Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

सोमवार, १३ नोव्हेंबर, २०२३

14 नोव्हेंबर- दैनंदिन शालेय परिपाठ

 १४ नोव्हेंबर



प्रार्थना

 ज्योत से ज्योत जगात चलो, प्रेम की गंगा बहाते चलो.. → 

 

श्लोक

  - यद् जीव्यते क्षणमपि प्रथितं मनुष्यैः विज्ञान शौयं विभवार्यगुणैः समेतम् । तद् नाम जीवितमिह प्रवदन्ति तज्ज्ञाः काकोऽपि जीवति चिरं च बलिं च भुइक्ते ॥

  -  ज्ञान, पराक्रम, वैभव अशा श्रेष्ठ संस्कृतीच्या गुणांनी नटलेले माणसांचे जे जीवन ते क्षणभराचे असले तरी तेच खरे मानवी जीवन होय असे हणतात. नाहीतर कावळा देखील खूप वर्षे जगतो आणि माणसांनी आपल्या अन्नातून केवळ भूतदया किंवा धार्मिक रूडी म्हणून पुढे खाऊन आपले पोट भरतो, अडाणी, दुबळा, दरिद्री आणि कोणताही चांगला गुण अंगी नसलेला माणूस जगला काय आणि मेला काय जीवनाला अर्थ आहे. ज्ञानेश्वरांचे लौकिक जीवन अल्प, परंतु आपल्या कर्तृत्वाने ते अमर झाले. 

   


- चिंतन

- - कठोर परिश्रम हे सुयशाचे मुख्य गमक आहे. पंडित नेहरू दिवसाचे अठरा तास विविध कामात गढलेले असतान त्यांच्या विरंगुळ्याचा कार्यक्रम असे. 'रिकामे मन हा सैतानाचा कारखाना असतो.' अशी इंग्लिश भाषेत एक म्हण आहे. म्हणू किवा छंदात गुंतविले पाहिजे. एखादा शोध दिसायला छोटा असतो, पण त्यामागे शास्त्रज्ञांचे अथक कष्ट असतात होती. म्हणून सतत काही ध्येय ठरवून त्या दिशेने वाटचाल केली पाहिजे



.कथाकथन 

- बालदिन - 'माझ्या देहाची राख विमानातून उंचीवर, खूपखूप उंचीवर नेऊन तिथून सी खाली जमिनीवर विखरून टाकावी ती खाली पहेल शेतात पडेल, तिथे माझे भारतीय मजूर जमीन नांगरत असतील, मातीची ढेकळे फोडत असतील. विमानातून श मिळूनमिसळून मातीचेच एक अंग होवून जाईल." अशी आपली शेवटची इच्छा व्यक्त करणारे पंडित जवाहरलाल नेहरू स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान होत. जवाहरलाल नेहरूचा जन्म १४ नोव्हेंबर १८८९ रोजी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव मोतीलाल व आईचे नाव स्वरूप होते. क्लेप्रमाणे बाल जवाहरचे रूप, बुध्दी कलेकलेने वाढत होती. त्यांचे बालपण श्रीमतीमुळे लाडात, कौतुकात गेले. जवाहरचे कौतुक करताना आईवडिलांना दिवस पुरत नव्हता. त्याचे शिक्षण घरच्या घरी झाले. उच्च शिक्षणासाठी लंडनच्या हॅरो शाळेत प्रवेश घेतला. केंब्रिज येथे तीन वर्षे अभ्यास केल ब्रिजमध्ये असताना घडलेला हा प्रसंग आहे. सुट्टीच्या दिवशी जवाहरलाल आपल्या मित्राबरोबर नावे येथे सहलीला गेले होते. तिथे एक ताहात पोहायला उतरले. त्यांना अंदाज न आल्यामुळे वाहत्या पाण्याच्या प्रवाहात ते वाहत वाहत दूरवर गेले. थंड पाण्याने सग यांना हातपायही हलवता येत नव्हते. परंतु दैव बलवत्तर होते. त्यांच्या मित्राने त्यांना पाण्यातून बाहेर काढले आणि जव कधीही विसरू शकले नाही. इ.स. १९१२ साली बॅरिस्टर होऊन ते हिंदुस्थानात आले. सरकारी नोकरी न करता, आपण आपल्या बदलाचा कितीया वारसा पुढे चालविण्याचा त्यांनी निर्णय घेतला. अलाहाबादला वकिली सुरु केली. पण वकिलीत त्यांचे मन रमेना. हळूहळू ते काँग्रेसच्या कार्यात भाग घेऊ लागले. ते होमरूल लीगमध्ये सामील झाले. १९१६ साली त्यांचा विवाह कमलाबरोबर झाला. त्याच वर्षी लखनी कग्रिसमध्ये गा नाही गांधीजीची मते पटू लागली. गांधीजींच्या सहवासामुळे त्यांनी ऐषआरामी राहणीला रामराम ठोकला. ि असहकारितेच्या चळवळीत उडी घेतली. मोतीलाल व जवाहरलालांचे खुले विरोधाचे धोरण इंग्रज अधिकाऱ्यांना आवडले नाही स्वारी दो तुरुंगात टाकले. तुरुंगातून सुटल्यावर त्यांनी परदेशी मालाच्या बहिष्काराचा कार्यक्रम हाती घेतला. संपूर्ण स्वराज्यासाठी सायमन कमिशनला विरोध करण्याच्या कार्यक्रमात त्यांना लखनौला लाठीमार सहन करावा लागला. त्यांची देशप्रीती दिवसेंदिवस वाढतच होती. जवाहरलाल १९२९ साली अध्यक्ष झाले. अहमदनगरच्या किल्ल्यात असताना त्यांनी 'भारताचा शोध' हा ग्रंथ लिहिला. सुभाषबाबूंच्या आझाद हिंद सेनेतील खटला त्यांनी चालवला. १५ ऑगस्ट १९४७ साली आपला देश स्वतंत्र झाला. भारतमाता गुलामगिरीतून मुक्त झाली. आणि जवाहरलाल नेहरू भारताचे पंतप्रधान झाले. १७ वर्षे त्यांनी पंतप्रधानाची धुरा सांभाळली. देशाला आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठा मिळवून दिली. 'पंचशील' ही त्यांनी दिलेली देणगीच म्हणावी लागेल. १९५५ मध्ये राष्ट्रपतींनी त्यांना भारतरत्न ही पदवी बहाल केली. मुले हा त्यांचा आवडता विषय होता. लहान मुलांचा अवखळपणा त्यांच्या रक्तात होता. गुलाबाएवढेच मुलावर त्याचे प्रेम होते. मूल आणि फूल हा त्यांचा कौतुकाचा विषय होता. मुलांना मा वाळीत मुलं त्यांना 'चाचा' म्हणत. १४ नोव्हेंबरच्या दिवशी मुलांच्या मेळाव्यात ते स्वतला विसरून जात १४ साजरा होऊ लागला. २० मे १९६३ रोजी याचे उद्गाते, विज्ञानाचे उपालक, शांतीचे पुरते नवभारताचे शिल्पकार पति निधन झाले. अखंड धगधगत यज्ञकुंड शांत झाला. भारतातील एक कालखंडाचा सूर्यास्त झाला


सुविचार

. आवाजावरून नम्रता, उच्चारावरून विद्वत्ता व वर्तनावरून शील समजते - 



→ दिनविशेष

 म्हणून साऱ्या भारतभर साजरा केला जातो. वि.म. कुलकर्णी हे बालकांसाठी काम करणारे महाराष्ट्रीय. त्यांनी प्रथम कल्पना मांडली व १९५२ पासून बालदिन सुरू झाला. उभी हयात राजकारण, तुरुंगवास आणि स्वातंत्र्यासाठी झगडण्यात गेली असली तरी मुळात पंडित नेहरू अतिशय तरल अशा कवी हृदयाचे होते. निसर्ग आणि मुले यांचे विलक्षण प्रेम त्यांना होते. ते 'फुलामुलांचे नेहरू' म्हणून ओळखले जात. जगभरची मुले त्यांना नेहरूचाचा असे | लाडाने म्हणत. नेहरू राजकारणात नसते तर नक्कीच मुलांमध्ये अधिक रमले असते. सर्व मुलांना अधिकाधिक आनंदी बालपण लाभावे यासाठी शक्य असेल ते प्रयत्न ते करीत. दि. २७ मे १९६३ ला मुलांचे लाडके नेहरू सर्वांना सोडून गेले. 


→ मूल्ये - 

• देशप्रेम, विज्ञाननिष्ठा 


→ अन्य घटना -

 • क्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे जन्मदिन - १७९४ 

 • कर्मचारी राज्य विमा निगम स्थापना - १९ 

 • जवाहरलाल नेह | विद्यापीठाची स्थापना - १९६९. स्त्रीजागृती, स्त्रीशिक्षणाची तळमळ असणारे आदर्श शिक्षक आचार्य श्रीकृष्ण चंद्रभान ढाकरे स्मृतिदिन - २००४


 → उपक्रम 

 - • पं. नेहरूंनी आपल्या कन्येस लिहिलेले - 'इंदिरेस पत्र' हे पुस्तक वाचा.

 • पंडित नेहरूंचे बालकप्रेम व्यक्त करणारी गोष्ट वर्गाला सांग 


→ समूहगान

 • देश हमारा, धरती अपनी, हम धरती के लाल.....


 → सामान्यज्ञान -

  महाराष्ट्रातील जल-विद्युत केंद्रे : भिवपुरी कोयना 

  • खोपोली 

   • भिरा

    • भाटघर पोफळी राधानगरी 

    • भेल 

    • मुंबईत १९५२ साली एक सरकारी बालभवन सुरू झाले. हे भारतातील पहिले बालभवन होय. नेहरू स्मारक समितीच्या योजनेनुसार मुंबई | बालभवनाचे १९७७ मध्ये जवाहर बालभवनात रूपांतर झाले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा