Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

सोमवार, १ जानेवारी, २०२४

dahavi-itihas 4 भारतीय कलांचा इतिहास

  dahavi-itihas  ४ भारतीय कलांचा इतिहास

४भारतीय कलांचा इतिहासपुढील संकल्पना स्पष्ट करा :-

 

(१) कला. 

उत्तर : (१) आपल्याला आलेले अनुभव आणि त्यातून मिळालेले ज्ञान दुसऱ्यांना सांगावेसे वाटते. आपल्या मनातील भावभावना व्यक्त कराव्यात ही माणसाची सहज या सहजप्रवृत्तीतून जेव्हा एखादी सौंदर्यपूर्ण निर्मिती केली जाते, तेव्हा तिला 'कला' असे म्हणतात. (२) 'कला' ही विविध घटकांची अनुभूती देणारी मांडणी असते. (३) ही मांडणी शिल्प, गायन, चित्र, नृत्य वा वादन अशा विविध रूपांत आविष्कृत होते. (४) कलानिर्मितीच्या मुळाशी कल्पकता, संवेदनशीलता, कौशल्य इत्यादी महत्त्वाचे घटक असतात.

 (२) हेमाडपंती शैली.

 उत्तर : प्रामुख्याने यादवकाळात महाराष्ट्रात हेमाडपंती मंदिरांची बांधणी झाली. (१) हेमाडपंती स्थापत्यशैलीचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे या पद्धतीत दोन दगडांमधील सांधे चुना वा मातीने भरले जात नाहीत. दगडांमध्येच एकमेकांत घट्ट बसतील अशा कातलेल्या खोबणी आणि कुसू यांच्या आधाराने भिंत उभारली जाते. (२) हेमाडपंती मंदिरांच्या बांधणीत प्रामुख्याने तारकाकृती बांधकाम आढळते. (३) तारकाकृती मंदिरांच्या बाह्य भिंती अनेक कोनांमध्ये विभागलेल्या असतात. (४) या दगडी भिंतींवरील देवतांची कोरीव शिल्पे पर्यटकांना आकर्षून घेतात. महाराष्ट्रभर अशी उभी असलेली हेमाडपंती शैलीतील मंदिरे तत्कालीन शिल्प व स्थापत्यकलेचा विकास दर्शवतात.

(३) मराठा चित्रशैली.

* उत्तर : इसवी सनाच्या सतराव्या शतकाच्या उत्तरार्धात मराठा चित्रशैली विकसित होण्यास सुरुवात झाली. (१) सचित्र हस्तलिखित पोथ्या, पोथ्यांच्या खाली आणि वर ठेवण्यात येणाऱ्या ) लाकडी फळ्यांवरील चित्रे, काचचित्रे आणि भित्तिचित्रे या विविध स्वरूपांत मराठा चित्रशैलीचा आविष्कार आढळतो. (२) या शैलीतील चित्रे रंगीत असून ती भित्तिचित्रे आणि हस्तलिखितांमधील लघुचित्रे यांच्या स्वरूपांतील आहेत. (३)) वाड्यांचा दर्शनी भागः दिवाणखाने, मंदिरांचे मंडप, शिखरे व छत यांवर मराठा चित्रशैलीतील भित्तिचित्रे पाहण्यास मिळतात. (४) या चित्रशैलीवर राजपूत आणि माळवा चित्रशैलीचा; तसेच युरोपीय चित्रशैलीचा प्रभाव पडलेला दिसून येतो.

(४) कलाशैली

उत्तर : (१) प्रत्येक कलाकाराची कलानिर्मितीची जी सर्वस पद्धती असते, तिला 'शैली' असे म्हणतात. ही शैली किंवा जेव्हा परंपरेचे रूप धारण करते; तेव्हा ती कलाशैली म्हणून ओळ जाऊ लागते. शैली लघ (२) प्रत्येक कलाप्रकारात अशा शैली रूढ झालेल्या आहेत (३) प्रत्येक प्रदेशात, संस्कृतीत आणि कालखंडात वि कलाशैली विकसित होतात. (४) त्या त्या कालखंडात आणि संस्कृतीत विशिष्ट कलाशैल प्रभाव पडत असल्याने त्या शैलींच्या आधारे त्या संस्कृतील कलेच्या इतिहासाचा अभ्यास करता येतो.

(५) अभिजात चित्रकला

. उत्तर : (१) ज्या कला प्रमाणित नियमांच्या चौकटीत बांधले ि असतात, त्या कलांना अभिजात कला' असे म्हणतात. (२) प्राचीन भारतात अशा ६४ अभिजात कलांचा उल्ले 'आलेख्यम्' किंवा 'आलेख्य विदया' या नावाने केलेला आहे. (३) आलेख्य विदधेची म्हणजेच अभिजात चित्रकलेची पड म्हणजेच सहा पैलू आहेत. आकार, प्रमाणबद्धता, भावप्रदर्शन (चेहऱ्यावरील भाव), सौंदर्याचा स्पर्श, सादृश्यता व रंगांचे आयोज यांचा या षडांगांत समावेश होतो. (४) जैन धर्मीयांच्या आगमग्रंथांत आणि पुराणांमध्ये मंदिरांच्या बांधणीच्या संदर्भात अभिजात चित्रकलेचा विचारही मांडला गेल आहे.

-------------------------------------------------------------------------

टिपा लिहा 

(१) चित्रकथी परंपरा.

(१) उत्तर : (१) कठपुतळ्या किया चित्रांच्या साहाय्याने रा महाभारत यांमधील कथा सांगण्याची परंपरा म्हणजे 'ि परंपरा' होय. (२) या परंपरेची माहिती चालुक्य राजा सोमेश्वर याने शतकात लिहिलेल्या 'मानसोल्लास' किंवा 'अभिलषितार्थीच या ग्रंथात आढळते. (३) कोकणातील कुडाळजवळच्या पिंगुळी गावातील आदिवासींनी ही परंपरा जतन केली आहे. म्हणून चित्रकथी 'पिंगुळी परंपरा' असेही म्हटले जाते. (४) चित्रकथी परंपरेत कागदावर चित्र काढून ती नैसर्गिक रंगवली जातात. साधारणतः ३० ते ५० चित्रांत एक कथा पूर्व जाते. ही परंपरा आता नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.
-------------------------------------------------------------------------

 (२) लघुचित्रे.

 उत्तर : (१) लहान आकाराच्या चौकटीतील चित्राला 'ल असे म्हणतात. हस्तलिखित पोथ्यांच्या माध्यमांतून हीसर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचली. सुरुवातीस या लघुचित्रांवर पर्शियन शैलीचा प्रभाव होता. (२) दक्षिणेकडील मुस्लीम राजवटींच्या आश्रयाखाली ख लघुचित्रशैली विकसित झाली तर अकबराच्या काळात पर्शियन आणि भारतीय चित्रशैलीतून मुघल लघुचित्रशैलीचा उदय झाला. (३) धार्मिक आशय सहजसुलभ पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचवण्यात ही लघुचित्रे यशस्वी ठरली. (४) भित्तिचित्रशैलीपेक्षा हस्तलिखित पोथ्यांमधील लघुचित्रशैली वेगळी व वैशिष्ट्यपूर्ण ठरली.
-------------------------------------------------------------------------

(३) पाश्चात्त्य चित्रशैली


, उत्तर : (१) ब्रिटिश राजवटीत भारतीय चित्रशैलीवर पाश्चात्त्य चित्रशैलीचा प्रभाव पडलेला जाणवतो. जेम्स वेल्स या स्कॉटिश चित्रकाराच्या नेतृत्वाखाली पुण्यातील शनिवारवाड्यात कलाशाळेची स्थापना झाली होती. (२) मुंबईत १८५७ साली पाश्चात्त्य कलाशैलीचे शिक्षण देण्यासाठी जे.जे. स्कूल ऑफ आर्ट अॅन्ड इंडस्ट्रीची स्थापना झाली. (३) पेस्तनजी बोमनजी यांनी अजिंठा लेण्यांमधील चित्रांच्या प्रतिकृती बनवल्या होत्या. (४) चित्रवस्तूंचे हुबेहूब चित्रण करणे, हे पाश्चात्य चित्रशैलीचे वैशिष्ट्य समजले जाते.
-------------------------------------------------------------------------

(४) चित्रकार गंगाराम तांबट


 उत्तर : (१) स्कॉटिश चित्रकार जेम्स वेल्स याच्या नेतृत्वाखाली शनिवारवाड्यात कलाशाळा स्थापन करण्यात आली होती. या वेल्ससोबत मराठी चित्रकार गंगाराम तांबट हे काम करीत होते. (२) उत्तम चित्रकार असलेल्या तांबट यांनी वेरूळ व का येथील लेण्यांची चित्रे काढली होती. (३) त्यांची काही चित्रे अमेरिकेतील येल विद्यापीठातील 'येल सेंटर ऑफ ब्रिटिश आर्ट' येथे जतन करून ठेवलेली आहेत.
 
-------------------------------------------------------------------------

 (५) मंदिर स्थापत्यशैली

 . उत्तर : (१) शिखरांच्या रचनावैशिष्ट्यांवरून भारतीय मंदिर स्थापत्याच्या अनेक शैली निर्माण झाल्या. (२) उत्तर भारतात 'नागर शैली' तर दक्षिण भारतात 'द्राविड शैली' अशा दोन प्रमुख शैली अस्तित्वात आल्या. (३) नागर व द्राविड या दोन शैलींच्या मिश्रणातून 'वेसर नवीन मंदिर स्थापत्यशैली निर्माण झाली. (४) मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात 'भूमिज' आणि 'नागर' अशा दोन मंदिर स्थापत्यशैली विकसित झाल्या.
 
-------------------------------------------------------------------------

(६) इंडो-गॉथिक स्थापत्यशैली,

उत्तर : (१) गॉथिक स्थापत्यशैलीचा उगम फ्रान्समध्ये बाराव्या शतकात झाला.(२) भारतात इंग्रजांचे राज्य स्थापन झाल्यानंतर भारतीय स्थापत्यशैली आणि गॉथिक स्थापत्यशैली यांच्या मिश्रणातून इंडो- गॉथिक स्थापत्यशैली उदयाला आली. (३) भारतात ब्रिटिश काळात या शैलीत अनेक चर्च, सरकारी कचेऱ्या, अधिकाऱ्यांची निवासस्थाने, रेल्वे स्टेशन्स यांच्या इमारती इंडो-गॉथिक स्थापत्यशैलीत बांधल्या गेल्या. (४) मुंबईतील 'छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनस' ही प्रसिद्ध इमारत याच स्थापत्यशैलीत बांधलेली आहे.
-------------------------------------------------------------------------

 (७) किताब-ए-नवरस.

 उत्तर : (१) विजापूरचा सुलतान इब्राहीम आदिलशाह दुसरा याने दखनीउर्दू भाषेत 'किताब-ए-नवरस' हा ग्रंथ लिहिला. हा ग्रंथ संगीतशास्त्राशी संबंधित आहे. (२) या ग्रंथात गायनाला अनुकूल अशी गीते आहेत. (३) धृपद गायकीतील गीतांना साकार करणारा आणि रसिकांना उत्तम दर्जाच्या काव्याची अनुभूती देणारा असा हा ग्रंथ आहे. (४) संस्कृत साहित्यात प्रकट होणाऱ्या नवरसांचा परिचय संगीतशास्त्राशी संबंधित असलेल्या या पर्शियन ग्रंथातून होतो.
-------------------------------------------------------------------------


पुढील विधाने सकारण स्पष्ट करा (प्रत्येकी ३ गुण) 

 (१) कलेच्या इतिहासाचा सखोल अभ्यास असणाऱ्या आवश्यकता असते

 . उत्तर : (१) कलावस्तूंच्या खरेदी-विक्रीचे एक स्वतंत्र क्षेत्र असते. (२)) कलावस्तू नकली आहेत की खऱ्या आहेत. त्यांतील पातू लाकडाचा प्रकार, त्यांचा दर्जा योग्य आहे का हे त्यातील जाणकारच सांगू शकतो. (३) कलावस्तूतील कलेचा दर्जा कसा आहे, हे कलाकारच ओळखू शकतात. (४) एकूण कलावस्तूंचे मूल्य ठरवताना वरील सर्व गोष्टींची पारख होणे आवश्यक असते; त्यासाठी कलेच्या इतिहासाचा सखोल अभ्यास असणाऱ्या तज्ज्ञांची आवश्यकता असते.
------------------------------------------------------------------------- 

 • (२) चित्रकथीसारख्या नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या परंपरेचे पुनरुज्जीवन करणे गरजेचे आहे.

 • उत्तर : (१) कठपुतळ्या किंवा चित्रांच्या साहाय्याने रामायण- महाभारतातील कथा सांगण्याची परंपरा म्हणजे 'चित्रकथी परंपरा' होय. (२) ठाकर, आदिवासी, वारली अशा जमातींनी चित्रकथी परंपरा 'पिढ्यान्पिढ्या टिकवून ठेवली आहे. (३) चित्रकथी कुटुंबांमध्ये जतन करून ठेवलेल्या पोथ्या आता जीर्ण झाल्या आहेत. (४) नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या चित्रकथीसारख्या परंपरांचे पुनरुज्जीवन करणे गरजेचे आहे; कारण या परंपरा आपल्या संस्कृतीच्या घटक असून, तो आपला वैभवशाली वारसा आहे.
-------------------------------------------------------------------------

(३) भारतीय ललितकला अधिकाधिक समृद्ध होत गेल्या

उत्तर : (१) शेकडो वर्षांच्या कालखंडात भारतात ग्रीक, अरब, मुघल, ब्रिटिश असे शासक आले. (२) या राजवटीत भारतीय लोकांचा त्यांच्या ललितकलांशीही संबंध आला. (३) त्यामुळे कलांच्या सादरीकरणामध्येही अनेक प्रवाह मिसळत गेले. (४) त्यातून गायन, वादन, नृत्य यांच्या नवनव्या शैली निर्माण झाल्या. त्यामुळे भारतीय ललितकला अधिकाधिक समृद्ध होत गेल्या.
-------------------------------------------------------------------------

(४) उपयोजित कलाक्षेत्रात जाणकारांची आवश्यकता असते.

उत्तर : (१) उपयोजित कलाक्षेत्रात कलात्मक रचना आणि उपयुक्तता यांची सांगड घालून वस्तुनिर्मिती करावी लागते. (२) वस्तुनिर्मितीची संकल्पना प्रत्यक्षात उतरवेपर्यंत निर्मितीचे अनेक टप्पे पार पाडावे लागतात. (३) कलावस्तूंचे उत्पादन करताना सांस्कृतिक आणि ऐतिहासिक परंपरा माहीत असाव्या लागतात. (४) वस्तुनिर्मितीच्या प्रत्येक टप्प्यावर प्रशिक्षित व कुशल व्यक्तींची, जाणकारांची आवश्यकता असते.
-------------------------------------------------------------------------

पुढील प्रश्नांची २५ ते ३० शब्दांत उत्तरे लिहा (प्रत्येकी ३ गुण)

 ११) लोकशिल्पकला' याविषयी माहिती लिहा..

उत्तर : (१) लोककलांची परंपरा अश्मयुगीन काळापासून चालू आहे. हडप्पा संस्कृतीत मातीची शिल्पे, देवतांच्या मूर्ती तयार केल्या जात असत. आजही बंगाल, बिहार, गुजरात, महाराष्ट्र, राजस्थान अशा अनेक राज्यांत मातीच्या गणेशाच्या, गौरीच्या मूर्ती तयार केल्या जातात. (२) मातीची खेळणी, बैल तयार करण्याची पद्धत हडप्पा संस्कृतीत होती. (३) पूर्वजांच्या स्मरणासाठी उभे केलेले लाकडी खांब आणि वीरगळ यांवर शिल्पे कोरली गेलेली पाहावयास मिळतात. (४) अशा रितीने धार्मिक कारणांतून व मनोरंजनासाठी तपार केल्या जाणाऱ्या कारागिरीतून लोकशिल्पकला टिकून राहिली व तिचा विकासही झाला.
-------------------------------------------------------------------------

(२) गांधार शिल्पशैलीची माहिती लिहा.

 उत्तर : (१) इसवी सनापूर्वी दुसऱ्या शतकापासून अफगाणिस्तान आणि आसपासचा प्रदेश यांवर ग्रीक आणि पर्शियन संस्कृतींचा प्रभाव वाढू लागला. (२) इसवी सनापूर्वीच्या चौथ्या शतकात सिकंदराच्या स्वारीनंतर भारताचा ग्रीकांशी घनिष्ठ संबंध येऊन ग्रीकांच्या शिल्पकलेचा भारतीय शिल्पकलेवर प्रभाव पडला. त्यातून निर्माण झालेल्या शिल्पशैलीला 'गांधार शिल्पशैली' असे म्हणतात.
-------------------------------------------------------------------------

(२) भारतीय मूर्तिविज्ञानाच्या प्रगतीची वाटचाल कशी झाली ते लिहा.


उत्तर : (१) स्थानिक शिल्पकलाशैली व गांधार शिल्पशैलीच मिलाफातून निर्माण झालेल्या मथुरा शिल्पशैलीने भारतीय मूर्तिविज्ञानाच पाया घातला. (२) कुशाण नाण्यांवर देवप्रतिमांचा उपयोग करण्याची कल्पन प्रथम आलेली दिसते. (३) गुप्त साम्राज्याच्या काळात भारतीय मूर्तिविज्ञानाचे नियम तयार होऊन, शिल्पकलेचे मापदंड निर्माण झाले. (४) चोळ राजांच्या काळात दक्षिण भारतात शिव-पार्वती, नटराज, लक्ष्मी-विष्णू इत्यादी देवतांच्या कांस्यमूर्ती घडवण्याची कला विकसित झाली. अशा रितीने भारतीय मूर्तिविज्ञानाच्या प्रगतीची. वाटचाल झालेली दिसून येते
-------------------------------------------------------------------------

. (४) भारतातील कोरीव लेण्यांविषयी माहिती लिहा.

 उत्तर : (१) इसवी सनापूर्वीच्या तिसऱ्या शतकापासूनच भारतात कोरीव लेण्यांची परंपरा सुरू झाली. (२) लेण्यांमध्ये स्थापत्य आणि कोरीव शिल्पकलेचा संगम आढळतो. (३) लेण्यांची प्रवेशद्वारे, आतील खांब आणि मूर्ती शिल्पकलेचे उत्तम नमुने आहेत. (४) लेण्यांच्या भिंती आणि छते उत्तम चित्रकारीने नटलेली असतात. भारतात अनेक ठिकाणी व विशेषत्वाने महाराष्ट्रात बौद्ध, जैन व हिंदू लेणी आहेत. १९८३ मध्ये अजिंठा आणि वेरूळ या लेण्यांना जागतिक वारशाचा दर्जा मिळाला.
-------------------------------------------------------------------------

(५) भारतातील मंदिर स्थापत्यशैलीचा विकास

 उत्तर : (१) इसवी सनाच्या चौथ्या शतकात गुप्त साम्रा काळात भारतात मंदिर स्थापत्याची सुरुवात झाली. कसा (२) सुरुवातीच्या काळात गाभारा आणि त्याबाहेरील असलेली ओसरी एवढेच मंदिराचे स्वरूप होते. (३) वेरूळच्या कैलास मंदिराच्या भव्य रचनेवरून है ल की, इसवी सनाच्या आठव्या शतकापर्यंत मंदिर स्थापत्य पूर्ण वि झाले होते. (४) भारतातील मध्ययुगीन काळापर्यंत मंदिर स्थापत्यात द्राविड, भूमिज, वेसर अशा अनेक स्थापत्यशैली
-------------------------------------------------------------------------

(६) नृत्य आणि शास्त्रीय संगीत लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी भारतात कोणते प्रयत्न होतात ?

उत्तर : नृत्य व शास्त्रीय संगीत लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी भारतात पुढील प्रयत्न होतात- (१) विविध ठिकाणी संगीताचे व नृत्याचे कार्यक्रम आयोजित केले जातात. (२) पुण्यात प्रतिवर्षी सवाई गंधर्व यांच्या नावाने होणाऱ्या संगीतमहोत्सवाप्रमाणे महोत्सव भरवले जातात. (३) नृत्य आणि शास्त्रीय संगीताच्या विविध शैलींना आणि सादरीकरणाला वाव दिला जातो. (४) त्यांचा आस्वाद घेण्यासाठी भारतीय लोक आणि परदेशी लोकही भारतात येतात.
------------------------------------------------------------------------

 (७) नृत्यकलेतील उदय शंकर यांचे कार्य लिहा,

  उत्तर : उदय शंकर यांनी नृत्यकलाक्षेत्रात पुढील कार्य केले- (१) भारतीय शास्त्रीय नृत्य आणि युरोपीय रंगभूमीवरील नृत्य परंपरा यांचा मेळ घातला. (२) नवीन नृत्यशैली विकसित केल्या. (३) लोकनृत्याच्या विविध शैलींना शास्त्रीय नृत्यशैलीत स्थान मिळवून दिले. (४) नृत्यकलेच्या सादरीकरणाचे क्षेत्र त्यांनी विस्तृत केले.
 
-------------------------------------------------------------------------

 (८) उपयोजित कलाक्षेत्रात कोणकोणत्या गोष्टींचा समावेश होतो?

 उत्तर : 'उपयुक्तता' हा उपयोजित कलांचा मुख्य हेतू असतो. त्या दृष्टीने उपयोजित कलाक्षेत्रात पुढील गोष्टींचा समावेश होतो- (१) औदयोगिक क्षेत्र, जाहिरातीचे क्षेत्र, रंगमंचावरील नेप चित्रपट व दूरदर्शनवरील कार्यक्रमांसाठी लागणारे तंत्रज्ञ इत्यादी. (२) मुद्रणक्षेत्रातील पुस्तके, नियतकालिके, वर्तमानपत्रे यांच्या निर्मितीसाठी लागणारे तज्ज्ञ तसेच संगणकावर काम करणारे (३) भेटकार्डे, आमंत्रणपत्रिका, भेटवस्तू तसेच स्तू तयार करणे. (४) दागदागिने, मौल्यवान वस्तू, नक्षीची भांडी काचेच्या वस्तू यांची निर्मिती,
-------------------------------------------------------------------------

पुढील परिच्छेद वाचून त्याखाली दिलेल्या उत्तरे लिहा (एकूण गुण) 

 1)अश्मयुगीन काळातील कोणत्या राज्यांमध्ये गुहाचित्रे आहेत?

उत्तर: मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, अखंड, कर्नाटक आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या भारतातील राज्यांमध्ये ढळली आहेत.
-------------------------------------------------------------------------

गुहाचित्रांपासून सुरू झाली?

 उत्तर: गुहाचित्रांची परंपरा अश्मयुगीन पानी दिसून येते.
------------------------------------------------------------------------

. (३) गुहाचित्रांची वैशिष्ट लिहा

उत्तर : (१) गुहाचित्रांमध्ये मनुष्य प्राणी, झाडे यांच्या भौमितिक आकृत्या काढलेल्या दिसतात. (२) या चित्रांमध्ये नैसर्गिक द्रव्यांपासून तयार केलेल्या रंगांचा वापर केलेला असतो. (३) परिसरासंबंधीचे ज्ञान आणि नैसर्गिक स्रोतांचा उपयोग घेण्याचे तंत्रज्ञान यांचा विकास होत गेल्याचे दिसते. (४) बदलत्या काळाप्रमाणे चित्रांच्या रेखाटनांत बदल चित्रांतून दिसून येतो.
-------------------------------------------------------------------------

प्र. पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा (प्रत्येकी ४ गुण)

 (१) लोकचित्रकला शैलीविषयी सविस्तर माहिती लिहा. 

उत्तर : (१) अश्मयुगीन काळापासून गुहाचित्रांची परंपरा चालू आहे. या गुहाचित्रांतून लोकचित्रशैलीचे जतन केले गेले. (२) गुहाचित्रांमध्ये प्राणी मनुष्याकृती, झाडे, शिकारीचे प्रसंग अशी चित्रे गुहांच्या मिर्तीवर कोरलेली आढळतात. (३) अश्मयुगीन मानवाच्या प्रगतीच्या वाटचालीत बदलत गेले. नवीन प्राणी, शेतीजीवन, वनस्पती इत्यादी नवीन विष येत गेले. मनुष्याकृतींच्या रेखाटनांच्या पद्धतीत व ध्ये गेलेल्या रंगांमध्ये फरक होत गेला. (४) नैसर्गिक द्रव्यांपासून, वनस्पतींच्या पानांपासून विविध रंग वापरले गेलेले दिसतात. सभोवतालचा गरिदा आणि अवगत झालेले नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान यांचा चित्रे कोरू लागला. (५) नवाश्मयुगात विकसित झालेला मानव काढू लागला. सणसमारंभप्रसंगी घरांच्या ि अंगणात रांगोळी काढणे अशा स्थानिक परंपर विकसित झाली. वारली चित्र परंपरा चित्रको परंपरा अशा अनेक लोकचित्रकला शैली हाथ
-------------------------------------------------------------------------

(२) भारतातील मुस्लीम स्थापत्यशैलीची वैशिष्ट् स्पष्ट करा. 

उत्तर: पर्शियन, मध्य आशियाई, अरबी आणि पूर्ण भारतीय स्थापत्य अशा अनेक स्थापत्यशैलीतून विकसित झालेल्या स्थापत्यशैलीस 'मुस्लीम स्थापत्यशैली' असे म्हणतात. मध्ययुगीन भारतात मुस्लीम सत्तांच्या काळात विकसित झालेल्या या मुस्लीम स्थापत्यशैलीची वैशिष्ट्ये व उदाहरणे पुढीलप्रमाणे- (१) या स्थापत्यशैलीत बांधलेला कुतुबमिनार जगलोस सर्वाधिक उंच (२४० फूट) आहे.(२) मुघल सम्राट शाहजहानने बांधलेला ताजमहाल ही वास्तू जगातील आठवे आश्चर्य मानले जाते. (३) इसवी सनाच्या सतराव्या शतकात बांधलेला विजापूरचा गोलघुमट ही वास्तू प्रतिध्वनींसाठी प्रसिद्ध आहे. (४) फतेहपूर येथे सम्राट अकबराने बांधलेला राजवाडा आणि बुलंद दरवाजा त्याच्या उंचीसाठी आणि भव्यतेसाठी प्रसिद्ध आहे. (५) दिल्ली आणि आग्रा येथे बांधलेले लाल किल्ले विस्तीर्ण आणि देखणे आहेत. वरील सर्व वास्तू मुस्लीम स्थापत्यशैलीचे उत्तम नमुने आहेत.
-------------------------------------------------------------------------

(३) कलाक्षेत्रात व्यवसायाच्या कोणत्या उपलब्ध आहेत. हे स्पष्ट करा

 उत्तर : विविध कलाक्षेत्रांत व्यवसायाच्या पुढील संधी उपलब्ध असतात- (१) कलेच्या अभ्यासकांना संग्रहालये, अभिलेखागारे, ग्रंथालये, पुरातत्त्वीय संशोधन आणि भारतीय विद्या या ठिकाणी व्यवसाय मिळू शकतात. (२) कलांचे अभ्यासक पत्रकारितेच्या क्षेत्रात काम करू शकतात. (३) औद्योगिक आणि आहिरात क्षेत्रात तसेच कलावस्तूंच्या खरेदी-विक्री व्यवसायात कलांच्या जाणकारांची आवश्यकता असते. (४) चित्रपट आणि नाटक निर्मितीसाठी नेपथ्य, कलाकार, दिग्दर्शक, छायाचित्रकार, प्रकाशयोजना इत्यादी कलाकारांची आवश्यकता असते. (५) मुद्रणक्षेत्रात तसेच घरसजावटीच्या साहित्यनिर्मितीत कला- क्षेत्रातील जाणकारांची गरज असते.. (६) दागदागिने, धातूंच्या वा लाकडी शोभेच्या वस्तू बनवणे, बांबू, काच, कापड, माती वा दगडी कलापूर्ण वस्तू, शिल्पे बनवणे या क्षेत्रांतही व्यवसायाच्या अनेक संधी उपलब्ध असतात.
-------------------------------------------------

(५) 'लोककला' आणि 'अभिजात कला' यांतील फरक स्पष्ट करा.

 उत्तर : 'लोककला' आणि 'अभिजात कला' या दोन कलांच्या परंपरांमधील फरक
लोककला
 १. ये. य लोककला ही अश्मयुगीन अ काळापासून अखंडितपणे परं चालत आलेली परंपरा आहे.
 २. लोककलांचा आविष्कार हा अ लोकांच्या रोजच्या जगण्याचा रो भाग असतो.
  ३. लोककला या कोणत्याही अ नियमांनी बांधलेल्या नसतात. नि अ
   ४. लोककलेची निर्मिती लोकांच्या अ प्रत्यक्ष सहभागातून होते व ती क उत्स्फूर्त असते.
  ५. स्थानिक परिसर, परंपरा, पूजा पद्धती यांचा प्रभाव लोककलांवर पडलेला असतो. घ विविध लोकसमूहांत विविध प्रकारच्या लोककला आढळून येतात.

अभिजात कला
 गीन अभिजात कलांची एवढी दीर्घ तपणे परंपरा नाही. हे. हा अभिजात कला या लोकांच्या चा रोजच्या जगण्याशी संबंधित नसतात. नाही अभिजात कला या प्रमाणित त. नियमांच्या चौकटींत बांधलेल्या असतात. च्या अभिजात कला आत्मसात ती करण्यासाठी दीर्घकालीन प्रशिक्षणाची आवश्यकता असते
 अभिजात कला आत्मसात ■ करण्यासाठी दीर्घकालीन प्रशिक्षणाची आवश्यकता असते नियमांच्या चौकटींमुळे अभिजात कलांमध्ये विशिष्ट घराणी, पद्धती वा शैली निर्माण होतात.

-------------------------------------------------------------------------

🛑  *संपूर्ण अभ्यास* 🛑

*पहिली ते दहावी अभ्यास, शिष्यवृत्ती, मराठी हिंदी इंग्रजी व्याकरण, गोष्टी,story साठी भेट दया*

*https://www.godavaritambekar.com/p/blog-page_47.html?m=1*

☘️☘️☘️☘️☘️☘️☘️

🔮 *वर्णनात्मक नोंदी 1ली ते 5वी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_99.html?m=1

🔮 *वर्णनात्मक नोंदी 6 वी ते 8वी*

https://www.godavaritambekar.com/p/5-8.html?m=1

📕📗📘📙📕📗📘📙

*✳️इयत्ता दहावी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_34.html?m=1

✳️ *इयत्ता नववी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_93.html?m=1

*✳️इयत्ता आठवी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_60.html?m=1

*✳️इयत्ता सातवी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_32.html?m=1

*✳️इयत्ता सहावी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_5.html?m=1

✳️ *इयत्ता पाचवी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_64.html?m=1

*✳️इयत्ता चौथी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_65.html?m=1

*✳️इयत्ता तिसरी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_26.html?m=1

*✳️इयत्ता दुसरी सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/blog-page_19.html?m=1

*✳️इयत्ता पहिली सर्व विषय ऑनलाईन चाचणी*

https://www.godavaritambekar.com/p/i.html?m=1कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा