Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

सोमवार, ६ नोव्हेंबर, २०२३

9 नोव्हेंबर- दैनंदिन शालेय परिपाठ

              नोव्हेंबर- दैनंदिन शालेय परिपाठ



→ प्रार्थना 

- खरा तो एकचि धर्म, जगाला प्रेम अर्पावे....

 → श्लोक 

 - तुमच्या कृपेचे पोसणें मी हरी । तुम्हाविण दुःख वारी क्रोण माझे !! भव ताप श्रम निवारी दयाळा । मागणे गोपाळा हेचि असे ।। काया वाचा मनें संतांची ते सेवा । आन नको हेवा दुजा काही ।। चोखा म्हणजे देवा नका धरूं दुजें । उतरा हे वोझे संसाराचे ।। 

 - - संत चोखोबा देवा, माझे पालन पोषण तुमच्या आशीर्वादाने झाले आहे. माझे दुःख तुमच्याशिवाय कोण निवारण करणार आहे. तुम्ही या संसारातील दुःख त्रिविध ताप (आधिभौतिक, आधिदैविक व आध्यात्मिक) हे सर्व काही नष्ट करावे. कारण तुम्ही फार दयाळू आहात. देवा, माझे हेच मागणे करणार. मी या शरीराने, मनाने आणि वाचेने संतांची सेवा करणार आहे. माझा दुसरा कोणताही उद्देश नाही. चोखोबा म्हणतात, मनात कुठला दुजाभाव धरू नकोस. माझ्या संसारातील तुम्ही हे (दुःख) ओझे नाहीसे करावे. 


→ चिंतन-

 दानधर्मसुध्दा योग्य मर्यादिच्या बाहेर जाऊ शकतो. तामस, राजस, सात्विक असे दानाचे प्रकार आहेत. केवळ भावनेच्या आवेगात वेदान केले जाते ते तामसिक दान. या दानाच्या वेळी दात्याच्या तत्कालीन भावनेशिवाय कशाचाच विचार येत नाही. त्यामुळे चुकाच चुका होतात. स्वत वैभव व मोठेपणा वाढविण्यासाठी जे दान केले जाते ते राजसिक दान. योग्य व्यक्तिला योग्य रीतीने आणि योग्य विधीने जे दान केले जाते ते सात्विक 


  कथाकथन - 

  दीपावली आणि महावीर - महावीरांच्या मुक्तीचा क्षण जवळ येऊन ठेपला होता. त्यांनी आपला प्रिय शिष्य गौतम याला एक

  ब्राह्मणाला उपदेश देण्यासाठी दूर पाठवून दिले. तिथेच एका वाटसरूने गौतमाला महावीरांच्या निर्वाणाचे दुःखद वृत्त सांगितले. भगवानांच्या ि दुःख ऐकताच गौतम खूप दुःखी झाला. गौतमने वाटसरूला विचारले, 'मोक्षाला जाताना भगवानांनी माझ्यासाठी काही संदेश दिला का? ट म्हणाला, हो, त्यांनी तुझ्यासाठी एक संदेश दिला आहे. 'संयम गोयम मा पमायए!' अर्थात - "हे गौतम! क्षणभरही चूक करू नको तू सागर किनान्यावर आला आहेस.' आता किनाऱ्याला घट्ट पकडून बसण्यात अर्थ नाही. त्यालाही सोडून दे. तुझ्या मनात माझ्याबद्दल असलेला सोडून दे." परमेश्वराचा संदेश ऐकताच गौतमच्या आत्म्यातून मोहाचे आवरण तत्काळ दूर झाले आणि त्याच वेळी कैवल्याची प्राप्ती झाली दि दिवे उजळून निघाले. भगवान महावीरांनी दुपारी १२ वाजता गृहत्याग केला. महात्मा गौतम बुध्दांनी रात्री १२ वाजता घर सोडले. रामाचा जन्म दुपारी । वाजता झाला, कृष्ण रात्री १२ वाजता जन्मास आला. १२ या संख्येचा चारही महापुरूषसोबत संबंध आहे. वस्तुतः ते प्रतीक आहे. दिवसा १२ माणसाला पोटाची भूक त्रस्त करते. रात्री १२ वाजता माणूस कामपीडित होतो. राम आणि कृष्णाचा जन्म १२ वाजता होण्यामागे एकच संकेत असा की, माणसाला जेव्हा पोटाची भूक त्रस्त करीत असते आणि माणूस जेव्हा कामपीडित होतो. तेव्हा परमेश्वराचे नामस्मरण करीत आपल्या भा ताबा मिळविला पाहिजे. महावीर आणि बुध्द यांनी १२ वाजता केलेल्या गृहत्यागातून 'जब जागो तभी सवेरा' हा संकेत मिळतो. रात्र आणि दिवस है आपल्या मनाचे खेळ आहेत. रात्र कधीच होत नाही. ती होणे, न होणे आपल्यावर अवलंबून असते डोळे बंद केले की रात्र. डोळे उघडताच स महावीरांचे निर्वाण अमावस्येच्या रात्री झाले तर भगवान बुध्दाला पौर्णिमेच्या रात्री ज्ञानाची प्राप्ती झाली. त्याच दिवशी आकाशात पूर्ण चंद्रप्रकाश झालेला होता, त्याचवेळी त्यांचे मानस चंद्राप्रमाणे प्रकाशमान झाले होते. है विशेष आश वाटावे असे नव्हते. पण अमावस्येच्या रात्री पौर्णिमच्या उजळून निघाला तर आश्चर्यच म्हणावे लागेल. महावीरांच्या बाबतीत असेच पडले. पार्तिक महिन्याच्या कृष्णपक्षातील अमावस्येची ती होती. दिवशी महावीर पावापूर नगरीतून मुक्त झाले. अमावस्येची ती रात्र असंख्य दिव्यांच्या प्रकाशाने उजळून निघाली. अमावस्येची ती रात्र दीपावलीची रात्र झ अशा तऱ्हेने भगवान महावीरांनी दाखवून दिले की, ज्यांना आपले ध्येय साध्य करायचे असेल त्यांनी अंधाराची चिंता करण्याचे कारण नाही. महावीरानी म आहे, 'जे लोक दिवसरात्रीचा विचार न करता भविष्याच्या दिशेने चालत राहतात ते कधीही मागे परतत नाहीत. जो मनुष्य अधर्म करतो, त्याच्या दिवसरात्री निष्फळ ठरतात, पण जो मनुष्य धर्माने चालतो, तो सगळ्या दिवशी सफलच होतो. म्हणून जोपर्यंत वृध्दत्वाचा त्रास होत नाही, व्याधीने शरीर ग्रासले जात नाही, शरीर जोपर्यंत अशक्त होत नाही तोपर्यंत माणसाने धर्माचरण करायला हवे. कारण त्यानंतर काहीच साध्य होऊ शकत न भगवान महावीरांच्या निर्वाणाचा काळ जवळ आला. इंद्र देवांनी भगवानांना म्हटले, हे भगवान आपले आयुष्य आणखी वाढू द्या. कारण त्यामुळे समाजाल अधिक काळ तुमचा सत्संग लाभेल, त्यावर महावीर म्हणाले, देवश्री इंद्र, आता या आयुष्याचा एकही क्षण वाढविणे शक्य होणार नाही. मला जे साध्य करा होते, ते मी साध्य केले आहे. आता या संसारापासून पूर्ण मुक्ती हवी आहे. असे म्हणून महावीरांनी नश्वर शरीराचा त्याग करून मुक्ती प्राप्त केली. देव घोषणा केली की, कार्तिक कृष्ण अमावस्येला भगवान महावीरांचे निर्वाण झाले. आजपासून घरी दिवे लावावे, दिवाळी साजरी करून आसमंत उजळूनटाका 

  

→ सुविचार • जो मनुष्य अधर्म करतो, त्याच्या सर्व दिवसरात्री निष्फळ ठरतात, पण जो मनुष्य धर्माने चालतो, तो सगळ्या दिवशीसफल हो


 → दिनविशेष -

  • महर्षी धोंडो केशव कर्वे यांचा स्मृतिदिन - १९६२ महर्षी धोंडो केशव कर्वे यांचा जन्म १८ एप्रिल १८५८. १९१४ पर्यंत कॉलेजमध्ये त्यांनी गणिताचे प्राध्यापक म्हणून काम केले. त्यानंतरचे सर्व आयुष्य त्यांनी स्त्रीशिक्षणाच्या प्रसारात खर्च केले. हिंगणे या ठिकाणी ि स्वतंत्र विद्यापीठाची स्थापना केली. त्या काळी स्त्रीशिक्षण, विधवा विवाह या गोष्टींना समाज विरोध करीत असे. पहिली पत्नी वारल्यानं पंडिता रमाबाईंच्या शारदा सदन या संस्थेतील एका विधवेशी पुनर्विवाह केला. आनंदीबाई कर्वे यांनी कर्व्यांना आयुष्यभर साथ दिली. 'भारता'। सर्वोच्च पदवी घेऊन भारतसरकारने त्यांचा गौरव केला. १०३ वर्षांचे दीर्घायुष्य लाभलेला हा महापुरुष ९ नोव्हेंबर १९६२ ला स्वर्गवासी झाला. 


→ मूल्ये 


• ध्येयनिष्ठा, त्याग, कठोर परिश्रम, मानवता, संवेदनशीलता, समता. अन्य घटना

 • कवी मोहंमद इक्बाल यांचा जन्म १८०० 


→ उपक्रम 

शासनाने महर्षी कर्वे यांचे टपाल तिकीट काढले आहे ते मिळवून वहीत चिकटवा. 

• 'हिमालयाची सावली' या नाटकाचे वाचन का 


समूहगान 

• जय भारता, जय भारता, जय भारती जनदेवता... 


→ सामान्यज्ञान 

पॅराशूटचा आराखडा लिओनार्डोद व्हिन्सी याने तयार केला. पॅराशूटचा पहिला यशस्वी प्रयोग १७९७ मध्ये केला. प तयार करून त्याचा यशस्वीपणे उपयोग करून दाखविण्याचा प्रथम प्रयोग आंद्रे गारनेरिन या फ्रेंच माणसाने केला. मराठी भाषेत पैराशूट वापर सैनिकांना छत्रीधारी सैनिक म्हणतात. पॅराशूटमधून उतरताना उतरण्याचा वेग गुरूत्वाकर्षणाने वाढू नये याची पूर्ण खबरदारी घेतली जाते. तीन उंचीवरून उडी मारताना जेवढा वेग शरीराला मिळेल तेवढा वेग राखण्याची रचना असते. विशिष्ट पध्दतीत पाय व शरीर जमिनीला टेकल्यास दुखाप होत नाही. पॅराशूटचा अत्याधुनिक वापर अवकाशयान उतरवताना त्याचा वेग नियंत्रित राखण्यासाठी केला जातो.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा