Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

शनिवार, २ सप्टेंबर, २०२३

12 सप्टेंबर -दैनंदिन शालेय परिपाठ

१२ सप्टेंबर -दैनंदिन शालेय परिपाठ

→प्रार्थना

 या भारतात बंधुभाव नित्य वसू दे, दे वरचि असा दे....

 → श्लोक

 विद्यासमन्वितहि दुष्ट परि त्यजावा । त्याशी बुधे न सहवास कधी करावा । ज्याच्या असे विमलही मणि उत्तमांगी। तो सर्प काय न चढे खल अंतरंगी ॥ 

 विद्याविभूषित अशा दुष्ट माणसाची संगती शहाण्याने कधीही धरू नये. ज्या सर्पाच्या मस्तकी चमकणारे मणिरत्न असते, तो अंतरंगात भयंकरच असतो.

 → चिंतन 

 बारीक-सारीक घटनांमुळे माणूस चिडतो, दुःखी होतो. तसेच एखाद्या यशाने अहंकारी बनतो. स्वतःला श्रेष्ठ समजतो, दुसऱ्याची अ करतो. यामुळे मनाचा समतोल ढळतो. माणसाजवळ कितीही शैक्षणिक पदव्या असोत. त्यांचे वाचन वा त्याचा अभ्यास कितीही संत

→ कथाकथन 

'देवकार्य'- 

संत नामदेवांनी भक्तिपंथाचा प्रचार सर्व भारतभर केला. हिंदी भाषेतूनही त्यांनी अभंग रचले. त्यातले काही शीखधर्माच्या गुरुग्रंथसाहेब या पवित्र ग्रंथातही समाविष्ट केलेले आहेत. संत नामदेव संपूर्ण विठ्ठलमय झाले होते. या संतांच्या घरी घरकाम करण जनाबाई नावाची मोलकरीण होती. ती नामदेवांच्या घरी केर काढायची, धुणी धुवायची, जात्यावर दळण दळायची, भांडी घासायची. नामदेवांचे कुर होते. त्यांच्या घरी संत मंडळी नेहमी यायची. त्यांचे घर व वाडा खूप मोठा होता. जनाबाईला खूप झाडपूस करायला लागायचं. गाडाभर धुणं रोज जावून धुवायला लागायचं; रात्री गाद्या सतरंज्या घालायला लागायच्या. ही सर्व कामे एकटी जनाबाई करायची. ही कामे अतिशय थोड्या वेळात उत्कृष्टपणे करायची. तिने धुतलेले कपडे अतिशय शुभ्र असत. दळलेलं पीठ मऊ मुलायम असायचं, नामदेवांचे घर अतिशय स्वच्छ व लखलखीत एवढं सारे काम करून जनाबाई विठोबाच्या मंदिराला जाऊन विठ्ठलाची पूजा करायची. स्वतः अभंग करून ते देवळात व दळताना गायची. जनाबाईच्या या उत्कृष्ट कामाचं आश्चर्य वाटायचं. इतकं मोठं स्वच्छ सुंदर काम ती कशी काय करते हे त्यांना कळायचं नाही. इतर बाबा, नामदेवांकडे येणारे संत सत्पुरुष जनाबाईला विचारायचे, 'जनाबाई, तू एवढं मोठं काम थोड्या वेळात उत्कृष्टपणे कशी ग करतेस? जनाबाई उत्तर ही सारी कामे करायला प्रत्यक्ष विठोबा येतो. तो केर पाटीत भरून उकिरड्यावर टाकतो, तो मला दळण दळताना जाते ओढू लागतो. भांडी घासतान सभोवतालच्या प्रां विसळतो, धुणे बडवून देतो. म्हणून तर ही कामे झटकन आणि उत्तम प्रकारे होतात! लोक जनाबाई ही कामे करीत असताना मुद्दाम थांबून केले. त्यांचे चरण तिची मदत करायला येतो का ते पहायचे; पण कोणालाही कधीही विठ्ठल तिच्या मदतीला आलेला दिसला नाही. जनाबाईस विचारलं तर ती उत्तरही द्यायची नाही. तेव्हा काही लोकांनी संत नामदेवालाच विचारलं, “महाराज' जनाबाई म्हणते की तिची कामं करायला प्रत्यक्ष विठोबा येतो. अ तर तो आलेला कधीही दिसत नाही. बरं, जनाबाई खोटे बोलेल असेही वाटत नाही; कारण ती तुमच्या संगतीत राहून तीही संत पदवीला पोहचती हे कोडं तुम्हीच उलगडू शकाल. हे गौडबंगाल काय आहे ते आम्हाला सांगावं.' नामदेव म्हणाले, "लोकहो, जनी कधीच खोटं बोलत नाही. तिचे म्हणणं आहे. पण प्रत्यक्ष विठ्ठल तिच्या मदतीला येताना तुम्हाला कधीच दिसणार नाही. तो विठोबा तिच्या हृदयात वास करतो. ती पूर्णपणे विठ्ठलमय झाली क ती आपले काम विठ्ठलस्वरूपच आहे, असे समजते. तिची कामाची साधने जाते, झाडू, थोपटणे, साबण विठ्ठलाची रूपे आहेत, अशी तिची पूर्ण खात्री मग ती कामे भराभर, फार कौशल्याने, अतिशय चांगल्या स्वरुपात होतात. यात आश्चर्य कसले?' तुम्हीही आपली कामे, कामाची साधने व स्वतः करणारे आपण विठ्ठल स्वरूपीच आहोत व थोडया वेळात झाल्याशिवाय राहणार नाहीत." हे नामदेवांचे उत्तर ऐकून लोकांचं समाधात झालं व जनाबा दिला. आमरण कामाचं कोडं उलगडलं. पुरुषांचे आदराचे जन्माला आते. भा रूप होतं. श्रीमंत बाजीर २० मे १७३७ र अवध्या १९ व्या रोजी मल्हारराव रामशास्त्रीसारखा आदर होता. गोर धर्मशाळा स्वरूपीच आहोत व थोडया वेळात झाल्याशिवाय राहणार नाहीत." हे नामदेवांचे उत्तर ऐकून लोकांचं समाधात झालं व जनाबाईच्य कामाचं कोडं उलगडलं.

सुविचार 

•'कोणत्याही राष्ट्राची अगर मानवी जातीची समुन्नति व्हावयाची असेल तर समाजात विचारक्रांती व्हावी लागते.'

→ दिनविशेष

 • विनायक लक्ष्मण भावे यांचा स्मृतिदिन - १९२६: विनायक लक्ष्मण भावे हे मराठीचे साहित्य संशोधक आणि ग्रंथकार होते. अनेश जुन्या ग्रंथांचा त्यांनी जीर्णोध्दार केला. मराठी काव्ये आणि कविचरित्रे याविषयी निबंध लिहिले. 'महाराष्ट्र सारस्वताच्या' पहिल्या आवृत्तीचे लेखन त्यांनी महाविद्यालयात असताना केले. 'चक्रवर्ती नेपोलियन' हा त्यांनी रचलेला चरित्रग्रंथ प्रसिध्द आहे. 'वारसा' या नावाने त्यांचे 'स्फुट लेखन' प्रसिध्द आहे. महाराष्ट्र सारस्वत हाच भावे यांचा पहिला ग्रंथ होय. या ग्रंथाची पहिली आवृत्ती म्हणजे केवळ ९८ पृष्ठांचा एक निबंध होता. तथापि त्यात भावे यांनी पुढे सतत भर घातल्यामुळे तिसऱ्या आवृत्तीपर्यंत हा ग्रंथ ७४४ पृष्ठांपर्यंत वाढला. सहाव्या आवृत्तीत या ग्रंथाची विभागणी दोन खंडात झाली. पहिला खंड हा भावेलिखित मूळ ग्रंथ असून दुसरा खंड हा शं. गो. तुळपुळे यांनी तयार केलेल्या पुरवणीचा आहे..

→ मूल्ये

  •जिज्ञासा, साहित्याभिरुची

→ अन्य घटना -

  • रशियाने चंद्रावर रॉकेट सोडले १९५९• चक्रधर स्वामी यांचा जन्मदिन -

→ उपक्रम 

• महाराष्ट्र सारस्वत ग्रंथाबद्दल मुलांना माहिती देणे

→ समूहगान

• देश हमारा निर्मल सुंदर उज्ज्वल गगन का तारा....

 → सामान्यज्ञान

  • महाराष्ट्रातील कैलास (वेरूळ) लेणे द्राविडी वास्तूकलेचा उत्कृष्ट नमुना मानला जातो. जगातील हे सर्वांत मोठे लेणे आहे. नवव्य शतकात या लेण्यांची निर्मिती झाली. या लेण्यात 'कैलास मंदिर' हे अखंड शिल्प आहे. कैलास मंदिर या लेण्याचे बांधकाम विश्वकर्मा या कारागिराने केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा