Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

सोमवार, १ जानेवारी, २०२४

2 जानेवारी-दैनंदिन शालेय परिपाठ

            2 जानेवारी-दैनंदिन शालेय परिपाठ

 →  प्रार्थना 

- आई माझा गुरु, आई कल्पतरु, सुखाचा सागरु आई माझी

→ श्लोक - 

चन्दनपादपस्य मूलम् भुजङ्गैः, शिखरम् प्लवङ्गैः, शाखा विहङ्गैः,  कुसुमम्च भृङ्गैः सदा श्रितम् । (यतः) सताम् विभूतयः परोपकाराय (भवन्ति) 

चंदनाच्या झाडांच्या मुळाशी साप, टोकावर वानरे, फांदीवर पक्षी, फुलांवर भुंगे अशा सर्वांनी ठिकठिकाणी आश्रय घेतलेला असत ही चंदनाची परोपकारी वृत्ती हे त्याचे वैशिष्ट्य होय. सज्जनाप्रमाणे तो चांगले आणि वाईट दोघांवर सारखेच प्रेम करतो. 

→ चिंतन 

जनसेवा हीच ईश्वरसेवा आहे. परमेश्वर राऊळात, देवळात किंवा प्रार्थना मंदिरात नसतो. तो आपल्या अवतीभोवती असणाऱ्या चराचर सृष्टीत भरून राहिला आ आपल्या भोवतालच्या प्राणिमात्रांत, आबालवृद्धांत त्यांचे अस्तित्व आहे. तो जनतेत जनार्दन आहे. संत एकनाथ, संत गाडगेबाबा यांनी भावनेने कार्य केले. गांधीजींनीही याच भावनेने जनसेवा केली. मदर तेरेसा यांच्या जीवनामधूनही हाच संदेश मिळतो.

कथाकथन -

 'विठ्ठल रामजी शिंदे (जन्म २३ एप्रिल १८७३- मृत्यू २ जानेवारी १९४४) अस्पृश्यता निवारणाची हिंदू समाजाला लागलेला कलंक आहे. चातुवर्ण्य समाजव्यवस्थेचा राम भगवद्गीतेत आहे. जातीयता हो हिंदू दुर्बलता आहे. इंग्रजोनी याच इणिवेचा फायदा घेतला व भारतात एकछत्री साम्राज्य इभारले. जेव्हा भारताच्या राजकीय स्वातंत्र्याचा लढा सुरु या शिया समाजनेत्यांच्या लक्षात आल्या. विठ्ठल रामजी शिंदे हे त्यांचे अग्रदूत. १९९७ साली त्यांनी अॅनी बेझंट यांच्या अध्य भरलेल्या कांग्रेस अधिवेशनात हा ठराव आणला. विठ्ठल रामजी शिंदे यांचा जन्म २३ एप्रिल १८७३ साली जमखिंडी येथे झाला. त्यांचे वडील रामजीबाबा हे संत तुकारामांचे भक्त विल वैष्णवांचा धर्म । भेदाभेद भ्रम अमंगळ' ही तुकोबांची शिकवण. घरात जातीभेद नव्हता. १८९१ साली ते मॅट्रिक झाले. महाविद्यालय शिक्षणासाठी पुण्यास आले. त्यांची बहीण जानक्काही त्यांच्या समवेत राहिली. १८९८ साली ते बी.ए. झाले. १९०१ साली मॅचेस्टरला युरोपच्या सहली करून इंग्लंड, स्कॉटलंड, स्वित्झर्लंड, फ्रान्स, इटली देश पाहिले. त्या देशातील लोकशिक्षण पाहिले. कुटुंबसंस्था, शिक्ष समाजसंस्था पाहिल्या. विद्वानांच्या गाठीभेटी घेतल्या. प्रौढत्व, बुद्धिमत्ता, अनुभव समृद्धता, धर्मज्ञान यांचा सुंदर समन्वय त्यांच्या जीवनात २५ डिसेंबर १९२० रोजी नागरपूरला म. गांधीच्या अध्यक्षतेखाली अ. भा. अस्पृश्यता निवारण परिषद भरली होती. या पं. मोतीलाल नेहरु, राजगोपालाचार्य, जमनालाल बजाज, बहुभभाई पटेल इ. मान्यवर हजर होते. अशा प्रकारच्या परिषदा, भाष रामजीच्या प्रेरणा प्रयत्नाने भारतभर होत राहिल्या. मँचेस्टरला जाण्यापूर्वी ते एल.एल.बी. झाले होते. ब्रिटिश अँण्ड फॉरिन अ शिष्यवृत्ती डॉ. भांडारकर (प्रार्थनासमाज) यांच्यामुळे मिळाली. प्रार्थनासमाज व ब्राह्मोसमाजाचे प्रशस्तीपत्रक त्यासाठी लागे. त्याचा विठ्ठल रामजींना मिळाला. १९१२ साली श्रीमंत तुकोजीराव होळकर यांनी दिलेल्या २० हजार रुपयांच्या देणगीतून पुण्यश्लोक अहिल्यादेवी नावे वसतिगृह बांधले. दीडतप त्यांनी या मिशनचे कार्य केले. त्यानंतर ब्राह्मो समाजाने त्यांना मंगळूर कार्यालयात आचार्य म्हणून पाठविले. त्रावणकोर संस्थानातील वायक्रम मंदिरप्रवेशासाठी त्यांनी त्या पण ब्राह्मोसमाजाच्या कार्यकत्यांशी मतभेद झाले. त्यांनी आचार्यपदाचा राजीनामा दिला. कार्यकर्त्यांनी महर्षीना आग्रहपूर्वक पुण्यास नेले. १९२ अहिल्याश्रमाच्या नवीन वास्तूचे इद्घाटन झाले. ते पुणेकर झाले. १९३० सालच्या कायदेभंगाच्या आंदोलनातही ते सामील झाले. जनर काढली. प्रार्थनासमाजाला पदयात्रेची दीक्षा दिली. त्यांना १८ मे १९३० मध्ये अटक झाली. वयाने सत्तरी ओलांडली होती, शरीर थकले होते. कंपवात झाला होता. हातपायांना कंप सुटू लागला. त्या अवस्थेतही त्यांनी आपल्या आठवणी लिहून काढल्या. राजकारण, समाजकारण १९३३ नंतर शेवटची १३ वर्षे पुणे येथे काढली. ठक्करबाप्पा, भाऊराव पाटील वगैरे अनेक लहानथोर समाजसेवक येऊन भेटून गेले. विठ्ठल विटेवर उभा होता.  १९४४ रोजी ते वैकुंठवासी झाले. जनता जनार्दनाने फुल्यांना महात्मा ठरविले तर विठ्ठल रामजींना 'महर्षी' पदवी बहाल केली. 

सुविचार 

• दया, क्षमा, शांती, तेथे देवाची वसती जो शुद्ध

• , मनाने सुविचार व सदाचरण करतो, त्याला सुखाची शीतलता 

दिनविशेष 

- महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचा स्मृतिदिन - १९४४. महर्षी शिंदे यांचा जन्म जमखंडी संस्थानात २३ मत १०० झाला. प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी बी.ए. ची पदवी मिळविली आणि समाजसेवेचा खडतर मार्ग स्वीकारला. दलितांच्यातीसाठी हेच त्यांनी आपल्या आयुष्याचे ध्येय ठरविले. धर्माचा सखोल तौलनिक अभ्यास करण्यासाठी शिष्यवृत्ती मिळवून परत आल्यावर प्रार्थनासमाजाच्या प्रसारासाठी त्यांनी तीन वेळा आसेतुहिमालय प्रवास केला. परंतु अस्पृश्योद्धार हे कार्य या मानून त्यांनी 'डिप्रेस्ड क्लासेस मिशन सोसायटी ऑफ इंडिया' (दलित समाज सेवा मंडळ) ही संस्था स्थापन करून सर्वाधनि तिला वाहन संस्थेमार्फत अस्पृश्यांसाठी शाळा, वसतिगृहे, ग्रंथालये काढली. त्यासाठी समाजातील सर्व थरांतून मदत गोळा केली. अनेक गावां शाखा काढल्या. त्या सुव्यवस्थित सुरू झाल्यावर त्यांचा कार्यभार अस्पृश्य कार्यकर्त्यांवर सोपवून ते निवृत्त झाले. १९३४ साल ४१ सार्वजनिक संस्थांनी त्यांचा सत्कार करुन, मानपत्र देऊन त्यांच्या कार्याची प्रशंसा केली. २ जानेवारी १९४४ मध्ये त्यांचे निधन झाले .

3 जानेवारी -सावित्रीबाई फुले जयंती विशेष


→ मूल्ये 

-• श्रमनिष्ठा, समता.

अन्य घटना

 • पुणे येथे फर्ग्युसन कॉलेज• मराठा या दैनिकाची सुरूवात. सुरु झाले - १८८५ • हुताम्या वीर भाई कोतवाल यांनी देशासाठी हौताम्य पत्करले

 → उपक्रम 

 - महर्षी शिंदे यांच्या जीवनाविषयी अधिक माहिती मिळवा व त्यांच्या जीवन प्रसंगावर आधारित नाट्यप्रवेश सादर करा. 

→ समूहगान 

- सारे जहाँ से अच्छा हिंदोस्ताँ हमारा.... 

3 जानेवारी -सावित्रीबाई फुले जयंती विशेष


→ सामान्यज्ञान

 शहामृग हा पक्षी अंदाजे १५० कि.ग्रॅम वजनाचा असतो. त्याचे पाय लांब व ताकदवान असल्याने प्राण्यांनाही तो पायांच्या फटकाऱ्याने घायाळ करु शकतो. पायाच्या एका टांगेत अडीच ते तीन मीटर असा ताशी ६४ कि.मी. म्हणजेच सर्वसाधारण बसपेक्षा जास्त वेगाने शहामृग पळतो. 

• सागराच्या पृष्ठावर पुष्कळवेळा हिरवट थर साचलेला दिसतो. या अतिसूक्ष्म एकपेशी वनस्पती आहेत. पाण्यात व खडकावर येऊन आपटतात तिथे हे शेवाळे दिसते. शेवाळे हे जलचर प्राण्यांचे भक्ष असते.

●●●●●●●●●●●●●●●●


🛑  *संपूर्ण अभ्यास* 🛑

*पहिली ते दहावी अभ्यास, शिष्यवृत्ती, मराठी हिंदी इंग्रजी व्याकरण, गोष्टी,story साठी भेट दया*

*https://www.godavaritambekar.com/p/blog-page_47.html?m=1*

☘️☘️☘️☘️☘️☘️☘️

🔮 *वर्णनात्मक नोंदी 1ली ते 5वी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_99.html?m=1

🔮 *वर्णनात्मक नोंदी 6 वी ते 8वी*

https://www.godavaritambekar.com/p/5-8.html?m=1

📕📗📘📙📕📗📘📙

*✳️इयत्ता दहावी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_34.html?m=1

✳️ *इयत्ता नववी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_93.html?m=1

*✳️इयत्ता आठवी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_60.html?m=1

*✳️इयत्ता सातवी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_32.html?m=1

*✳️इयत्ता सहावी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_5.html?m=1

✳️ *इयत्ता पाचवी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_64.html?m=1

*✳️इयत्ता चौथी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_65.html?m=1

*✳️इयत्ता तिसरी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_26.html?m=1

*✳️इयत्ता दुसरी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_19.html?m=1

*✳️इयत्ता पहिली सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/i.html?m=1


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा