Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

शुक्रवार, ३ नोव्हेंबर, २०२३

2 नोव्हेंबर- दैनंदिन शालेय परिपाठ

 २ नोव्हेंबर


→ प्रार्थना

 आई माझा गुरू, आई कल्पतरू, सुखाचा सागरू आई माझी.... 

 

- - जाड्यं धियो हरति, सिञ्चति वाचि सत्यम् मानोन्नतिं दिशति, पापम् अपाकरोति ।


 → श्लोक 

 चेतः प्रसादयति, दिक्षु तनोति कीर्तिम्, सत्संगतिः कथय किं न करोति पुंसाम् ? ।। 

 : सज्जनांचा सहवास बुध्दीचा मंदपणा दूर करतो, वाणीत सत्य आणतो, मान व उन्नती यांचा मार्ग दाखवतो, दूर करतो, मन प्रसन्न करतो आणि सर्व दिशांत कीर्ती पसरवितो. सत्संगती मनुष्याचे चांगले काय काय करीत नाही बरे ? सत्संगतीमुळे मनुष्याचा अनेक प्रकारे फायदा होतो.


 → चिंतन

  शक्तीचा झरा तुमच्या अंतःकरणात दडला आहे. एकदा या शक्तीचे भान आले की, तुम्हाला अडवणारा कोण ? आपल्यातील गुणांची, कौशल्याची जाणीव झाल्यावर मन उत्साहित होते, स्वतः च्या सामर्थ्याची जाणीव होणे सोपे नाही. आपणच आपल्या गुणदोषांचा बारकाईने विचार केला तर गुणांचा गुणाकार करण्याची प्रेरणा उत्पन्न होते. काही नवे करावयास नवा हुरूप -विनोबा भावे.

  

 कथाकथन 

 - ईडा पीडा टळो, बळीचं राज्य येवो - दिवाळी हा भारतातील सर्वात मोठा आणि आनंदाचा सण. धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन, बलिप्रतिपदा आणि भाऊबीज असे हे पाच दिवस दिवाळीचे समजले जातात. यापैकी 'बलिप्रतिपदा' हा दिवस सर्व मूळनिवासी भारतीयाच्या आणि विशेषत: शेतकऱ्यांच्या दृष्टीने फार महत्त्वाचा आहे. हा दिवस बळीराजाचे स्मरण, चिंतन करण्याचा आहे. कोण होता हा बळीराजा? हिरण्यकश्यपूचा पणतू, प्रल्हादाचा नातू, विरोचनाचा पुत्र आणि बाणासुराचा पिता. महापराक्रमी चक्रवर्ती बळीराजा. केवळ 'ईडा पिडा टळो, बळीचे राज्य येवो'! असे म्हटल्याने बळीचे राज्य येणार नाही. एकीकडे बळीचे राज्य येवो म्हणायचे आणि वामनाला देवाचा अवतार मानून त्याची पूजा करायची हा कोणता शहाणपणा आहे? वामनाला देवाचा अवतार मानलं तर बळीराजा हा अधर्मी, दुष्ट, पापी, अत्याचारी, अन्यायी होता असेच मानावे लागेल. मग अशा दुष्ट आणि अधर्मी माणसाची आठवण का म्हणून करायची? तरीही आपण बळीचे राज्य येवो असेच म्हणतो. वस्तुस्थिती अशी आहे की, पुराणामध्ये बळीराजाची स्तुतीच केली आहे. खूप गुणगान केलं आहे. एवढेच नाहीतर बळीचे राज्य म्हणजे सुराज्य होते. न्यायाचे राज्य होते. बळीराजा प्रजाहितदक्ष राजा होता, जाणता राजा होता. सर्व प्रजा शेतकरी, कष्टकरी, व्यापारी कारभारी, दरबारी इत्यादी सुखी समाधानी होती. कोणाच्या काही समस्या नव्हत्या, तक्रारी नव्हत्या असे असतानाही बळीराजाचा संहार करण्यासाठी देवाला अवतार का घ्यावा लागला? हे एक मोठे कोडेच आहे. खरे कारण मात्र वेगळेच आहे. वामन आर्य (वैदिक ब्राह्मण) होता. यज्ञ करणे, त्यामध्ये प्राण्यांची उदा. गाय, बैल, घोडे, रेडे इत्यादींची हत्या करणे ही त्याची संस्कृती होती. बळीराजा शेतकऱ्याचा राजा होता. यज्ञ आणि यज्ञातील मोठ्या प्रमाणावरील प्राणी हत्या या गोष्टींना बळीराजाचा विरोध होता. बळी राज्याची कृषी संस्कृती (सिंधु संस्कृती) होती. गाय, बैल हे शेतकऱ्याचे दैवत. गाय, बैल नष्ट झाले तर शेती कशाने करायची? हा त्याच्यासमोर मुख्य प्रश्न होता. वामन यज्ञ वेदीसाठी भूमी मागत होता. परंतु बळी राजा त्यास तयार नव्हता. म्हणून कपटी वामनाने दान मागण्याचं नाटक करून बळीराजाचा घात केला. म्हणूनच संत तुकारात महाराज म्हणतात-

 -  हारे तू निहूर निर्गुण । नाही माया बहु कठीण । नव्हे करिसी आन । कवने नाही केले ते ।।१।। बळी सर्वस्व उदार । जेणे उभारीला कर । करून कहार । तो पाताळी घातला ||६|| "

 -  है हरी तू निघूर आहेस. तुला माया नाही. तू फार कठोर आहेस. दुसऱ्या कोणी केले नाही, असे (निष्ठुरपणाचे) कर्म तू करतोस. बळी सर्व दृष्टीने उदारहोता. त्याने (तुला भूमीचे दान देण्याचा उद्देशाने उदक सोडण्यासाठी) हात उचललेला होता. (पण) तू कहर (जुलमाचा अतिरेक) करून त्याला पातळात घातलेच. ' संत तुकारामांनी आणि संत कबीरांनी संत रविदासांनी बहुजन समाजाला जागविण्यासाठी आपल्या जिवाची पर्वा न करता प्रबोधनाचं कार्य केलं. परंतु आमचा बहुजनसमाज यावर विचारच करीत नाही, तर्कच करीत नाही, ब्राह्मणी ग्रंथांवर (वेद शास्त्र, पुराणे, पोथ्या, उपनिषदे आणि इतर भाकड (कथा) विश्वास ठेवतो. त्यामध्ये किती सत्यता आहे? याचा विचारच करीत नाही. स्वामी विवेकानंदसुद्धा म्हणतात, 'ज्या ज्या वेळी ब्राह्मणानी काही लिहिलं त्यावेळी त्यांनी इतरांच्या हक्कास विरोधच केला. व्यासाने तर वेदांच्या अर्थाला कलाटणी देऊन शुद्रांना ठकविण्याचाच प्रयत्न केला. 'बहुजन समाजातील अशिक्षित तर सोडाच, सुशिक्षित आणि उच्च शिक्षित समजणारेही विचार तर्क करीत नाही. सत्य बाहेर येऊ नये म्हणून धर्मग्रंथांची चिकित्सा करण्याची. तर्क करण्याची बंदी घालण्यात आली. चिकित्सा करणारा धर्मद्रोही व तर्क करणारा नरकात जाईल अशी धमकी देण्यात आली. त्यामुळे बहुजन समाजातील लोक धर्मग्रंथांची चिकित्सा करण्याच्या भानगडीत पडत नाहीत. ज्यांनी ज्यांनी तसा प्रयत्न केला त्यांचा (बहुजन संत आणि समाज सुधारक) वैदिक ब्राह्मणानी छळ केला. लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख म्हणतात, 'मनूचे वचन असो, याज्ञवल्क्याचे असो, कोणाचेही असो, ब्रह्मदेवाचे का असेना. 'बुद्धिरेव बलीयसी' असे आहे. त्यापेक्षा तुम्ही जे उघड पाहता त्याचा बंदोबस्त शास्त्रात नाही हे योग्य नाही. शास्त्रास एकीकडे ठेवा, आपली बुद्धी चालवा, विचार करून पाहा. घातक वचनांवर हरताळ लावा.' बहुजनांनो बळीचे राज्य आणण्यासाठी प्रयत्नवाद, बुद्धी प्रामाण्यवाद | आणि मानवतावाद यांची कास धरा. दैववाद, मनूवाद यांना मातीत गाडा. मानसिक दृष्ट्या गुलाम बनविण्याऱ्या धर्मग्रंथांना दूर सारा. महात्मा फुले, राजर्षी शाहू. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, संत कबीर, संत रविदास, संत तुकाराम, गाडगेबाबा, तुकडोजी महाराज यांचे विचार आत्मसात करून त्याप्रमाणे वागा. टेवळाच्या भोवती चकरा मारण्याऐवजी सत्तेचे मंदिर काबीज करा.

 

 • सुविचार 

 • • इडा पिडा टळो बळीचे राज्य येवो.


दिनविशेष

 अण्णासाहेब किर्लोस्कर स्मृतिदिन - १८८५. बळवंत पांडुरंग उर्फ अण्णासाहेब किर्लोस्कर यांचा जन्म ३१ मार्च १८४३ मध्ये • इडा पिडा टळो बळीचे राज्य येवो. धारवाड जिल्ह्यातील गुर्लहोसूर या गावी झाला. बाराव्या वर्षापर्यंत घरीच कानडी व मराठी भाषांचे शिक्षण घेतले. पुढील शिक्षण धारवाड, कोल्हापूर व पुणे येथे घेतले. पुण्यास असताना नाटक मंडळींना पदे रचून देऊ लागले. त्यातून नाटकाची आवड वाढीस लागून स्वतःची नाटक मंडळी काढली. पुडे विविध प्रकारच्या नोकऱ्या केल्या. १८८० साली पुणे येथे एका पारशी नाटक मंडळीचे ऑपेराच्या धर्तीवरील एक नाटक पाहून त्या धर्तीवर कालिदासाच्या | अभिज्ञान शाकुंतलम् या नाटकाचे मराठी भाषांतर करून नवीन पदे घालून रंगभूमीवर आणले. या नाटकास उत्तम यश व लोकप्रियता मिळाली. १८८० मध्ये किर्लोस्कर नाटक मंडळी स्थापन केली. संगीत सौभद्र हे त्यांचे स्वतंत्र नाटक सर्वकाळ लोकप्रिय ठरले आहे. रामराज्य वियोग हे त्यांचे शेवटचे नाटक. सुसंघटित कथानक, अकृत्रिम संवाद, विलोभनीय व्यक्तिरेखा, प्रासादिक पदे आणि नाट्योपरोधी विनोदाचा झरा यामुळे अण्णासाहेब आजही मराठीतील श्रेष्ठ संगीतकार मानले जातात. ते कीर्तनाची आख्यानेही रचून देत. शीघ्र कवित्व त्यांच्या ठायी होते. दक्षिण प्राइझ कमिटीच्या स्पर्धेसाठी शिवाजी महाराजांवर पाचशे आर्यांचे एक दीर्घकाव्य त्यांनी रचले होते. त्यांच्या सर्व लेखनाचा संग्रह समग्र किर्लोस्कर नावाने प्रसिध्द करण्यात आला आहे. 


मूल्ये 

• साहित्यप्रेम. 


 अन्य घटना - 

 • बळीराजा स्मृतीदिन वीर महाराणा रणजितसिंह यांचा जन्म - १७८०. 


उपक्रम

• किर्लोस्करांच्या नाटकांबद्दल अधिक माहिती मिळवून वर्गात सांगावी.. 


समूहगान 

• सारे जहाँ से अच्छा हिंदोस्ताँ हमारा...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा