Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

शुक्रवार, ३ नोव्हेंबर, २०२३

15 नोव्हेंबर- दैनंदिन शालेय परिपाठ

 १५ नोव्हेंबर



→ प्रार्थना

 सर्वात्मका शिव सुंदरा, स्वीकार या अभिवादना... 

 

→ श्लोक

 त्रैलोक्य वैभव ओवाळोनी बहुतांपरी । नाम सुखे घ्यावें विठोबाचें ॥। आणि साधने आहेत बहुतांपरी । नामाची ती सरी न पवती ।। म्हणोनी सुलभ विठ्ठ एक नाम । गातां नाचतां प्रेमें मुक्ती तथा ।। चोखा म्हणे माझा अनुभव उघडा । भवभय पीडा येणें वारे ।। 

 - संत चोखोबा, या तीनही लोकांतील ऐश्वर्य ओवाळून टाकावे आणि आनंदाने विठोबाचे नामस्मरण करावे. अनेक इतर साधने जरी असली तरी सुध् बरोबरी इतर कोणत्याही साधनांनी होत नाही. म्हणूनच "विठ्ठल" हे नाव एक सरळ, साधे व सोपे आहे. हे नाव प्रेमभावे गाऊन, नाचून माणसाला मोक्ष मिळतो. चोखोबा म्हणतात, ही माझी प्रत्यक्ष अनुभूति असून प्रपंचामधील होणारे दुःख यामुळे नाश पावतात.



 चिंतन 

 - पवित्र तो देश । पावन तो देश । जेथे हरीचे हात । जन्मा येती - संत तुकाराम भारत ही साधूसंतांची भूमी आहे. तुलसीदासापासून ते तुकडोजी महाराजांपर्यंत आणि ज्ञानोबा, तुकोबांपासून आचार्य विनोबांपर्यंत अनेक संत त्यांनी आपल्या लेखणीने आणि वाणीने मनुष्याचे जीवन सुखी-समाधानी व्हावे असा प्रयत्न केला. दीनदुबळ्या माणसांवरच नव्हे तर सर्व प्राणिमात्राव करण्याची साधुसंतांनी शिकवण दिली. खवळलेल्या समुद्रात जहाजांना मार्गदर्शन करण्याचे काम दीपस्तंभ करतात. खवळलेल्या समुद्रात जहाजांना मा करण्याचे काम दीपस्तंभ करतात. ते दीपस्तंभ धोका टाळून सुखरूप कसे जावे हे दाखवितात, साधुसंतांचे कार्यही असेच 

करण्याचे काम दीपस्तंभ करतात. ते दोपस्तंभ धोका टाळून सुखरूप कसे जावे हे दाखवितात, साधुसंतांचे कार्यही असेच असते. 



→ कथाकथन

 'गुरुनानक' गुरुनानकांचा जन्म पंजाबमधील लाहोर जिल्हयातील 'तलवंडी' येथे कार्तिक पोर्णिमा १४६९ साली झाला. मेहता कल्याणदास क्षत्रिय होते. आई तृप्ता, बहिण नानकी प्रेमळ होती. बालक नानक फार बुध्दिमान होते. पण शाळेत अभ्यासाकडे त्याच | अध्यात्मविषयक जन्मजात त्यांना ज्ञान होते. परंतु त्यांचे संसारात लक्ष नव्हते. त्यांचे सुलक्षणी बरोबर लग्न होऊन, श्रीचंद्र व लक्ष्मीचंद्र होती. ईश्वरभक्तीकडे त्यांचा ओढा होता. वडिलांनी दिलेल्या लक्ष रूपयाचे त्यांनी साधुना जेवण दिले. आपल्या कमाईच्या मिळालेल्या गरिबांना धान्य वाटप करीत. दीपालपूरच्या एका खेड्यातील एका कुष्ठरोग्याची भाऊ म्हणून सेवा केली. ते अत्यंत दयाळू होते. आई-वडील. मुले यांच्या विरोधाला न जुमानता त्यांनी गृहत्याग केला. देशभ्रमण करीत ते एमानबादला गेले. श्रीमंताकडे न जाता गरीब सुताराच्या घरची भाकरी खाल्ली. गुरूनानक कबीरासारेखच होते. एक अकाल सत्त्वरूप प्रभू आहे आणि बाकी सर्व फंद आहेत, असा त्यांचा मुख्य उपदेश होता. ते मूर्ति विरोधी होते. त्यांच्या जीवनातील मुख्य कार्य हिंदू व मुसलमान यामधील 'दरी' नाहीशी करणे हे होते. त्यांचा उपदेश सामान्य लोकांना आ आणता यावा असा मध्यमार्गाचा होता, कठोर तपश्चर्या व कर्मकांडाचा त्यांनी विरोध केला होता. ईश्वर एकच आहे. तो मंदिरात, मशिदीत सर्वत्र असतो. ईश्वराच्या नजरेत सर्व माणसे समान आहेत. सर्वांच्या जन्माची आणि मृत्यूची तऱ्हा एकच आहे. सर्वांचे रक्त लाल रंगाचे आहे. मनापासून भक्ती करा या वचनाचा त्यांनी अनेक देशात प्रचार व प्रसार केला. ते पॅलेस्टईन, इराक, आफ्रिका, अफगाणिस्तान, चीन इ. देशात गेले. धर्म हा एकेश्वरवादी धर्म आहे. त्यांचा त्यांनी जगभर प्रसार केला. ना कोई हिंदु ना कोई मुसलमान सर्व मानवजात एक असून आपण एका परमेश्व लेकरे आहोत, असा संदेश त्यांनी दिला. सर्वधर्माचे सार पवित्र गुरूग्रंथ साहेबात आढळते. गुरूग्रंथ साहिबात १५ संत वचनांचा आदरपूर्वक समत केलेला आहे. ज्यात संत नामदेव, संत त्रिलोकचंद संत रामानंद, संत पीपा, संत परमानंद, संत कबीर, संत रवीदास, शेख फरीद, संत जयदेव, स धनाजी, सुरदास, भिकनजी, साधना, संत बैनी आदिंचा समावेश आहे. मुखबानी म्हणून गुरूग्रंथ साहिब हा मौलिक ग्रंथ असून त्यात प्रेम, सद समता, शांती आदी अनमोल वचनांचा समावेश आहे. 'गुरुग्रंथ साहिब' या धर्म ग्रंथामध्ये गुरु रविदासांची ४० पदे आहेत. भारत ही साधूताची भूमी आहे. तुलसीदासापासून ते तुकडोजी महाराजांपर्यंत आणि म गुरुनानकांनी दिलेली शिकवण म्हणजे आत्मिक म्हणजे आत्म्याची आठवण कर, फालतू गोष्टी विसरून जा, आपल्या जातीचा गर्व करू नको अनेक विकारांना जन्म देतो, गुरुंची आज्ञा पाळा, स्त्रियांची निंदा करू नका, महान व्यक्तांना आणि संतांना त्यांनीच जन्म दिलेला आहे. त माणूस वा धर्म पापी नसतो, जीवन मुळातच पापमय नमते, या जगात कोणतीही जात उवा नाँच नाही, अशी शिकवण देणारे ते टिक मानवतेचे पुजारी होते.



सुविचार 

 • दया हाच कापूस, संतोष हेच सूत व संयम हीच त्या यज्ञोपवीताची - जानव्याची ब्रह्मगाठ आहे, असे जानवे की नाही, कधी खराब होत नाही, कधी नष्टही होत नाही - गुरुनानक. • जगातील सर्वजाती एक असून नम्रता, बघुमा पावित्र्य, ईश्वरभक्ती, प्रेम, औदार्य, एकात्मभाव ही सर्व धर्माची शिकवण आहे.


 → दिनविशेष 

 • विनोभा भावे स्मृतिदिन - १९८२. आचार्य विनायक नरहर भावे हे विनोबा यांचे नाव. ते नाव महात्मा गांधींनीच त्या होते. 'शंकराचार्य', महात्मा गांधी आणि प्रेमळ आई यांच्या शिकवणीमुले माझी जडणघडण झाली. असे विनोबा म्हणत, मराठी, इंग्लिश, लटिन, संस्कृत आदी अनेक भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते. गीता, उपनिषदे, कुराण, बायबल हे धर्मग्रंथ तर त्यांचे तोंडपाठ होते. गीताई, गीतायन्य मधुकर हे त्यांचे ग्रंथ कमालीचे लोकप्रिय ठरले. 'खरा नाश म्हणजे बुध्दीचा नाश', 'देतो तो देव व खातो तो राक्षस', 'संस्था नको व्यवस्था हव सूत्रबध्द बोलण्यात त्यांचा हातखंडा होता. भूदान चळवळीचे ते प्रवर्तक होते. सोपे मराठी लिहिणारा लेखक विनोबाखेरीज दुसरा कोणी १५ नोव्हें. १९८२ रोजी आचार्य विनोबांचे निधन झाले. 'महात्मा गांधीजींचा आवडता सत्याग्रही' अशा शब्दात भारताने त्यांना श्रध्दांजली वाि


 → मूल्ये

  • ध्येनिष्ठा, बुध्दिप्रामाण्य, सर्वधर्मसमभाव.


 → अन्य घटना -

  • महान क्रांतीकारक शहिद बिरसा मुंडा जन्मदिन - १८७५.

   • नारायण हरी आपटे स्मृतिदिन -१९७१. 


→ उपक्रम -

 • गीताई वाचून तिचा अर्थ समजून सांगा. • विनोबांनी लिहिलेल्या काही पुस्तकांची नावे व माहिती सांगा.

 

 समूहगान 

 • ह्या भूमीचे पुत्र आम्ही, उंचवू देशाची शान... 


सामान्यज्ञान

• भारताचे राष्ट्रीय पंचांग २२ मार्च १९५७ ला सुरू आहे. तो दिवस नव्या पंचागांप्रमाणे १ चैत्र १८७९ असा समजण्यात या पंचांगाप्रमाणे ज्या ज्या वर्षी इंग्रजी लीप वर्षे येईल त्या त्या वर्षी चैत्र महिन्याचे ३० ऐवजी ३१ दिवस धरण्यात येतात. तसेच दिवसांची करताना मध्यरात्रीपासून मध्यरात्रीपर्यंत एक दिवस मानला जातो.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा