाते. हा सण सर्वांनी सारखा साजरा करावा हा त्यामागील हेतू आहे. दया, संयम, समानता, करूणा, स्नेह व ममत्व इत्यादिचा संदेश ईद घेऊन येते. आपल्या घरातील माणसांशी, नातेवाईक, मित्रपरिवार व शेजाऱ्यांशी व्यवहार कसा ठेवावा व एकमेकांच्या सुखदुःखात कसे सहभागी व्हावे, हाच ईद या सणाचा खास संदेश आहे. 


→ सुविचार

 • हिंदू, मुस्लिम, शीख ईसाई, हम सब है भाई भाई । • खरा तो एकचि धर्म । जगाला प्रेम अर्पावे ।। - सानेगुरूजीखरे असेल तेच बोलावे, उदात्त असेल ते लिहावे, उपयोगी तेच शिकावे, देशाचे हित ज्यात असेल तेच करावे - शि. म. परांजपे. 


→ दिनविशेष -

 • आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके जन्मदिन १८४५ - यांना 'लढाऊ राष्ट्रवादाचे जनक' असे म्हणतात. इंग्रजी राजवटीत नोकरी करीत असताना वेळेवर रजा मंजूर न झाल्यामुळे त्यांची व आजारी आईची भेट होऊ शकली नाही. यामुळे त्यांच्या मनात इंग्रजी सत्तेविषयी तीव्र चीड निर्माण झाली. त्यांचे मन बंडखोर बनले. सशस्त्र लढ्याचा प्रारंभ त्यांनीच केला. भारतीय स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या वीरास काळ्या पाण्याची शिक्षा झाली. एडनच्या तुरूंगात त्यांना इंग्रजांनी डांबले. 'दधिची ऋषीनी आपल्या अस्थी देवांसाठी दिल्या. मग हे भारतीयांनो, मी आपला प्राण तुमच्यासाठी का देऊ नये?' हे त्यांचे मृत्यूपूर्वीचे उद्गार, भारतमातेच्या शिरढोण या गावच्या या सुपुत्राचा जन्मदिन ४ नोव्हेंबर १८४५. सार्वजनिक सभा, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी अशा संस्थांचा हा संस्थापक आपल्या कार्याने अनेक स्वातंत्र्यवीरांना प्रेरणा नि स्फूर्ती देऊन कीर्तीरुपे अमर झाला. दि. १७ फेब्रुवारी १८८३ ला त्यांनी देहत्याग केला.


 → मूल्ये -

 • देशप्रेम, निर्भयता, 


→ अन्य घटना

 • जमनालाल बजाज यांचा जन्म - १८८९

 .• हिमालय पर्वतारोहण संस्थेची स्थापना - १९५४- 


→ उपक्रम -

 • वासुदेव बळवंत फडके यांच्या चरित्रातील प्रसंग सांगा.

  • क्रांतिकारकांचे खटले हे भा. द. खेर यांचे पुस्तक मिळवून ते विद्यार्थ्यांना वाचून दाखवा.


समूहगान

 • हिंद देश के निवासी सभी जन एक है


→ सामान्यज्ञान -

• भारत : राष्ट्रीय उद्याने राष्ट्रीय उद्यान : राष्ट्रीय उद्यानात संपूर्ण परिसंस्थे (इको-सिस्टिम)चे जतन केले जाते, एकूण राष्ट्रीय 


उद्याने: ८९. त्यातील काही खालीलप्रमाणे.

१. जिम कॉर्बेट नॅशनल पार्क : रामनगर (उत्तरांचल)

२. दुधवा नॅशनल पार्क : लखीमपुरखेरी (उत्तर प्रदेश)

३. हजारीबाग नॅशनल पार्क : हजारीबाग (झारखंड)

४. शिवपुरी नॅशनल पार्क : शिवपुरी (मध्य प्रदेश)

५. कान्हा नॅशनल पार्क : मांडला व बालाघाट (मध्य प्रदेश)

 ६. बांधवगड नॅशनल पार्क : शाहदोल (मध्य प्रदेश) 

 ७. बेटला राष्ट्रीय उद्यान : बेटला (बिहार) 

 ८. भरतपूर राष्ट्रीय उद्यान : भरतपूर (राजस्थान) 

९. काझिरंगा नॅशनल पार्क : जोरहाट (आसम)

१०. रोहला नॅशनल पार्क : कुलू (हिमाचल प्रदेश) 

 ११. खांगचेंदझोंगा राष्ट्रीय उद्यान : गंगटोक (सिक्कीम) 

१२. ताडोबा राष्ट्रीय उद्यान : चंद्रपूर (महाराष्ट्र) 

१३. पेंच राष्ट्रीय उद्यान : नागपूर (महाराष्ट्र) 

१४. संजय गांधी नॅशनल पार्क : मुंबई-ठाणे (महाराष्ट्र) 

१५. नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान : भंडारा (महाराष्ट्र) 

१६. बंडीपूर नॅशनल पार्क : (कर्नाटक) 

१७. नागरहोल नॅशनल पार्क : कूर्ग (कर्नाटक)

१८. बन्नेरघट्टा राष्ट्रीय उद्यान : बंगळूर (कर्नाटक

१९. वेळावदार राष्ट्रीय उद्यान : भावनगर (गुजरात)

२०. एरावीकुलम राजमलय नॅशनल पार्क : (केरळ)

 २१. गिंडी नॅशनल पार्क :  

 २२. नंदनकानन नॅशनल पार्क : भुवनेश्वजवळ (उडिसा)

 २३. कांगेर राष्ट्रीय उद्यान :

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा