23 सप्टेंबर-दैनंदिन शालेय परिपाठ
→राष्ट्रगीत-क्लिक करा
→प्रतिज्ञा-क्लिक करा
→ प्रार्थना -क्लिक करा
→समुहगीत-क्लिक करा
→ श्लोक
• सत्यानुसारिणी लक्ष्मी : कीर्तिस्त्यागानुसारिणी । कर्मानुसारिणी बुद्धि विद्या ऽ भ्यासानुसारिणी ॥ सत्याचरणाने लक्ष्मी येते. त्यागामागून कीर्ती येते. मनुष्य जी कर्मे करतो. त्यांना अनुसरुन त्याला बुध्दी होते आणि अभ्यासाने विद्या देते.
→ चिंतन
सर्व स्त्री पुरुषांस धर्म व राजकीय स्वतंत्रता आहे. जो दुसऱ्याचे हक्क समजून घेऊन इतरांस पीडा देत नाही, त्यांचे नुकसान करीत नाही, तो सत्यवर्तन करणारा म्हणावा. आपले प्रकट विचार व मते यापासून दुसऱ्याचे नुकसान होऊ नये म्हणून जे खबरदारी घेतात त्यास सत्यवर्तन त्यास नीच मानून त्यांचा छळ करीत नाहीत, त्यास सत्यवर्तन करणारे म्हणावे. गावकी किंवा मुलको वार करणारे म्हणावे. दुसऱ्यांच्या मतांवरून जे अधिकाऱ्यांच्या जागा स्त्री-पुरुषांच्या योग्यतेनुरुप, सामर्थ्यानुरूप मिळाव्यात असे मान्य करतात ते सत्यवर्तन करणारे म्हणावे. महात्मा फुले
→ कथाकथन
'स्त्री पुरुष समानता' हवी आम्हाला
स्त्री आणि पुरुष यांना भारतीय संस्कृतीत संसाररूपी रथाची दोन चाके म्हटले आहे. चाके म्हणजे रथाचा आधार, रथाचा तोल, रथाची गती, जेव्हा ही दोन्ही चाके समान आकाराची म्हणजे जाडी, उंची, परिष इ. सर्व बाबतीत सारखी असतील, तेव्हाथ रथ आपल्या लक्ष्यप्राप्तीच्या रस्त्यावर इच्छित गतीने व अपेक्षित दिशेने चांगल्या प्रकारे धावू शकतो. यातील एखादे चाक जरी वेगळे असेल, कमकुवत असेल तर रथ पुढे जाऊ शकत नाही. हट्टाने दडपण्याचा प्रयत्न केला तर उलट होऊन पडतो, मोडतो. त्यामुळे इतरांनाही त्रास होतो. प्रत्यक्ष संसाराचेही तसेच आहे. स्त्री आणि पुरुष हे संसाराचे दोन प्रमुख घटक. या दोन्ही घटकांत सर्वच बाबतीत समानता असेल तरच संसार नीट, सुरळीत, न कुरकुरता चालू राहतो, नाहीतर त्या कुटुंबाचे जीवन उद्ध्वस्त होण्याची वेळ येते. मानव म्हणून स्त्री आणि पुरुष या दोघांनाही सारखेच महत्व आहे. मानव म्हणून दोघांच्याहीमध्ये अनेक प्रकारचे सारखे गुण असतात. स्थान वैशिष्ट्ये किंवा भूगोलामुळे व्यक्तित्यात काही विशेष गुण येतात. अर्थात पारिवारिक किंवा काही सामाजिक संस्कारांमुळे सुध्दा काही विशेष गोष्टींची जडणघडण व्यक्तित्वामध्ये होत असते. पण काही विशेष कारणांनी ज्या वेळी काही विशेष गुणांचे प्राबल्य वाढते, काही संस्कार अत्यंत प्रभावी ठरून तो 'दुसऱ्या घटकांस आपल्या प्रभावाखाली ठेवतो, ताब्यात ठेवतो. तो घटक सत्ताधारी बनतो. अशा तऱ्हेने ज्या समाजात पुरुष हा घटक प्रभावी ठरून सत्ताधीश होतो. तेथे पुरुषप्रधान संस्कृतीचा जन्म होतो. तेथे पुरुषांचाच अधिकार चालतो. पुरुषप्रधान संस्कृती जपली जाते. त्यांचाच मान वाढत जातो. पुरुषांचे मत हेच अंतिम मत मानले जाते. उलट स्त्री घटक येथे प्रभावी ठरतो, तेथे तोच सत्ताधारी बनतो. स्त्रीप्रधान संस्कृतीचा तेथे जन्म होतो. स्त्रीचा अधिकार सर्वत्र चालतो. स्त्रियांचा मान-सन्मान वाढत राहतो. त्यांचे म्हणणे ग्राह्य धरले जाते. निर्णयाचा अधिकार स्त्रियांनाच असतो. त्यांचे मत अंतिम ठरते. त्यांच्या आसेनुसार, त्यांच्या हुकमतीनुसारच सारे सारे चालते. पण आपण सध्याच्या जगातील समाजाचा अभ्यास केला असता असे दिसून येते की स्त्रियांचे प्रभुत्व असलेले, स्त्रियांची सत्ता असलेले, स्त्रियांना मान देणारे मानवी समाज फारच कमी आहेत. भारतीय समाजातील काही आदिवासी जमाती, केरळ व आसाम राज्य तसेच भारताच्या | शेजारी असलेल्या देशांपैकी ब्रह्मदेश (म्यानमार), श्रीलंका या ठिकाणीच स्त्री प्रधान संस्कृती असल्याचे दिसून येते. बाकी सर्वत्र पुरुष प्रधान संस्कृती असून सर्वत्र | क्षेत्रात पुरुषांचे वर्चस्व गाजविण्याची प्रवृत्ती असल्याचे दिसून येते. स्त्री-पुरुष समानता म्हणजे सर्व मानवजात ही एकच असून त्यात असलेल्या स्त्री आणि पुरुष या दोन घटकांना सारखेच स्थान आहे. सारखाच दर्जा आहे हे मान्य करणे. यामुळेच त्यांच्यात कोणी वरिष्ठ वा कनिष्ठ असा भेदभाव होऊ शकत नाही. तसा कोणाचा दर्जा ठरू शकत नाही. जीवनात विकास करण्यासाठी स्त्री आणि पुरुष या दोघांनाही समान संधी मिळाल्या पाहिजेत. ठराविक अशा विशिष्ट कामासाठी स्त्री आणि पुरुष अशा दोघांनासुध्दा समान आर्थिक मोबदला वेतन मिळाले पाहिजेत. स्त्री आणि पुरुष अशा दोघांनाही समान मान, समान दर्जा, समान प्रतिष्ठा मिळाली पाहिजे. भारतीय राज्यघटनेने नागरिकांना दिलेले सर्व मूलभूत हक्क आणि दिलेले अधिकार प्रत्येक स्त्री पुरुषास सारखेच उपभोगता आले पाहिजेत, कुटुंबात आणि समाजात स्त्री पुरुष असा भेद न करता दोघांनाही समान वागणूक मिळाली पाहिजे.
→ सुविचार -
'समान न्याय, समान दर्जा, समान संधी, समान स्वातंत्र्य, समान वागणूक मिळावी म्हणजे स्त्री- पुरुषसमानता. '
→ दिनविशेष
सत्यशोधक समाजाची स्थापना १८७३ हक्क मागून मिळत नसतात, सतत झगडा करून ते मिळवावे लागतात असे जोतीरावांचे स्पष्ट मत होते. म्हणून ब्राह्मणांच्या मानसिक गुलामगिरीतून कनिष्ठ वर्गाला मुक्त करणाऱ्या महत्त्वाकांक्षेने प्रेरित होऊन त्यांनी चळवळ सुरू केली, बाह्मणेत्तर समाजामध्ये खरी धर्मजागृती आणि विचारजागृती निर्माण करण्यासाठी त्यांनी २३ सप्टेंबर १८७३ मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना केली. या सत्यशोधक समाजाचे सर्व धर्मांचे व जातींचे नागरिक सदस्य व्हावेत, अशी त्यांची योजना होती. त्यांनी मीलिक आणि प्रासंगिक असे दोनही प्रकारचे लेखन अनेक पुस्तके व पुस्तिका प्रसिध्द केल्या. सत्यशोधक चळवळ म्हणजे सामाजिक कार्यामध्ये अनेक वर्षे दडपल्या गेलेल्या दलितांच्या पहिल्या प्रतिकाराचा आवाज. मानवाच्या समतेवर विश्वास घोषित करणारी आधुनिक महाराष्ट्रातील ही पहिली चळवळ. माणुसकी, न्याय, स्वातंत्र्य, समता व बंधुता ही पंचतत्वे मानवी जीवनातील सर्वश्रेष्ठ मूल्ये आहेत, हे या चळवळीतून जोतीबांनी मांडले. सत्य या मूल्याचे जीवनातील स्थान सांगताना जोतीबा म्हणतात 'सत्य सुखाला आधार । बाकी सर्व अंधकार ॥
→ मूल्ये
• समाजसेवा, सत्यनिष्ठा
→ अन्य घटना
• नेपच्यून ग्रहाचा शोध १८४६. लोकमान्य टिळकांचा मंडाले तुरूंगात प्रवेश १९०८. साहित्यिक मामा वरेरकर स्मृतिदिन - १९६४. भारत पाकिस्तान युध्दास विराम- १९६५ क्रिकेटपटू सुनील गावसकर यांना या वर्षीचा 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार १९९८ - → उपक्रम - सत्यशोधक समाजाबद्दल अधिक माहिती मिळवा.
→ समूहगान
राष्ट्र की जय चेतना का गान वंदेमातरम्...
→ सामान्यज्ञान
• आपल्या त्वचेमध्ये २० ते ४० लाख धर्मग्रंथी असतात. तळहातावर सर्वांत जास्त म्हणजे दर सं.मी. ला ४५० असतात. तर कपाळावर दर सें.मी. ला ३५० असतात. घाम उष्णता कमी करून शरीराचे तापमान थंड करण्यास मदत करतो. अतिशय घाम येणे किंवा अजिबात धाम न येणे हे दोन्ही एक प्रकारचे विकार आहेत. म्हातारपणी धाम कमी येतो. घाम कमी आल्याने लवकर दमणूक होते आणि उष्माघाताचे प्रमाण अधिक वाढते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा