Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

शनिवार, २ सप्टेंबर, २०२३

15 सप्टेंबर -दैनंदिन शालेय परिपाठ

         १५ सप्टेंबर -दैनंदिन शालेय परिपाठ

→ प्रार्थना 

सर्वात्मका शिव सुंदरा, स्वीकार या अभिवादना...

 → श्लोक 

 - शतेषु जायते शूरः सहस्त्रेषु च पण्डितः । वक्ता दर्शसहस्त्रेषु दाता भवतिवान वा ॥ शंभर माणसात एखादा शूर निपजतो. हजार माणसात एखादा विद्वान जन्माला येतो. दहा हजार माणसात एखादाच वक्ता असतो. दाता मात्र होईल की नाही, याची शंकाच आहे.

→ चिंतन

 भारताच्या ६० व्या स्वातंत्र्यदिनाचे वेळी भारताचे राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी भारतातील युवकांना दिलेली शपथ.

  १) मला याची जाणीव आहे की माझ्या आयुष्याचे ध्येय माझे मीच निश्चित केले पाहिजे. त्या ध्येयाच्या प्राप्तीसाठी मी आवश्यक ते ज्ञान मिळवेन आणि खूप मेहनत घेईन. जेव्हा या वाटचालीत अडचणी येतील तेव्हा त्या अडचणींवर मात करून जीवनात यशस्वी झालेच पाहिजे, याचीही मला सुस्पष्ट जाणीव आहे. 

  २) या देशाचा एक युवक या नात्याने माझ्यावरील जबाबदाऱ्या यशस्वीपणाने पार पाडण्यासाठी माझे काम अत्यंत धीरोदात्तपणे करेन आणि त्याचबरोबर इतरांच्या यशातही मी माझा आनंद मानेन.

   ३) मी स्वतः नेहमीच स्वच्छ राहीन. तसेच मी माझे घर, माझा परिवार, माझा शेजार आणि माझ्या आसपासचे वातावरण नेहमीच स्वच्छ व नीटनेटके ठेवेन

   . (४) मला माहीत आहे की माणसाच्या मनातील नैतिकतेमुळेच तर त्याच्या चारित्र्यात सौंदर्य निर्माण होते; या चारित्र्यगत सौंदर्यामुळे कुटुंबात ऐक्य निर्माण होते; या कौटुंबिक ऐक्यामुळे देशात सुव्यवस्था निर्माण होते; आणि अंतिमतः देशातील सुव्यवस्थेमुळेच तर जगात शांतता निर्माण होते. 

   ५) मी एक प्रामाणिक आणि भ्रष्टाचारमुक्त जीवन जगेन. तसेच मी माझ्या जीवनाद्वारे इतरांसमोर चारित्र्यसंपन्न जीवनाचा एक उत्तम आदर्श ठेवेन

   . (६) मी माझ्या देशात ज्ञानाचा दिवा प्रज्वलित करेन व तो सतत प्रज्वलित कसा राहील याबद्दल मी जागरूक राहीन.

    (७) माझ्यावर सोपविलेले कोणतेही काम जर मी अत्यंत उत्कृष्टपणाने पार पाडले तर त्याद्वारे इ.स.२०२० मधील विकसित भारताचे स्वप्न प्रत्यक्षात उतरविण्यासाठी मी माझा छोटासा वाटा उचलल्याचे समाधान मला मिळेल.

कथाकथन '

सर मोक्षगुंडम विश्वेश्वरैय्या' (जन्म १५ सप्टेंबर १८६२, मृत्यू १४ एप्रिल १९६२) स्थापत्यशास्त्रज्ञ मयूरपासून १२ मैलांवर - - कृष्णराजसागर हे प्रचंड धरण बांधणारे मोक्षगुंडम विश्वेश्वरैया आज आपल्यात नाहीत. हे धरण दीड मैलाहून सांब, ११ फूट रुंद व १४० फूट खोल आहे. १४० फूट उंचीच्या या धरणाला ७११ दरवाजे आहेत. ते दरवाजे पाण्याच्या पातळीप्रमाणे आपोआप उघडतात. डाव्या बाजूला काढलेल्या विश्वेश्वरैय्या कालव्यासाठी डोंगर सुमारे चार हजार फूट लांबीचा बोगदा आहे. धरणाजवळ अतिसुंदर वृंदावन आहे. याशिवाय हैदराबादच्या मुसानदीला कबूत ठेवून शहराचा धोकाही त्यांनी टाळता आहे. खडकवासला धरणाला लावलेले पाण्याच्या पातळीप्रमाणे उडणारे व बंद होणारे कळसूत्री दरवाजेही त्यांनीच कल्पकतेने प्रथम तयार केले. या त्यांच्या कल्पनेचा पनामा कालव्यातही उपयोग करण्यात आला. भारतातील व महाराष्ट्रातील अनेक योजनांचा आराखडा त्यांनी तयार केला. त्यामुळे कर्नाटकात सिमेंट, कागद, साबण यांचे कारखाने उघडले. भद्रावती येथे पोलादाचा कारखाना उभारून उत्कृष्ट प्रतीचे पोलाद निर्माण होऊ लागले. भारत त्यावेळी पारतंत्र्यात होता. स्थापत्यशास्त्राला इंग्रजांचे पाठबळ नव्हते. तरीही जगातील स्थापत्यशास्त्रज्ञांनी तोंडात बोटे सत्तावीत इतके आश्चर्यजनक काम मोक्षगुंडम् यांनी केले. स्वतंत्र भारताने 'भारतरत्न' हा सर्वोच्च किताब देऊन त्यांना गौरवित केले. डॉ. विश्वेश्वरैय्या पांचा जन्म १५ सप्टेंबर १८६२ साली म्हैसूर (कर्नाटक) राज्यातील कोलार जिल्ह्यातील मुद्देनहल्ली या लहानशा खेड्यात झाला. त्यांनी मुंबई विद्यापीठाची एस.सी.ई. ही पदवी घेतली होती व १८८४ साली सार्वजनिक बांधकाम खात्यात नोकरी स्वीकारली. त्यानंतर सेवानिवृत्ती स्वीकारून म्हैसूर संस्थानात | स्थापत्यशास्त्र सल्लागार म्हणून व काही वर्षे दिवाणपदही भूषविले. १९२३ सालच्या लखनऊ येथे भरलेल्या विज्ञान परिषदेचे अध्यक्षस्थान त्यांनाच देण्यात आले. 'कन्स्ट्रक्टिंग इंडिया' व 'लँड इकॉनॉमी ऑफ इंडिया' हे त्यांचे ग्रंथही व्यासंगपूर्ण अध्ययनावर आधारलेले आहेत. १४ एप्रिल १९६२ साली त्यांचे वृद्धापकाळामुळे निधन झाले.

 → सुविचार

 झाडांना फळे येतात ती परोपकारासाठीच, नयांतून पाणी वाहते ते परोपकारासाठीच, गाई परोपकारसाठीच दूध देतात आणि म्हणून या साऱ्यांवर पोसलेला देह, हा परोपकारासाठीच आहे हे विसरू नका.'

  • तुम्ही स्वतःकरिता जे हक्क मागता, जे हवेत असे तुम्हाला वाटते, ते हक्क दुसऱ्यांनाही आहेत हे लक्षात ठेवून व ठेवून व मान्य करून त्यांच्याशी वागा. आर.जी. इंगरसोल


→ दिनविशेष 

 • शरदच्चंद्र चटोपाध्याय (च्याटर्जी) जन्मदिन १८७६ शरच्चंद्र चतर्जी म्हणजे बंगाली साहित्यातील एक मानाचे पान. प्रतिभेचे | अलौकिक देणे लाभलेल्या या साहित्यकाने तत्कालीन भारतीय समाजाचे प्रतिबिंब आपल्या साहित्यातून दाखविले आहे. हिंदू स्त्रीचे दुःख त्यांनी विशेष | करुणपणाने उघड केले आहे. समाजातील शोषित, दलित, पतित, दुर्बल वर्गाबद्दल त्यांना विशेष कळकळ होती. यांच्या उन्नतीसाठी जे जे करणे त्यांना शक्य होते ते त्यांनी केले. त्यांच्या साहित्याची अनेक भाषांमधून भाषांतरे झाली आहेत. हृदयस्पर्शी लेखनामुळे आजही त्यांचे साहित्य शिळे झाले नाही. श्रीकांत, परिणिता, विप्रदास, बिराजबहू, पथेरदाबी, गृहदाह, चरित्रहीन, सव्यसाची या त्यांच्या काही गाजलेल्या कादंबऱ्या. १९३८ मध्ये कलकत्ता विद्यापीठाने त्यांना 'जगत्तारिणी' ही पदवी देऊन गौरविले मूल्ये व्यासंग, बंधुप्रेम, साहित्याभिरुची

→ अन्य घटना 

- ज्ञानेश्वरीची प्रत संत एकनाथांनी शुध्द केली १५८४ भारतात दिल्ली येथून दूरदर्शन कार्यक्रम प्रसारणास प्रारंभ १९५९ -

→ उपक्रम•

 शरदचंद्राच्या साहित्याबद्दल मुलांना माहिती सांगा. शरदचंद्राचे एखादे पुस्तक मिळवून वाचा.

→ समूहगान 

झेंडा अमुचा प्रिय देशाचा, फडकत वरी महान...

→ सामान्यज्ञान - 

• अंटार्क्टिका या खंडावर कुठल्याही वाळवंटापेक्षा कमी पाऊस पडतो.

 • अंटार्क्टिका खंड बहुतांश बर्फाच्छादित असूनही क्वचित  जागृत होणारा माऊंट एर्बस नावाचा ज्वालामुखी तेथे आहे. अंटार्क्टिकावर भारताचे बारमाही संशोधन केंद्र उभे आहे. अंटार्क्टिका खंडावर कोणताही | देश मालकी सांगू शकत नाही. मात्र तेथील पर्यावरण सुरक्षित ठेवण्याची काळजी घेऊन शांतता पूर्ण संशोधन करू शकतो. कॅप्टन कुक या संशोधकाने १७७४ मध्ये प्रथम अंटार्क्टिका खंडाचा शोध लावला. दुर्गमतेमुळे त्यावर वस्ती करण्यास विसावे शतक उजाडले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा