Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

गुरुवार, २१ मार्च, २०२४

आठवी इतिहास 6.स्वातंत्र्य चळवळीच्या युगास प्रारंभ

 6.स्वातंत्र्य चळवळीच्या युगास प्रारंभ




स्वाध्याय

प्रश्न. पुढील प्रत्येक प्रश्नासमोर दिलेल्या पर्याय-क्रमांकांपैकी अचूक उत्तराच्या पर्याव-क्रमांकाचे वर्तुळ इंमवा :


1. 'भांडारकर प्राच्यविदया संशोधन मंदिर' ही संस्था---- येथे गेल्या शंभर वर्षांपासून कार्यरत आहे.


(1) मुंबई


(2) पुणे


(3) नाशिक


(4) कोल्हापूर


उत्तर-पुणे

_________

2. 1784 मध्ये 'एशियाटिक सोसायटी ऑफ बंगाल' या संस्थेची स्थापना का केली ?


-(1) भारतीय संस्कृतीचा अभ्यास करण्यासाठी


(2) पाश्चात्त्य संस्कृतीचा अभ्यास करण्यासाठी


(3) भारतीय संस्कृतीचा प्रसार व प्रचार करण्यासाठी


(4) पाश्चात्त्य संस्कृतीचा प्रसार करण्यासाठी


उत्तर-भारतीय संस्कृतीचा अभ्यास करण्यासाठी

___________________


3. भारतीय राष्ट्रीय सभेची स्थापना केव्हा झाली?


(1) 25 डिसेंबर 1848


(2) 25 डिसेंबर 1884


(3) 28 डिसेंबर 1886


(4) 28 डिसेंबर 1885


उत्तर-28 डिसेंबर 1885

__________________

4. राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन---- येथे भरवण्यात आले.


(1) पुणे


(2) मुंबई


(3) कोलकाता


(4) लखनौ


उत्तर-मुंबई

__________

5. राष्ट्रीय सभेचे पहिले अध्यक्ष कोण होते ?


(1) सुरेंद्रनाथ बॅनर्जी


(2) व्योमेशचंद्र बॅनर्जी


(3) फिरोजशहा मेहता


(4) बद्रुद्दीन तय्यबजी


उत्तर-व्योमेशचंद्र बॅनर्जी

____________________

6. भारतीय राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन ------भरले होते.


(1) मुंबई विद्यापीठ परिसरात


(2) रॉयल एशियाटिक सोसायटी वास्तूत


(3) गोकुळदास तेजपाल संस्कृत पाठशाळेत


(4) गिरगाव चौपाटीवर


उत्तर-गोकुळदास तेजपाल संस्कृत पाठशाळेत

_____________________

7. राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनात -------- प्रतिनिधींनी       सहभाग घेतला होता. 


(1) 71


(2) 72


(3) 73


(4) 74

उत्तर-72

________

8. भारतीय राष्ट्रीय सभेच्या स्थापनेत पुढाकार कोणी घेतला?


(1) सर विल्यम वेडरबर्न


(2) डॉ. अॅनी बेझंट


(3) सर हेन्री कॉटन


(4) ॲलन ऑक्टेव्हियन हयूम


उत्तर-ॲलन ऑक्टेव्हियन हयूम

________________________

9. राष्ट्रीय सभेच्या मागण्यांसंबंधित चुकीचा पर्याय कोणता ?


(1) देशी उदयोगांना संरक्षण दद्यावे.


(2) लष्करावरील खर्च कमी करावा.


(3) राजकीय व सामाजिक जागृती करावी.


(4) भारतीयांना प्रशासनात अधिक प्रतिनिधित्व मिळावे.


उत्तर-राजकीय व सामाजिक जागृती करावी.

_____________________

10. 'भारताच्या निरनिराळ्या भागांतील लोकांना एकत्र आणणे, धर्म, वंश, जात इत्यादी भेद बाजूला सारून लोकांमध्ये ऐक्याची भावना निर्माण करणे' हे-------


(1) राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनाचे उद्दिष्ट होते.


(2) प्रांतिक संघटनांचे उद्दिष्ट होते.


(3) भारतीय नेत्यांचे उद्दिष्ट होते.


(4) भारतीय राष्ट्रीय सभेचे उ‌द्दिष्ट होते.


उत्तर-भारतीय राष्ट्रीय सभेचे उ‌द्दिष्ट होते.

______________________

11. भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील मवाळ युगाचा कालखंड कोणता ?


(1) 1857 ते 1885


(2) 1885 ते 1905


(3) 1905 ते 1920


(4) 1920 ते 1947


उत्तर-1885 ते 1905

__________________

12. मवाळ गटाचे नेते कोण कोण होते ? योग्य पर्याय निवडा.


(1) गोपाळ कृष्ण गोखले, लाला लजपतराय, फिरोजशहा मेहता


(2) गोपाळ कृष्ण गोखले, सुरेंद्रनाथ बॅनर्जी, लोकमान्य टिळक


(3) फिरोजशहा मेहता, गोपाळ कृष्ण गोखले, सुरेंद्रनाथ बॅनर्जी


(4) सुरेंद्रनाथ बॅनर्जी, बिपिनचंद्र पाल, लोकमान्य टिळक


उत्तर-फिरोजशहा मेहता, गोपाळ कृष्ण गोखले, सुरेंद्रनाथ बॅनर्जी

_____________________

13. भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील जहाल युगाचा कालखंड कोणता ?


(1) 1857 ते 1885


(2) 1885 ते 1905


(3) 1905 ते 1920


(4) 1920 ते 1947


उत्तर-1905 ते 1920

_________________

14. राजकीय जागृती घडवून आणण्यासाठी राष्ट्रीय सभेच्या जहाल नेत्यांनी ज्या मार्गांचा वापर केला, त्यात समाविष्ट नसलेला मार्ग------


(1) अर्ज व विनंत्या


(2) वृत्तपत्रांद्वारे जहाल मतप्रचार


(3) राष्ट्रीय शिक्षण


(4) स्वदेशी व बहिष्कार


उत्तर-अर्ज व विनंत्या

_________________

15. •------ हे वृत्तपत्र जहाल मतवादी विचारांचे मुखपत्र होते.


(1) ज्ञानोदय


(2) ज्ञानप्रकाश


(3) अमृत बझार पत्रिका

 (4) प्रभाकर


उत्तर-अमृत बझार पत्रिका

____________________

16. लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या राष्ट्रीय उत्सवांमागील हेतु कोणता होता ?


(1) सरकारी धोरणांचा पुरस्कार करणे.


(2) भेदभाव विसरून लोकांनी एकत्र येऊन विचारांची देवघेव करणे.


(3) शिक्षणसंस्था स्थापन करणे.


(4) धर्माचा प्रसार करणे.


उत्तर-भेदभाव विसरून लोकांनी एकत्र येऊन विचारांची देवघेव करणे.

_______________________

17. 'गीतारहस्य' हा ग्रंथ ------यांनी लिहिला.


(1) लोकमान्य टिळक


(3) लाला लजपतराय


(2) दादाभाई नौरोजी


(4) बिपीनचंद्र पाल

उत्तर-लोकमान्य टिळक

________________

18. 'गीतारहस्य' या ग्रंथाचा गाभा---- होता.


(1) भक्तियोग


(2) कर्मयोग


(3) विभूतियोग


(4) सांख्ययोग


उत्तर-कर्मयोग

___________

19. 1897 मध्ये पुण्यात आलेली प्लेगची साथ आटोक्यात आणण्यासाठी कोणाची नेमणूक केली होती?


(1) मटिग्यू


(2) चेम्सफर्ड


(3) रैंड


(4) मिंटो


उत्तर-रैंड

_______

20. ब्रिटिश अधिकारी रँड याचा वध कोणी केला?


(1) वासुदेव बळवंत फडके


(2) शिरीषकुमार


(3) सुखदेव


(4) चाफेकर बंधू


उत्तर-चाफेकर बंधू

________________

21. 1905 मध्ये बंगाल प्रांताची फाळणी -----  या व्हाइसरॉयने. जाहीर केली?


(1) लॉर्ड हेस्टिंग्ज


(2) लॉर्ड कर्झन


(3) लॉर्ड लिटन


(4) लॉर्ड कॉर्नवॉलिस 


उत्तर-लॉर्ड कर्झन

______________

22. बंगालची फाळणी करण्यामागे लॉर्ड कर्झनचा कोणता हेतू होता?


(1) कारभाराची सोय पाहणे.


(2) स्वातंत्र्य चळवळ दुर्बळ करणे/कमकुवत करणे.


(3) पूर्व बंगालमधील लोकांना न्याय देणे.


(4) हिंदूंना विशेष सवलती देणे.


उत्तर-स्वातंत्र्य चळवळ दुर्बळ करणे/कमकुवत करणे.

_____________________

23. लॉड कॅझनने बंगालची फाळणी केव्हा केली?


(1) 16 ऑक्टोबर 1905


(2) 16 ऑक्टोबर 1907


(3) 10 ऑक्टोबर 1905


(4) 16 नोव्हेंबर 1905


उत्तर-16 ऑक्टोबर 1905

______________________

24. बंगालच्या फाळणीनंतर ब्रिटिश सरकारविरोधी जी चळवळ झाली तिला----- चळवळ म्हणतात.


(1) वंगभंग


(2) होमरूल


(3) असहकार


(4) सविनय कायदेभंग 


उत्तर-वंगभंग

__________

25. वंगभंग चळवळीदरम्यान----  हे गीत सर्वत्र गायले जाऊ लागले.


(1) जन गण मन


(2) हम होंगे कामयाब


(3) वंदे मातरम्


(4) झंडा ऊँचा रहे हमारा


उत्तर-वंदे मातरम्

_____________

26. वंगभंग चळवळीदरम्यान ऐक्याचे प्रतीक म्हणून कोणत्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले ?


(1) भाऊबीज


(2) गणेशोत्सव


(3) शिवजयंती


(4) रक्षाबंधन


उत्तर-रक्षाबंधन

____________

27. वंगभंग चळवळीचे नेतृत्व कोणी कोणी केले ?


(1) सुरेंद्रनाथ बॅनर्जी, लोकमान्य टिळक, रवींद्रनाथ टागोर


(2) सुरेंद्रनाथ बॅनर्जी, आनंदमोहन बोस, रवींद्रनाथ टागोर


(3) रवींद्रनाथ टागोर, व्योमेशचंद्र बॅनर्जी, आनंदमोहन बोस


(4) लोकमान्य टिळक, दादाभाई नौरोजी, सुरेंद्रनाथ बॅनर्जी


उत्तर-सुरेंद्रनाथ बॅनर्जी, आनंदमोहन बोस, रवींद्रनाथ टागोर

___________________

28. ब्रिटिश सरकारने बंगालची फाळणी------ साली रद्द केली.


(1) 1905


(2) 1910


(3) 1907


(4) 1911


उत्तर-1911

__________

29. 'एकजुटीने राहा, स्वराज्य मिळवा व त्यासाठी अखंड चळवळ करा' हा संदेश -----यांनी भारतीय जनतेला दिला.


(1) दादाभाई नौरोजी


(2) लोकमान्य टिळक


(3) गोपाळ कृष्ण गोखले


(4) सुरेंद्रनाथ बॅनर्जी


उत्तर-दादाभाई नौरोजी

___________________

30. 'स्वराज्य, स्वदेशी, बहिष्कार व राष्ट्रीय शिक्षण' ही चतुःसूत्री भारतीय राष्ट्रीय सभेने------ च्या अधिवेशनात स्वीकारली.


(1) 1905


(2) 1906


(3) 1907


(4) 1908


उत्तर-1906

__________

31. लोकमान्य टिळक यांना---- ठेवले. येथील मंडालेच्या तुरुंगात


(1) ओदिसा


(2) म्यानमार


(3) मध्य प्रदेश


(4) अंदमान


उत्तर-म्यानमार

__________

32. जन-आंदोलन दडपण्यासाठी सरकारने केलेल्या दडपशाहीमध्ये समाविष्ट नसलेली बाब पुढील पर्यायांतून निवडा :


(1) वृत्तपत्रांवर अनेक बंधने घातली.


(2) कायदा मोडणाऱ्यांना कठोर शिक्षा केल्या.


(3) दैनंदिन वस्तूंचे भाव वाढवले.


(4) लेखक व संपादक यांना तुरुंगात टाकले.


उत्तर-दैनंदिन वस्तूंचे भाव वाढवले.

___________________

33. मुस्लीम समाजातील उच्चवर्णीयांचे शिष्टमंडळ-----यांच्या नेतृत्वाखाली गव्हर्नर जनरल लॉर्ड मिंटो यांना भेटले. 


(1) सर सय्यद अहमदखान


(2) अब्दुल लतीफ


(3) बद्रुद्दीन तय्यबजी


(4) आगाखान


उत्तर-आगाखान

____________

34. 1906 साली----- या पक्षाची स्थापना झाली.


(1) मवाळवादी पक्ष


(2) जहालवादी पक्ष


(3) मुस्लीम लोग


(4) भारतीय राष्ट्रीय काँग्रेस


उत्तर-मुस्लीम लोग

_______________

35. अयोग्य जोडी निवडा :


(1) मोर्ले-मिंटो कायदा - 1909


(2) मुस्लीम लीग - 1906


(3) बंगालची फाळणी रद्द - 1905


(4) राष्ट्रीय सभेची स्थापना 1885


उत्तर-बंगालची फाळणी रद्द - 1905

_____________________

36. लोकमान्य टिळकांच्या प्रयत्नाने कोणत्या अधिवेशनात राष्ट्रीय सभेतील मतभेद दूर होऊन दोन्ही गट एकत्र आले ?


(1) लखनौ


(2) मुंबई


(3) सूरत


(4) पुणे


उत्तर-लखनौ

___________

37.मुस्लिमांच्या विभक्त मतदारसंघांना राष्ट्रीय सभेने---- करारानुसार मान्यता दिली.


(1) मोर्ले-मिंटा कायदा


(2) लखनौ करार


(3) लाहोर करार


(4) पुणे करार


उत्तर-लखनौ करार

____________

38.-----मधील वसाहतवादविरोधी चळवळीच्या धर्तीवर भारतात होमरूल चळवळ सुरू केली.


(1) स्कॉटलंड


(2) आयर्लंड


(3) स्वित्झर्लंड


(4) न्यूझीलँड


उत्तर-आयर्लंड

____________

39. अॅनी बेझंट व -----यांनी होमरूल चळवळ सुरू केली.


(1) गोपाळ कृष्ण गोखले


(2) लोकमान्य टिळक


(3) लाला लजपतराय


(4) बिपिनचंद्र पाल


उत्तर-लोकमान्य टिळक

________________

40. ब्रिटिश सरकार भारताला टप्याटप्प्याने जबाबदार राज्यपद्धती देईल, ही घोषणा----- यांनी केली.


(1) माँटेग्यू


(2) लॉर्ड मिंटो


(3) चार्ल्स वुड


(4) लॉर्ड डफरीन


उत्तर-माँटेग्यू

__________

41. 'प्रतियोगी सहकारिता' हे तत्त्व कोणी जाहीर केले ?


(1) महात्मा गांधी


(2) पंडित जवाहरलाल नेहरू


(3) लोकमान्य टिळक


(4) दादाभाई नौरोजी


उत्तर-लोकमान्य टिळक

________________

42. 'सरकार जर भारतीयांच्या मागण्यांविषयी समजूतदारपणा दाखवणार असेल; तर भारतीय जनतादेखील सरकारला सहकार्य करील' हे उद्‌गार कोणी काढले ?


(1) महादेव गोविंद रानडे


 (2) लोकमान्य टिळक


(3) अॅनी बेझंट


(4) दादाभाई नौरोजी


उत्तर-लोकमान्य टिळक

__________________

43. हे स्वराज्य नव्हे आणि त्याचा पायाही नव्हे अशी टीका लोकमान्य टिळकांनी कोणत्या कायदयावर केली ?


(1) मोर्ले-मिंटो सुधारणा कायदा


(2) क्रिप्स योजना


(3) माँटेग्यू-चेम्सफर्ड सुधारणा कायदा


(4) भारत संरक्षण कायदा


उत्तर-माँटेग्यू-चेम्सफर्ड सुधारणा कायदा

_______________________

44. 'भारत सेवक समाजाची स्थापना' 1905 मध्ये ----यांनी केली.


(1) न्या. महादेव गोविंद रानडे


(2) लोकमान्य टिळक


(3) विष्णुशास्त्री चिपळूणकर


(4) गोपाळ कृष्ण गोखले


उत्तर-गोपाळ कृष्ण गोखले

___________________

45. 1906 च्या कोलकाता अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते ?


(1) सुरेंद्रनाथ बॅनर्जी


(2) दादाभाई नौरोजी


(3) व्योमेशचंद्र बॅनर्जी


(4) बद्रुद्दीन तय्यबजी


उत्तर-दादाभाई नौरोजी

________________

46. 'भारत सेवक समाज' या संघटनेच्या उ‌द्दिष्टांमध्ये समाविष्ट नसलेली बाब पुढील पर्यायांतून निवडा :

(1) लोकांमध्ये देशभक्ती निर्माण करणे.


(2) जातीय सलोखा निर्माण करणे.


(3) शिक्षणाचा प्रसार करणे.


(4) हिंदूंना विशेष सवलती देणे.


उत्तर-हिंदूंना विशेष सवलती देणे.

_________________________

47. चित्रातील व्यक्ती कोणत्या संघटनेशी संबंधित आहे ?


(1) होमरूल चळवळ


(2) भारत सेवक समाज


(3) मुस्लीम लीग


(4) भारतीय राष्ट्रीय सभा


उत्तर-भारत सेवक समाज

____________________

48. चित्रातील व्यक्ती कोण आहे ?


(1) पंडिता रमाबाई


(2) ॲलन हयूम


(3) सर विल्यम वेडरबर्न


(4) डॉ. अॅनी बेझंट


उत्तर-डॉ. अॅनी बेझंट

__________________

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा