Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

सोमवार, ७ ऑगस्ट, २०२३

विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग -२ दहावी ।। २ सजीवांतील जीवनप्रक्रिया भाग -१

विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग -२ दहावी

२ सजीवांतील जीवनप्रक्रिया भाग -१

रिकाम्या जागी योग्य पर्याय भरा: 
 (1) एका ग्लुकोज रेणूचे पूर्ण ऑक्सिडीकरण झाल्यावर ATP चे एकूण...... रेणू मिळतात.
उत्तर-38
------------------------
 (2) ग्लायकोलायसीसच्या शेवटी....... चे रेणू मिळतात. 
उत्तर-पायरुवेटचे
------------------------
(3) अर्धगुणसूत्री विभाजन भाग- I च्या पूर्वावस्थेतील........ ........या अवस्थेमध्ये जनुकीय विचरण होते. 
उत्तर-स्थूलसूत्रता
------------------------
 (4) सूत्री विभाजनाच्या...... अवस्थेमध्ये सर्व गुणसूत्रे पेशीच्या विषुववृत्तीय प्रतलाला समांतर संरचित होतात.
उत्तर-माध्यावस्था
------------------------
  (5) पेशीचे प्रद्रव्यपटल तयार करण्यासाठी.......... च्या रेणूची आवश्यकता असते. 
उत्तर-फॉस्फोलिपीड
------------------------
 (6) आपण व्यायाम करताना आपल्या मांसपेशी........  प्रकारचे श्वसन करतात.
उत्तर-विनॉक्श्विसन
-----------------------------
★व्याख्या लिहा
■पोषण
उत्तर : पोषकद्रव्ये शरीरात घेऊन त्यांचा वापर करण्याच्या सजीवांच्या प्रक्रियेला पोषण असे म्हणतात.
-----------------------------
■2) पोषकतत्त्वे.
उत्तर : आपल्या पोषणासाठी आवश्यक असणारे कर्बोदके, प्रथिने स्निग्धपदार्थ, जीवनसत्त्वे, खनिजे इत्यादी अन्नघटक म्हणजेच पोषकतत्त्वे होय.
-----------------------------
■(3) प्रथिने.
उत्तर : अमिनो आम्लाचे अनेक रेणू एकमेकांना जोडून तयार काच झालेल्या महारेणूला 'प्रथिन' म्हणतात.
-----------------------------
■(4) पेशीस्तरावरील श्वसन.
उत्तर : अन्नपदार्थांचे ऑक्सिजनच्या मदतीने अथवा त्याच्याविना ऑक्सिडीकरण होण्याची जी प्रक्रिया पेशीत चालते, त्या प्रक्रियेला पेशीस्तरावरील श्वसन असे म्हणतात.
-----------------------------
■(5) ऑक्सिश्वसन.
उत्तर : ऑक्सिजनचा वापर करून सजीवांमध्ये पेशीस्तरावर होणारे श्वसन म्हणजे ऑक्सिश्वसन होय.
---------------------------
■ (6) ग्लायकोलायसीस.
उत्तर : पेशीद्रव्यात घडणारी प्रक्रिया ज्यात, ग्लुकोजच्या एका रेणूचे टप्प्याटप्याने विघटन होऊन पायरुविक आम्ल, ATP, NADH, आणि पाणी यांचे प्रत्येकी दोन-दोन रेणू तयार होतात.
---------------------------
शास्त्रीय कारणे लिहा:
■ग्लुकोजचे पूर्ण ऑक्सिडीकरण करण्यासाठी ऑक्सिजन आवश्यकता असते.
उत्तर : पेशीश्वसनामध्ये ग्लुकोजच्या रेणूचे पूर्णतः ऑक्सिडीकार झाल्यास त्यापासून ATP चे 38 रेणू निर्माण होतात. पेशीश्वसनाम ग्लायकोलायसीस, क्रेब चक्र आणि इलेक्ट्रॉन वहन साखळी अभिक्रिय या तीन प्रक्रिया एकापाठोपाठ होत असतात. जर अशा वेळ ऑक्सिजन नसेल तर ग्लायकोलायसीस ही प्रक्रिया होईल पण पुढच्या दोन प्रक्रिया होणार नाहीत. शिवाय ग्लायकोलायसीस ज ऑक्सिजनशिवाय पार पडला तर त्यातून अल्कोहोलनिर्मिती होईल. त्याचप्रमाणे ATP चे केवळ दोनच रेणू निर्माण होतील. शरीरासाठी ऊर्जापुरवठा कमी होईल. म्हणून ग्लुकोजचे पूर्ण ऑक्सिडीकरण करण्यासाठी ऑक्सिजनची आवश्यकता असते.
------------------------------
■(1)पेशीस्तरावरील श्वसनाच्या कोणत्या प्रकारात ग्लुकोजचे पूर्ण ऑक्सिडीकरण होते ?
उत्तर : पेशीस्तरावरील श्वसनाच्या ऑक्सिश्वसन या प्रकारात ग्लुकोजचे पूर्ण ऑक्सिडीकरण होते.
---------------------------
■(2) ग्लुकोजच्या पूर्ण ऑक्सिडीकरणासाठी कोणत्या पेशी अंगकाची आवश्यकता असते ?
उत्तर : ग्लुकोजच्या पूर्ण ऑक्सिडीकरणासाठी तंतुकणिका या पेशीअंगकाची आवश्यकता असते.
---------------------------
■3)अनेकदा तुमचे तोंड येते. त्या वेळी तुम्ही तिखट पदार्थ खाऊ शकत नाही.
उत्तर : जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे आपले तोंड येऊ शकते. तोंड आल्यावर तोंडात व्रण किंवा जखमा होतात. त्यामुळे तिखट पदार्थ खाल्ल्याने झोंबते. म्हणून तोंड आल्यावर तिखट पदार्थ खाऊ शकत नाही. जीवनसत्त्व B कॉम्प्लेक्स याच्या कमतरतेमुळे तोंड येते.
---------------------------
■(2) काही जणांना बाल्यावस्था किंवा तारुण्यावस्थेमध्येच रात्रीचे दिसण्यास त्रास होतो.
उत्तर : दिसण्यासाठी जीवनसत्त्व A ची आवश्यकता असते. जर जीवनसत्त्व A ची आहारात कमतरता असेल तर दृष्टी क्षीण होते. रातांधळेपणा देखील येण्याचा संभव असतो.
---------------------------
■कोणत्याही सजीवाची वाढ कशी होते? त्याच्या शरीरात पेशींची संख्या वाढते का? वाढत असेल तर ती कशी ?
उत्तर : कोणत्याही सजीवाची वाढ ही त्याच्या पेशीच्या संख्येत झालेल्या वाढीमुळे होते. यासाठी पेशीत नियमितपणे पेशीविभाजन होत असते. शरीराची वाढ आणि शरीराची झालेली। झीज या दोन्हींसाठी पेशीविभाजन आवश्यक असते.
---------------------------
■(5) एका सजीवापासून त्याच प्रजातीचा दुसरा सजीव कसा निर्माण होतो ?
उत्तर : प्रजननाने एका सजीवापासून नवा सजीव निर्माण होतो. प्रजनन अलैंगिक असते किंवा लैंगिक असते. सूत्री विभाजनाने अलैंगिक प्रजनन होते. लैंगिक प्रजननात अर्धगुणसूत्री विभाजनाने युग्मक निर्माण होतात. गुणसूत्रे, जनुके व DNA यांमुळे एका सजीवापासून त्याच प्रजातीचा दुसरा सजीव तयार होतो.
------------------------
एका वाक्यात उत्तरे लिहा:
■कर्बोदकामधून आपल्याला किती ऊर्जा मिळते?
 उत्तर: कर्बोदकामधून आपल्याला 4 Kcal/gm एवढी ऊर्जा
मिळते.
---------------------------
■ इलेक्ट्रॉन वहन साखळी अभिक्रिया कोठे राबवली जाते ?
उत्तर: इलेक्ट्रॉन वहन साखळी अभिक्रिया तंतुकणिकेमध्ये राबवली जाते.
---------------------------
■ 'ट्रायकार्बोक्झिलिक आम्लचक्र' ही चक्रीय अभिक्रिया कोणी शोधली ?
 उत्तर: 'ट्रायकार्बोक्सिलिक आम्लचक्र ही चक्रीय अभिक्रिया सर हेन्स क्रे यांनी शोधली. 
 ---------------------------
■ विनॉक्सिश्वसनाचे कोणते टप्पे असतात?
उत्तर : विनॉक्सिश्वसनाचे ग्लुकोज-विघटन (ग्लायकोलायसीस) आणि किण्वन (फर्मेंटेशन) हे दोन टप्पे असतात.
---------------------------
 ■(10) निसर्गात सर्वात जास्त प्रमाणात आढळणारे प्रथिनकोणते ?
उत्तर : वनस्पती पेशींच्या हरितलवकांमध्ये असलेले रुविस्को (RUBISCO) नावाचे विकर म्हणजे निसर्गात सर्वात जास्त प्रमाणात आढळणारे प्रथिन होय.
---------------------------
शास्त्रीय कारणे लिहा:
(1) ग्लुकोजचे पूर्ण ऑक्सिडीकरण करण्यासाठी ऑक्सिजन आवश्यकता असते. उत्तर : पेशीश्वसनामध्ये ग्लुकोजच्या रेणूचे पूर्णत: ऑक्सिडीकरण झाल्यास त्यापासून ATP चे 38 रेणू निर्माण होतात. पेशीश्वसनामध्ये ग्लायकोलायसीस, क्रेब चक्र आणि इलेक्ट्रॉन वहन साखळी अभिक्रिया या तीन प्रक्रिया एकापाठोपाठ होत असतात. जर अशा वेळी ऑक्सिजन नसेल तर ग्लायकोलायसीस ही प्रक्रिया होईल पण पुढच्या दोन प्रक्रिया होणार नाहीत. शिवाय ग्लायकोलायसीस ज ऑक्सिजनशिवाय पार पडला तर त्यातून अल्कोहोलनिर्मिती होईल. त्याचप्रमाणे ATP चे केवळ दोनच रेणू निर्माण होतील. शरीरासाठी ऊर्जा पुरवठा कमी होईल म्हणून ग्लुकोजचे पूर्ण ऑक्सिडीकरण करण्यासाठी ऑक्सिजनची आवश्यकता असते. 
------------------
■क्रेब चक्रालाच सायट्रिक आम्लचक्र असेही म्हणतात.
 उत्तर : क्रेब चक्र म्हणजेच ट्रायकार्बोक्झिलिक आम्लचक्र हे सर हेन्झ क्रेब या शास्त्रज्ञांनी शोधून काढले होते. अॅसेटिल को- एन्झाइम - A चे रेणू ऑक्झॅलो असेटिक आम्ल या रेणूबरोबर विकरांच्या साहाय्याने रासायनिक क्रिया करतात. त्यामुळे हे चक्र सुरू होते. ऑक्झेलो असेटिक आम्ल या रेणूपासून या चक्रातील पहिला रेणू तयार होतो. हा पहिला रेणू सायट्रिक आम्ल हा असतो. म्हणून क्रेब चकालाच सायट्रिक आम्लचक्र असेही म्हणतात. 
---------------------
■ काही उच्चस्तरीय वनस्पती व प्राणीसुद्धा काही वेळा विनॉक्सिश्वसन करतात.
 उत्तर : काही उच्चस्तरीय वनस्पती व प्राणी त्याच्या सभोवती असणारी ऑक्सिजन वायूची पातळी कमी झाल्यास ऑक्सिश्वसनऐवजी विनॉक्सिश्वसन करू लागतात. जिवंत राहण्यासाठी अशा विनॉक्सिश्वसनाचा आधार घेतला जातो. 
----------------------
■तंतुमय पदार्थ एक महत्त्वाचे पोषकतत्त्व आहे. 
उत्तर : आहारातील तंतुमय पदार्थ आपण पचवू शकत नाही. परंतु त्यामुळे न पचलेले अन्न बाहेर टाकण्याच्या क्रियेमध्ये तंतुमय पदार्थांची खूप मदत होते. तसेच काही तंतुमय पदार्थांची इतर पदार्थांच्या पचन क्रियेमध्ये मदत होते म्हणून पालेभाज्या, फळे, धान्ये यापासून मिळणाऱ्या तंतुमय पदार्थांना महत्त्वाचे पोषकद्रव्य मानले जाते. 
--------------------------
 (6) पेशीविभाजन हा पेशीच्या आणि सजीवांच्या अनेक गुणधर्मापैकी महत्त्वाचा गुणधर्म आहे.
 उत्तर : पेशीविभाजन ही एक आवश्यक जीवनप्रक्रिया आहे. पेशीविभाजनामुळेच सजीवांची वाढ व विकास होतो. शरीराची झालेली झीज भरून काढता येऊ शकते. जखमा भरून येतात. पेशींची संख्या वाढू शकते. अलैंगिक प्रजनन करणाऱ्या सजीवांत नवे जीव निर्माण होतात. लैंगिक प्रजनन करणाऱ्या बहुपेशीय सजीवांत युग्मके तयार होतात. या साऱ्या कार्यांमुळे पेशीविभाजन हा पेशीच्या आणि सजीवांच्या अनेक गुणधर्मांपैकी महत्त्वाचा गुणधर्म आहे.
---------------------------
(1) शरीराच्या वाढ व विकासासाठी सर्व जीवनप्रक्रिया मोलाचे योगदान कसे देतात ? उत्तर : (1) प्रत्येक सजीवाच्या शरीरात निरनिराळ्या संस्था सतत समन्वयाने कार्य करीत असतात. मानवी शरीरात हा समन्वय अधिकच प्रगत असतो. (2) पचन संस्था, श्वसन संस्था, रक्ताभिसरण संस्था, उत्सर्जन संस्था, नियंत्रण संस्था आणि शरीरातील अंतर्गत व बाह्य अवयव आपले कार्य स्वतंत्रपणे परंतु एकमेकांत असलेल्या समन्वयातून करीत असतात. (3) पचन संस्थेने शोषलेले अन्नघटक पेशीपर्यंत पोहोचवण्यासाठी परिवहन संस्था हृदयाच्या साहाय्याने सतत कार्य करीत असते. त्याच्यासोबत श्वसन संस्थेने घेतलेला ऑक्सिजन प्रत्येक पेशीपर्यंत पोहोचवण्यात येतो. (4) प्रत्येक पेशीमध्ये असलेल्या तंतुकणिकांत ऑक्सिजनच्या साहाय्याने अन्नघटकांचे ऑक्सिडीकरण करून सर्व कार्यास लागणारी ऊर्जा मिळवली जाते.
(5) या सर्व संस्थांची कार्ये चेता संस्थेच्या साहाय्याने नियंत्रित असतात. या सर्व क्रियांमुळे सजीव जिवंत राहू शकतो. त्याची वाढ व विकास होतो.
-----------------------
जरा डोके चालवा:
■बऱ्याचदा आपल्या तोंडात/घशात कोरड पडते.
उत्तर : (1) आपल्या शरीरातल्या पाण्याचे प्रमाण साधारणतः 65. ते 70% असते. ते नियंत्रित ठेवले जाते. (2) ज्या वेळेला अतिघाम येऊन, किंवा बराच काळ पाणी न प्यायल्याने हे प्रमाण कमी होते, तेव्हा आपल्याला तोंडाला किंवा घशाला कोरड पडून तहान लागल्याची जाणीव होते.
(3) तेव्हा अशी कोरड लागणे ही एक नैसर्गिक इच्छा आहे. ज्यामुळे आपण पाणी पितो व त्यामुळे पाण्याचे प्रमाण पूर्ववत त्याच पातळीत आणले जाते.
---------------------------
■(3) अतिप्रमाणात जुलाब झाल्यास वरचेवर मीठ-साखर-पाणी प्यायला देतात. 
उत्तर : (1) जुलाब झाल्यास शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते. (2) अतिशुष्कता (Dehydration) निर्माण होते. हे जिवाला घातक ठरू शकते.
(3) विशेषतः लहान बालकांच्या बाबतीत प्राण देखील जाऊ शकतात. (4) त्यामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण आणि इलेक्ट्रोलाइट्सचे प्रमाण पूर्ववत करण्यासाठी अतिप्रमाणात जुलाब झाल्यास वरचेवर मीठ-साखर पाणी प्यायला देतात.
---------------------------
■(4) उन्हाळ्यामध्ये आणि जास्त श्रम केल्यावर आपल्याला घाम येतो. 
उत्तर : (1) उन्हाळ्यात परिसरात अधिक उष्णता असते. (2) त्यामुळे शरीराचे तापमान वाढते. जास्त श्रम केल्यानंतरही शरीराचे तापमान वाढते. हे तापमान नियंत्रित राहावे म्हणून आपोआप उत्तेजित होतात.. धर्मग्रंथी (3) त्यामुळे घाम येतो..
---------------------------

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा