Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

शुक्रवार, २ फेब्रुवारी, २०२४

6 फेब्रुवारी- दैनंदिन शालेय परिपाठ

 6 फेब्रुवारी- दैनंदिन शालेय परिपाठ


👉संपूर्ण अभ्यास पहिली ते दहावी 

प्रार्थना-

 अजाण आम्ही तुझीं लेकरे, तू सर्वांचा पिता...

 

 - श्लोक

 -  - चला कल्पतरूंचे आरव । चेतना चिंतामणीचे गांव । बोलते जे अर्णव । पीयूषाचे ॥ - ज्ञानेश्वरी पसायदान. हे संतसज्जन म्हणजे चालत्या कल्पवृक्षांचे अंकूर होत, किंवा हे चैतन्यरूपी चिंतामणीरत्नाचे गाव अथवा अमृताचे बोलते सागर समजोत


. • चिंतन- जनता जनार्दन हाच देव, त्याचे सुख हाच धर्म जो प्रजेचे अनुरंजन करतो तो राजा, अशी पूर्वी लोकांची श्रध्दा असे. राजाने स्वामी म्हणून वागू नये, लोकनेता म्हणून लोकांचे नेतृत्व करावे, अशी लोकांची अपेक्षा असते. ध्येय साध्य करण्याचा मार्ग दाखवितो व त्यामध्ये त्यांचे नेतृत्व करतो तो खरा नेता. लोकांची सर्व प्रकारे प्रगती व्हावी. ते सुखी -समाधानी असावेत यासाठी सदैव, सर्व प्रकारे झटणे हे लोकनेत्याचे काम असते. तो एक प्रकारे लोकांचा सेवकच असतो, तोच खरा


कथाकथन '

पंडित मोतीलाल नेहरू - भारताचा शिल्पकार': (जन्म ६ मे १८६१, मृत्यू ६ फेब्रुवारी १९३१) - '

सुप्रसिद्ध बंगाली कवी आनदयोगी रविंद्रनाथ टागोर आणि पंडित मोतीलाल नेहरू यांचा जन्मदिवस एकच असावा, हा एक विलक्षण योगायोग आहे. ता. ६ मे १८६१ हाच तो दिवस. नेहरू हे काश्मिरी ब्राह्मण घराण्यातील. पांढरा शुभ्र खादीचा पोशाख, वर काश्मिरी शाली घेतलेला त्यांचा फोटो एका प्रसन्न व्यक्तिमत्वाचे दर्शन घडवितो. लहानपणापासून 'कायद्याचा अभ्यास' हा त्यांच्या आवडीचा विषय. हायकोर्ट वकिलीच्या परीक्षेत त्यांनी सुवर्णपदक मिळविले. मोतीलालजींचा जन्म होण्यापूर्वीच तीन महिने अगोदर त्यांच्या पित्याचे निधन झाले. त्यांचे वडीलबंधू नंदलाल यांनी मोतीलालजींचे पालन, पोषण, शिक्षण केले होते; पण मोतीलालजी वकिलीची परीक्षा पास झाल्यानंतर थोड्याच दिवसात नंदलाल यांचे निधन झाले आणि साऱ्या कुटुंबाच्या पालनपोषणाची जबाबदारी मोतीलालजींवर पडली. पण मोतीलालजींनी आपल्या वकिलीच्या व्यवसायावर ती सहजपणे पेलली. त्या व्यवसायात त्यांनी लाखो रुपये मिळविले. युरोपच्या सहली केल्या. पं मोतीलालजींना स्वरुपाराणीपासून पं. जवाहरलाल, विजयालक्ष्मी व कृष्णा हाथीमिंग अशी तीन मुले झाली. मोतीलाल हे स्वतः उदारमतवादी इंग्रजी चालीरिती पाश्चात्य संस्कृतीचे प्रशंसक व समर्थक होते. युरोपमधील अनेक राजदरबारी घराण्यांशी त्याचे निकटचे संबंध होते; पण १९१९ मध्ये पंजाबमध्ये मार्शल लॉ पुकारून इंग्रजी राजसत्तेने जे अश्लाघ्य वर्तन केले, त्यामुळे पं. मोतीलालजींच्या विचारात मोठेच परिवर्तन घडून आले. महात्मा गांधीजींनी शासनाशी पुकारलेल्या असहकाराच्या आंदोलनात ते सामील झाले. भारताच्या स्वांतत्र्यप्राप्तीच्या काँग्रेस पक्षात ते सामील झाले. गांधीजींच्या मवाळ धोरणाशी प्रथम ते सहमत नव्हते; पण नंतर पंडित जवाहरलालजींनी महात्माजींचे नेतृत्व स्वीकारले, तेव्हा सारे नेहरू घराणे गांधीजींच्या विचारांनी भारले गेले. १९२८ साली ते काँग्रेसचे अध्यक्ष होते, तर १९२९ च्या काँग्रेसचे अध्यक्षपद जवाहरलालजींकडे आले. घराण्यातील वारसा राजकीय वारसात परावर्तित झाला. संपूर्ण स्वराज्याचा ठरावही याच अधिवेशनात पास झाला. काँग्रेसला युवा नेतृत्व लाभले. पाश्चात्य संस्कृतीचे आकर्षण, रशियन राज्यक्रांती, भारतीय स्वातंत्र्य आंदोलनाशी समन्वय साधण्यासाठी नेहरूंच्या पाठीशी सारे राष्ट्र उभे राहिले. मोतीलालजी मृत्यूपूर्वी गांधीजींना म्हणाले होते, 'मी काही स्वराज्य पहाण्यास जगणार नाही पण तुम्ही मात्र स्वातंत्र्य पाहण्यास जगणार आहात.' ६ फेब्रुवारी १९३१ साली त्यांचे अलाहाबाद येथे निधन झाले. त्या वेळी साऱ्या भारतात शोककळा पसरली. पं. जवाहरलाल नेहरूंसारखा सुपुत्र देशाला अर्पण करून पं. मोतीलालजींनी भारताचे भाग्यविधातापद भूषविले. बॅ. चित्तरंजनदार व पं. मोतीलाल नेहरू यांचे मोलाचे सहकार्य म. गांधीजींना भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात मिळाले, हे भारताचे फार मोठे भाग्य आहे.


 सुविचार - 

 • इतिहास हा महान व्यक्तींच्या विशाल अंतःकरण व सामर्थ्यशाली बाहूंनी घडतो. - पं.जवाहरलाल नेहरू • जे थोर असतात, त्याचा संदेश एखाद्या राष्ट्रापुरता मर्यादित नसतो, तर तो साऱ्या जगासाठी असतो. - पं. जवाहरलाल नेहरू

  • पुस्तकप्रेपी मनुष्य अत्यंत श्रीमंत व सुखी असतो. • चांगली पुस्तके ही माणसास जगणं शिकवितात

 


. दिनविशेष 

- • महाराज सयाजीराव गायकवाड स्मृतिदिन - १९३९ : सयाजीरावांचे वर्णन 'हिन्दुस्थानातील आदर्श राजा' या शब्दात मदनमोहन मालवीयजींनी केले आहे. महाराजा सयाजीरावांचा जन्म नाशिक जिल्ह्यातील कवळाणे या गावी दि. १७ मार्च १८३३ रोजी झाला, मूळ गोपाळ काशीराम गायकवाड. बडोदा नरेश खंडेराव महाराजांच्या मृत्यूनंतर गोपाळ गायकवाडांकडे दत्तक गेला व त्याचे नाव सयाजीराव ठेवण्यात झाले. सयाजीरावांनी न्यायव्यस्थेत सुधारणा, ग्रामपंचायतीचे पुनरूज्जीवन, सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाची सोय, गरीब गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, विद्यार्थ्यांना औद्योगिक प्रशिक्षण व कलेचे शिक्षण, संस्कृतग्रंथ प्रकाशन, हरिजनांसाठी शाळा, अस्पृश्यता निवारण, स्त्रियांचा वारसा हक्क, बालविवाह दों, विधवा विवाह, कन्याविक्रय बंदी, पडदापध्दती बंदी यांसारखी सामाजिक सुधारणांची विविध कामे आपल्या संस्थानात केली. ते अत्यंत पुरोगामी विचारांचे होते. पुढे ते राष्ट्रीय सामाजिक परिषदेचे अध्यक्ष झाले. भारतरत्न डॉ. आंबेडकरांना त्यांनी शिष्यवृत्ती दिली व संस्थानात मानाची मणूकही दिली. ज्योतिबा फुल्यांना महात्मा ही पदवी त्यांनीच मुंबईमध्ये एका समारंभात १८८६ साली दिली. 

 

👉संपूर्ण अभ्यास पहिली ते दहावी 

→ मूल्ये -

 • कर्तव्यदक्षता, समता, राष्ट्रप्रेम.

 

 -अन्य घटना

 - • मानवेन्द्र राय यांचा जन्म १८९३. • पं. मोतीलाल नेहरू यांचा स्मृतिदिन १९३१ - सुश्री चांडी या केरळ न्यायालयात प्रथम महिला न्यायाधीश नियुक्त झाल्या - १९५९. मराठेशाहीमधील व पेशवाईमधील कर्तबगार घराण्यांची माहिती द्यावी. 


+ उपक्रम 

+ • बडोदा शहराची वैशिष्ट्ये सांगावीत, नकाशावर बडोदा शहर दाखवावे. 

 

→ समूहगान 

• इन्साफ की डगरपे, बच्चो दिखाओ चलके... 


+ सामान्यज्ञान 

+ • प्रसिध्द मराठा सरदार घराणी व त्यांच्या राजधान्या.

 • शिंदे - ग्वाल्हेर 

 • • होळकर - इंदौर

 • गायकवाड - बडोदा

 •  • पवार - देवास 

• डफळे - जत

  • पटवर्धन - सांगली 

• सावंत - सावंतवाडी

👉संपूर्ण अभ्यास पहिली ते दहावी 

*****************************************************************************

🛑  *संपूर्ण अभ्यास* 🛑

*पहिली ते दहावी अभ्यास, शिष्यवृत्ती, मराठी हिंदी इंग्रजी व्याकरण, गोष्टी,story साठी भेट दया*

*https://www.godavaritambekar.com/p/blog-page_47.html?m=1*

☘️☘️☘️☘️☘️☘️☘️

🔮 *वर्णनात्मक नोंदी 1ली ते 5वी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_99.html?m=1

🔮 *वर्णनात्मक नोंदी 6 वी ते 8वी*

https://www.godavaritambekar.com/p/5-8.html?m=1

📕📗📘📙📕📗📘📙

*✳️इयत्ता दहावी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_34.html?m=1

✳️ *इयत्ता नववी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_93.html?m=1

*✳️इयत्ता आठवी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_60.html?m=1

*✳️इयत्ता सातवी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_32.html?m=1

*✳️इयत्ता सहावी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_5.html?m=1

✳️ *इयत्ता पाचवी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_64.html?m=1

*✳️इयत्ता चौथी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_65.html?m=1

*✳️इयत्ता तिसरी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_26.html?m=1

*✳️इयत्ता दुसरी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_19.html?m=1

*✳️इयत्ता पहिली सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/i.html?m=1


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा