Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

शुक्रवार, २ फेब्रुवारी, २०२४

18 फेब्रुवारी- दैनंदिन शालेय परिपाठ

१8 फेब्रुवारी- दैनंदिन शालेय परिपाठ



प्रार्थना

 प्रभु तेरो नाम जो ध्याये फल पाये सुख लाये...


श्लोक

 - मोघाशा मोघकर्माणो मोघज्ञाना विचेतसः । राक्षसीमासुरी चैव प्रकृतिं मोहिनीं श्रिताः ।।

 -  ज्यांच्या आशा, कर्मे व ज्ञान ही निष्फल होतात असे विपरीत बुद्धीचे लोक मोहिनी, आसुरी व राक्षसी वृत्तीचे असतात

 

. • चिंतन-

 नरसेवा हीच नारायणाची सेवा. वार: जगात अनेक लोक निरनिराळ्या प्रकारे परमेश्वराची उपासना करीत असतात. कोणी गंध-फुले वाहून पूजा करतात, तर कोणी श्वासागणिक नामस्मरण करीत असतात. कोणी आसन, प्राणायाम, ध्यान करीत असतात. तर कोणी धार्मिक ग्रंथाचे वाचन करतात. कोणी घरदार, परिवार सोडून हिमालयात जाऊन तपश्चर्या करतात. याउलट काही धर्मात्मे प्रत्येक जीवन, हाच परमेश्वराचा अंश आहे हे जाणून त्याचे दुःख दूर करण्यासाठी आजीवन धडपडत असतात. तीच त्यांची उपासना असते.

 

 → कथाकथन 

 - प्रार्थनेची संकल्पना : शाळा किंवा इतर कोणताही कार्यक्रम असो;त्याची सुरुवात प्रार्थनेने होते. प्रार्थनेत काहीतरी उदास विचार किया भावना असते. धार्मिक किंवा राष्ट्रीय विचारांचा व भावनांचा मनावर संस्कार व्हावा, हा त्याचा हेतू असतो; परंतु आपण प्रार्थना करताना काय करतो? प्रार्थनेचा अभिनय करतो. ठराविक पवित्रा, मुद्रा आणि ओठांची हालचाल यापलीकडे प्रार्थनेला अर्थ उरत नाही. म्हणनूच त्याचे फळ मिळत नाही. गीतेमध्ये 'मनाला सहावे इंद्रिय म्हटले आहे. जे सर्वांत जास्त शक्तिमान आहे; परंतु इतर इंद्रियांप्रमाणेच ते सुदृढ आणि सुंदर पडणीचे व्हायला प्रार्थना हे एक आदर्श व्यायामस्वरूप आहे. प्रार्थनेत अनेक सोज्वळ वास्तववादी विचार असतात. प्रार्थना म्हणत असताना त्यातील एखाद्या विचारावर केंद्रित केल्यास हळूहळू या प्रार्थनेतील अर्थ मनापुढे साकार होऊ लागतो व त्याचा मनावर परिणाम होतो. पुढे याचाच परिणाम आपल्या आचरणावर) होतो. धातूच्या पत्र्याला ठोकून ठोकून सुंदर आकार देता येतो, तशी प्रार्थनाही माणसाच्या मनाला विचारांचा आणि भावनांचा सूक्ष्म धक्का देणारी शक्ती आहे. या शक्तीचा आपण बुद्धिपुरस्सर उपयोग करून घेतला तर निर्भर, निर्वैर आणि निकोप संस्कार मनावर होतील. आपल्या मनाची सुदृढता वाढेल. को संस्कार आपले आचरणही उजळून टाकेल. श्रीरामकृष्ण परमहंस म्हणतात की, 'मातीतून माणसं निर्माण करणे आणि पुढे त्या माणसातून, नरातून नारायण निर्माण होण्याची शक्यता प्रार्थनेत असते. आपली कर्मगती, सत्संगती आणि गुरुकृपा यांना सतत अनुकूल ठेवून, आपले आत्यंतिक कल्याण आणि सर्वांगीण प्रगती करून घेण्याची एकमात्र शक्ती प्रार्थनेत आहे. परंतु प्रार्थनेत ती शक्ती प्राप्त करून घेतांना मूळ आडकाठी निर्माण होते, ती लाजाळूपणाची. आपल्याला आपल्याच मनाला सशक्त करणान्या मापनाची लाज वाटते; परंतु अनेक थोर पुरुषांची ती मूळशक्ती ठरली आहे. पूज्य बापूजी गांधी म्हणायचे की, "प्रार्थना ही मेरा जीवन है ।" आणि त्याच्या अहिंसक, सात्त्विक आंदोलन सत्याग्रहीना वामनांच्या पावलांचे व्यापकत्व प्राप्त व्हायचे. त्यांनी प्रार्थनेने कमावलेले चारित्र्य बंदूकधारी इंग्रजांना नमवते झाले. याबद्दलचा स्वानुभव सांगताना 'अग्निपंख' या आपल्या आत्मचरित्रात आपले माजी राष्ट्रपती मा. ए. पी. जे. अब्दुल कलाम म्हणतात की. मी जगप्रसिद्ध नासा संस्थेत अवकाश अभ्यासाला जाणार होतो. त्याआधी मला माझ्या वडिलांनी विशेष नमाजासाठी नेले. तेव्हा जाणवले की, प्रार्थनेमध्ये मला नवनव्या कल्पनांना जन्म देणारी, सृजनशक्ती चेतवायची शक्ती आहे, असा माझा विश्वास आहे. यशस्वी जीवनासाठी जे जे संचित माणसाला जेचे आहे, ते सर्व आपल्यामध्ये आधीच असते, नवनव्या कल्पना निद्रिस्त अवस्थेत आधीच आपल्या मनात असतात. त्या जाग्या होतात, मुक्त होतात. त्यांना कष्टाचे खतपाणी घालून आपण सत्यात उतरवतो, तेव्हा त्यातून यशाची निर्मिती होते. निर्माणकर्त्यांनी आपल्या मनामध्ये ज्या ज्या शक्ती गुप्त स्वरूपात साठवून ठेवल्या आहेत, त्यांना प्रार्थनेमुळे उत्तेजना मिळते आणि आपल्या दृश्य मनात त्यांची जाणीव होते.

 

सुविचार 

- • प्रार्थनेने मनाची स्थिरता, एकाग्रता, शांती, प्रसन्नता, निर्मलता, निरामयता, उदात्तता, पावित्र्य, ऋजुता, दृढता, प्रल्भता, व गर्म होतो.

दिनविशेष 

उदारता वाढीस लागते. • प्रार्थना म्हणल्याने, भक्ती केल्याने आपला अहंकार व गर्व दूर होतो. - ० पू.पंधे गुरुजी यांचा स्मृतिदिन - १९९२ : ५. पंधे गुरुजी यांचे पूर्ण नाव मुकुंद श्रीकृष्ण पथे त्यांचा जन्म १२ फेब्रुवारी १९०३ रोजी झाला. ते मूळचे नागपूरचे. म. गांधीजींविषयी व त्यांच्या कार्यपध्दतीविषयी अतिशय आकर्षण व आदर पंधे गुरुजींच्या मनात होता. १९२९ साली म. गांधीजीच्या आदेशाने असहकार आंदोलनात त्यांनी उडी घेतली. तुरुंगवास भोगला. आंदोलनात्मक कामाबरोबरच रचनात्मक काम केले पाहिजे व शिक्षणातून संस्कार हेच सर्वश्रेष्ठ रचनात्मक काम आहे हे जाणून ते १९२४ साली खामगावच्या टिळक राष्ट्रीय विद्यालयात सर्व शक्तीनिशी कार्यरत झाले. तेथे ते औपचारिक शिक्षणाबरोबरच चित्रकला, मूर्तिकला व नृत्यकला शिकवीत. वास्तुशिल्प शास्त्राचेही सखोल ज्ञान त्यांना होते. कोणत्याही विषयाचा मूळापासून व सर्वांगीण अभ्यास व विचार करण्याची त्यांची पद्धती होती. १९५९ च्या नागपूर येथील काँग्रेस अधिवेशनात पंडित जवाहरलाल नेहरूंनी त्यांना 'कलाचार्य' ही पदवी दिली. त्यांनी तन मन धन पूर्वक समाजातील दलित पीडित आणि शोषित लोकांची सेवा केली. महाराष्ट्र शासनाने त्यांना 'दलित मित्र' ही पदवी देऊन त्यांचा गौरव केला. ते प्रसिद्धीपासून कटाक्षाने दूर राहिले. ते निरीश्वरवादी होते. समाज हाच त्याचा देव होता. त्याची सेवा हीच त्यांची देवपूजा होती.


 मूल्ये -

  • बंधुता, स्वाधीनता, श्रमनिष्ठा, कर्तव्यदक्षता, समता. 


अन्य घटना

 • चैतन्य महाप्रभूंचा जन्म - १४८६. 

 • लोकहितवादी ऊर्फ गोपाळ हरी देशमुख यांचा जन्म - १८२३. 

 • भारतीय ज्ञानपीठ संस्थेची स्थापना - १९४४. • डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मुंबई विधीमंडळात शपथ विधी संपन्न - १९२७


 → उपक्रम

  • आपल्या परिसरामधील शाळा सोडलेल्या मुलांना फावल्या वेळात चांगल्या गोष्टी सांगणे, गाणी शिकविणे. 

  • कार्यानुभवामध्ये शिकलेल्या वस्तू करण्यास विद्यार्थ्यांना प्रवृत्त करा. 


समूहगान 

-• नन्हा मुन्ना राही हूँ, देश का सिपाही हूँ.... 


सामान्यज्ञान - 

• रेडियमचा अर्ध आयुष्यकाल १६२० वर्षे आहे. हा काल मानवाच्या आयुष्यातील अनुभवाच्या दृष्टीने फार असला, तरी भूवैज्ञानिक कालमापनाच्या दृष्टीने अत्यल्प आहे. उदा. आजच्या १०० ग्रॅम रेडियमपैकी आणखी १६२० वर्षांनी फक्त ५० ग्रॅम रेडियम उरेल आणि संपलेल्या ५० ग्रॅमचे रूपांतर शिसे आणि हेलियममध्ये झालेले असेल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा