Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

शनिवार, १६ सप्टेंबर, २०२३

22 सप्टेंबर-दैनंदिन शालेय परिपाठ

 

 22 सप्टेंबर-दैनंदिन शालेय परिपाठ

राष्ट्रगीत-क्लिक करा


 प्रतिज्ञा-क्लिक करा


 → प्रार्थना -क्लिक करा


समुहगीत-क्लिक करा


 → श्लोक 

करी साजे त्याग, श्रवण युगुली सच्छ्रवण ने मुखी सत्य, स्वत्वाचरण विलसे शीर्यही मुजे । स्वशीर्षे थोराला नमन विभवावाचुनि पहा । भल्याचा की स्वभाविक शुभ अलंकाराविधि हा ।।

 हात त्यागाने शोभतात, कान सदुपदेशाने शोभून दिसतात, मुखाला शोभा सत्यवचनांनी येते. सदाचरणाने पुरुष शोभून दिसतो, हात शीर्य गाजविण्याने सुंदर दिसतात, थोर पुरुषाच्या पुढे नम्र झाल्याने मस्तक शोभते, कसलेही अन्य वैभव नसले, तरी जन्मात थोर पुरुषाचे हे अलंकारचं होतं.

 चिंतन 

सर्वांना मागे टाकून आपण एकटेच पुढे जाऊ पाहणे चुकीचे आहे. अशा रीतीने चालण्यात अखेरी यशही येत नाही असा अनुभव येतो. दुसऱ्याच्या मुक्तीसाठी धडपड करण्यातच आपणासही मुक्तिलाभ होतो, हे तत्व केव्हा ना केव्हा तरी प्रत्येकाच्या अनुभवास आल्यावाचून राहणार नाही. स्वामी विवेकानंद 

कथाकथन

 'शिष्याची परीक्षा 

प्राचीन काळी गुरुकुल पद्धती होती. तेव्हा आचार्याकडे तीन शिष्य विद्या ग्रहण करण्यासाठी आले आचार्यांांनी आपल्या आश्रमामध्ये विद्यादानाचे कार्य सुरू केले. विद्या ग्रहण करीत असताना आचायांच्या सहवासात आश्रमातील दिवस भरभर निघून गेले. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तीनही शिष्य गुरुदक्षिणा देण्यासाठी आचार्यांकडे गेले. तेव्हा आचार्यांनी शिष्यांची परीक्षा घ्यायचे ठरविले. दुसऱ्या दिवशी तिन्ही शिष्य परीक्षेकरिता आले. इकडे आचार्यांनी परीक्षा घेण्यासाठी रस्त्यावर काटे पसरवून ठेवले होते. आचार्यांनी शिष्याला सांगितले की, हा काटेरी मार्ग पार करून आश्रमामध्ये प्रवेश करायचा, ' ठरल्याप्रमाणे आचार्य आश्रमात बसून होते. सर्वप्रथम पहिला शिष्य काटेरी मार्गावरून पायी चालत चालत आश्रमात आचार्यांकडे गेला. तेव्हा शिष्याचे पाय पूर्ण रक्तबंबाळ झाले होते. त्यानंतर दुसरा शिष्य काटेरी मार्गावर पाऊलवाटेतील काटे बाजूला सारून पायाला एकही काटा न रुतू देता आचार्यांजवळ पोहोचला. नंतर तिसऱ्या शिष्याने हाती झाडू घेऊन रस्त्यावरील काटे झाडून रस्ता साफ केला आणि सर्व काटे जाळून टाकल्यानंतर आचायांजवळ आला तेव्हा आचार्यांनी तिसऱ्या शिष्याचे अभिनंदन केले; तेव्हा दोन्ही शिष्यांना आश्चर्य वाटले, तेव्हा पहिला शिष्य आचार्यांना म्हणाला, मी कशाचीही पर्वा न करता रक्तबंबाळ होऊन आपल्या जवळ आलो.' दुसरा शिष्य म्हणाला,' मी एकही काटा रुतू न देता सुखरुप आपल्याजवळ आलो. ' तेव्हा आचार्यांनी शांतपणे उत्तर दिले. शिष्योत्तमा तुला काही गरज नसताना पाय रक्तबंबाळ करून आलास." दुसन्या शिष्याला म्हणाले, “तू काटेरी रस्त्यावरून येताना फक्त स्वतःपुरता विचार केलास. तर तिसऱ्या शिष्याने मात्र स्वतःचा विचार करून दुसऱ्यांचा ही विचार केला." असे आचार्यांनी सांगताच दोन्ही शिष्य निरुतर झाले.

सुविचार

 • चांगल्या गोष्टी टिकून राहतात. वाईट गोष्टी पान्यवर उडून जातात. कर्तव्य करीत राहणे हीच खरी वाटचाल आहे.- महात्मा फुले 'जीवन जगतांना स्वतःबरोबरच दुसऱ्यांचासुध्या विचार करावा.

 • भक्तीच्या मनात मूलभूत परिवर्तन घडून येण्यापासूनच शिक्षणाला प्रारंभ होतो. 


दिनविशेष 

•• कर्मवीर भाऊराव पाटील जन्मदिन १८८७. महाराष्ट्रातील एक थोर समाजसुधारक व शिक्षणतज्ज्ञ जन्म कोल्हापूर जिल्ह्यातील कुंभोज या खेडेगावी २२ सप्टेंबर १८८७ मध्ये झाला यमिक शिक्षण खेडयातच होऊन फोल्हापूरला इंग्रजी सहावीपर्यंत शिकले. विक्रेते म्हणून खेडोपाडी हिंडल्यामुळे जनतेचे अज्ञान व शिक्षणाचा अभाव यांची त्यांना जाणीव झाली. कराडजवळ काले या गावी त्यांनी पहिले वसतिगृह काढले (१९१९). तोच रयत शिक्षण संस्थेचा शुभारंभ होय. पुढे १९२४ मध्ये सातारा येथे अस्पृश्यांसह सर्व जातिधर्माच्या विद्यार्थ्यांसाठी त्यांनी वसतिगृह काढले. महात्मा गांधींनी १९२७ साली या वसतिगृहास भेट देऊन त्यांच्या कार्याबद्दल प्रशंसोद्गार काढले गोरगरीब पण हुशार मुलांना सातारच्या शाहू बोर्डींगमध्ये ठेऊन पोटच्या पोरांप्रमाणे सांभाळले. त्या पैकी अनेक जणांना उच्च शिक्षणासाठी परदेशी पाठवलं. सर्व जातिधर्माचे आजन्म कार्यकर्ते सेवक त्यांनी घडविले. शिक्षणापासून वंचित राहिलेल्या समाजाला त्यांनी शिक्षणाची संधी प्राप्तकरून दिली. रयत शिक्षण संस्था खऱ्या अर्थाने जनतेची झाली. जनता त्यांना आदराने व प्रेमाने कर्मवीर म्हणू लागली. 'वटवृक्ष हे बोधचिन्ह आणि 'स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद' हे संस्थेचे बोधवाक्य आहे, महात्मा फुले व राजर्षी शाहू महाराज त्यांची शिक्षण प्रसाराची इच्छा त्यांनी पूर्ण केली. पुणे विद्यापीठाने त्यांना 'डी.लिट्. ही सन्मान्य पदवी अर्पण केली भारत सरकारने १९५९ साली पद्मभूषण हाकितांच देऊन त्यांचा सन्मान केला. ९ मे १९५९ रोजी ते पुणे येथे निधन पावले. 

अन्य घटना 

गुरुनानक स्मृतिदिन १५३९. मायकेल फॅरेडे जन्मदिन १७९१. दिवसरात्र समान अयन दिन 

उपक्रम 

कर्मवीर भाऊराव पाटील यांचे चरित्र मिळवून वाचा. 


सामान्यज्ञान

 • रयत शिक्षण संस्था ही खेड्यापाडयातून शिक्षण प्रसार करणारी सर्वात मोठी संस्था, 'कमवा व शिका' ही योजना सुरू करून या संस्थेने गरीबातील गरीब विद्यार्थ्यांच्याही शिक्षणाची सोय केली. गरीब, सामान्य लोकांच्या १/१ रुपयाच्या देणगीचा हातभार या संस्थेस लाभला आहे. कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा