Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

सोमवार, १ जानेवारी, २०२४

dahavi- itihas ७-खेळ आणि इतिहास

                           ७-खेळ आणि इतिहास





 टिपा लिहा : (प्रत्येकी २ गुण) माहित
 • (१) खेळणी आणि उत्सव,
 • उत्तर: उत्सव व खेळणी यांचा प्राचीन काळापासूनच निष्ठ संबंध आहे. (१) विविध संस्कृतींत आणि धर्मात उत्सवप्रसंगी विविध खेळण्यांनी सजावट केली जाते. लहान मुलांना खेळण्यांचे वाटप केले जाते. संताक्लॉज नाताळमध्ये मुलांना खेळणीच देऊन जातो. (२) दीपावलीच्या उत्सवात महाराष्ट्रात मातीच्या किल्ल्यांवर शिवराय व सैनिकांच्या प्रतिमा ठेवतात, ती खेळणीच असतात. (३) गावोगावच्या जत्रा व उत्सवप्रसंगी बाजारात मोठ्या प्रमाणात खेळण्यांची दुकाने लागतात. (४) बैलपोळा, नागपंचमी अशा सणांप्रसंगी मातीचे बैल, गाडी. नागोबा अशी खेळणी तयार केली जातात. मुले या खेळण्यांशी खेळतात, स्पर्धा लावतात.
---------------------------------------------------------------------

 (२) खेळ व चित्रपट.
 उत्तर : (१) पूर्वीच्या चित्रपटांमधून नायक-नायिका खेळ खेळत असल्याची किंवा खेळांची दृश्ये दाखवली जात असत. (२) अलीकडच्या काळात खेळ आणि खेळाडूंचा जीवनपट दाखवणारे हिंदी-इंग्रजी चित्रपट निघाले आहेत. 'लगान', 'दंगल' असे क्रिकेट, कुस्ती खेळांशी संबंधित चित्रपट निघाले आहेत.(३) मेरी कोम, फोगटाच्या जीवनावर चित्रपट निघाले आहेत. (४) प्रसिद्ध धावपटू मिल्खासिंग, भारतरत्न सचिन तेंडुलकर आणि क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनी यांच्या कारकिदीवरही चित्रपट निघाले. एकूण खेळ व चित्रपट यांचा संबंध मूकपटापासून आजपर्यंत धनिष्ठ राहिलेला आहे.
---------------------------------------------------------------------

(३) देशी खेळ.
उत्तर : (१) ज्या खेळांचा उदय भारतात झाला आणि ज्या खेळांना भारतीय परंपरा आहे, अशा खेळांना 'देशी खेळ' असे म्हणतात. (२) देशी खेळांत बैठे खेळ आणि मैदानी खेळ असे दोन प्रकार आहेत. जे खेळ बसून कोठेही खेळता येतात; त्यांना 'बैठे खेळ' असे म्हणतात; तर जे खेळ मैदानात उभे राहून खेळावे लागतात, त्यांना 'मैदानी खेळ' असे म्हणतात. (३) बुद्धिबळ, सारीपाट, पत्ते इत्यादी देशी बैठे खेळ; तर आट्यापाट्या, खो-खो, कबड्डी, कुस्ती वगैरे देशी मैदानी खेळ होत. (४) देशी खेळांचे वैशिष्ट्य म्हणजे या खेळांना जास्त किमतीचे साहित्य लागत नसल्याने हे खेळ कमी खर्चीक असतात. फुगडी, झिम्मा, भातुकली असे मुलींचे देशी खेळ आहेत. आधुनिक काळात मुलीही मुलांच्या बरोबरीचे सर्व देशी व विदेशी खेळ खेळतात.
---------------------------------------------------------------------

पुढील विधाने सकारण स्पष्ट करा (प्रत्येकी ३ गुण)
 (१) सध्याच्या काळात खेळाचे अर्थकारण बदलले आहे.
 
उत्तर : (१) विसाव्या-एकविसाव्या शतकात आंतरराष्ट्रीयीकरण झाले आहे. खेळांचे (२) सर्वच सामन्यांचे थेट प्रक्षेपण जगाच्या कानाकोपऱ्यात एकाच वेळी होत असते. ज्यामुळे हौशी खेळाडू शिकण्यासाठी तर प्रेक्षक मनोरंजनासाठी सामने पाहतात. (३) निवृत्त खेळाडू समालोचनासाठी वाहिन्यांवर येतात. (४) मोठा प्रेक्षक वर्ग सामने पाहतो; त्यामुळे कंपन्या मोठ्या प्रमाणात पैसा खर्च करून आपल्या उत्पादनाच्या जाहिराती खेळाच्या प्रक्षेपणादरम्यान करीत असतात. या कारणांमुळे सध्याच्या काळात खेळाचे अर्थकारण बदलले आहे
 
---------------------------------------------------------------------

(२) खेळण्यांद्वारे इतिहासावर प्रकाश पडतो.
 उत्तर : मनोरंजनासाठी विविध प्रकारची खेळणी तयार करण्याची. प्रथा प्राचीन काळापासून चालू आहे. त्यामुळे खेळणी ही इतिहास- लेखनाचे महत्त्वाचे भौतिक साधन आहे. (१) खेळण्यांमुळे त्या काळातील धार्मिक व सांस्कृतिक परंपरा समजतात. (२) मातीचे किल्ले व त्यावर शिवकालीन देखावा उभा करण्यासाठी मातीच्या प्रतिमा ठेवतात. त्यावरून किल्ल्यांच्या रचनेचा अभ्यास होतो.(३) उत्खननात पपई शहरात सापडलेल्या भारतीय हस्तिदंती बाहुलीवरून भारत व रोम यांच्या प्राचीन संबंधांवर प्रकाश पडतो. (४) मोहेंजोदडो येथील उत्खननात सापडलेल्या खेळण्यांवरून तत्कालीन पद्धती, पोशाख, खेळांचे प्रकार आणि तंत्रज्ञान यांची 2602 माहिती होते. म्हणून खेळण्यांद्वारे इतिहासावर प्रकाश पडतो.
 
---------------------------------------------------------------------

 (३) मेजर ध्यानचंद यांना 'हॉकीचे जादूगार' असे म्हटले जाते.
  उत्तर : (१) मेजर ध्यानचंद हे त्या वेळच्या भारतीय हॉकी संघाचे मुख्य खेळाडू व संघनायक होते. (२) त्यांनी १९२८, १९३२ आणि १९३६ अशा सलग तीन ऑलिम्पिक स्पर्धांत भारताचे प्रतिनिधित्व करून भारताला हॉकीची सुवर्णपदके मिळवून दिली. 10000३ (३) १९३२ च्या ऑलिम्पिकमध्ये त्यांनी अमेरिका व जपानविरुद्ध *२५ गोल केले. (४) आपल्या कारकिर्दीत त्यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धात ४०० च्या वर गोल केले. त्यांच्या हॉकीतील या देदीप्यमान कामगिरीमुळे त्यांना 'हॉकीचे जादूगार' असे म्हटले जाते.
---------------------------------------------------------------------

(४) आज खेळांचे आंतरराष्ट्रीयीकरण झाले आहे.
 उत्तर : (१) कोणताही खेळ आज एका राष्ट्रापुरता मर्यादित राहिलेला नाही. दूरदर्शन आणि अन्य वाहिन्यांवरून सामन्यांचे थेट प्रक्षेपण होत असल्याने हे सामने जगभर पाहिले जातात. (२) ऑलिम्पिक, एशियाड, ब्रिटिश राष्ट्रकुल, विंबल्डन यांसारख्या आंतरराष्ट्रीय स्पर्धाचा आनंद जगभरातील लोक घेत असतात. (३) हॉकी, फुटबॉल, क्रिकेट या खेळांच्या विश्वकप स्पर्धा भरतात. (४) खेळ ही कोणत्याही राष्ट्राची आज मक्तेदारी राहिलेली नाही. याचाच अर्थ, आज खेळांचे आंतरराष्ट्रीयीकरण झालेले आहे.
---------------------------------------------------------------------

(५) खेळांच्या समालोचकाला क्रीडा इतिहासाच्या अभ्यासाची गरज असते.
 उत्तर : खेळांच्या समालोचकाला (१) स्पर्धा वा खेळ चालू असताना त्या खेळाचे वर्णन करावे लागते. (२) खेळाचा इतिहास व खेळाडूंची भूतकाळातील कामगिरी सांगावी लागते. विविध स्पर्धांमधील वैशिष्ट्यपूर्ण घटना सांगाव्या लागतात.. (३) मैदानाचा इतिहास सांगणे आवश्यक असते. (४) विविध सामन्यांतील विक्रम सांगावे लागतात; तरच त्याचे समालोचन रंजक होते. हे सर्व सांगण्यासाठी समालोचकाला क्रीडा इतिहासाच्या अभ्यासाची गरज असते.
 
---------------------------------------------------------------------

पुढील प्रश्नांची २५३० शब्दांत उत्तरे लिहा (प्रत्येकी ३ गुण)
(१) खेळांचे महत्त्व स्पष्ट करा.

उत्तर : खेळांचे पुढील दृष्टीने अनन्यसाधारण महत्त्व आहे (१) खेळांमुळे जीवनातील व्यथा व चिंता विसरल्या जातात. (२) माणसाच्या मनाला विरंगुळा मिळतो, त्यामुळे मन ताजेतवाने व उल्हसित होते. (३) खेळामुळे व्यायाम होऊन शरीर काटक व बळकट होते. (४) खेळामुळे मनोधैर्य, चिकाटी, खिलाडूपणा हे गुण अंगी बाणतात. (५) सांघिक खेळातून सहकार्य, संघभावना व नेतृत्वगुण वाढीस लागतात.
---------------------------------------------------------------------

 * (२) खेळांतून व्यावसायिक संधी कशा प्राप्त होतान है?
उत्तर : खेळाशी अनेक घटक संबंधित असतात. त्यातूनच पुढील अनेक व्यावसायिक संधी प्राप्त होतात- (१) खेळांसंबंधी लेखन करणारे लेखक व समीक्षक. (२) आकाशवाणी, दूरदर्शन व विविध वाहिन्यांवरून खेळांचे समालोचन करणारे समालोचक, तज्ज्ञ व त्यांना माहिती पुरवण्या साहाय्यक. (३) खेळाडूंना शिकवणारे प्रशिक्षक, मैदान तयार करणारे त पंच इत्यादी. (४) खेळांचे चित्रीकरण करणारे कॅमेरामन क संगणक तज्ज्ञ.
---------------------------------------------------------------------
(३)खेळांची पूर्वपीठिका लिहा.
उत्तर :(१) खेळणे ही माणसाची प्रवृत् अश्मयुगातील माणसापासून आजतागायत माणसे विविध प्रकारचे। खेळत आली आहेत. (२) शिकारी अवस्थेतील माणूस उदरनिर्वाहासाठी शिकार क असला तरी तो त्याचा खेळ आणि मनोरंजनाचाही एक भाग होता. (३) प्राचीन साहित्यात आणि महाकाव्यांमध्ये दयूत, कुस्ती, मुष्टियुद्धे, रथांच्या आणि घोड्यांच्या शर्यती, बुद्धिबळ या विविध खेळांचे उल्लेख येतात. (४) हडप्पा संस्कृतीतील बाहुल्या, शिटट्या, बैलगाडी असे अनेक अवशेष उत्खननात सापडले आहेत. एकूण खेळांचा इतिहास हा माणसांएवढाच जुना आहे.
---------------------------------------------------------------------
 (४) शिक्षणक्षेत्रात खेळांचे असलेले महत्त्व स्पष्ट करा.
  उत्तर : (१) खेळ हा शिक्षणाचा अविभाज्य घटक आहे. व्यक्तीच्या खेळांची सुरुवात शालेय पातळीवरच होते. (२) आंतरशालेय पातळीवर अनेक खेळ खेळले जातात. या खेळाडूंना जिल्हा, राज्य व राष्ट्रीय पातळीवर खेळण्याची संधी मिळते.(३) सरकारी व खाजगी पातळीवरून खेळांना उत्तेजन मिळते, त्यांच्यासाठी तेथे राखीव जागा ठेवण्यात आल्या आहेत, (४) खेळाडूंसाठी शिष्यवृत्त्याही ठेवण्यात आल्या आहेत. भावी जीवनात यशस्वी झालेल्या खेळाडूंचा पाया शालेय व महाविदयालयीन पातळीवर तयार होत असतो.
 
---------------------------------------------------------------------

(५) क्रीडाविषयक चित्रपट तयार करताना कोणत्या गोष्टी माहीत असणे आवश्यक असते ?
उत्तर : (१) क्रीडाविषयक चित्रपट तयार करताना ज्या खेळा- वर तो चित्रपट तयार करायचा आहे, त्या खेळाविषयी संपूर्ण माहिती निर्मात्याला असली पाहिजे. (२) ही माहिती मिळवताना त्या खेळाविषयी व खेळाडूंविषयी लिहिलेली पुस्तके, मासिकांमधून आलेले लेख, वृत्तपत्रीय लेख, फोटो या सर्वांचा त्याला अभ्यास करावा लागतो. (३) चित्रपटाचा कालखंड, खेळाची भाषा, पेहराव या सोचा सखोल अभ्यास करावा लागतो. (४) त्या खेळाविषयी जनतेचे असणारे समज, प्रथा, पूर्वपरंपरा, प्रसिद्ध खेळाडू अशा सर्व गोष्टींचा त्याला शोध घ्यावा लागतो.
---------------------------------------------------------------------

पुढील परिच्छेद काळजीपूर्वक वाचून त्याखाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा
(१) बाळ ज. पंडित कोणते काम करीत असत ?

 उत्तर : बाळ ज. पंडित क्रिकेट सामन्यांचे आकाशवाणीवरून समालोचन करीत असत.
 
---------------------------------------------------------------------

(२) समालोचकाचे कोणते काम असते ?
उत्तर : मैदानावर चालू असलेल्या सामन्याचे, त्यातील घटनांचे, खेळाडूंच्या प्रत्येक कृतीचे धावते वर्णन करण्याचे काम समालोचक करीत असतो.
---------------------------------------------------------------------
(३) बाळ ज. पंडितांचे समालोचन का रंजक होत असे ?
उत्तर : (१) बाळ पंडित हे क्रिकेट सामन्याचे धावते वर्णन करण्याबरोबरच ते तेथील मैदानाचा इतिहास सांगत असत. (२) खेळाडूंसंबंधीची माहिती आणि त्यांचा इतिहास सांगत असत. (३) त्या खेळाडूने पूर्वी कोणते विक्रम केले, त्या आठवणीही सांगत. (४) खेळाचे व खेळाच्या इतिहासाचे उत्तम ज्ञान त्यांना होते. या गुणांबरोबरच त्यांची बोलण्याची शैलीही उत्तम असल्यामुळे पंडितांचे समालोचन रंजक होत असे.

---------------------------------------------------------------------
प्र. पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा (प्रत्येकी ४ गुण) 
● (१) भारतातील खेळाच्या साहित्याच्या इतिहासाविषयी माहिती लिहा.
 उत्तर : खेळांशी संबंधित साहित्य ही एक नवी ज्ञानशाखाच निर्माण झालेली आहे. भारतात विविध खेळांवर विपुल लेखन केले जाते. (१) खेळांशी संबंधित अनेक पुस्तके व आत्मचरित्रे प्रसिद्ध झालेली आहेत. खेळांविषयीचे कोश लिहिले जात आहेत. (२) व्यायाम या विषयावर स्वतंत्र शब्दकोश तयार झालेला आहे. मल्लखांबाचा इतिहास प्रकाशित झालेला आहे. (३) खेळांवर लेखन असणारी स्वतंत्र क्रीडामासिके, पाक्षिके प्रसिद्ध होत असतात. दैनंदिन वृत्तपत्रांमध्ये एक वा दोन संपूर्ण पाने क्रीडाजगतासाठीच राखून ठेवलेली असतात. (४) 'षट्कार' नावाचे खेळाला वाहिलेले नियतकालिक पूर्वी प्रसिद्ध होत असे. द्वारकानाथ संझगिरी, शिरीष कणेकर, बाळ पंडित असे अनेक लेखक क्रिकेट आणि अन्य खेळांवर वृत्तपत्रांमधून लेखन करीत असतात. (५) इंग्रजी भाषेत तर क्रीडाक्षेत्रावर प्रचंड प्रमाणात लेखन होत असते. अन्य प्रादेशिक भाषांमधूनही क्रीडालेखन होते. ही सर्व माहिती म्हणजे खेळांच्या साहित्याचा इतिहासच आहे.
---------------------------------------------------------------------

(२) इतिहासांतील परस्परसंबंध स्पष्ट करा.
• उत्तर : खेळ आणि इतिहास यांच्यातील परस्परसंबंध पनिष्ठ आहेत. (१) खेळांवर लिखाण करणाऱ्या लेखकांना त्या खेळांचा इतिहास माहीत असावाच लागतो. (२) खेळाची समीक्षा करण्यासाठी त्या समीक्षकाला भूतकाळातील खेळाडूंच्या खेळाचे कौशल्य माहीत असावे लागते. ऑलिम्पिक, एशियाड, राष्ट्रकुल अशा आंतरराष्ट्रीय स्पर्धांची माहिती, खेळाडूंची वैशिष्ट्ये असा संदर्भ देण्यासाठी समीक्षकाला इतिहासाचा आधार घ्यावाच लागतो. (३) विविध स्पर्धाचे आकाशवाणीवरून दूरदर्शनवरून वा वाहिन्यांवरून समालोचन करताना समालोचकाला त्या खेळाचा इतिहास, गाजलेले खेळाडू, त्यांचे विक्रम इत्यादींसंबंधी माहिती दयावी लागते. तरच त्याचे समालोचन रंजक होते. (४) खेळातील विशेष तज्ज्ञ म्हणून बोलावलेल्या व्यक्ती, खेळाडूंच्या प्रशिक्षणासाठी असणारे प्रशिक्षक, स्पर्धांसाठी खेळाडूंची निवड करणारी समिती या सर्वांना खेळाडूंची माहिती, त्यांचे गुण व दोष, विरुद्ध चमूतील खेळाडूंचा इतिहास या सर्वांचा अभ्यास करावा लागतो. (५) खेळाडूंनाही आपल्या प्रतिस्पर्ध्याचा इतिहास माहीत असावा लागतो. थोडक्यात, खेळाशी संबंधित सर्व घटकांना खेळाचा इतिहास माहीत करून घ्यावाच लागतो.
---------------------------------------------------------------------
(३) मैदानी खेळ व बैठे खेळ यांच्यातील फरक स्पष्ट करा. उत्तर : मैदानी खेळ व बैठे खेळ यांत पुढील बाबतीत फरक आहे
* क्र. मैदानी खेळ मैदानमै उमे ___बैठे खेळ बसून खेळावे लागतात व ते घरात, मोकळ्या जागेत, कोठेही खेळता येतात.
* २. मैदानी खेळांसाठी करतो व कौशल्याची अधिक गरज असते. ___बैठ्या खेळांत तुलनेने कमी गरज कसरतीची व कौशल्याची गरज असते.
* ३. मैदानी खेळांना शारीरिक या क्षमतेची, शक्तीची. असते. गरज श ___रिक या खेळांना शारीरिक क्षमतेची, रज शक्तीची गरज नसते.
* ४. शक्ती अधिक खर्च झाल्याने या खेळांत थकवा लवकर येतो. ___शक्तीची गरज नसल्याने या खेळांमध्ये थकवा लवकर येत नाही.
* ५. मैदानी खेळांत थरारकता, रोमांच असतो. आनंदही अधिक मिळतो.. ___बैठ्या खेळांत थरारकता आनंदही नसते. रोमांच नसल्याने आनंद कमी मिळतो.
* ६. मैदानी खेळांत शारीरिक कौशल्याची गरज असल्याने क प्रशिक्षणाची, सरावाची गरज असते___बैट्या खेळांना शारीरिक गारीरिक सल्याने कौशल्याची गरज नसल्याने
* . ७. मैदानी खेळांमध्ये कबड्डी, हॉकी, खो-खो, क्रिकेट अशा स देशी-विदेशी | समावेश होतो.__प्रशिक्षण व सरावाची गरज तितकीशी नसते,

---------------------------------------------------------------------


(४) खेळण्यांच्या विकासाची वाटचाल व त्यांचे महत्त्व सांगा.
 उत्तर : (१) प्राचीन काळापासून प्रत्येक समाजात लहान मुलांच्या करमणुकीसाठी व शिक्षणासाठी खेळणी बनवली जात असल्याचे पुरावे मिळालेले आहेत. (२) मोहेंजोदडो, पाँपेई, ग्रीस इत्यादी ठिकाणी झालेल्या उत्खननात खेळणी सापडली आहेत. दगड, माती यांपासून ही खेळणी बनवलेली होती. ही खेळणी साच्यात किंवा हाताने तयार केली जात. कालौघात खेळणी बनवण्याचे तंत्र सुधारत जाऊन सुबक खेळणी बनू लागली. (३) 'कथासरित्सागर' या ग्रंथात कळ दाबल्यावर उंच उडणाऱ्या, नाचणाऱ्या लाकडी बाहुल्यांचे वर्णन आहे. धातुयुगातील माणूस खेळण्यांसाठी धातूंचा वापर करू लागला. (४) आधुनिक काळात कातडे, कापड, मोरपिसे, मोती यांचा खेळण्यांच्या सजावटीसाठी वापर केला जातो.
---------------------------------------------------------------------

🛑  *संपूर्ण अभ्यास* 🛑

*पहिली ते दहावी अभ्यास, शिष्यवृत्ती, मराठी हिंदी इंग्रजी व्याकरण, गोष्टी,story साठी भेट दया*

*https://www.godavaritambekar.com/p/blog-page_47.html?m=1*

☘️☘️☘️☘️☘️☘️☘️

🔮 *वर्णनात्मक नोंदी 1ली ते 5वी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_99.html?m=1

🔮 *वर्णनात्मक नोंदी 6 वी ते 8वी*

https://www.godavaritambekar.com/p/5-8.html?m=1

📕📗📘📙📕📗📘📙

*✳️इयत्ता दहावी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_34.html?m=1

✳️ *इयत्ता नववी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_93.html?m=1

*✳️इयत्ता आठवी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_60.html?m=1

*✳️इयत्ता सातवी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_32.html?m=1

*✳️इयत्ता सहावी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_5.html?m=1

✳️ *इयत्ता पाचवी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_64.html?m=1

*✳️इयत्ता चौथी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_65.html?m=1

*✳️इयत्ता तिसरी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_26.html?m=1

*✳️इयत्ता दुसरी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_19.html?m=1

*✳️इयत्ता पहिली सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/i.html?m=1



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा