Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

शुक्रवार, ३ नोव्हेंबर, २०२३

1नोव्हेंबर- दैनंदिन शालेय परिपाठ

 १ नोव्हेंबर→ प्रार्थना

 गे मायभू तुझे मी फेडीन पांग सारे... 

 

→ श्लोक 

- ऐसा पुत्र देगा देवा । जग म्हणे त्याला बाबा ।। ऐसा भक्तराज गुंडा । त्याचा तिहींलोकी झेंडा ।। इतुकें न देवे तुझ्यानें । माझे करी गा निःसंतान । दोही माजी एक लेखा ।। बोले केशवदास चोखा || 

- मला तू असा मुलगा द्यावा की, सर्व जग त्याला बाबा म्हणेल, तो असा भक्तराज असावा की त्याच्या भक्तीचा गौरव तीनही लोकात व्हावा. एवढे देणे तुला शक्य होत नसेल तर मला तू अपत्य देवू नकोस. वरील दोनही पैकी मला कोणतेही एक चालेल, असे चोखोबा बोलत आहे.


 → चिंतन- 

 खरा आनंद दुसऱ्यांना देण्यात असतो, घेण्यात किंवा मागण्यात नसतो - संत तुकडोजी महाराज. गरे खाण्यासाठी विनोबांनी फणस कापला. तेव्हा आई म्हणाली, “विन्या, आधी शेजाऱ्यांना गरे दे मग तू खा." विनोबांनी शेजाऱ्यांना गरे वाटले मग ते उरलेले गरे खाऊ लागले. ते गरे जास्त गोड आहेत असे त्यांना वाटले व आईचे बोलणे आठवणे, 'देतो तो देव व खातो तो राक्षस', दुसऱ्याला देण्याचा आनंद काही औरच असतो..→ कथाकथन

 दिवाळी दिवाळी सण मोठा, आनंदाला नाही तोटा,' असा हा दिवाळीचा दीपावली म्हणून सुध्दा ओळखला जातो. दिवाळीपेशा दीपावली हा शब्द या सणासाठी जास्त शोभतो. दीपावली म्हणजे दिव्यांच्या ओळी हा सण इतर वेगळा आहे, याचं हेच कारण होय. या सत - - आकाशातले तारे पृथ्वीवर येतात, अशी कविकल्पना आहे. आश्विन महिन्यातील शेवटचे तीन दिवस आणि कार्तिक महिन्यातील पहिले दोन दिवस असा पाव | दिवसांचा दिवाळीचा उत्सव असतो. शरद ऋतूच्या मध्यभागी येणारा हा दीपोत्सव काश्मीरपासून कशकमारीपर्यंत सर्वत्र उत्साहाने साजरा केला जातो प्राचीनकाळी आर्य जेव्हा उत्तर ध्रुवाकडील प्रदेशात राहत होते, तेव्हा पासून दिवाळी साजरी होत असावा. काहींच्या मते चौदा वर्षाचा वनवास संपवून, भिगवान राम लकेवर विजय मिळवून अयोध्येस परतले, तेव्हा प्रजा आनंदीत होऊन त्यांनी दीप उजळले, तो हाच दिवस वर्षभरात केले जात नाहीत तिखट-गोड पदार्थ या दिवशी केले जातात. आकाश कंदिलामुळे घराला एक वेगळीच शोभा येते. मित्र नातेवाईक यांना भेटण्याचा, शुभेच्छा देण्याचा काळ असतो. अशा दिवाळीचे पाच दिवसही कमी पडतात, वाटतात. पहिला दिवस धनत्रयोदशीचा असतो. या दिवशी घरातील लक्ष्मीची पूजा केली जाते. घरातील मोठी व्यक्ती या दिवशी संध्याकाळी आंघोळ करून एका तबकात काही रूपये ठेवून त्याची पूजा करते. धणे-गुळाचा नैवेद्य दाखविला जातो व दिवाळीचे गोड पदार्थ प्रसाद म्हणून वाटले जातात. या दिवशी अशा प्रकारे पूजा केल्याने लक्ष्मी प्रसन्न होते/- इतक दुसरा दिवस नरक चतुर्दशीचा असतो या दिवसाला दिवाळीच्या पाच दिवसात खूपच महत्व आहे. या दिवशी कृष्णाने नरकासुर नावाच्या एका राक्षसाचा वध केला होता. नरकासूर हा एक दृष्ट प्रवृत्तीचा राक्षस होता. त्याने सोळा हजार मुलींना बंदिस्त करून ठेवले होते. त्या मुलींचे पालक या प्रसंगाने घाबरले त्यांनी श्रीकृष्णाची भेट घेऊन, त्याला आपले दुःख सांगितले. या घटनेमुळे श्रीकृष्णाला पालकांची दया आली. त्यांचे दुःख दूर करण्याची जबाबदारी त्याने घेतली. कासुराचं आणि श्रीकृष्णाचं युध्द झाल. श्रीकृष्णाने सकासुराचा वध करून सगळ्या मुलीची सुटका केली. आपल्या मुलींना सुखरूप पाहून पालक आनंदले. नरकासुराच्या बंधामुळे सार संकट संपले. ही घटना आश्विन वद्य चतुर्दशीला पडली. या घटनेची आठवण म्हणून या दिवसाला नरकचतुर्दशी म्हणतात. तिसरा दिवस लक्ष्मीपूजनाचा असतो. या दिवशी अमावस्या असते. व्यापारी मंडळी या दिवशी आपल्या दुकानात लक्ष्मीपूजन करतात. या दिवश प्रसाद म्हणून माळीच्या लाह्या आणि बनासे वाटले जातात. काही लोकात घरीसुध्दा लक्ष्मीपूजन केले जाते. लक्ष्मीपूजन झाल्यावर मोठ्या प्रमाणात फटाके फोडले जातात. बौचा दिवस बलिप्रतिपदेचा असतो, गुढीपाडवा हिंदू धर्मियांचा पहिला दिवस, वाप्रमाणे बलिप्रतिपदा किंवा व्यापारी पाडवा व्यापारातीत पहिला दिवस होय. हा दिवस साडेतीन मुहूतांपैकी एक शुभ दिवस मानला जातो. भाऊबीज हा दीपावलीचा शेवटचा दिवस, या दिवशी यम सुध्दा आपला बहिणीला भेटावयास तिच्या घरी जातो. या दिवशी बहीण आपल्या भावाला ओवाळते. दिवाली हा सण भारतात नव्हे तर इतर देशातसुध्दा साजरा करतात 


→ सुविचार

 • दिवाळी सण मोठा, आनंदाला नाही तोटा • अज्ञानाशी लढावयाचे तर ज्ञानानेच लढता येईल- विनोबा भावे. 

• मऊ मेणाहूनी आम्ही विष्णुदास । कठिण वज्रासी भेदू ऐसे। भले तरी देऊ कासेची लंगोटी । नाठाळाचे माथा हाणू काठी ।। संत तुकाराम

→ दिनविशेष • ग्रँट मेडिकल कॉलेज - १८४५. भारतातील पहिले वैद्यकीय महाविद्यालय मुंबई येथे १ नोव्हेंबर १८४५ रोजी सुरु झाले. त्यामुळे ● मऊ मेणाहूनी आम्ही विष्णुदास । कठिण बज्रासी भेटू ऐसे । भले तरी देऊ कासेची लंगोटी । नाठाळाचे माथा हाणू काठी ।। संत आधुनिक पाश्चात्य वैद्यकीय शिक्षण भारतातच मिळण्याची सोय झाली. ऑक्टोबर १८४५ मध्ये जाहीर प्रकटनाद्वारे या नव्या शिक्षणक्रमासाठी अन मागविण्यात आले. शिक्षण पूर्ण मोफत होते व त्यासाठी पाठ्यवेतनही होते. परंतु भारतीय समाजातील गैरसमाजामुळे विद्यार्थी येईनात. सुरुवातीला पाच ख्रिस्ती, तीन पारशी, पाच हिंदू अशा फक्त १३ विद्यार्थ्यांच्या प्रवेशाने कॉलेज सुरू झाले. २५ मार्च १८५१ ला या विद्यार्थ्यांची अंतिम परीक्षा झाली. त्यात ८ जणांना जी.एम.सी.सी. (ग्रॅज्युएट ऑफ मेडिकल कॉलेज) ही पदवी देण्यात आली. त्यात भाऊ दाजी व आत्माराम पांडुरंग हे दोन हिंद होते. सर जमशेटजी जिजीभाई यांनी हॉस्पिटलसाठी १ लाख रुपये देऊन हॉस्पिटल सुरू केले


. → मूल्ये 

• राष्ट्रप्रेम, सेवा तुकाराम

• 

 → अन्य घटना 

 - • छत्रपती संभाजी राजांनी पोर्तुगीजांचा पराभव केला - १६८३. 

• द्वैभाषिक, मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण - १९५६

 • भाषावार प्रांतरचना अस्तित्वात आली. - १९५६

जñ • पंजाब राज्याची पंजाब व हरियाना अशा दोन स्वतंत्र राज्यात विभागणी झाली. - १९६६. 


→ उपक्रम -

 • महाराष्ट्रात आतापर्यंत जे मुख्यमंत्री झाले त्यांची नावे लिहा. • भारतातील राज्ये व केंद्रशासित प्रदेश नकाशात बघून सांगा. 


→ समूहगान 

-• बहु असोत सुंदर संपन्न की महा.... 


→ सामान्यज्ञान 

• साऱ्या जगभर विविध प्रकारच्या, आकाराच्या, रंगछटांच्या, पंखांच्या, बिनपंखांच्या जवळपास १४००० जातीच्या मुंग्या आढळतात. जेमतेम डोळ्याला दिसेल अशा आकारापासून इंचभर आकाराच्याही मुंग्या आढळतात. बहुतांश मुंग्या जमिनीखाली वारूळे करून राहतात. मुंग्या ४ दिवसापर्यंत उपाशी राहू शकतात. मुंग्यांना रक्तजन्य व प्राणीज पदार्थ जास्त आवडतात. मुंग्याचे वारूळ हे कायम अभ्यासाचा विषय ठरलेले आहे. काळ्या मुंग्या जास्त जलद हालचाली करतात. जंगलातील मुंग्यांचे वास्तव्य निसर्गाचा समतोल राखण्याकडे जास्त लक्ष देते.. लाकूड खाणारी वाळवी, झुरळासारखे प्राणी, जखमी जनावरे व सरपटणारे प्राणी यांच्यावर लाल मुंग्या झपाट्याने तुटून पडतात. मृत प्राण्यांचे अवशेष मुंग्याच पूर्ण खाऊन टाकतात.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा