Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

शनिवार, २ सप्टेंबर, २०२३

13 सप्टेंबर -दैनंदिन शालेय परिपाठ

      १३ सप्टेंबर -दैनंदिन शालेय परिपाठ

→ प्रार्थना 

नमस्कार माझा ज्ञानमंदिरा, सत्यम् शिवम् सुंदरारा.....

→ श्लोक

 - नास्ति सत्यात्परोधर्मः नानृतात्पातकं परम् । स्थितिहिं सत्य धर्मस्य तस्मात्सत्यं न लोपयेत् ॥ 

 - जय सावित्री सत्यापरता धर्म नाही, खोटेपणासारखे पाप नाही. सत्याने वागने म्हणजे धर्म टिकविणे होय. म्हणून सत्याचा लोप होऊ देऊ नये.

→ चिंतन 

- मनुष्य मरणाधीन आहे. प्रत्येकाला केव्हा ना केव्हा मरायचेच आहे. पण स्वाभिमानाचा थोर आदर्श संपन्न करण्यात आणि मानवी जीवन अधिक चांगले करण्यात आपण देह ठेवण्याचा प्रत्येकाने निश्चय केला पाहिजे. आपण गुलाम नाही. आपण एक लढाऊ जमात आहोत. शूराला स्वाभिमानशून्य आणि देशभक्तीविरहित जीवन घालविणे याहून अधिक गर्हणीय दुसरे काही नाही. - डॉ. आंबेडकर

 → कथाकथन

  'महाराणी अहिल्याबाई होळकर' - ( जन्म ३१ मे १७२५- मृत्यू १३ ऑगस्ट १७९५) लोकमाता अहिल्यादेवी होळकर हे मराठी स्त्री- पुरुषांचे आदराचे स्थान आहे. अहमदनगर जिल्ह्यातील चौंडी या गावी श्रीमंत मानकोजी शिंदे व सौ. सुशीलाबाई यांच्या पोटी हे कन्यारत्न १७२५ साली जन्मला आहे. भारदस्त तेजस्वी चेहरा, काळे कुळकुळीत केस, डोईवर पदर, भांगाखाली कुंकवाची चिरी, अथांग जलाशयासारखे गहिरे डोळे, असे हे सात्विक रूप होतं. श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्या दरबारातील एक मानकरी सरदार मल्हारराव होळकरांच्या एकुलत्या एक मुलाशी, श्रीमंत (खंडेश्वर) खंडेराव यांच्याशी २० मे १७३७ रोजी विवाह झाला. श्री. खंडेराव तसे बाईक त्यांचे अधिक खेळात. पुढे खंडेराव कुंभेरीच्या लढाईत मारले गेले. अहिल्याबाईना अवघ्या १९ व्या वर्षी वैधव्य आले. सती जाण्याची तेव्हा चालच होती. परंतु सासरे मल्हारराव यांनी सती न जाण्याबद्दल सांगितले. पुढे २० मे १७६६ रोजी मल्हारराव मरण पावले. सगळा राज्यकारभार अहिल्याबाई पाहू लागल्या. माळव्यासारख्या संपन्न प्रांतात इंदूर ही त्यांची राजधानी होती. रामशास्त्रीसारखा न्यायनिवाडा त्या करू लागल्या. प्रजेच्या हिताकडे त्या जातीने लक्ष पुरवित. गुणी माणसांना राज्यात चांगली कामे दिली जात. त्यांचा आदर होता. गोर-गरिबांसाठी त्यांनी अनेक चांगले निर्णय घेतले. अहिल्याबाईच्या दातृत्वास आणि कर्तृत्यास इतिहासात तोड नाही. नद्यांना घाट बांधणे, धर्म बांधणे, नवीन विहिरी खोदणे, तलाव बांधणे अशी प्रजेच्या हिताची अनेक कामे केलीत. अनेक मंदिरांचा जिर्णोध्दार केला. कर्मभूमी इंदोर आणि सभोवतालच्या प्रांतात १३ ऑगस्ट १७९५ रोजी या लोकमातेनं आपला देह ठेवला. अहिल्याबाईंनी आयुष्यभर गृहधर्म व मनुष्यधर्म यांचे यथायोग्य पालन चरणी विनम्र अभिवादन

सुविचार

 स्त्रिया निसर्गतःच बुध्दिमान असतात.' 

 • गमावलेले हक्क भीक मागून आणि सुवाहणान्यांच्या मनोदेवतेपुढे अजीजी करून कधी परत मिळत नसतात, तर अविश्रांत लढा देऊन ते मिळवावे लागतात. - डॉ. आंबेडकर

→ दिनविशेष 

• क्रांतिकारक जतींद्रनाथ दास स्मृतिदिन - १९२९: जतींद्रनाथांचा जन्म कोलकात्यात इ.स.१८६५ मध्ये झाला. बंगालमध्ये अरविंद घोष यांच्या 'वंदे मातरम्' या वृत्तपत्रातून उठविलेल्या जयघोषाने तरुणांची मने जणू पेटून उठली होती. जतींद्रनाथांनी स्वातंत्र्यसमरात उडी घेतली | भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव या क्रांतिकारकांबरोबर असेंब्ली बॉम्ब खटला आणि लाहोर कट यात जतींद्रनाथही पकडले गेले. तुरुंगातल्या यमयातना जुलूम अन्यायाविरुध्द त्यांनी उपोषण सुरू केले. पंडित नेहरूंनी मध्यस्थी करून तुरुंगात येऊन उपोषण सोडण्यास मन वळविले. पण जतींद्रनाथांनी नकर | दिला. आमरण उपोषण करून ताठ मानेने तेजस्वी निर्भयपणाने उपोषणाच्या ६४ व्या दिवशी जतींद्रनाथ अनंतात विलीन झाले.

• मूल्ये • राष्ट्रप्रेम, जिद्द, निष्ठा.

→ अन्य घटना 

• महाराणी अहिल्यादेवी होळकर स्मृतिदिन- १७९५ हैदराबाद संस्थान भारतात विलीन - १९४८ 

• भारत-चीन युध्दात चीनने मॅकमोहन रेषा पार करून अरुणाचल प्रदेशात प्रवेश केला - १९६२

  • मराठी रंगभूमीवरील प्रख्यात नट केशवराव दाते मृत्यू - १९७१.

→ उपक्रम 

• जतींद्रनाथांचे चरित्र मिळवून वाचा. • त्यांच्या चरित्रातील गोष्टी सांगा.

→ समूहगान 

या भूमीचे पुत्र आम्ही, उंचवू देशाची शान....

सामान्यज्ञान -

 • फुलातील मकरंदापासून मधमाशा जो चिकट व गोड द्रव पदार्थ तयार करतात त्याला 'मध' असे म्हणतात. मधामध्ये साखरेचे एकूण प्रमाण किती आहे यावर त्याची प्रत ठरते. जितके साखरेचे प्रमाण अधिक तितकी मधाची प्रत उच्च समजली जाते. मधाचे अनेक औषधी उपयोग होतात. त्वचेतील खोलवरचे व्रण, दूषित जखमा, कुष्ठरोग्यांच्या जखमा, कापणे भाजणे यावरचे व्रण व जखमा यावर मधाचा जंतुनाशक म्हणून उपचार करण्यावर संशोधन सुरू आहे. भारतीयांनी सर्वप्रथम मधोपचार शोधून काढला. आता संशोधनाने मधाचा वापर पुन्हा परिचित होईल व मधोत्पादनाला बरकत येईल. भरपूर फुले असतील तेव्हा वसंत ऋतूत मध्यम आकाराचे पोळे पंधरा ते वीस किलो इतका मध साठवू शकते. कृत्रिम रीतीने मध गोळा करण्याच्या पद्धतीत पोळ्यातून फक्त मध गाळून घेतला जातो. रिकामे पोळे पुन्हा साखर पेरून मध साठविता येते..

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा