Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

मंगळवार, ८ ऑगस्ट, २०२३

8 ऑगस्ट-दैनंदिन शालेय परिपाठ

      8 ऑगस्ट-दैनंदिन शालेय परिपाठ


प्रार्थना

- सबके लिए खुला है, मंदिर यह हमारा...

श्लोक

 - पुस्तकस्था तु या विद्या परहस्तगतं धनम् । कार्यकाले समुत्पत्रे न सा विद्या न तद्धनम् ॥

 -  पुस्तकातील विद्या आणि परक्याच्या हाती गेलेले धन या दोन्ही गोष्टी प्रसंग पडल्यावर उपयोगी पडत नाहीत. (विद्या केवळ पुस्तकातच नको, ती स्मरणातही हवी.) जय-सावित्री 

चिंतन

- अयोग्य मार्गाने मिळणारा पैसा, कमी कष्ट व अधिक आराम या मार्गाने मिळणारे (परीक्षेतील) यश अशा जीवनक्रमामागे लागण्याची वृत्ती आम्ही सोडून दिली पाहिजे. पुरूषार्थहीन अशी ही पलायनवृत्ती विद्यार्थ्यांना तरुणांना शोभत नाही. परिश्रम, नम्रता, आत्मविश्वास व स्वाभिमान या सद्गुणांचा समन्वय साधून आपल्या जीवनाची रचना केली पाहिजे. - गोळवलकर 

कथाकथन

 - 'एलीशांची एका गरीब विधवेला मदत' 

 - लोकजागृतीसाठी भविष्यवादी एलीशा संत एलायझांप्रमाणेच गावोगावी फिरत असत. अनेक गावात त्यांचा मुक्काम होई. लोक आपली सुखदुःखे त्यांना सांगत. एका दिवसाची गोष्ट. ते एका गावात मुक्कामाला राहिले असता एक विधवा बाई रडत रडत त्यांच्याकडे आली आणि म्हणाली, "महाराज, मी फार दु:खी स्त्री आहे. माझे पती ईश्वरभक्त होते. अकस्मात त्यांचे निधन झाले. मला दोन मुलगे आहेत. परंतु सावकार मला आणि माझ्या मुलांना रोज घरी येऊन छळतोय. 'तुझ्या पतीने माझ्याकडून घेतलेले कर्ज फेडले नाहीस तर तुझ्या मुलांना घेऊन जाईन आणि गुलाम म्हणून करू?" महाराज मला मदत करा.” भविष्यवादी एलीशांना तिची दया आली. ते म्हणाले, “बेटी, मला सांग. | स्वयंपाकाला लागणारी कोणती वस्तू तुझ्या घरी शिल्लक आहे?" "महाराज, कसं सांगू? मी खरोखरीच दरिद्री आहे हो. माझ्याकडे तांदूळ, मीठ काहीही नाही. हं, फक्त एका भांड्यात थोडे तेल आहे.' "मग तुझ काम झालच समज. जा, घरी जा आणि तुझ्या घरातील सर्व भांडी रिकामी कर. शिवाय शेजाऱ्यांकडून लहान मोठी जी मिळतील ती भांडी उसनी आण. घराचा दरवाजा लावून घे आणि त्या सर्व भांड्यात तुझ्या भांडयातील तेल थोडे थोड टाक. बघ काय चमत्कार होतो तो.” भविष्यवादी | एलीशांनी तिच्या डोक्यावर हात ठेवून तिला आशीर्वाद दिला. ती बाई आपल्या घरी आली आणि तिने त्याप्रमाणे केले. पाहते तर काय, सर्व भांडी तेलाने तुडुंब भरली. तिला काय करावे ते सुचेना. ती धावत धावत पुन्हा एलीशांकडे आली. तिने काही सांगण्यापूर्वीच भविष्यवादी एलीशा म्हणाले, “बेटी, आता तू रोज थोडे तेल विकून त्या सावकाराचे कर्ज फेड. तुला काहीही कमी पडणार नाही.” त्या बाईने त्यांच्या सांगण्याप्रमाणे केले. थोड्याच दिवसात ती कर्जमुक्त झाली. तसेच विकून तिला बराच पैसा मिळाला. तिची गरीबी नाहीशी झाली.

 → सुविचार - • दुःखी माणसाला मदत करण्यासाठी पुढे केलेला एक हात, प्रार्थनेसाठी जोडलेल्या दोन हातांपेक्षा अधिक उपयुक्त असतो.

  • सेवा जग फुलविते पण प्रीती मन फुलविते.

दिनविशेष -

 • गांधीजींनी 'चले जाव' ची घोषणा दिली १९४२ :

 • मूल्ये - • स्वाधीनता, राष्ट्रप्रेम, निर्भयता, → अन्य घटना • स्कॉटिश जंतुशास्त्रज्ञ अलेक्झांडर फ्लेमिंग यांचा जन्म - १८८१. • कवयित्री बहिणाबाई चौधरी जन्म १८८०. • सुप्रसिद्ध मराठी कथाकार शंकर पाटील यांचा जन्मदिन - १९२६. • मराठीतील लोकप्रिय अभिनेते दादा कोंडके यांचा जन्म - १९३२. → उपक्रम • विजयी विश्व तिरंगा प्यारा, तसेच जयोस्तुते श्री महन्मंगले शिवास्पदे शुभदे ही गीते अर्थ समजून पाठ करा. तसेच संपूर्ण वंदे मातरम् हें गीत | सामुदायिक म्हणा.

 इंग्रज सरकारने हिंदुस्थानात चालविलेली जुलमी राजवट, दडपशाही दहशतवाद, जुलमी कायदे यांच्या अहिंसात्मक प्रतिकारासाठी गांधीजींनी हिंदी जनतेला आवाहन केले. हिंदुस्थान स्वतंत्र करण्यासाठी जे आंदोल करावयाचे ते शांततेच्या मार्गाने करावयाचे, प्रतिकारही करावयाचा, अन्याय अगदी सहन करावयाचा नाही. यासाठी कारागृहात जावे लागले. अनं हालअपेष्टा सोसाव्या लागल्या तरी त्या आनंदाने सोसावयाच्या असे गांधीजींच्या आंदोलनाचे सूत्र होते. चंपारण्य सत्याग्रह, अहमदाबादचा गिरणीमालक मजूर यांचा संघर्ष, बार्डोली साराबंदी चळवळ यात त्यांना अपूर्व यश मिळाले होते. असहकार आंदोलन, सविनय कायदेभंग आंदोलन इत्यादि आंदोलन त्यांना अपूर्व यश मिळाले होते. पण १९४२ चे आंदोलन वरील आंदोलनापेक्षा वेगळे होते. ८ ऑगस्ट १९४२ रोजी मुंबईला गवालिया टँक मैदाना गांधीजींनी 'ब्रिटिशांनो चालते व्हा' अशी घोषणा केली. आपल्या ओजस्वी भाषणात ते म्हणाले, “तुमच्या प्रत्येकाने या क्षणापासून स्वतंत्र समज | साम्राज्यशाहीची टाच झुगारून स्वतंत्रपणे वागावे. गुलाम ज्या क्षणाला स्वतःला स्वतंत्र समजतो त्या क्षणालाच त्याची सर्व बंधने गळून पडतात  तुम्हाला एक मंत्र सांगतो तो तुमच्या प्रत्येक निःश्वासाबरोबर व्यक्त होऊ द्या. करेंगे या मरेंगे' हाच तो मंत्र. जो जिवावर उदार होतो त्याला स्वातंत्र्य मि मिळते. पण ज्याला स्वातंत्र्यापेक्षा प्राणाची मातब्बरी अधिक वाटते तो प्राणाला दुरावतो."

मूल्ये 

- • स्वाधीनता, राष्ट्रप्रेम, निर्भयता, 

अन्य घटना 

- स्कॉटिश जंतुशास्त्रज्ञ अलेक्झांडर फ्लेमिंग यांचा जन्म - १८८१. 

• कवयित्री बहिणाबाई चौधरी जन्म १८८०. 

• सुप्रसिद्ध मराठी कथाकार शंकर पाटील यांचा जन्मदिन - १९२६. 

• मराठीतील लोकप्रिय अभिनेते दादा कोंडके यांचा जन्म - १९३२. 

उपक्रम

 विजयी विश्व तिरंगा प्यारा, तसेच जयोस्तुते श्री महन्मंगले शिवास्पदे शुभदे ही गीते अर्थ समजून पाठ करा. तसेच संपूर्ण वंदे मातरम् हें गीत | सामुदायिक म्हणा.

समूहगान

- • हम युवकों का ऽऽऽ नारा हैं, हैंऽ हैs हैs 

सामान्यज्ञान

 • पंचशील तत्त्वे देशाच्या परदेश नीतीचे पुढील पाच सिद्धांत पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मांडलेत -

 •  १. एका देशाच्या 1 | मनात दुसऱ्या देशाबद्दल आदर असणे. 

 •  २. एका देशाने दुसऱ्या देशाचे अखंडत्व मानणे. 

 •  ३. एका देशाने दुसऱ्या देशावर आक्रमण न करणे.

 •   ४. एका | देशाच्या अंतर्गत बाबीत दुसऱ्या देशाने हस्तक्षेप न करणे. 

 •   ५. शांततापूर्ण सहजीवन.

महत्वाच्या व्यक्ति व त्यांची समाधी स्थळे

• महात्मा गांधी - राज घाट,

• इंदिरा गांधी शक्ति स्थळ,

• राजीव गांधी - वरभूमी,

• संजय गांधी-शांती घाट,

• लालबहाद्दूर शास्त्री-विजय घाट,

• चरण सिंग-किसान घाट,

• मोरारजी देसाई-अभय घाट,

• पं. नेहरू-शांती वन.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा