Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

सोमवार, १३ नोव्हेंबर, २०२३

11 नोव्हेंबर- दैनंदिन शालेय परिपाठ

 ११ नोव्हेंबर→ प्रार्थना 

ए मालिक तेरे बंदे हम, ऐसे हो हमारे करम...


श्लोक -

 कामया करूं तपाचे डोंगर । आणिक अपार व्रतदान । कासया जाऊ दिगंतरी । राहीन पंढरी पशुचाती ।। कासया उपवास निराहार पारणे । संत संग पेणे जन्मोजन्मी || 

 कासया विधिनिषेधाची मात । सुखाचा सांगात तुमचा माझा कशाला मोठे तप, व्रत आणि दान करावे. कशासाठी दूर दूर देशामध्ये जावे. पंढरपुरात प्राण्याच्या जातीमध्येच राहणार आहे. कशासाठी आहाररहीत पारायण करावे. मला संतांच्या सोबतीला जन्मोजन्मी घालावे; संताच्या विचारांचे आवरण करावे, कशाला विधी निषेधाचीन पार्क चोखोबा म्हणतात देवा, तुमची आणि माझी सुखाची, जन्मोजन्मीची सोबत आहे. 


→ चिंतन

 मजहब नहीं सिखाता आपसमें बैर रखना, हिंदी है हम, वतन है हिन्दोस्ताँ हमारा ।। - कवी इक्वाल कोणताही धर्म वैरभावनेची शिकवण देत नाही. प्रत्येकाला आपला धर्म प्रिय असतो. टिळा-टोपी, दाढी-शेंडी या गोष्टी म्हणजे धर्म न कर्तव्यबुध्दीने सदाचरण करणे म्हणजे धर्म. पण अडाणी माणसे बाह्य गोष्टींना महत्व देतात, त्यामुळे गैरसमज निर्माण होतात. भांडणे होतात. 'कुराण' ग्रंथाची प्रत पायदळी तुडविली जाणार नाही याची काळजी घ्या, असा छत्रपती शिवाजी महाराजांचा शिपायांस सक्त हुकूम होता. आपल्या धर्माप्रमाणेच दुसऱ्याच्या धर्मासही आदराची वागणूक दिली पाहिजे. बंधुभाव निर्माण होण्यासाठी अशा उदार व विशाल मनोवृत्तीची गरज आहे. 


→ कथाकथन 

- गाडगेबाबा - वन्हाड प्रांतातल्या शेणगाव या छोट्याशा खेड्यात संत गाडगेबाबांचा जन्म झाला. त्यांचे नाव होते डेबूजी झिंगराजी जानोरकर. ते परीट जातीचे होते. दारूच्या व्यसनामुळे बाबांच्या वडिलांचा अकाली मृत्यू झाला. वडील गेल्यावर निराधार झालेल्या डेबूजीला घेऊन आई आपल्या भावाच्या आश्रयाला आली. छोटा डेबूजी खूप कष्टाळू स्वभावाचा होता. आई त्याला नेहमी सांगायची, 'बाळ डेबू, आपल्याला आयु जर मानाने जगायचे असेल तर अतोनात कष्टाला पर्याय नाही. आपण आता तुझ्या मामाकडे राहतो आहोत. त्यांच्या शेतात आता खूप काम करायचे." आईचे हे बोलणे डेबूने मनात जपून ठेवले. त्याने कष्ट केले आणि मामाच्या शेताला ऐश्वर्य प्राप्त झाले, भरघोस पीक यायला लागले. छोट्या डेबुन मामाला कर्जमुक्त केले, तेव्हा आईला खूप आनंद झाला, आई त्याला म्हणू लागली, 'डेबू, तीर्थयात्रेला जायची आवश्यकता नाही. देव आपल्या हृदयात आहे. आपण करीत असलेल्या कष्टात देव आहे. ' हे तू नेहमीसाठी लक्षात ठेव.. छोटा डेबू मोठा होऊ लागला. कामे करताना तो गोड आवाजात देवाची भजने म्हणू लागला, तो नेहमी एकच भजन म्हणायचा, “गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला ।' डेबूच्या आईने मग डेबूचे लग्न कुंताबाई नावाच्या मुलीशी लावून दिले. डेबू आता संसाराला लागून स्वतःचे कष्टाचे आयुष्य छान फुलवेल असे तिला वाटले. परंतु डेबूच्या मनात वैराग्य दाटून आले. त्याला कशातच रस वाटेना आणि एक दिवस त्याने घराचा त्याग केला. देवाचा शोध घेत, दिवसभर काम करीत, रात्रीची भजने म्हणू लागला, कीर्तने करू लागला. त्याच्या हातात गाडगे असायचे. त्यात वाढलेल्या अन्नाचे तो सेवन करायचा, म्हणून लोक त्यांन गाडगेबाबा म्हणू लागले. निरक्षर समाजाला जागृत करण्याचे व्रत गाडगेबाबांनी घेतले होते. संवाद साधत ते कीर्तने करीत. सर्वसामान्य माणसाशी सतत संवाद साधणारा, प्रभावी वक्ता म्हणून गाडगेबाबांचा प्रसार झाला. लोकसेवा आणि दलित, गरीब लोकांचा उध्दार हे त्यांनी एखाद्या व्रतासारखे पर पाडले. मुलांनो, आईने कष्टाचे महत्व बाबांना लहानपणी पटवून दिले होते, एक संत तिने घडविला होता.


→ सुविचार -

  ● मऊ मेणाहूनी आम्ही विष्णूदास । कठिण वज्रासी भेदू ऐसे ।। भले तरी देऊ कासेची लंगोटी । नाठाळाचे माथा हाणू काठी ।। - संत तुकाराम. • कितीही संकटे आली तरी सन्मार्ग सोडीत नाही, तोच खरा पुरूष होय. • देव मातीच्या मूर्तीत नसून तो माणसात पहावा. • सेवाभाव हा लोकांना जिंकण्याचा एक यशस्वी मार्ग होय. 


→ दिनविशेष  • गुरु तेगबहादूर स्मृतिदिन- १६७५. हे शिखांचे नववे गुरू, गुरू हरगोविंद हे त्यांचे वडील. 'तेग' म्हणजे तलवार, ताकि तेगबहादुरांच्या बुध्दीची चमक होती. ते शूर व त्यागी होते. त्यांनी शिखांची संघटना मजबूत केली. पंजाबमधील बकाला या गावी ते राहत. स्वरक्षणाम ते सशस्त्र फौज बाळगत. तेव्हा बादशहा औरंगजेबाचे राज्य होते. गुरू तेगबहादूर यांची लोकप्रियता व संघटनाकौशल्य पाहून बादशहाने दिल्लीच्य चांदणी चौकात त्यांना उभे केले व मारेकऱ्यांकडून त्यांचा शिरच्छेद करण्यात आला. त्यांच्या मानेभोवती एक चिठ्ठी आढळली. 'मान दिली पण इ दिले नाही' असा एका ओळीचा मजकूर त्या चिठ्ठीत होता. त्या भीषण वधाने गुरू तेगबहादुरांचे सारे शिष्य हळहळले. ही घटना ११ नोव्हेंबर १६७५ च 


→ मूल्ये

 देशप्रेम, निष्ठा, निर्भयता.. -


 → अन्य घटना 

 • गायक अब्दुल करीमखाँ जन्मदिन - १८७२

 . • मौलाना अबुलकलम आझाद जन्मदिन - १८८८.

  • पहिले महायुद्ध समाप्त -१९१८

 . • पंढरपूरच्या विठ्ठलाचे मंदिर हरिजनांसाठी खुले - १९४७. 


→ उपक्रम -

 • शिखांच्या धर्मग्रंथास 'गुरुग्रंथसाहेब' म्हणतात; त्याची माहिती मिळवा. 

 • 'ग्रंथसाहेब' मध्ये संत नामदेवांचे अभंग आहेत, ते वाचा. समूहगान - 

 • मंगल देशा ! पवित्र देशा !! महाराष्ट्र देशा !!!... 


→ सामान्यज्ञान - 

• शीख धर्माचे संस्थापक गुरुनानक हे होत. शिखांचे एकूण १० धर्मगुरू आहेत. - गुरू नानकदेव, गुरू अंगददेव, गुरु अमरदास, गुरू रामदास, गुरू अर्जुनदास, गुरू हरगोविंद, गुरू हरिराय, गुरू हरकृष्ण, गुरू तेगबहादूर, गुरू गोविंदसिंह.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा