Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

सोमवार, १ एप्रिल, २०२४

7 ऑक्टोबर दैनंदिन शालेय परिपाठ

      7 ऑक्टोबर दैनंदिन शालेय परिपाठप्रार्थना 

 देवा तुझे किती सुंदर आकाश, सुंदर प्रकाश सूर्य देतो.....  

 

श्लोक 

 आपदि मित्रपरीक्षा शूरपरीक्षा रणांगणे भवति । विनये वंशपरीक्षा स्त्रियः परीक्षा तू निर्धन पुसि ॥ परीक्षा संकट कालात होते. शूराची परीक्षा रणांगणात होते. कोणा व्यक्तीच्या कुलाची परीक्षा तिच्या सौजन्यशीलतेने आणि स्त्रीची परीक्षा तिचा पती निर्धन (गरीब) असल्यावर होते. 

 

→ चिंतन सतत पाण्याची धार पडली तर अभेद्य खडकही दुभंगतात. अविरत, अखंड, सातत्याने प्रयत्न केले तर असाध्य असे काहीही असत नाही. प्रचंड मोठ्या वृक्षाच्या खोडावर धाव चालले तर तो तुद शकतो. मात्र प्रयत्न मध्येच सोडले तर काही उपयोग होऊ शकत नाही. कष्ट वाया जातात. विद्या, कला, व्यवहारज्ञान, धनदौलत, मानसन्मान अशा त्याही गोष्टीच्या प्राप्तीसाठी सातत्यपूर्ण प्रयत्नांची आवश्यकता असते.कथाकथन

 सेवा आणि शिखांचे गुरू गोविंदसिंह अत्यंत शूर आणि पराक्रमी होते, त्यांच्या वक्तृत्वाला कर्तृत्वाची धार होती. स्वतः - परिश्रम करीत. त्यामुळे आवरणशील वक्तृत्वाला एक वेगळीच धार होती. एकदा त्यांचे मानवाधर्मावर भारतात सुंदर न झाले. सारे शिष्य मंत्रमुग्ध झाले. सभेत निःस्तब्ध शांतता पसरली होती. अथक बोलण्याने त्यांना तहान लागली. ते आपल्या शिष्यवर्गाता "मित्रहो! कुणी तरी आपल्या पवित्र हातांनी पेलाभर पाणी प्यायला आणीत का?" एक शिष्य पळतच गेला आणि तात्काळ चांदीच्या यातून निर्मळ पाणी घेऊन आला. गुरु गोविंदसिंह तो पेत्ता हातात घेत शिष्याला म्हणाले, "मित्रा, मित्रा, तुझे हात गुलाबाच्या पाकळीसारखे कोमल नाजूक आहेत. शिष्य प्रसन्न झाला. त्याला वाटले, गुरुजी तर आपली प्रशंसाच करीत आहेत. तो गवनि म्हणाला, "गुरुदेव! माझे हात एवढे कोमल नाजुक आहेत, लालसर आहेत की मला श्रम करावे लागत नाहीत. माझे अनेक नोकर-चाकर आहेत. अत्यंत आज्ञाधारक आहेत. मी कोणतेही काम सांगताच ते तत्परतेने करतात. "गुरु गोविंदसिंह मनात समजले, हा ऐतखाऊ सरंजामशाह-जमीनदार असावा. श्रमाचे महत्व याला समजावून देणे आवश्यक आहे. आपल्या तोंडाला चांदीचा पेला लावीत ते म्हणाले, "हे पाणी पवित्र हातांचे नाही" गंभीर आवाजात ते म्हणाले, "वत्स! ज्या कधी कुणाची सेवा केली नाही. कधी काही काम केले नाही, शरीरातून घामाचे ओघळ निवळले नाहीत ते हात पवित्र कसे ? एकाने काम करायचे दुसन्यांनी खायचे! हे दैन्य, ही विषमता पाहून बेचैन वाटायला पाहिजे. ही आर्थिक विषमता आहे. 'एक तुपाशी तर दुसरा उपाशी' मातृभूमी हो धाने नष्ट होते." पुढे त्यांनी एक गोष्ट सांगितली. "एक गरीब घरातील आई मुलाला म्हणाली, "बाळ, उठ लवकर रानात जा, लाकडाचे तुकडे गोळा कर. मोळी बांध व लोकर बाजारात जा. दहा-बारा वर्षांचा तो मुलगा, घडीचे दिवस. उठला नाही. उलट रागावला. आईलाच मारायला धावला. त्याची मातृभक्ती दारिद्र्याने नष्ट केली. वात्सल्य दारिद्र्याने गोठले. "झाडू घ्या. कुदळी घ्या. सर्व देशभर हिंडा, जमिनीवर रावा. जमिनीवर वृक्ष, बेली, अन्नधान्य निर्माण करा. अन्नोत्पादन वाढवा. शेतीचे प्रयोग करा. जमिनी फुलवा. निसर्गाच्या सान्निध्यात जा. सर्वत्र स्वच्छता करा. सफाई करा. मंदिरे, देवालये साफ कर कडे विषमता भरली आहे. मेहनतीने, श्रमाने समता निर्माण होईल. श्रमजीवी माणसाचे सारे शरीर पवित्र असते. मन पवित्र व निर्म श्रमाची भाजी-भाकरी गोड लागते. पण, तूपसाखरेची चोरी करून मन व शरीर दोन्ही अपवित्र होतात, हे पवित्र हातातील पाणी नाही, मी शकत नाही. म्हणून मला क्षमा कर, एवढे सांगून त्यांनी पाण्याने भरलेला तो चांदीचा पेला शांतपणे खाली ठेवला. सारी सभा मंत्रमुग्ध होऊन गुरु गोविंदसिंह 


→ सुविचार

 • कष्ट नाही तेथे लाभ नाही. • मोत्याच्या हारापेक्षा घामाच्या धारा अधिक शोभून दिसतात. •रंजल्या गांजाची सेवा करणारे सत्पुरुष होत. 

 • श्रमानेच स्वास्थ प्राप्त होते व खरे सुख मिळते. • कष्टेविण फळ नाही । कष्टेवीण राज्य नाही केल्यावीण होत नाही साध्य जनी 11 कष्टत सौख्य मानावे । कष्टे फलचि पाविजे । आळसे सुख वाटे ने दुःख ब्रम्हांड भेटवी ॥ 

 


→ दिनविशेष -

 • शीख धर्मगुरु गोविंदसिंग स्मृतिदिन - १७०८: शिखांचे दहावे आणि शेवटचे गुरु गुरु गोविंदसिंग यांना ७ ऑक्टोबर २००८ रोजी मृत्यू आला. शिखांमध्ये वीरवृत्ती जागृत करून शिखांचे जीवन युध्दप्रवण करण्यात त्यांनी आपली सारी हयात घालवली. वयाच्या केवळ ५ त्यांचे वडील शिखांचे नववे गुरु तेज बहादूरसिंग यांचा औरंगजेबाने जाहीर शिरच्छेद करून शीख जमातीच्या उल्टांसाठी आपले सामर्थ्य वापरण्यास केली. तेव्हापासून धर्म हा केवळ शांततेसाठी नाही तर मुख्यतः रक्षणासाठी आहे हे ओळखून शिखांची लढाऊ संघटना उभी केली. कधी उपपणे तर कधी भूमिगत राहून सातत्याने औरंगजेबाशी संघर्ष जारी ठेवला. त्यात त्यांचे चारही पुत्र कामी आले. आपल्यानंतर धर्मगुरुंचा बाद कायमचा मिटावा म्हणून 'ग्रंथसाहेब' हाच गुरु मानावा. पंचकफारांचे आणि वीरवृत्तींचे पालन आजन्म करण्याचा आदेश त्यांनी शिखांना दिला. पंजाब वीरभूमी बनली. याचे बीज गुरु गोविंदसिंगांच्या आजन्म लढाऊ समर्पणात आहे. 

 

→ मूल्य 

• देशप्रेम, एकता, एकात्मता 


→ अन्य घटना 

 केशवसुतांचा जन्मदिन १८६६. • मादाम मेरी क्युरी जन्मदिन - १८६७. 


→ उपक्रम 

• शीख धर्मगुरुची माहिती करून घ्यावी. 

  

→ समूहगान 

• धरतीची आम्ही लेकरं, भाग्यवान धरतीची आम्ही लेकरं.. 

 


→ सामान्यज्ञान 

 • गंगा नदी हिमालयात गंगोत्री येथे एका छोट्या बर्फाळ खोल गुहेतून उगम पावते. तिची एकूण लांबी २५०६ कि.मी. आहे. तिला वाटेत अनेक नद्या मिळून तिचा विस्तार अफाट वाढलेला दिसतो. गंगेचा त्रिभुज प्रदेश सर्वात मोठा असून तीनशे कि.मी. रुंद आहे. गंगेचे खोरे सर्वात दाट लोकसंख्येचे आहे. गंगेवरील काही पूल पाच मैल लांबीचे आहेत. गंगेच्या पाण्यात विशिष्ट गुण असून ते जंतुनाशक असल्याने आपो स्वच्छ राहते, अशी समजूत आहे. जगभराच्या धाडसी लोकांनी गंगेच्या मुखापासून उगमाकडे उलटा प्रवास करण्याचे प्रयोग केले आहेत. काठ दाट वस्तीने बकालपणा येऊन गंगेचे पाणी प्रदूषित झाले असून त्यावर उपाय सुरु आहेत....

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा