Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

शुक्रवार, १ मार्च, २०२४

1 मार्च दैनंदिन शालेय परिपाठ

 १ मार्च


👉 संपूर्ण अभ्यास पहिली ते दहावी 

👉 आधुनिक शेतीविषयक माहिती

👉 आधुनिक शेती ग्रुप जॉइन करा

प्रार्थना 

गे मायभू तुझे मी फेडीन पांग सारे.


श्लोक

 ब्राह्मण खतरी, वैस, सूद 'रविदास' जनम ते नांहि ।। जो चाहइ सुवरन कड, पावई करमन मांहि ।। - रविदास दर्शन ● लोक मनुष्य जन्मापासून ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य अथवा शूद्र होत नसतो. उच्च कर्मापासून उच्च वर्ण प्राप्त होत असतो. चिंतन-

 जिद्दीने आव्हाने स्वीकारून पुढे चला आणि अंती यशस्वी व्हा. "कोणतीही नवीन गोष्ट शिकताना, नवी वाट चालताना एखादे ध्येय निश्चित करून ते साध्य करण्याचा प्रयत्न करीत असताना अडचणी येतातच. संकटे, मार्गातले अडथळे यांना आपण हसतमुखाने सामोरे जाऊन संयमाने मार्ग काढला पाहिजे ! परिस्थितीला शरण न जाता निर्धाराने। कटावर मात करून पुढे जाण्यातच खरा पुरूषार्थ आहे.


कथाकथन 

- कृतघ्न सिंह एका घनदाट जंगलात एक सिंह रहात होता. छोट्याछोट्या प्राण्यांची शिकार करून खात होता. एकदा काय झालं, जंगलात खूपखूप फिरला. पाणवठ्यावर मनसोक्त पाणी प्याला. निळ्याशार थंडगार पाण्यात त्याने एक डुबकी मारली व अंग शहारत काठावर | | आला. इतक्यात झाडावर लपलेल्या शिकाऱ्याने त्याच्यावर गोळी झाडली. गोळी सूडसूड करत मागच्या उजव्या पायातून आरपार गेली. सिंहानं रागान एकच गर्जना केली. सारं जंगल हादरून गेल. या अकल्पित घटनेनं सिंह घाबरून पळत सुटला. पायातून भळभळा रक्त गळत होते. कशीबशी त्यांने गुहा गाठली. गुहेत जाऊन सिंह आडवा झाला. त्याला खूप वेदना होत होत्या. सिंहाला ताप चढला. जखमी सिंह दोन-चार दिवस हाच पडून होता. त्याचं जंगलात फिरणं बंद झालं होतं. अन्न पाणी मिळत नव्हतं, गुहेच्या जवळच एक लांडगा रहात होता. दररोज दिसणारा सिंह का बरं दिसत नाही म्हणून उत्सुकतेने त्याने गुहेत डोकावलं तर कण्हत पडलेला आजारी सिंह त्याला दिसला. लांडग्यानं लांबूनच त्याची विचारपूस केली. सिंहाने पडलेला प्रसंग सांगितला. लांडग्याला त्याची दया आली. सिंहाला मदत करण्याचे त्याने अविले. आपल्या शिकारीतला थोडा भाग तो सिंहाला देऊ लागला. सिंहाची सेवा करू लागला. सिंहाला बरे वाटले. त्याच्या पायाची जखम भरून आली. पाय बरा झाला. सिंह आणि लांडगा यांच्यात मैत्री झाली. दोघेही जंगलातून सोबतीनं फिरू लागले. दोघं मिळून शिकार करू लागले. सिंहाबरोबर फिरताना लांडग्याला खूप मजा वाटायची. जंगलाचा राजा त्याचा मित्र होता ना! काही दिवस मजेत गेले. पण एक दिवस काय झालं, जंगलात वणवा शिरला. सारं जंगल जळून खाक झालं. जंगलातले प्राणी मरून गेले. गुहेमुळे सिंह आणि लांडगा मात्र वाचले, पण हा आनंद फार काळ टिकला नाही. दोघांनाही उपवास घडू जागला. शिकार काही मिळेना केवळ पाणी पिऊन दिवस काढणं जमेना. पोटात आग होऊ लागली तसा सिंह लांडग्यावर चिडू लागला. सिंहाच्या मनातलं कपट लांडग्याच्या लक्षात आले. आता आपली धडगत नाही हे त्यानं ओळखलं. पण, फार उशीर झाला होता लांडग्यांने पळण्याचा प्रयत्न केला. पण काही उपयोग झाला नाही. सिंहानं लांडग्याचा खरपूस समाचार घेतला. म्हणून शत्रूला मदत अन् त्याच्याशी मैत्री कधीच करू नये. 


→ सुविचार

 • वाईट कर्माचे फळ कधीही चांगले नसते. 

 • • शत्रूला मदत अन् त्याच्याशी मैत्री कधीच करू नये

 • 


. दिनविशेष - -

 • महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा स्मृतिदिन - १९८९: महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील हे सांगलीचे, १९३७ मध्ये देशप्रेमाने प्रेरित होऊन त्यांनी स्वातंत्र्यसंग्रामात उडी घेतली. १९४० मध्ये म. गांधींनी वैयक्तिक सत्याग्रहाचा आदेश | दिला. त्यानुसार वसंतदादानी सत्याग्रहात सक्रिय सहभाग घेतला. १९४२ च्या 'भारत छोडो' आंदोलनात त्यांनी पुढाकार घेतला. ते कुशल संघटक स्वभावाने जिद्दी आणि मनाने कणखर होते. स्वातंत्र्यानंतर १९६५ पासून त्यांनी महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघाचे नेतृत्व केले. १९७०-७१ मध्ये ते साखर निर्यात मंडळाचे अध्यक्ष होते. १९७१ मध्ये अमेरिकेतील लुइझियाना येथे भरलेल्या चौदाव्या आंतरराष्ट्रीय ऊस तज्ज्ञांच्या सरइटेस ते गेले होते. तेथे त्यांनी भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व केले होते. १७ एप्रिल १९७७ रोजी ते महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी नियुक्त झाले. मूल्ये - • देशप्रेम, श्रमनिष्ठा. 


→ अन्य घटना -

 • सिंहगड किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला. - १८१८

  • सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब हिरे यांचा जन्म १९०५

   • टाटा आयर्न अँड स्टील कंपनीची स्थापना १९०७ 

   • थोर धर्मवेत्ते स्वामी केवलानंद यांचा स्मृतिदिन - १९५५ 

   • अण्णाभाऊ साठे यांनी 'फकिरा' कादंबरी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना समर्पित केली. - १९५९.


 → उपक्रम 

 - • वसंतदादांच्या जीवनाविषयी अधिक माहिती मिळविणे

. • महाराष्ट्राच्या आतापर्यंतच्या मुख्यमंत्र्यांची क्रमवार माहिती मिळविणे, 


→ समूहगान - 

• बहु असोत सुंदर संपन्न की महा...

सामान्यज्ञान

शोध-संशोधक 

रेडियम-मादाम मेरी क्युरी

पिस्तुल -मादाम मेरी क्युरी

विमान-राईट बंधू

 फोनोग्राफ-


शोध-संशोधक

गॅलिलिओ-दुर्बीण

सिंगर-शिलाई मशी

ग्रॅहॅम बेल-टेलिफोन

टेलिव्हि-जजॉन बर्ड

👉संपूर्ण अभ्यास पहिली ते दहावी 

👉 आधुनिक शेतीविषयक माहिती

👉 आधुनिक शेती ग्रुप जॉइन करा

*****************************************************************************

🛑  *संपूर्ण अभ्यास* 🛑

*पहिली ते दहावी अभ्यास, शिष्यवृत्ती, मराठी हिंदी इंग्रजी व्याकरण, गोष्टी,story साठी भेट दया*

*https://www.godavaritambekar.com/p/blog-page_47.html?m=1*

☘️☘️☘️☘️☘️☘️☘️

🔮 *वर्णनात्मक नोंदी 1ली ते 5वी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_99.html?m=1

🔮 *वर्णनात्मक नोंदी 6 वी ते 8वी*

https://www.godavaritambekar.com/p/5-8.html?m=1

📕📗📘📙📕📗📘📙

*✳️इयत्ता दहावी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_34.html?m=1

✳️ *इयत्ता नववी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_93.html?m=1

*✳️इयत्ता आठवी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_60.html?m=1

*✳️इयत्ता सातवी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_32.html?m=1

*✳️इयत्ता सहावी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_5.html?m=1

✳️ *इयत्ता पाचवी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_64.html?m=1

*✳️इयत्ता चौथी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_65.html?m=1

*✳️इयत्ता तिसरी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_26.html?m=1

*✳️इयत्ता दुसरी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_19.html?m=1

*✳️इयत्ता पहिली सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/i.html?m=1

■■■■■■■■■■◆◆◆◆◆■■■■■■■■

👉संपूर्ण अभ्यास पहिली ते दहावी 

👉आधुनिक शेतीविषयक माहिती

👉 आधुनिक शेती ग्रुप जॉइन कराकोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा