15
संकीर्ण स्वाध्याय
प्रश्न. पुढील प्रत्येक प्रश्नासमोर दिलेल्या पर्याय-क्रमांकांपैकी अचूक उत्तराच्या पर्याय - क्रमांकाचे वर्तुळ रंगवा :
1. पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा :
(1) निराजी रावजी - न्यायाधीश
(2) अण्णाजी दत्तो अमात्य
(3) दत्ताजी वाकनीस - मंत्री
(4) रामचंद्र डबीर - सुमंत
उत्तर-अण्णाजी दत्तो अमात्य
____________________
2. शिवाजी महाराजांनी विविध खात्यांच्या प्रमुखपदी नामवंत व्यक्तींची निवड केली होती. त्यामधील चुकीच्या जोडीचा पर्याय ओळखा.
(1) बहिर्जी नाईक - हेर खाते
(2) मोरेश्वर पंडितराव – न्यायाधीश
(3) दौलतराव - आरमाराचे प्रमुख अधिकारी
(4) हंबीरराव मोहिते - घोडदळाचे सरनोबत
उत्तर-मोरेश्वर पंडितराव – न्यायाधीश
_______________
3. अलाहाबादचा मुघल सुभेदार---- . याने बुंदलेखंडावर. हल्ला केला.
(1) महमदखान बंगश
(3) सय्यिद बंधू अब्दुला
(2) हुसैन अली
(4) नजीबखान
उत्तर-महमदखान बंगश
_________________
4. पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा :
(1) वऱ्हाडची - इमादशाही
(2) बिदरची - कुतुबशाही
(3) विजापूरची - आदिलशाही
(4) अहमदनगरची - निजामशाही
उत्तर-बिदरची - कुतुबशाही
____________________
5. मराठ्यांचा पराभव करण्यासाठी आलेल्या औरंगजेब बादशाहाचा मृत्यू इ. स. 1707 मध्ये -----येथे झाला.
(1) पुणे
(2) सातारा
(3) अहमदनगर
(4) औरंगाबाद
उत्तर-अहमदनगर
______________
6. "महाराज हे केवळ महाराष्ट्राचेच नव्हते, तर ते साऱ्या राष्ट्राचे होते, " हे उद्गार कोणाचे ?
(1) पं. जवाहरलाल नेहरू
(2) महात्मा फुले
(3) डॉ. बाबासाहेब आंबेडकर
(4) लोकमान्य टिळक
उत्तर- पं. जवाहरलाल नेहरू
____________________
7. आजच्या मध्य प्रदेशातील माळवा भागात आपली ठाणी मजबूत करण्यासाठी बाजीरावाने कोणाच्या नेतृत्वाखाली मराठा सरदार पाठवले ?
(1) मल्हारराव होळकर
(2) राणोजी शिंदे
(3) उदाजी पवार
(4) चिमाजी आप्पा
उत्तर-चिमाजी आप्पा
_______________
8. छत्रपती शिवाजी महाराजांवर 1869 साली कोणी पोवाडा लिहिला ?
(1) लोकमान्य टिळक
(2) रवींद्रनाथ टागोर
(3) महात्मा जोतीराव फुले
(4) सुब्रमण्यम भारती
उत्तर-महात्मा जोतीराव फुले
_____________________
9. कवायती फौजेच्या बळावर रोहिले, जाट, बुंदेले यांना नमवणारे मराठा सरदार कोण होते ?
(1) मल्हारराव होळकर
(3) नाना फडणवीस
(2) परसोजी भोसले
(4) महादजी शिंदे
उत्तर-महादजी शिंदे
______________
10. आठव्या शतकातील बंगालमधील प्रसिद्ध राजघराणे कोणते होते ?
(1) होयसळ
(2) परमार
(3) चोळ
(4) पाल
उत्तर -पाल
________
11. पहिल्या तराईच्या लढाईत पृथ्वीराज चौहानने कोणाचा पराभव केला?
(1) सुलतान महमूद
(2) मुहम्मद तुघलक
(3) इब्राहीम लोदी
(4) मुहम्मद घोरी
उत्तर-मुहम्मद घोरी
_______________
12. होयसळ राजघराण्यातील---- याने पूर्ण कर्नाटक जिंकले.
(1) विष्णुवर्धन
(2) गोपाळ
(4) जीमूतवाहन
(3) गोविंद तिसरा
उत्तर- विष्णुवर्धन
__________________
13. आपल्या आरमाराच्या जोरावर मालदीव बेटे व श्रीलंका जिंकून घेणारे राजघराणे-----
(1) शिलाहार
(2) चोळ
(3) राष्ट्रकूट
(4) यादव
उत्तर-चोळ
_________
14.----याने 'आमुक्तमाल्यदा' या ग्रंथाचे लेखन केले.
(1) हरिहर
(2) बुक्क
(3) कृष्णदेवराय
(4) विष्णुवर्धन
उत्तर-कृष्णदेवराय
______________
15. अरबी व फारसी विषयांच्या अभ्यासासाठी मदरसा स्थापन करणारा--------
(1) हसन गंगू
(2) अकबर
(3) बाबर
(4) हुमायून
उत्तर-हसन गंगू
___________
16. गटात न बसणारा पर्याय निवडा :
अल्तमश, कुतुबुद्दीन ऐबक, बल्बन, बाबर
(1) अल्तमश
(2) बाबर
(3) कुतुबुद्दीन ऐबक
(4) बल्बन
उत्तर-बाबर
_________
17. मेवाडच्या राजघराण्यातील भक्तिरचना लिहिणाऱ्या -----या स्त्री-संत होऊन गेल्या.
(1) मीराबाई
(2) मुक्ताबाई
(3) बहिणाबाई
(4) जनाबाई
उत्तर-मीराबाई
____________
18.----- यांनी 'रामचरितमानस' हा काव्यग्रंथ लिहिला.
(1) शेख महमद
(2) संत रोहिदास
(3) तुलसीदास
(4) नरसी मेहता
उत्तर-तुलसीदास
_____________
19. भारुडांचे रचनाकार म्हणून कोणास ओळखले जाते?
(1) संत तुकाराम
(2) संत एकनाथ
(3) संत रामदास
(4) संत ज्ञानेश्वर
उत्तर-संत एकनाथ
______________
20. समर्थ संप्रदायाची स्थापना कोणी केली ?
(1) संत तुकाराम
(2) संत रामदास
(3) संत एकनाथ
(4) संत ज्ञानेश्वर
उत्तर-संत रामदास
_______________
21. 'अमृतानुभव' या ग्रंथाचे रचनाकार कोण ?
(1) संत रामदास
(2) संत तुकाराम
(3) संत ज्ञानेश्वर
(4) संत एकनाथ
उत्तर-संत ज्ञानेश्वर
_____________
22.----- यांनी रंजल्या गांजलेल्यांमध्ये देवत्व शोधण्यास सांगितले.
(1) संत तुकाराम
(2) संत एकनाथ
(3) संत रामदास
(4) संत ज्ञानेश्वर
उत्तर-संत तुकाराम
______________
23. 'गुरुग्रंथसाहिब' या शिखांच्या धर्मग्रंथात ------ यांची अभंगरचना आहे.
-(1) संत नामदेव
(2) संत एकनाथ
(3) संत ज्ञानेश्वर
(4) संत तुकाराम
उत्तर-संत नामदेव
_____________
24. शिवकालीन काळात गावात महसूल नोंद करणारा अधिकारी----
(1) पाटील
(2) कुलकर्णी
(3) देशमुख
(4) देशपांडे
उत्तर-कुलकर्णी
_____________
25. अनेक गावे मिळून एक---- तयार होई.
(1) कसबा
(2) परगणा
(3) वतन
(4) जहागिरी
उत्तर-परगणा
__________
26.----- यांना शाहू महाराजांनी वऱ्हाड व गोंडवन प्रदेशांच्या सनदा दिल्या.
(1) रघूजी
(2) राणोजी
(3) महादजी
(4) परसोजी
उत्तर-परसोजी
___________
27.----- यांनी कवायती फौज तयार केली होती.
(1) रघूजी
-(2) महादजी
(3) राणोजी
(4) परसोजी
उत्तर-महादजी
__________
28. इंदौरच्या होळकर सत्तेचे संस्थापक कोण होते ?
(1) अहिल्याबाई
(2) खंडेराव
(3) यशवंतराव
(4) मल्हारराव
उत्तर-मल्हारराव
______________
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा