Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

सोमवार, ७ ऑगस्ट, २०२३

विज्ञान आणि तंत्रज्ञान दहावी ।। १ आनुवंशिकता व उत्क्रांती

 विज्ञान आणि तंत्रज्ञान दहावी

१ आनुवंशिकता व उत्क्रांती


1) अचानक घडणाऱ्या बदलांमागील कार्यकारणभाव ह्युगो द व्हीस यांच्या ..... सिद्धांतामुळे लक्षात आला.

-उत्परिवर्तन

-----------------------------

(2) प्रथिनांची निर्मिती ..... घडून येते, हे जॉर्ज बिडल व एडवर्ड टेटम यांनी दाखवून दिले.

-जनुकांमार्फत

----------------------------

(3) DNA धाग्यावरील माहिती RNA धाग्यावर पाठवण्याच्या प्रक्रियेस ..... म्हणतात.

-प्रतिलेखन

----------------------------

(4) उत्क्रांती म्हणजेच ..... होय.

-क्रमविकास

---------------------------

(5) मानवी शरीरात आढळणारे .... हे उत्क्रांतीचा अवशेषांगात्मक पुरावा होय.

-आंत्रपुच्छ

---------------------------

.... याचा अभ्यास हे उत्क्रांतीच्या अभ्यासाचे एक महत्त्वाचे अंग आहे.

-जीवाश्म

---------------------------

(7) आफ्रिकेतील .... या मानवसदृश प्राण्याची आपल्याकडे सर्वात पहिली नोंद आहे.

-रामापिथिकस

---------------------------

(8) सुमारे 50 हजार वर्षांपूर्वी .... मानव अस्तित्वात आला.

-क्रो मान्यां

--------------------------

 (9) सुमारे 10,000 वर्षांपूर्वी .... मानव शेती करू लागला.

- बुद्धिमान

--------------------------

 (10) .... मानव हा पहिला बुद्धी विकसित झालेला मानव म्हणता येईल.

- निअॅन्डरथॉल

--------------------------

■आनुवंशिकता.

उत्तर : एका पिढीतील जैविक लक्षणे जनुकांद्वारे पुढच्या पिढीत संक्रमित होण्याची प्रक्रिया म्हणजे आनुवंशिकता होय.

--------------------------

■(2) प्रतिलेखन.

उत्तर : DNA वरील न्यूक्लिओटाइडच्या क्रमवार रचनेनुसार RNA तयार करण्याच्या या प्रक्रयेलाच प्रतिलेखन असे म्हणतात..

--------------------------

■(3) भाषांतरण.

उत्तर : m-RNA वर जसा कोडॉन असतो त्याला पूरक क्रम असलेला अँटीकोडॉन धारण केलेला t-RNA प्रथिन संश्लेषण करण्यासाठी रायबोझोममध्ये आणला जाणे या क्रियेला भाषांतरण असे म्हणतात.

---------------------------

■(4) स्थानांतरण.

उत्तर : m-RNA च्या एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे एक- एक ट्रिप्लेट कोडॉनच्या अंतराने रायबोझोम सरकत जातो, या क्रियेस स्थानांतरण असे म्हणतात.

--------------------------

■(5) उत्परिवर्तन.

उत्तर : जनुकातील एखाद्या न्युक्लिओटाइडने अचानक आपली नागा बदलल्यावर जो लहानसा बदल घडून येतो, त्या बदलाला - त्परिवर्तन असे म्हणतात.

--------------------------

■(6) जाती.

उत्तर : नैसर्गिक फलनाद्वारे फलनक्षम संतती निर्माण करू शकणाऱ्या सजीवांच्या गटास जाती किंवा Species असे म्हणतात.

--------------------------

■सजीवांच्या पेशीकेंद्रातील आनुवंशिक गुणधर्म वाहून नेणारा घटक कोणता ?

उत्तर : सजीवांच्या पेशीकेंद्रकात असणारा व आनुवंशिक गुणधर्म वाहून नेणारा घटक म्हणजे केंद्रकाम्ले व प्रथिने यांनी बनलेले गुणसूत्र होय.

--------------------------

■(2) आपल्या मातापित्यांची शारीरिक आणि मानसिक लक्षणे संततीमध्ये संक्रमित होण्याच्या प्रक्रियेस काय म्हणतात ?

उत्तर: आपल्या मातापित्यांची शारीरिक आणि मानसिक लक्षणे संततीमध्ये संक्रमित होण्याच्या प्रक्रियेस आनुवंशिकता म्हणतात.

--------------------------

■(3) डी.एन.ए. चा रेणू कोणत्या घटकांपासून बनलेला असतो ?

उत्तर: डी.एन.ए.चा रेणू हा डीऑक्सिरायबोझ शर्करा, फॉस्फरिक आम्ल आणि नत्रयुक्त पदार्थांच्या जोड्यांनी

 बनलेल्या दोन सर्पिल धाग्यांपासून बनलेला असतो.

------------------------

■आनुवंशिक विकृती म्हणजे काय हे सांगून काही

आनुवंशिक विकृतींची नावे सांगा.

उत्तर : ज्या विकृती गुणसूत्रातील अपसामान्यतेमुळे किंवा जनुकातील उत्परिवर्तनामुळे निर्माण होतात, त्यांना आनुवंशिक विकृती असे म्हणतात. या विकृती पुढील कारणांनी निर्माण होतात :

(1) गुणसूत्राच्या संख्येत बदल आधिक्य किंवा कमतरता (2) गुणसूत्राच्या एखादया भागाचा लोप (3) गुणसूत्राचे स्थानांतरण (4) अचानक उत्परिवर्तन होणे (5) एकापेक्षा जास्त जनुकांत बदल.

------------------------

■सजीवांच्या शरीरातील विविध अवयव कोणते आहेत?

उत्तर : प्रगत सजीवांच्या शरीरात निरनिराळ्या प्रकारची कार्ये करण्यासाठी वेगवेगळ्या संस्था असतात. प्रत्येक संस्थेत ठरावीक अवयव असतात. जसे हृदय, फुप्फुसे हे दोन महत्त्वाचे अवयव छातीच्या पोकळीत असतात. कर्परेमध्ये मेंदू असतो. उदरपोकळीत जठर, आतडी, यकृत, वृक्क असे अवयव असतात.

------------------------

■(2) शरीरातील प्रत्येक अवयव त्यास उपयोगी पडतो का? उत्तर : सजीवांना जगण्यासाठी जी जी कार्ये शरीरात पार

पाडावी लागतात, ती ती कार्ये प्रत्येक महत्त्वाचा अवयव करतो. मेंदू शरीरातील सर्व कार्यांवर नियंत्रण करतो. हृदयामुळे रक्ताभिसरण होते. फुप्फुसे श्वसनाचे कार्य पार पडतात. वृक्क रक्त शुद्धीकरणाची क्रिया करतात. अशा रितीने शरीरातील प्रत्येक अवयव सजीवास उपयोगी पडतो. केवळ फार थोडे अवयवच कोणतेही कार्य करीत नाहीत. उदा., आंत्रपुच्छ.

------------------------

■एखादे उपयोगी इंद्रिय नाहीसे होण्यासाठी हजारो वर्षे

लागतात.

 उत्तर : असत्य. (एखादे निरुपयोगी इंद्रिय नाहीसे होण्यासाठी हजारो वर्षे लागतात. उपयोगी इंद्रिये लयास जात नाहीत. त्यांच्या वापराने जीवन सुलभ होत असते. मात्र निरुपयोगी इंद्रिये कालांतराने नष्ट होतात.)

------------------------

■(2) 'रेडिओ कार्बन' या शोधपत्रिकेत निबंध लिहिलेल्या डॉ. हरगोविंद खुराना यांना रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार मिळाला.

उत्तर : असत्य. ('रेडिओ कार्बन' या शोधपत्रिकेत निबंध लिहिलेल्या विलाई लिबी यांना रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळाले.) 

------------------------

■(3) मध्यजीव महाकल्प या कालावधीत सर्वांत जास्त सस्तनप्राणी आढळत होते.

उत्तर : असत्य. (मध्यजीव महाकल्प या कालावधीत सर्वातजास्त सरिसृप प्राणी आढळत होते.)

------------------------

(4) पृष्ठवंशीय प्राण्यांपासून हळूहळू अपृष्ठवंशीय प्राण्यांचा उद्भव झालेला दिसतो.

उत्तर : असत्य. (अपृष्ठवंशीय प्राण्यांपासून हळूहळू पृष्ठवंशीय प्राण्यांचा उद्भव झालेला दिसतो. उत्क्रांती होत असताना कमी विकसित अशा सजीवांकडून प्रगत सजीव निर्माण होतात. त्यामुळे अपृष्ठवंशीय प्राणी अगोदरच्या महाकल्पात होते. त्यांच्यापासून पृष्ठवंशीय प्राण्यांचा उद्भव झाला.)

------------------------

(5) मृत सजीवांच्या शरीरातील C-12 चा हास ही एकच प्रक्रिया सतत चालू राहते.

उत्तर : असत्य. ( शरीरातील C-14 चा हास ही एकच प्रक्रिया सतत चालू राहते. C-12 हा किरणोत्सारी नसतो त्यामुळे त्याचा हास होत नाही.)

------------------------

■नावे दया :

■(1) सजीवांमध्ये डी.एन.ए. हीच आनुवंशिक सामग्री असते, हे सिद्ध करणारे तीन शास्त्रज्ञ.

उत्तर : (1) ओस्वाल्ड एवरी (2) मॅकलिन मॅक्कार्थी (3) कॉलिन मॅक्लॉइड.

------------------------

■(2) उत्परिवर्तनामुळे निर्माण होणारी जनुकीय विकृती. 

उत्तर : सिकलसेल अॅनीमिया.

------------------------

■DNA मधल्या थायमीनऐवजी II RNA मध्ये कोणता नत्रयुक्त पदार्थ असतो ?

उत्तर : DNA मधल्या थायमीनऐवजी m-RNA मध्ये युरॅसिल हा नत्रयुक्त पदार्थ असतो.

------------------------

■(3) प्रत्येक अमिनो आम्लाकरिता असलेला संकेत कोणत्या स्वरूपात असतो? 

- प्रत्येक अमिनो आम्लाकरिता असलेला संकेत म्हणजेच'ट्रिप्लेट कोडॉन' हा तीन न्यूक्लिओटाइडच्या संचाच्या स्वरूपात असतो.

------------------------

 ■(4) डॉ. हरगोविंद खुराना यांना नोबेल पुरस्कार का मिळाला ?

उत्तर : प्रथिन संश्लेषण क्रियेत आवश्यक असणाऱ्या सर्व 20 अमिनो आम्लांकरिता असलेले कोडॉन शोधण्याच्या कामात महत्त्वाची भूमिका डॉ. हरगोविंद खुराना यांनी पार पाडली, म्हणून त्यांना नोबेल पुरस्कार मिळाला.

------------------------

■(5) r-RNA चे प्रथिन संश्लेषणात कार्य कोणते ?

उत्तर : tRNA ने आणलेल्या अमिनो आम्लांची पेप्टाईड बंधाने शृंखला तयार करण्याचे कार्य r RNA करतो

------------------------

■(6) सजीवांच्या विकासाचा कालपट किती मोठा आहे ?

उत्तर : सजीवांच्या विकासाचा कालपट जवळजवळ 300 कोटी वर्षांचा आहे.

------------------------

■(7) बाह्यरूपीय पुरावे काय सूचित करतात ?

उत्तर : बाह्यरूपीय पुराव्यांवरून त्या त्या सजीवाचा उगम समानआहे आणि ते एकाच पूर्वजापासून उत्क्रांत झाले असावेत, हे सूचित होते. 

------------------------

■(8) कार्बनी वयमापन पद्धत कोणत्या शास्त्रज्ञाने आणि कधी विकसित केली? ती कोणत्या तत्त्वावर चालते ?

उत्तर : कार्बनी वयमापन पद्धत विलार्ड लिबी यांनी 1954 मध्ये विकसित केली असून, ही पद्धत नैसर्गिक C-14 च्या किरणोत्सर्गी चावर आधारलेली आहे.

------------------------

■(9) कार्बनी वयमापन पद्धतीचा उपयोग कोठे करतात ?

उत्तर : कार्बनी वयमापन पद्धतीचा उपयोग पुरातन अवशेषशास्त्र व मानववंशशास्त्रामध्ये मानवी अवशेष अथवा जीवाश्म व हस्तलिखिते यांचा काळ ठरवण्यासाठी होतो. 

------------------------

■(10) डार्विनने कोणते सुप्रसिद्ध पुस्तक लिहिले?

उत्तर : डार्विनने 'ओरिजिन ऑफ स्पेसीज' (Origin of Species) हे सुप्रसिद्ध पुस्तक लिहिले.

डार्विनच्या सिद्धांताला घेतलेले आक्षेप कोणते? 

उत्तर : डार्विनच्या सिद्धांताला घेतलेले आक्षेप पुढीलप्रमाणे आहेत :

(1) नैसर्गिक निवड ही एकमेव गोष्ट उत्क्रांतीला कारणीभूत नाही.

(2) उपयोगी व निरुपयोगी बदलांचे स्पष्टीकरण डार्विनने दिले नाही.. 

(3) सावकाश होणारे बदल व एकदम होणारे बदल यांचा उल्लेख केलेला नाही.

असे असले तरी डार्विनने उत्क्रांतीबाबत केलेले कार्य हे एक मैलाचा दगड ठरले.

------------------------

(13) पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा (सराव कृतिपत्रिका - 3)

■(i) लॅमार्क यांचा इंद्रियांचा 'वापर व न वापर' सिद्धांत थोडक्यात लिहा.

उत्तर : लॅमार्क यांचा इंद्रियांचा 'वापर व न वापर' सिद्धांत असा आहे की उत्क्रांती होत असतांना काही शरीर रचनेतले बदल हे त्या सजीवाने केलेल्या प्रयत्नांनी किंवा काही अवयव न वापरल्यामुळे होत असतात. जे अवयव वापरले जातात ते विकसित होतात व जे वापरले जात नाहीत ते नाश पावतात.

---------------------------

■(ii) हा सिद्धांत स्पष्ट करणारी 2 उदाहरणे दया. उत्तर : उंच फांदयांवरची पाने खाण्यासाठी जिराफाने आपली मान सतत ताणली त्यामुळे जिराफ लांब मानेचे झाले. लोहाराने सतत जातिउद्भव.

उत्तर : (1) जातिउद्भव म्हणजे नव्या जातींची निर्मिती. (2) उत्क्रांतीमुळे प्राणी व वनस्पती यांच्यातील विविध जातींचा उद्भव होतो. हे मत डार्विन यांनी मांडले आहे.

(3) प्रत्येक जाती विशिष्ट भौगोलिक स्थितीत वाढते. तिचा आहार, विहार, फलनक्षमता, समागमकाळ इत्यादी भिन्न असतो. त्यामुळेच जातीची वैशिष्ट्ये टिकून राहतात.

(4) एका जातीपासून दुसरी नवीन जात निर्माण होण्यास जनुकीय बदल कारणीभूत असतात.

(5) त्याचप्रमाणे भौगोलिक वा पुनरुत्पादनीय बदल कारणीभूत असतो.

(6) नैसर्गिक फलनाद्वारे फलनक्षम संतती निर्माण करू शकणाऱ्या सजीवांच्या गटास 'जाती' असे म्हणतात. त्यामुळे त्या पुनरुत्पादनीय- दृष्ट्या दुसऱ्या जातीपासून अलगीकरण झालेल्या असतात.. 

(7) तसेच सजीवांचे भौगोलिक अलगीकरणदेखील होते. त्यामुळे कालांतराने जातिबदल किंवा जातिउद्भव होतो.

----------------------------

■उत्क्रांतीस आनुवंशिक बदल कसे कारणीभूत ठरतात ? 

उत्तर : आनुवंशिक गुणधर्म आई-वडिलांच्या जनुकातून पुढील पिढीत जात असतात. हे आनुवंशिक गुणधर्म शक्यतो टिकवले जातात. ज्या गुणधर्मांमुळे सजीवांत परिसराशी अनुकूलन करून राहण्याची जास्त क्षमता निर्माण होते, असे गुणधर्म असलेली जनुके नैसर्गिक निवडीच्या तत्त्वानुसार पुढच्या पिढीत हस्तांतरित होतात. उत्क्रांतीच्या अतिशय हळुवार चालणाऱ्या प्रक्रियेत चांगली जनुके असलेले सजीव प्रजननातून टिकून राहतात. ज्यांची जनुके जगण्यासाठी अनुकूल नसतील असे सजीव पृथ्वीवर टिकून राहू शकत नाहीत. उत्क्रांतीच्या चालणाऱ्या प्रक्रियेस आनुवंशिक बदलाचेच इंधन असते.

------

■उत्क्रांतीचा सिद्धांत सांगून त्यासाठी कोणते पुरावे आहेत, ते सांगा. 

उत्तर : (1) (1) उत्क्रांती या प्रक्रियेत सजीवांमध्ये अत्यंत सावकाश गतीने क्रमिक बदल होत गेला (2) त्याचप्रमाणे भिन्न रचना व कार्ये असलेल्या पूर्वजांपासून वनस्पती व प्राण्यांचा प्रागतिक विकास होणे म्हणजे पण उत्क्रांतीच होय (3) उत्क्रांतीची ही प्रक्रिया अत्यंत सावकाश होते त्याला कित्येक कोटी वर्षे लागतात मात्र त्यातून जीवांचा विकास साधला जातो. (4) उत्क्रांतीच्या अभ्यासामध्ये अंतराळातील ग्रह-ताऱ्यांपासून ते पृथ्वीवर असलेल्या जीवसृष्टीतील बदलांपर्यंतच्या अनेक टप्प्यांचा विचार केला जातो. (5) उत्क्रांतीमुळे सजीव अत्यंत सक्षम होतात आणि त्यापासून नव्या जीव जाती निर्माण होतात... (6) उत्क्रांती नक्की कशी झाली हे सांगण्यासाठी अनेक शास्त्रज्ञांनी वेगवेगळे सिद्धांत मांडले आहेत त्यात डार्विन यांचे नैसर्गिक निवड आणि जातिउद्भव हे दोन सिद्धांत जगभरात योग्य मानले जातात. 

(2) उत्क्रांतीविषयक पुरावे : (i) बाह्यरूपीय (ii) शरीरशास्त्रीय (iii) अवशेषांगे (iv) पुराजीवविषयक (v) जोडणारे दुवे (vi) भ्रूणविज्ञानविषयक

--------------

उत्क्रांतीमध्ये शरीरशास्त्रीय पुराव्यांचे महत्त्व सोदाहरण विशद करा. 

उत्तर : (1) निरनिराळ्या सजीवांत शरीरातील वैशिष्ट्ये साम्य दाखवतात. उदा., मानवी हात, बैलाचा पाय, वटवाघळाचा चर्मपर व देवमाशाचा पर यांच्यात हाडांच्या रचनेत व हाडांच्या जोडणीत साम्य दिसून येते. (2) वायरूपात यात कोणतेही साम्य दिसून येत नाही. त्यांचा प्रत्येक प्राण्यात उपयोगही वेगवेगळा आहे. तसेच त्यांच्या रचनेतही भिन्नता आहे. (3) परंतु हे हाडांतील साम्य त्यांचे पूर्वज समान असावेत याचा पुरावा ठरू शकते. यालाच शरीरशास्त्रीय पुरावा म्हटले जाते.

-------

टिपा लिहा

■(1) उत्क्रांती. 

उत्तर : (1) उत्क्रांती या प्रक्रियेत सजीवांमध्ये अत्यंत सावकाश गतीने क्रमिक बदल होत गेला (2) त्याचप्रमाणे भिन्न रचना व कार्ये असलेल्या पूर्वजांपासून वनस्पती व प्राण्यांचा प्रागतिक विकास होणे म्हणजे पण उत्क्रांतीच होय (3) उत्क्रांतीची ही प्रक्रिया अत्यंत सावकाश होते त्याला कित्येक कोटी वर्षे लागतात मात्र त्यातून जीवांचा विकास साधला जातो. (4) उत्क्रांतीच्या अभ्यासामध्ये अंतराळातील ग्रह-ताऱ्यांपासून ते पृथ्वीवर असलेल्या जीवसृष्टीतील बदलांपर्यंतच्या अनेक टप्प्यांचा विचार केला जातो. (5) उत्क्रांतीमुळे सजीव अत्यंत सक्षम होतात आणि त्यापासून नव्या जीव जाती निर्माण होतात... (6) उत्क्रांती नक्की कशी झाली हे सांगण्यासाठी अनेक शास्त्रज्ञांनी वेगवेगळे सिद्धांत मांडले आहेत त्यात डार्विन यांचे नैसर्गिक निवड आणि जातिउद्भव हे दोन सिद्धांत जगभरात योग्य मानले जातात.

-----------------------

■(2) सजीवांची उत्पत्ती.

 उत्तर : (1) ज्या वेळी पृथ्वीची निर्मिती झाली, तेव्हा पृथ्वीवर जीवन नव्हते. हा कालखंड सुमारे साडेतीन अब्ज वर्षांपूर्वीचा होता. (2) त्या वेळच्या अतिउष्ण तापमानामुळे सुरुवातीच्या अत्यंत साध्या साध्या मूलद्रव्यांपासून सेंद्रिय व असेंद्रिय प्रकारची साधी साधी संयुगे तयार झाली असावीत. (3) याच साध्या संयुगांपासून हळूहळू गुंतागुंतीची सेंद्रिय संयुगे तयार झाली. उदा., प्रथिने आणि केंद्रकाम्ले (4) अशा निरनिराळ्या प्रकारच्या सेंद्रिय आणि असेंद्रिय पदार्थांचे मिश्रण त्या काळच्या समुद्रात तरंगत असावे. (5) त्यापासूनच नंतर मूळ स्वरूपाच्या प्राचीन पेशी तयार झाल्या असाव्यात.(6) या प्राचीन पेशींनी आजूबाजूच्या रसायनांचे भक्षण कल्यामुळे त्यांची संख्या वाढू लागली असेल. अशा रितीने पृथ्वीवर सजीवांची निर्मिती झाली असावी.. (7) निरनिराळ्या संस्कृतींमध्ये सृष्टीच्या निर्मितीबद्दल गहन विचार झालेला दिसतो. मात्र काही शास्त्रीय प्रयोगान्ती वरील घटनाक्रम अचूक असावा असे आधुनिक शास्त्रज्ञ मानतात.

---------------------

■ भ्रूणविज्ञान. 

उत्तर : (1) भ्रूणविज्ञानात निरनिराळ्या भ्रूणांचा तुलनात्मक अभ्यास केला जातो. (2) विविध पृष्ठवंशीय प्राण्यांतील भ्रूणवाढीच्या वेगवेगळ्या टप्प्यांचे निरीक्षण केल्यास असे आढळते की, प्रारंभिक अवस्थेत या भ्रूणांमध्ये खूपच साम्य दिसते. (3) जसजसा पुढे विकास होत जातो, तसतसे त्यांच्यातील साम्य कमी कमी होत जाते. (4) प्रारंभिक अवस्थेतील साम्य पाहता असा अंदाज केला जातो की, या सर्व प्राण्यांचे पूर्वज एकच असावेत. (5) भ्रूणविज्ञान अशा रितीने उत्क्रांतीचा एक पुरावा देते.

----------------

■ डार्विनचा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत. उत्तर : (1) चार्लस् डार्विनने नैसर्गिक निवडीचा सिद्धांत मांडला. यासाठी त्याने विविध प्रदेशांतील वनस्पती व प्राण्यांचे असंख्य नमुने गोळा करून त्यांच्या निरीक्षणांवरून 'सक्षम ते जगतील' असे मत मांडले. (2) याचे स्पष्टीकरण देताना डार्विन म्हणतो की, सर्व सजीव प्रचंड संख्येने पुनरुत्पादन करतात. निर्माण झालेले जीव जगण्यासाठी जीवघेणी स्पर्धा करतात. जो सक्षम असतो तो या स्पर्धेत टिकून राहतो. (3) सक्षम जिवाच्या शरीरात जगण्यासाठी आवश्यक गुणधर्म असतात. हे निसर्गच निवडतो. निसर्गात सुयोग्य जीवच जगतात, बाकीचे टिकाव धरू शकत नाहीत. (4) जगलेले जीव पुनरुत्पादन करून स्वतःच्या वेगळ्या वैशिष्ट्यांसकट नवीन प्रजाती तयार करतात. (5) हा सिद्धांत 'ओरिजिन ऑफ स्पिसीज' (Origin of | Species) या डार्विनच्या पुस्तकात प्रसिद्ध झाला आहे. डार्विनचा नैसर्गिक निवडीचा हा सिद्धांत सर्वमान्य आहे, कारण निसर्गातील अनेक उदाहरणांवरून तो स्पष्ट होतो.

---------------

■ लॅमार्कवाद. 

उत्तर : (1) लॅमार्कवाद यात जीन बाप्टिस्ट लॅमार्क या शास्त्रज्ञाने दिलेल्या उत्क्रांतीवरील पुढील दोन सिद्धांतांचा समावेश होतो : (a) इंद्रियांचा वापर व न वापरांचा सिद्धांत. (b) 'मिळवलेल्या बदलांच्या संक्रमणाचा सिद्धांत.

(2) लॅमार्क यांच्या मते, उत्क्रांती होत असताना सजीवांच्या शरीररचनेत होणारे बदल हे त्या जिवाने केलेल्या प्रयत्नांनी किंवा केलेल्या आळसामुळे होतात. (3) सजीव जो अवयव अधिक क्षमतेने वापरतो त्याची जास्त वाढ व विकास होतो. याला त्यांनी 'इंद्रियांचा वापर व न वापर असे म्हटले, (4) याची उदाहरणे देण्यासाठी त्यांनी जिराफाची मान सतत ताणली गेल्यामुळे लांब झाली असे म्हटले तसेच लोहाराचे खांदे बळकट होण्याचे कारण म्हणजे तो सतत घणाचे घाव घालतो. न उडणाऱ्या पक्ष्यांचे पंख कमकुवत झाले. उदा., शहामृग, इमू. पाणपक्ष्यांचे पाय पाण्यात राहून पोहण्यायोग्य झाले, उदा., हंस, बदक. सापाने बिळात जाण्यायोग्य शरीररचना करताना आपले पाय गमावले. (5) ही सर्व उदाहरणे म्हणजे 'मिळवलेली वैशिष्ट्ये' अशा स्वरूपाची असून ती एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित होतात. यालाच लॅमार्कवाद म्हटले आहे. (6) लॅमार्कवाद हा उत्क्रांतीचा सिद्धांत ग्राह्य धरला जात नाही; कारण स्वतःमध्ये घडवून आणलेले बदल नव्या पिढीकडे दिले जात नाहीत हे शोधांद्वारे लक्षात आले आहे. त्यामुळे लॅमार्कचे म्हणणे चुकीचे ठरते.

--------------------------

★पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा : 

 ■(1) आनुवंशिकता म्हणजे काय हे सांगून आनुवंशिक बदल कसे घडतात हे स्पष्ट करा. उत्तर : (1) एका जनक पिढीतील जैविक लक्षणे जनुकांद्वारेपुढच्या संततीच्या पिढीत संक्रमित होण्याची प्रक्रिया म्हणजे आनुवंशिकता होय. (2) आनुवंशिक बदल होण्याची कारणे : (i) उत्परिवर्तन : अचानक एखादया कारणाने जनक पिढीतील DNA मध्ये बदल घडला तर आनुवंशिक बदल होतात. (ii) युग्मके तयार होताना अर्धगुणसूत्री विभाजन प्रक्रियेत जनुकांची सरमिसळ होते; त्यामुळेही आनुवंशिक बदल होतात.

-----------------------

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा