Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

सोमवार, १ एप्रिल, २०२४

16 एप्रिल दैनंदिन शालेय परिपाठ

 

            16 एप्रिल दैनंदिन शालेय परिपाठप्रार्थना 

.- ईश्वर अल्लाह तेरे नाम सबको सन्मति दे भगवान.... जय-सावित्री 


→ श्लोक -

 अद्वेष्ट सर्वभूतानां मैत्र: करूण एव च । निर्ममो निरहंकारः समदुःख सुखः क्षमा ।। 

 जो कोणाचाही द्वेष करीत नाही, सर्वाशी मैत्री पूर्ण वागतो आणि ज्याला अहंकार स्पर्श करीत नाही व सुख दुःखांविषयी जो उदासीन असतो व जो क्षमाशील असतो तो सदैव संतुष्ट असतो. 

 

> चिंतन

- आपल्या देशात आज वीरांची गरज आहे. तेव्हा वीर बना. पर्वताप्रमाणे दृढ व्हा. तुमचा निश्चय कधीही ढळू देऊ नका. जी राष्ट्राच्या नसानसातून नव्या उत्साहाचा संचार करील, अशा एका विद्युतशक्तीची नव्या सामर्थ्याची भारताला गरज आहे. लक्षात ठेवा की, 'सत्यमेव जयते' सत्याचाच सर्वदा विजय होतो. परोपकार करणे हा धर्म होय. दुसऱ्याला पीडा देणे हा अधर्म होय. सामर्थ्य, पौरुष्य हा धर्म होय, दौर्बल्य आणि भेकडपणा हा अधर्म होय. ईश्वरावर आणि स्वतःच्या आत्म्यावर विश्वास ठेवणे हा धर्म होय आणि संदेह हा अधर्म होय.कथाकथन 

- 'दरोडेखोर अंगुलीमालचं हृदयपरिवर्तन' :- अरण्यात राहात असे आणि आपल्या गळ्यात मानवांच्या बोटांची माळा घालीत असे. अंगुलीमाल नावाचा एक अत्यंत क्रूर दरोडेखोर होता. तो एका अत्यंत दाट एकदा गौतमबुध्दास त्या अरण्यातून जाण्याचा प्रसंग आला. लोकांनी त्यांना अरण्यातून जाण्याचं घाडन न करण्याविषयी परोपरीनं विनविले. पण बुध्द मोठ्या आत्मविश्वासनं त्या अरण्यात शिरले. आपल्याला न जुमानता-भीता एक भिक्षू अरण्यातून चालला आहे हे पाहून दरोडेखोर अंगुलीमाल भयंकर संतापला. तो चिडून दरडावत बुध्दाला म्हणला, "अरे ए भिक्षेक्या, तू आत्ताच्या आत्ता उभा रहा पाहू!" "बाबा रे, मी तर उभाच आहे." आपलं चालणं चालूच ठेवीत बुध्दानं शांतपणे म्हटलं. “भिक्षेक्या, तुला खोटं बोलायला लाज शरम काहीच वाटत नाही काय?" अंगुलीमाल अधिकच संतापून म्हणाला, 'मी आंधळा आहे मला तुझं चालणं दिसत नाही असं तुला वाटतं काय" "बाबा रे, मी खरोखरच उभा आहे." बुध्द शांतपणे म्हणाला, "उभा म्हणजे अचल! मी राग, लोभ, द्वेष, मत्सर आदि विकारांनी कधीच विचलित होत नाही! मी सत्यधर्माच्या पायावर खंबीरपणे उभा आहे. तू मात्र स्वार्थासाठी दरोडेखोरी करून आणि निरपराधी जीवांना ठार मारून सन्मार्गापासून विचलित झाला आहेस !" बुध्दाचे ते शांत, गंभीर नि आत्मविश्वासपूर्ण शब्द ऐकून अंगुलीमालनं चमकून त्याच्याकडं पाहिलं. बुध्दाची तेज:पुंज मूर्ति आणि मनाचा ठाव |घेणारी भेदक नजर पाहून अंगुलीमालच्या मनातील सैतान चारीमुंड्या चीत झाला ! पुढच्याच क्षणी त्यांन बुध्दाचे पाय धरले. त्या अरण्यांतून बुद सुखरूप बाहेर आला एवढंच नव्हे तर त्यानं अंगुलीमालला आपल्याबरोबर शिष्य म्हणून आणल्याच पाहून लोकांना अत्यंत आश्चर्य वाटले. बुध्दाविषयीचा त्यांचा आदर त्वामुळे अधिकच दुणावला


सुविचार - 

• अनुकंपा (करुणा) आणि दान-धर्म यांनीच मनुष्यास पूर्णता येते. भगवान बुद्ध यकृत्याशिवाय फलदायी होत नाहीत

. • सूज्ञ माणसे प्रत्येक चूक फक्त एकदाच करतात.

 • प्रबल हा प्रगतीचा आत्मा आहे

 . ● जिसमें क्रोध है, उसमें विष है। 

 • दुसऱ्याच्या मनातील भाव हेरणे हेच खऱ्या बुध्दीचे लक्षण होय. 

 • शांत मनुष्य क्रोची माणसाचा पराभव करत मृत्यूपेक्षा मैत्रीचा हात पुढे करा. 

 • उष्णता, ताप आणि पीडा सहन करण्याची शक्ती असली तरच मातीमधून व बदिनविशेष .- 

• भारतीय रेल्वेच्या प्रवासास सुरुवात - १८५३ : आज भारतात व आशिया खंडातही दाट जाळे निर्माण केलेल्या रेल्वेची पहिली सुरुवात मुंबई ते ठाणे या प्रवासाने दि. १६ एप्रिल १८५३ या दिवशी झाली. याचे तत्कालीन लेखक कृष्ण भाटवडेकर यांनी मोठे सुरस वर्णन केले आहे. मुंबई सरकारचे मोठमोठे अधिकारी व इतर प्रतिष्ठीत लोक आपापल्या स्त्रियांसहीत डब्यातील बसले होते. एक साहेबांच्या बँडपथकाने व्यापला होता. दुपारी ३.३५ वाजता डोंगरीच्या किल्ल्यावरून तोफांची सरबती होताच जो सिटी देऊन करीत इंजिने आणि १४ डब्यांची ही गाडी पुढे पुढे धावू लागली. हा अद्भुत अचंबा पाहण्यास रेल्वे मार्गाच्या दुतर्फा लोकांचे थवेच्या थवे लोटले होते. बरोबर सत्तावन्न मिनिटांनी गाडी ठाण्यास पोहोचली. तेथे मोठा शामियाना उभारून गाडीची स्वागतसभा झाली. साडेसहा वाजता गाडी फिरून परतीच्या प्रवासास लागली व बरोबर पंचावन्न मिनिटांनी बोरीबंदरला पोहोचली. परतीच्या वेळीही प्रेक्षक मोठ्या संख्येने मार्गावर खोळंबून होते. आशिया खंडातील रेल्वेची मुहूर्तमेढ भारतीय रेल्वेने रोवली. त्यामागे जगन्नाथ शंकर शेट व जमशेटजी निजीभाई यांचे मुख्यत्वे प्रयत्न होते. → मूल्ये 

• संशोधकवृत्ती, उद्योगप्रियता, मानवता. 


→ अन्य घटना 

• डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन् स्मृतिदिन - १९७५. -


→ उपक्रम 

• भारतीय रेल्वेच्या शाखा उपशाखा व विस्तार यांची माहिती जमविणे.. 


 समूहगान

  • आओ बच्चों तुम्हे दिखाएँ झाँकी हिंदुस्थान की... 


सामान्यज्ञान

• भारताचे राष्ट्रपती

डॉ. राजेंद्र पसाद 

• वराहगिरी वेंकटगिरी

 • ग्यानी झैलसिंग

 • डॉ. सर्वपल्ली राधकृष्णन्

  • फक्रुद्दिन अली अहमद 

• आर. व्यंकटरमण

• डॉ. झाकीर हुसेन 

 • नीलम संजीव रेड्डी

 • डॉ. शंकरदयाल शर्मा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा