Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

शुक्रवार, ३ नोव्हेंबर, २०२३

10 नोव्हेंबर- दैनंदिन शालेय परिपाठ

 १० नोव्हेंबरप्रार्थना 

- तुही राम है, तू रहीम है, तू करीम कृष्ण, खुदा हुवा...


 → श्लोक 

 प्रारभ्यते न खलु विघ्नभयेन नीचैः । प्रारभ्य विघ्नविहता : विरमन्ति मध्याः । - रूप-जिजाऊ • *विघ्नैः पुनः पुनर् अपि प्रतिमन्यमानाः प्रारब्धम् उत्तमजनाः न परित्यजन्ति ।।

  संकटाच्या भीतीने नीच वृत्तीचे लोक कार्य आरंभीतच नाहीत. मध्यम प्रकारचे लोक कार्यास प्रारंभ केल्यावर संकटांनी हतबल होऊन काम करण्याचे थांबवितात. उत्तम प्रकारचे लोक संकटांचे पुन्हापुन्हा आघात झाले तरी आरंभिलेले काम टाकून देत नाहीत. हाती घ्यावे ते तडीस न्यावे' (निर्वाहः प्रतिपन्नस्तुषु) हेच उत्तम प्रकारच्या लोकांचे ब्रीद असते.

  

 → चिंतन-

  पूर्व दिव्य ज्यांचे त्यांना रम्य भावी काळ, बोध हाच इतिहासाचा सदा सर्व काळ - कवी विनायक. इति+है+आस अशी इतिहास शब्दाची फोड आहे. त्याचा अर्थ 'असे असे घडले' इतिहास मागच्या झालेल्या चुका टाळायला शिकवितो आणि न कळत पुढे कसा वागावे हे ही सांगतो. इतिहासातील स्फूर्तिदायी प्रसंग, घटना माणसांना नवी प्रेरणा देतात. आपल्या आजोबांनी नारळाचे झाड लावलेले असते. त्या नारळाची निगा राखलेली असते पण त्याची फळे नातवांना मिळतात. आपणही असेच कष्टपूर्वक काम केले पाहिजे. केलेले कष्ट कधीच वाया जात नाहीत. आपली बुध्दी, शक्ती आयुष्यभर खर्च करून शास्त्रज्ञ शोध लावतात. त्या शोधामुळे साऱ्या मानवजातीला फायदा लाभतो. सत्कार्यात कल्याण लपलेले असते हे खरे. (जो इतिहास वाचतो, तोच इतिहास घडवू शकतो; जो इतिहास विसरतो तो इतिहास घडवू शकत नाही.)


कथाकथन

 संगत जशी व्यक्ती पडे तशी होतो?" राजाने हा प्रश्न विचारला, त्याचवेळी रस्त्याने पोपटाची दोन पिले घेऊन जात होता. राजाला दिले विक • एकदा राजा विक्रमाने आपल्या गुरूना प्रश्न केला. 'गुरुदेव संगतीचा परिणाम प्राणिमात्रांवर सांगितले. सेवकाने ती पिले आणताच राजमाता म्हणाला, "हे राजाबातील एक तू या धर्मानंद सशील व पंडिताला दे आणि दुसरे पिल्याच नगरीतील तो दुर्व्यसनी व शिका खाटी भोगना यांच्या स्वाधीन कर. सात-आठ महिन्यानंतर या दोन पिलांच्या वागण्यात काय फरक पडतो, तो तू पाहा, म्हणजे तुला संगतीनुसार प्राण्याच्या वागण्यात कसा फरक पडली, ते कळून येईल." राजाने त्याप्रमाणे करायचे ठरविले. सात-आठ महिन्यानंतर आपल्यासंगे एक-दोन सेवक घेऊन राजा प्रथम धर्मानंद नावाच्या पंडिताकडे गेला. पराच्या हल्या बाजूला आडव्या खांबाला टांगलेल्या पिंजऱ्यातलं - आता मोठं झालेलं ते पोपटाचं पिल्लू बोलू लागलं, 'या! आसनावर बसा. आपल्या याने आम्ही धन्य झालो आहोत.' त्याच्या या बोलण्यानं आनंदित झालेल्या राजानं पंडिताला सांगून तो पिंजरा आपल्या एका सेवकासंगे राजवाड्यावर | पाठविला व तो त्या उरलेल्या सेवकासह त्या दुर्व्यसनी व शिवराळ कसायाच्या घराकडे गेला. त्या घराच्या दर्शनी बाजूला टांगलेल्या पिंजयात असलेल हे दुसरे पिहूही आता मोठं झालं होतं. राजाला पुढल्या वेशीतून अंगणात येताना पाहताच ते थयथय नाचत त्याच्याकडे पाहत कर्णकर्कश आवाजात ओरडू लागले. 'अरे चोरा! आलास तसा चालता हो; नाहीतर मी तुझी तंगडी तोडून टाकीन' त्याच्या या शब्दांनी क्रुध्द झालेल्या राजाने तोही पिंजरा त्या कसायाला सांगून आपल्या सेवकांबरोबर राजवाड्यावर पाठविला व पाठोपाठ तोही तिकडे गेला. वाड्यावर गेल्यावर राजाने आपल्या सेवकाला त्या शिळ पोपटाची मान मुरगळून त्याला मारायला सांगितले असता पंडिताकडल्या पोपटाने त्याला विचारले 'त्याचा जीव का घेता?' राजाने उत्तर दिले. 'याला आणायला कसायाकडे गेलो असता त्याने मला शिव्या दिल्या व माझा अपमान केला म्हणून' यावर त्या पोपटाचा जीव न घेण्याची राजाला विनंती करून पंडिताकडला पोपट त्याला म्हणाला. 

 

'गवाशनानां स शृणोति वाक्यम् अहं हि राजन् विदुषां वचांसि । न तस्य दोषो न च मद् गुणो वा संसगंजा दोषगुणा भवन्ति ।।

 

 ' (भावार्थ हे राजा, त्या पोपटाच्या कानी असंस्कृत (शब्दश: अर्थ गोमांसभक्षक) माणसांचे बोलणे पडते, तर मला विद्वानांचे बोलणे ऐकायला मिळते. त्यामुळे तो वाईट बोलतो यात त्याचा दोष नाही किंवा मी चांगले बोलतो यात माझा चांगलेपणा नाही. कारण संगतीनुसार प्राणमात्रांच्या ठिकाणी दुर्गुण वा सद्गुण निर्माण होत असतात.) अशा रीतीने राजा विक्रमाने त्याच्या गुरूला विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर त्याला त्या पोपटाच्या तोंडून मिळाले व त्याचे समाधान झाले. 


सुविचार •

 सज्जनांच्या संगतीमुळे दृष्ट माणसे चांगली होतात. परंतु दुष्ट माणसांच्या सहवासामुळे सज्जन माणसात दृष्टपणा येत नाही. • जमिनीवर पडलेल्या फुलांचा सुगंध मातीला लागतो, परंतु फुले काही मातीचा वास धारण करीत नाहीत. जशी संगती, तशी व्यक्ती घडत असते

 

दिनविशेष - • ल. रा. पांगारकर स्मृतिदिन १९४१ - मराठी भाषेतील प्राचीन संतवाङ्मयाचे सुप्रसिध्द अभ्यासक, रसाळ लेखक व उत्तम वक्ते म्हणून उभ्या महाराष्ट्रास ते परिचित आहेत. त्यांचे सारे आयुष्य अध्यात्म, भक्ती आणि धर्मसंस्कृती यांना वाहिलेले होते. 'मुमुश्' हे मासिक त्यांनी काढले. त्यांनी संपादित केलेले 'भक्तिमार्गप्रदीप' हे पुस्तक महाराष्ट्रात आजही मोठ्या प्रमाणात सर्वत्र वाचले जाते. ज्ञानेश्वर, मोरोपंत, तुकाराम आदि संतांची चरित्रे त्यांनी लिहिली. अनेक वर्षे प्राचीन मराठी कवी आणि त्यांचे काव्य यांच्याशी एकरूप झालेल्या पांगारकरांनी प्राचीन मराठी वाङ्मयाच्या इतिहासाचे कालसापेक्ष तीन भाग कल्पून तीन इतिहासखंड प्रसिध्द केले. 'स्वराज्यातील कवी' हा चौथा खंड मात्र त्यांच्या निधनामुळे अपूर्ण राहिला. *


 मूल्ये - 

 • साहित्याभिरूची, अभ्यासूवृत्ती


 → अन्य घटना 

 • सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांचा जन्म - 

 •  अफझलखानाचा वध १८५९ 

 • शिवप्रतापदिन शिवाजी राजांनी प्रतापगड १८४८ जिंकला - १६५९. 

 • कन्हैयालाल दत्त यांना फाशी - १९०२. प्रसिद्ध गायिका माणिक वर्मा यांचे निधन-१९९६. 


→ उपक्रम -

 • 'राजा छत्रपती' हे ब.मो. पुरंदरे यांचे पुस्तक वाचा.

  • ज्ञानेश्वर व तुकाराम या संतांची चरित्रे वाचा. 


→ समूहगान

 -• हम होंगे कामयाब, हम होंगे कामयाब... 


→ सामान्यज्ञान

 • आळंदी येथील ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधिमंदिरातील अजानवृक्षाखालच्या अजानबागेत ज्ञानेश्वरीचे वाचन पठण सतत चालू असते. आतापर्यंत तेथे स्त्रियांना वाचनास बंदी होती. फेब्रुवारी ९६ मध्ये आळंदी येथे मराठी साहित्य संमेलन भरले होते. त्यानिमित्ताने व ज्ञानेश्वरीच्या | सप्तशताब्दीच्या निमित्ताने सात शतकांची ही बंदी उठविण्यात आली. आता अजानवृक्षाखाली स्त्री-पुरूष कोणीही ज्ञानेश्वरीचे वचन पठण करू शकतात.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा