Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

गुरुवार, २१ मार्च, २०२४

आठवी इतिहास 5.सामाजिक व धार्मिक प्रबोधन

 5.सामाजिक व धार्मिक प्रबोधन
स्वाध्याय

प्रश्न. पुढील प्रत्येक प्रश् नासमोर दिलेल्या पर्याय-क्रमांकांपैकी अचूक उत्तराच्या पर्याय-क्रमांकाचे वर्तुळ रंगवा :


1. राजा राममोहन रॉय यांनी इ. स. 1828 मध्ये ----स्थापना केली.


(1) आर्य समाजाची


(2) प्रार्थना समाजाची


(3) ब्राह्मो समाजाची


(4) सत्यशोधक समाजाची

उत्तर-ब्राह्मो समाजाची

_________________


2. चुकीचा पर्याय ओळखा :


ब्राह्मो समाजाचे कार्य


(1) विधवा पुनर्विवाह, स्त्रियांचे शिक्षण यांना समर्थन


(2) सतीप्रथा, बालविवाह, पडदा पद्धती यांना विरोध


(3) अस्पृश्योद्धार करणे हे मुख्य कार्य


(4) अद्वैतवादी विकसित केली

उत्तर-अस्पृश्योद्धार करणे हे मुख्य कार्य

_____________________


3. पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा :


समाजसुधारक


(1) महात्मा जोतीराव फुले


(2) स्वामी दयानंद सरस्वती


(3) दादोबा पांडुरंग तर्खडकर


(4) स्वामी विवेकानंद


संस्था


-सत्यशोधक समाज


-आर्य समाज


- प्रार्थना समाज


-रामकृष्ण मिशन


उत्तर-दादोबा पांडुरंग तर्खडकर-प्रार्थना समाज

__________________


4. रामकृष्ण मिशनची स्थापना----- यांनी केली.


(1) स्वामी विवेकानंद


(2) आत्माराम पांडुरंग तर्खडकर


(3) स्वामी दयानंद सरस्वती


(4) राजा राममोहन रॉय


उत्तर-स्वामी विवेकानंद

__________________


5. प्रार्थना समाजाचे पहिले अध्यक्ष कोण होते ?


(1) स्वामी दयानंद सरस्वती


(2) महात्मा जोतीराव फुले


(3) दादोबा पांडुरंग तर्खडकर


(4) डॉ. आत्माराम पांडुरंग तर्खडकर


उत्तर-डॉ. आत्माराम पांडुरंग तर्खडकर

___________________

6. राजा राममोहन रॉय यांसारख्या समाजसुधारकांनी केलेल्या मदतीमुळे गव्हर्नर----- आला याला सतीबंदीचा कायदा करता


(1) लॉर्ड वेलस्ली


(2) लॉर्ड बेंटिंक


(3) रॉबर्ट क्लाइव्ह


(4) लॉर्ड कॉर्नवॉलिस


उत्तर-लॉर्ड बेंटिंक

______________


7. राजा राममोहन रॉय यांनी कोणत्या वृत्तपत्राद्वारे जनजागृती केली ?


(1) संवाद कौमुदी


(3) दर्पण


(2) अमृत बझार पत्रिका


(4) प्रभाकर


उत्तर-संवाद कौमुदी

________________


8. ब्राह्मो समाजाची स्थापना कोठे झाली?


(1) महाराष्ट्र


- (2) बंगाल


(3) तमिळनाडू


(4) आंध्र प्रदेश


उत्तर-बंगाल

_________


9. शीख समाजातील सुधारणावादाची परंपरा -----चालू ठेवली.


(1) सिंगसभेने


(2) अकाली चळवळीने


(3) आर्य समाजाने


(4) प्रार्थना समाजाने


उत्तर-अकाली चळवळीने

___________________


10. सिंगसभेने -----समाजात शिक्षणाचा प्रसार आणि आधुनिकीकरण घडवून आणले.


(1) मराठी


(2) हिंदू


(3) मुस्लीम


(4) शीख


उत्तर-शीख

_________


11. सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली ?


(1) राजा राममोहन रॉय


(2) दादोबा पांडुरंग तर्खडकर


(3) स्वामी विवेकानंद


(4) महात्मा जोतीराव फुले


उत्तर-महात्मा जोतीराव फुले

______________________


12. कोलकाता येथे हिंदू कॉलेजची स्थापना करणारे-----


(1) महात्मा जोतीराव फुले


(2) स्वामी विवेकानंद


(3) राजा राममोहन रॉय


(4) स्वामी दयानंद सरस्वती


उत्तर-राजा राममोहन रॉय

____________________


13. चित्रातील व्यक्ती कोण आहेत ते ओळखा.


(1) लोकमान्य टिळक


(2) न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे


(3) दादोबा पांडुरंग तर्खडकर


(4) गोपाळ हरी देशमुख


उत्तर-दादोबा पांडुरंग तर्खडकर

______________________


14. सत्यशोधक समाजाची स्थापना -----मध्ये झाली.


(1) इ. स. 1828


(2) इ. स. 1873


(3) इ. स. 1848


(4) इ. स. 1875


उत्तर-इ. स. 1873

_______________

15. 'वेदांकडे परत चला' हे ब्रीदवाक्य असणारी संस्था-----


(1) रामकृष्ण मिशन


(2) ब्राह्मो समाज


(3) आर्य समाज


(4) प्रार्थना समाज


उत्तर-आर्य समाज

_____________


16. 'सत्यार्थ प्रकाश' हा ग्रंथ कोणी लिहिला ?


(1) स्वामी दयानंद सरस्वती


(2) राजा राममोहन रॉय


(3) स्वामी विवेकानंद

(4) पंडित ईश्वरचंद्र विदयार


उत्तर-स्वामी दयानंद सरस्वती

______________________


17. आर्य समाजाची तत्त्वज्ञानासंबंधी नसलेली बाब ओळखा.


(1) प्राचीन वैदिक धर्म हाच खरा धर्म


(2) 'वेदांकडे परत चला' हे ब्रीदवाक्य


(3) जातिभेद पाळू नका


(4) 'उठा, जागे व्हा व ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका' हा संदेश दिला


उत्तर-उठा, जागे व्हा व ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका' हा संदेश दिला

______________________


18. आर्य समाजाची स्थापना कोणी केली ?


(1) स्वामी विवेकानंद


(2) राजा राममोहन रॉय


• (3) स्वामी दयानंद सरस्वती


(4) पंडित ईश्वरचंद्र विदयासागर


उत्तर-स्वामी दयानंद सरस्वती

_______________________

19. पुढील घटनांचा योग्य कालानुक्रम असलेला पर्याय लिहा :


(i) शिकागो धर्मपरिषदेत नेतृत्व


(ii) पहिली मुलींची शाळा


(iii) आर्य समाजाची स्थापना


(iv) हिंदू महासभेची स्थापना


(1) (iii), (i), (ii), (iv)


(2) (ii), (iii), (i), (iv)


(3) (iv), (i), (iii), (ii)


(4) (ii), (i), (iii), (iv)


उत्तर-(ii), (iii), (i), (iv)

____________________

20. भारतीय तरुणांना 'उठा, जागे व्हा व ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका' हा संदेश कोणी दिला?


(1) स्वामी दयानंद सरस्वती


(2) गोपाळ हरी देशमुख


(3) स्वामी विवेकानंद


(4) वीरेशलिंगम पंतलु


उत्तर-स्वामी विवेकानंद

__________________

21. शिकागो येथील विश्वधर्म परिषदेत हिंदू धर्माचे प्रतिनिधित्व कोणी केले होते ?


(1) स्वामी विवेकानंद


(2) गोपाळ हरी देशमुख


(3) स्वामी दयानंद सरस्वती


(4) राजा राममोहन रॉय


उत्तर-स्वामी विवेकानंद

___________________


22. रामकृष्ण मिशनची स्थापना---- यांनी केली.


(1) स्वामी दयानंद सरस्वती


(2) राजा राममोहन रॉय


(3) रामकृष्ण परमहंस


(4) स्वामी विवेकानंद


उत्तर-स्वामी विवेकानंद

__________________

23. 'डिप्रेस्ड क्लासेस मिशन' या संस्थेचे मुख्य उद्दिष्ट कोणते होते ?


(1) शीख समाजात शिक्षणाचा प्रसार करणे


(2) अस्पृश्यांचा उद्धार करणे


(3) कामगारांसाठी रात्रशाळा सुरू करणे


(4) वैदिक धर्मास पुनरुज्जीवन देणे


उत्तर-अस्पृश्यांचा उद्धार करणे

_________________________

24. विठ्ठल रामजी शिंदे यांनी कोणत्या संस्थेची स्थापना केली ?


(1) परमहंस सभा


(2) डिप्रेस्ड क्लासेस मिशन


(3) आर्य समाज


(4) रामकृष्ण मिशन


उत्तर-डिप्रेस्ड क्लासेस मिशन

______________________


25. बाजूच्या चित्रामध्ये दाखवलेली व्यक्ती निगडित आहे, त्याचा अचूक पर्याय लिहा. कोणत्या घटनेशी


(1) परमहंस सभेची स्थापना


(2) ब्राह्मो समाजाची स्थापना


(3) शतपत्रातून स्त्री-पुरुष समानतेचा पुरस्कार


(4) सत्यशोधक समाजाची स्थापना


उत्तर-शतपत्रातून स्त्री-पुरुष समानतेचा पुरस्कार

_____________________

26. गोपाळ हरी देशमुख यांनी कोणत्या साप्ताहिकातून लिहिलेली शतपत्रे यामधून सामाजिक व सांस्कृतिक विषयावर भाष्य केले आहे?


(1) प्रभाकर


(2) निबंधमाला


(3) जनता


(4) ज्ञानोदय

उत्तर-प्रभाकर

___________


27. महात्मा फुले यांनी-----साली पुण्यातील भिडेवाड्यात पहिली मुलींची शाळा काढली. 


(1) 1829


-(2) 1848


(3) 1870


(4) 1875


उत्तर-1848

__________

28. पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्यासोबत------ यांनी विधवांच्या पुनर्विवाहाला मान्यता मिळवून देण्याकरिता प्रयत्न केले.


(1) वीरेशलिंगम पंतलु


(2) महर्षी विठ्ठल रामजी शिंदे


(3) गोपाळ गणेश आगरकर


(4) महात्मा फुले


उत्तर-वीरेशलिंगम पंतलु

__________________


29. गोपाळ गणेश आगरकर यांनी आपल्या------ या वृत्तपत्रातून बालविवाह, संमतीवयाचा कायदा यांवर परखड मते मांडली.


(1) मराठा


(2) दर्पण


(3) सुधारक


(4) ज्ञानोदय


उत्तर-सुधारक

___________


30. देवदासी प्रथेविरुद्ध परिषद भरवणारे------


(1) महर्षी धोंडो केशव कर्वे


(2) महात्मा फुले


- (3) महर्षी विठ्ठल रामजी शिंदे


(4) गोपाळ हरी देशमुख


उत्तर-महर्षी विठ्ठल रामजी शिंदे

_____________________


31. 'स्त्री-पुरुष तुलना' हा ग्रंथ कोणी लिहिला ?


(1) ताराबाई शिंदे


(2) पंडिता रमाबाई


(3) रमाबाई रानडे


(4) महात्मा फुले


उत्तर-ताराबाई शिंदे

_______________


32. विसाव्या शतकातील भारतातील पहिले महिला विद्यापीठ ------यांच्या प्रयत्नांमधून उभे राहिले.


(1) महर्षी धोंडो केशव कर्वे


(2) महर्षी विठ्ठल रामजी शिंदे


(3) डॉ. बाबासाहेब आंबेडकर


(4) महात्मा फुले

उत्तर-महर्षी धोंडो केशव कर्वे

______________________

33. 'अनाथ बालिकाश्रमा 'ची स्थापना कोणी केली ?


(1) पंडिता रमाबाई


(2) रमाबाई रानडे


(3) महात्मा फुले


(4) महर्षी धोंडो केशव कर्वे


उत्तर-महर्षी धोंडो केशव कर्वे

______________________

34. 'शारदामदन 'या संस्थेची स्थापना कोणी केली ?


(1) पंडिता रमाबाई


(2) महर्षी धोंडो केशव कर्वे


(3) रमाबाई रानडे


(4) सावित्रीबाई फुले


उत्तर-पंडिता रमाबाई

_________________


35. 'सेवासदन' या संस्थेच्या-----यांनी माध्यमातून स्त्रियांसाठी परिचारिका अभ्यासक्रम सुरू केला. 


(1) ताराबाई शिंदे


(2) पंडिता रमाबाई


(3) सावित्रीबाई फुले


(4) रमाबाई रानडे


उत्तर-रमाबाई रानडे

_______________


36. 'द मोहम्मदन लिटररी सोसायटी' या संस्थेची स्थापना कोणी केली ?


(1) सर सय्यद अहमद खान


(2) अब्दुल लतीफ


(3) मौलाना आझाद


(4) दादाभाई नौरोजी


उत्तर-अब्दुल लतीफ

__________________


37. सर सय्यद अहमद खान यांनी -----ची स्थापना केली.


-(1) मोहम्मदन अँग्लो ओरिएंटल कॉलेज


(2) हिंदू कॉलेज


(3) महिला विद्यापीठ


(4) द मोहम्मदन लिटररी सोसायटी


उत्तर-मोहम्मदन अँग्लो ओरिएंटल कॉलेज

_________________________


38. हिंदू समाजाला मानाचे स्थान मिळावे या हेतूने ----- ही  संस्था स्थापन करण्यात आली. 


(1) बनारस हिंदू विद्यापीठ


(2) प्रार्थना समाज


 (3) हिंदू महासभा


(4) आर्य समाज


उत्तर-हिंदू महासभा

________________

39. राष्ट्रीय स्वयंसवेक संघाची स्थापना कोणी केली ?


(1) स्वातंत्र्यवीर सावरकर


(2) डॉ. केशव बळीराम हेडगेवार


(3) पंडित मदन मोहन मालवीय


(4) गोपाळ गणेश आगरकर


उत्तर-डॉ. केशव बळीराम हेडगेवार

______________________


40. हिंदू धर्मातील सर्व जातींना मुक्त प्रवेश असणाऱ्या पतित पाका मंदिराची स्थापना कोणी केली ?


(1) स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर


(2) गोपाळ गणेश आगरकर


(3) डॉ. केशव बळीराम हेडगेवार


(4) स्वामी विवेकानंद


उत्तर-स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर

____________________

41. गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांना ----- क्षेत्रातील नोबेल        पारितोषिक मिळाले आहे. 


(1) कला


(2) विज्ञान


(3) शांतता


(4) साहित्य


उत्तर-साहित्य

___________

42. प्रबोधनकाळात------ क्षेत्रातील सर्वोच्च नोबेल पारितोषिक सी. व्ही. रामन यांना मिळाले.


-(1) विज्ञान


(2) कला


(3) साहित्य


(4) शांतता


उत्तर-विज्ञान

_________

43. चित्रामध्ये दाखवलेल्या व्यक्तीने कोणत्या संस्थेची स्थापन केली आहे, त्याचा अचूक पर्याय कोणता ते लिहा.


(1) 'सेवासदन' संस्थेची स्थापना


(2) 'अनाथ बालिकाश्रमा 'ची स्थापना


(3) बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना


(4) 'डिप्रेस्ड क्लासेस मिशन 'ची स्थापना


उत्तर-'अनाथ बालिकाश्रमा 'ची स्थापना

________________________


44. चित्रातील व्यक्ती कोण ते ओळखा.


(1) दादाभाई नौरोजी


(2) सर सय्यद अहमद खान


(3) अब्दुल लतीफ


(4) मौलाना आझाद


उत्तर-'सर सय्यद अहमद खान

_______________________

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा