Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

शुक्रवार, ३ नोव्हेंबर, २०२३

3 नोव्हेंबर- दैनंदिन शालेय परिपाठ

 ३ नोव्हेंबर→ प्रार्थना -

 ॐ असतो मा सद्गय तमसो मा ज्योतिर्गमय... 

 

→ श्लोक 

- तुमच्या चरणी जे काही आहे । ते सुख पाहे मज द्यावें । सर्वांशी विश्रांती तेथें मन ठेवी । तें सुख - शांति देई मज देवा ।। सर्वांभूती द्या संतांची ते सेवा । हेंचि देई देवा दुर्जे नको । चोखा म्हणे आणिक दुजे नको काही । जीव तुझें पायी देईन बळी ॥ 

- देवा, तुझ्या चरणाजवळ जे काही आहे, ते सुख तू मला द्यावे, सर्वांना तेथे शांती मिळते. त्या ठिकाणी माझे मन स्थिर राहू दे. ते सुख आणि शांती तुम्ही मला द्यावी. सर्व जीव मात्रांविषयी माझ्या मनात दया असू द्यावी व संताची सेवा माझ्या हातून घडू द्यावी, हेच मला तुम्ही द्यावे, दुसरे मला काहीही नको. चोखोबा म्हणतात, ईश्वरा याशिवाय काहीही मागणे नाही. मी माझा जीव तुझ्या चरणी अर्पण करतो. → चिंतन - 

विज्ञानाच्या जोरावर माणूस पक्ष्याप्रमाणे आकाशात आणि माशाप्रमाणे पाण्यामध्ये वावरू शकला तरच ते विज्ञान श्रेष्ठ - डॉ.एस.राधाकृष्णन् आजचे युग विज्ञानाचे युग आहे. स्टोव्ह, गॅस, विजेचे दिवे, आगपेटी, बस, मोटारी, रेल्वे, विमाने आदि असंख्य गोष्टींच्या गराड्यात आज माणसे वावरतात. देवी, प्लेग, विषमज्वर सारख्या साथी आज नामशेष झाल्या आहेत. खते, बी-बियाणे, कृत्रिम धागे आदिंनी तर मानवी जीवनात सुबत्ता आणली. अंतराळात उपग्रह पाठवून विज्ञान अंतराळावरही स्वारी करू पाहात आहे. दूरदर्शनवरच्या विविध वाहिन्या (चॅनेल्स) वाढताहेत. हे विज्ञानाचेच चमत्कार होत. 'विज्ञानानेच मनुष्या आले श्रेष्ठत्व या जगामाजी.'


कथाकथन -

 मन चंगा तो कठौती में गंगा - संत शिरोमणी गुरू रविदास हे संतकवी म्हणून प्रसिध्द आहेत. ते वाराणशीत काशीत गंगाकिनार | झोपडीत आपल्या पत्नीसह रहायचे व वहाणा शिवून जे काही मिळे त्यावर ते व त्यांचे कुटुंब उपजीविका करीत. कामातून सवड मिळाली तर संतांच्या सहवासात आपला वेळ घालवी. एक दिवस एक साधु रैदासांना भेटायला आला. त्याने आपल्या झोळीतून एक दगड काढला व रैदासाला म्हणाला, परीस आहे. याला लोखंड लावले तर त्या लोखंडाचे सोने बनते." असे म्हणून त्याने लोखंडाचा एक तुकडा काढून परिसाला लावला. तो काय? स बनले होते! रैदास म्हणाले, "महाराज ! आपली दुर्लभ वस्तू आपल्या जवळच ठेवा. मला नको. मी कुणाकडूनही मदत घेत नाही. स्वतः मेहनत करून मिळते त्यातच मला समाधान वाटते. त्यातच मी माझा संसार चालवितो.' साधूने अत्यंत प्रेमाने सांगितले, "माणसाने आपले जीवन सुखासमाधारण घालवावे. तुमची ही झोपडीच पहा ना! काय परिस्थिती झाली आहे. तिची?” रैदास म्हणाले, "माझ्या याच झोपडीत मी सुखासमाधानाने राह आहे. घाम गाळून पैसे मिळवून खातो, त्यात आनंद मानतो. तेच सत्य धन आहे." साधूने खूप आग्रह केला. पण रैदासाने मुळीच मान्य केले नाही. से म्हणाले, "आपण हा परीस द्यायचाच असेल तर तो राजेसाहेबांना द्या. ते फार गरीब आहेत. त्यांना नेहमी खूप पैसे लागत असतात. किंवा एखाद्या सद सावकाराला द्या. जो रात्रंदिवस तळमळत राहतो." रैदास पुढे जास्त काही बोलले नाही. आपल्या वहाणा दुरूस्तीच्या कामात मग्न झाले. साधु होऊन निघून गेला. याच रैदासाच्या घरासमोरून एक ब्राह्मण गंगास्नानासाठी नदीवर चालला होता. तो रैदासाला म्हणाला, “माझ्या बरोबर गंगास्नानाल चला. " रैदास म्हणाले, 'मी काही गंगास्नानाला येत नाही. पण मी देतो ती वस्तु गंगामातेला दे.' म्हणून त्याने एक सुपारी ब्राह्मणाच्या हातावर ठेवली ब्राम्हण मनात हसला नि सुपारी घेऊन गंगेवर गेला. गंगास्नान केले व मातेला म्हणाला, 'रैदासाने ही सुपारी तुला भेट दिली आहे' पाहतो तो काय? नदीतून एक हात वर आला आणि त्या हाताने सुपारी घेतली. गंगामाता म्हणाली, 'माझी ही भेट रैदासाला दे.' त्या हातात एक रत्नकंकण होते. ब्राह्मणात मोह निर्माण झाला. त्याने ते कंकण आपल्या पत्नीला दिले. पत्नी म्हणाली, "हे एकच कंकण मला काय कामाचे ? राजाला विका आणि पैसे घेऊन या ब्राह्मणाने ते कंकण राजाला दिले. राजाने ते राणीला दिले. पण त्या कंकणाच्या जोडीचे दुसरे कंकण तिच्या खजिन्यातही मिळाले नाही. राणी म्हणाली "त्या ब्राह्मणाला आणखी पैसा द्या आणि त्याच्याजवळून दुसरे कंकण विकत आणा." राजाचे दूत गेले नि ब्राह्मणाला पकडून घेऊन आले. ब्राह्मण रैदासाकडे नेण्यास सांगितले. राजदूत त्याला रैदासाकडे घेऊन गेले. ब्राह्मणाने रैदासाला हकीकत सांगितली. रैदास समजले. त्यांनी गंगामातेची ब्राह्मणान चुकीबद्दल क्षमा मागितली व दुसरे तसलेच कंकण तिच्याकडे मागितले. ती म्हणाली, 'तुझ्या पाण्याच्या पडघ्यातच ते ठेवलेले आहे. त्या ब्राह्मणाला दे पुन्हा अशा मोहात पडून कधी खोटे बोलू नकोस असे त्याला सांग.' रैदासाला कळून चुकले की रोज गंगास्नान केले तरी मन स्वच्छ होत नाही. मन वासनाविकार मोह यांना बळी पडत असेल तर अशा गंगास्नानाचा काही उपयोग नाही. रैदासाने त्या ब्राह्मणाला हे सारे नीट समजावून सांगितले व त्यात म्हणाले, 'मन चंगा तो कठौती में गंगा' मन स्वच्छ निर्मल असेल तर हया लाकडांच्या पडघ्यातही (कठौतामें) गंगा असते. त्या पडघ्यात हात घालून ग मातेला नमस्कार करून रत्नकंकण काढून घे व राजाला नेऊन दे. म्हणजे राणी प्रसन्न होऊन जे काही देईल ते घेऊन सुखाने संसार कर.'→ सुविचार 

-• जातीने कोणी उच्च-नीच ठरत नाही, तर तो कर्माने ठरत असतो - संत रविदास,


 → दिनविशेष - 

 • रॉऊक्स पेरि स्मृतिदिन - १९३३. रॉऊक्स पेरि हा फ्रेंच सूक्ष्म जंतुशास्त्रज्ञ. जन्म दि. १७ डिसेंबर १८५३. वैद्यकीय शिक्षण झाल्यावर हा पॅरिस विद्यापीठातील वैद्यकीय शाखेत संशोधन करू लागला. पुढे पाश्चर इन्स्टिट्युटचा हा प्रमुख बनला. आधुनिक काळातील Se Therapy अभयतारक्त रसोपचाराचा, (रक्तातील घटकांचे प्रमाण योग्य ठेवून जखम झाल्यावर खपली धरेपर्यंतची प्रक्रिया होण्यासंबंधी) हा जनवर | मानला जातो. याने यर्सिन या संशोधकाबरोबर घटसर्पाचे जंतू शोधण्यासाठी प्रयोग केले. पाश्चरबरोबर अँथ्रयर्सिचेही संशोधन केले. मेकिनकॉफ याच्यावरत कॉलरा व क्षय या रोगाचे जंतू शोधण्याचे काम केले. याचे सर्वच संशोधन अनेक रोग्यांना जीवनदायी ठरले आहे. 


→ मूल्ये -

 • देशप्रेम, साहस 


→ अन्य घटना - 

• हरिलाल जे. काकानिया - स्वतंत्र भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे पहिले न्यायाधीश जन्मदिन - १८९०

 • स्पुटनिक - २ या रशियन यानातून लायका नावाची एक कुत्री अंतरिक्षात पाठविली. - १९५७. - - 


→ उपक्रम - 

• महाराष्ट्रातील दहा प्रसिध्द गडांची नावे लिहा व गडाचे वर्णन लिहा:

 • रक्ताची खपली धरण्याची प्रक्रिया माहिती करून द्यावे 


→ समूहगान

 • बलसागर भारत होवो, विश्वात शोभुनी राहो.... 

 

→ सामान्यज्ञान -

 ० बांबू ही गवत कुळातील अत्यंत उपयुक्त वनस्पती असून तिला गरिबांचा साग म्हटले जाते. बांबूच्या झाडाचे आयुष्य ३० ते १० वर्षे असते. बांबूचा उपयोग फर्निचर, झोपड्या, घरबांधणीची कामे, शेतीची अवजारे, घरगुती कामाच्या वस्तू, कुंपण, खाद्य, जलवाहिन्या इ. विशे प्रकारे केला जातो. 

 • पेंग्विन - हा न उडणारा समुद्र पक्षी आहे. तो दक्षिण ध्रुव प्रदेशात राहतो. समुद्र आणि समुद्रकिनारा ही पेंग्विनची निवासस्था होत. त्यांच्या एकूण १७ जातीपैकी 'किंग पेग्विन' व 'एंपरर पेंग्विन' सुप्रसिध्द आहेत. एंपरर पेंग्विन सर्वात मोठा आहे. बहुतेक सगळ्या जातींमध्येह व पोट पांढरे किंवा पिवळसर आणि पाठ काळी अथवा निळसर असते. त्यांचा आवाज मोठा व कर्कश असतो.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा