Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

शुक्रवार, २ फेब्रुवारी, २०२४

22 फेब्रुवारी- दैनंदिन शालेय परिपाठ

          २2 फेब्रुवारी- दैनंदिन शालेय परिपाठ


👉संपूर्ण अभ्यास पहिली ते दहावी 

👉 आधुनिक शेती ग्रुप जॉइन करा

प्रार्थना 

ॐ तत् सत् श्री नारायण तू पुरूषोत्तम गुरु तू...


श्लोक

 जन्म जात मत पूडिजे, का जात अरू पात । मूल्यशिक्षण) सुश्री. ऊर्मिला ढाकरे/ऊर्मी • जय-सावित रविदास' पूत सभ प्रभु के, कोऊ नहीं जात कुजात । 

 - रविदास दर्शन जन्म, जात विचारू नका. जात किंवा वंशात काय आहे? सर्वजण त्या एकाच प्रभूची लेकरे आहेत. जातीचा किंवा परजातीचा कोणीच माणूस नाही. माणसे एकाच परमेश्वराची लेकरे असल्यामुळे ती सर्व समान आहेत. आपल्या चांगल्या-वाईट कर्मामुळेच आम्ही मोठे किंवा लहान बनत विशिष्ट जातीत किंवा कुटुंबात जन्म झाल्यामुळे मनुष्य उच्च किंवा नीच ठरत नसतो. 


चिंतन 

माता जे शिक्षण देते ते सर्वश्रेष्ठ असते - विनोबा भावे. डीचे सर्वश्रेष्ठ, मंगल, उदात्त व उन्नत रूप जर कोणते असेल तर ते म्हणजे मातृरूप, मातृत्वामध्ये स्त्रीजन्माचे सार्थक मानले जाते. दया, क्षमा, सेवा या गुणांचे मूर्तिमंत रूप म्हणजेच आई. एक वेळ मुलांकडून आईची उपेक्षा होईल, पण आई मात्र सदैव मुलांचे कल्याणच चिंतत असते. या देशभूमीला माता असे यथार्थ विशेषण दिले जाते. स्त्रीमध्ये कीर्ती, श्री, वाणी, स्मृती, मेधा, घृती आणि क्षमा अशा सात शक्ती आहेत, असे म्हटले आहे.


कथन -

 इंद्र आणि लाकूडतोड्या': एक लाकूडतोड्या अरण्यात एक नदीकाठी असलेले एक झाड तोदीत असताना अचानक त्याची पडली. त्यामुळे तो दुःखी होऊन रडू लागला. त्याची ही अवस्था पाहून इंद्र त्या ठिकाणी आता आणि त्याने लाकूडतोड्याला विचारले, तुला काय झाल? तू का रडतोस ?' त्यावर लाकूडतोड्याने आपली कुन्हाड पाण्यात पडल्याचे इंद्राला सांगितले. तेव्हा इंद्राने पाण्यात उडी एक सोन्याची कुन्हाड वर आणली आणि लाकूडतोड्याला विचारले, 'अरे, हीच का तुझी कुन्हाड?' तो म्हणाला, 'नाही, ही नाही माझी उनाड 'नंतर पुन्हा इंद्राने पाण्यात उडी मारली व चांदीची कुन्हाड आणली असता, आपली नाही, असे लाकूडतोड्याने सांगितले. मग तिसन्या बळी त्यांची स्वतःची कुल्हाड त्याला आणून दिली. तेव्हा त्या लाकूडतोड्याला मोठा आनंद झाला आणि त्याने इंद्राचे फार आभार मानले. त्याचा माणिकपणा पाहून इंद्रही संतुष्ट झाला आणि त्या सोन्या चांदीच्या दोन्ही कुन्हाडी त्याने त्याला बक्षीस दिल्या. सील गोष्ट त्या लाकुडतोड्याच्या शेजाऱ्याला समजताच तोही नदीवर गेला व आपली कुन्हाड मुद्दाम पाण्यात टाकून नदीकाठी रडत बसला. ते पूर्वीप्रमाणे इंद्र त्या ठिकाणी आला व पाण्यात उडी मारून एक सोन्याची कुन्हाड त्याने वर आणली तेव्हा त्या माणसाला मोठा मोह झाला म्हणाला, 'हो, हो! हीच माझी कुन्हाड!' इतके बोलून इंद्राच्या हातातील कुन्हाड घेण्यास तो पुढे आला. तेव्हा त्याच्या लबाडपणाबद्दल इंद्राने निर्भर्त्सना केली व त्याला सोन्याची कुन्हाड तर दिली नाहीच, पण त्याची स्वतःची कुन्हाडही त्याला मिळाली नाही. तात्पर्य साधेपणा व सचोटी हे दोन सद्गुण सर्वांना आवडतात व ते ज्याच्या अंगी असतील तोही सर्वांना प्रिय होतो; परंतु साधेपणा आणि सचोटी नुसता आव आणून जो लबाडी करायला जातो, त्याची मात्र शेवटी फजिती झाल्याशिवाय राहत नाही. 


सुविचार

 • अविचाराने व निष्ठुरतेने शेवटी हानीच होते.

  • चोर, हिंसक, खोटे बोलणारा आणि व्यसनी हे पतित असतात. यांच्यापासून नेहमी दूर राहावे.


>दिनविशेष 

-• कस्तुरबा गांधी स्मृतिदिन (१९४४) - कस्तुरबा या महात्मा गांधींच्या धर्मपत्नी, त्यांचा जन्म पोरबंदर येथे झाला. वयाच्या १३ या वर्षी त्यांचे लग्न झाले. गांधीजी इग्लंडहून बॅरिस्टर होऊन परत आले तेव्हा त्यांनी मुंबईत आपला संसार थाटला. नंतर गांधी आफ्रिकेत गेले तेव्हा त्याही त्यांच्यासोबत गेल्या. तेथे गांधीजींनी सत्याग्रह चळवळ सुरू केली. तेव्हा त्यांच्यासोबत कस्तुरबांनीही कारावास पत्करला. १९१५ मध्ये गांधी। भारतात परत आले व त्यांनी साबरमतीला आश्रम उभारला. त्याची सगळी व्यवस्था 'बा' (आई) बघत. व्यवस्थितपणा, टापटीप, शिक्षण यावर त्याचा कटाक्ष असे. त्या मुळात सनातनी पण गांधीजींच्या सहवासाने इतक्या बदलल्या की एक अस्पृश्य मुलगी त्यांनी सांभाळली. चंपारण्य सत्याग्रहापासून त्या गांधीजींच्या बरोबरीने चळवळीत उतरल्या. १९१२ व १९३० मध्ये त्यांनी तुरूंगवास भोगला. १९४२ च्या 'चले जाव' चळवळीत त्यांना पकडले व पुण्याला आगाखान पॅलेसमध्ये ठेवले. तेथे त्यांची प्रकृती अतिशय बिघडली व महाशिवरात्रीला त्यांनी हा लोक सोडला. पतीच्या कार्याला आणि ध्येयाला संपूर्ण समर्पण बुद्धीने वाहून घेणे हा त्यांचा विशेष होता. त्याच्या मृत्यूनंतर जमलेल्या निधीतून ग्रामीण महिलांच्या हिताची कामे केली गेली. त्यांचे जीवन म्हणजे एक यजच होता. 


मूल्ये

• समता, कर्तव्यदक्षता, स्वच्छता, श्रमनिष्ठा, भूतदया, शुचिता. 


अन्य घटना 

-• कापडाची पहिली गिरणी मुंबईला सुरु (१८५४) • स्काऊटचे जनक 'बेडन पॉवेल' यांचा जन्म (१८५७) 


👉संपूर्ण अभ्यास पहिली ते दहावी 

👉 आधुनिक शेती ग्रुप जॉइन करा

उपक्रम 

• मुलांकडून वर्ग व परिसर सफाई करवून घेणे, कस्तुरबांचे चरित्र जाणून घेणे. 


समूहगान -•

 साथी हाथ बढाना, एक अकेला थक जायेगा मिलकर बोझ उठाना.... 


सामान्यज्ञान 

• जगातील काही नद्या व त्यांची लांबी. 

• अॅमेझॉन - द. अमेरिका - ६७१२ कि. मी.

 • कांगो - आफ्रिका - ४६४० कि. मी. 

 • मिसिसिपी - अमेरिका - ५९३६ कि. मी. 

 • गंगा भारत २६४० कि. मी.

.

👉संपूर्ण अभ्यास पहिली ते दहावी 

👉 आधुनिक शेती ग्रुप जॉइन करा

*****************************************************************************

🛑  *संपूर्ण अभ्यास* 🛑

*पहिली ते दहावी अभ्यास, शिष्यवृत्ती, मराठी हिंदी इंग्रजी व्याकरण, गोष्टी,story साठी भेट दया*

*https://www.godavaritambekar.com/p/blog-page_47.html?m=1*

☘️☘️☘️☘️☘️☘️☘️

🔮 *वर्णनात्मक नोंदी 1ली ते 5वी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_99.html?m=1

🔮 *वर्णनात्मक नोंदी 6 वी ते 8वी*

https://www.godavaritambekar.com/p/5-8.html?m=1

📕📗📘📙📕📗📘📙

*✳️इयत्ता दहावी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_34.html?m=1

✳️ *इयत्ता नववी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_93.html?m=1

*✳️इयत्ता आठवी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_60.html?m=1

*✳️इयत्ता सातवी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_32.html?m=1

*✳️इयत्ता सहावी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_5.html?m=1

✳️ *इयत्ता पाचवी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_64.html?m=1

*✳️इयत्ता चौथी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_65.html?m=1

*✳️इयत्ता तिसरी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_26.html?m=1

*✳️इयत्ता दुसरी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_19.html?m=1

*✳️इयत्ता पहिली सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/i.html?m=1

■■■■■■■■■■◆◆◆◆◆■■■■■■■■

👉संपूर्ण अभ्यास पहिली ते दहावी 

👉 आधुनिक शेती ग्रुप जॉइन करा


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा