Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

सोमवार, ६ नोव्हेंबर, २०२३

7 नोव्हेंबर- दैनंदिन शालेय परिपाठ

 ७ नोव्हेंबरप्रार्थना

 देवा तुझे किती सुंदर आकाश, सुंदर प्रकाश सूर्य देतो....

 

 → श्लोक 

 बरे झाले येथे आलोसे सायासें । सुखदुःख लेशे भोगानिया ।। मागिला लागाचें केलेसे खंडण । तेणें समाधान वृत्ति होय ।।

  एकसरें मन ठेविले बांधोनी । निवांत चरणी तुमचीया ।। चोखा म्हणे काम क्रोध तोडियले । येर तेही केले देशघडी ।। - संत चोखोबा मानवी देह प्राप्त होण्यास अतोनात प्रयत्न करावे लागतात. पुण्य व पापाचे मिळणारे फळ सुख व दुःख भोगून मानवी जन्मास आलो आहे. | जन्माचे देणे होते. ते खोडून काढले आहे. त्यामुळे माझी वृत्ती समाधानी झाली आहे. तुमच्या पायाशी निवांतपणे मी माझे मन गुंतून ठेवले आहे. म्हणतात, मी माझ्यामधील काम क्रोधादि रिपु नष्ट करून त्यांना बाहेर हाकलून दिले आहे. 

  

→ चिंतन-

 साध्याही विषयात आशय कधी मोठा किती आढळे. नित्याच्या अवलोकने जन परी होती पहा आंधळे - केशवसुत. साध्या साध्या गोष्टींमध्ये मोठा अर्थ भरलेला असतो. परंतु अती परिचयामुळे आपल्या अवतीभवतीच्या वस्तू, घटना आपणास टाकाऊ त्यांच्याकडे आपण दुर्लक्ष करतो. त्या गोष्टीही जीवनात आनंद निर्माण करू शकतात, हे आपण लक्षात घेत नाही. डोळस असून माणसे आंधळ वागतात. सोधपणातही सौंदर्य असते. त्यासाठी एक दृष्टी हवी, उमदे मन हवे, रसिकता हवी, गुण हेरण्याची वृत्ती हवी. ती असेल तर सर्वत्र आनंदहा अनुभव येईल. → कथाकथन 

- भगवान युध्दाची शिकवण कोलीय विभागात सज्जनेत नावाचे उपनगर होते. भगवान बुध्द त्या भागात एक राजपुत्र असूनही राजप्रसाद आणि सौंदर्यशाली पत्नी आणि सुकुमार पुत्र राहुल, या साऱ्या वैभवाचा त्याने त्याग केला होता. तो स्वतः सुलक्षणांनी युक्त मदनाचा पुतळा होता. 'बहुजन हिताय, बहुजन सुखाय' ही घोषणा करून तो मानवजातीच्या कल्याणासाठी, मानवाच्या म राजवाड्या बाहेर पडला होता. लोकांत त्याच्याविषयी कमालीचे कुतूहल होते. या दुःखमय जगात सुखाचा मार्ग दाखविणारा घोर तत्वज्ञ म्हणून उपदेशाची लोकांना जिज्ञासा होती. कोलीय हा त्या भागचा प्रमुख नगरशेठ होता. त्याच्या कन्येनेच भगवन बुध्दांना भोजनासाठी बोलावले हो ""काही सुखासीन जीवन तयारी करून झाली होती. सारेजण बुध्दाची वाट पाहात होते. बुध्ट आले. आसनस्थ झाले. खाली मान घालून त्यांनी भोजन संपविले. सुप्रवास । कन्येचे नाव होते. भगवान भोजनोत्तर उपदेश-ज्ञान करीत. कृतज्ञता व्यक्त करीत. भगवान म्हणाले, 'भोजनानंतर यजमानाने चार पदार्थाचे दार असते. काही जीवनाचे दान करतात.' 'दुसर दान? "काही जाती (बंधने) झुगारून देतात. ''तिसरं कोणतं दान? देतात." "चौथ दान?" "काही आपल्या सामर्थ्य-संपन्नतेचं (बलाच) दान करतात. 'आयुष्यदान कशा प्रकारचं असतं, महामनाः" "अ करणारी उपासिका बनते. दिव्या व उदात्त जीवनाची अधिकारी बनते. "सुखदान म्हणजे काय?" "साधी राहणी जगणे. त्यामुळे उपासिका ही दात्री मानवी हक्क व कर्तव्याची अधिकारी होते. 'जीवनदान, वर्णदान (जातीबंधन तोडणे), सामद व सुखदान' ही सर्व दाने जिने भोजनदान दिले तीच व्यक्ती देऊ शकते. " भगवान बुध्दांनी सुप्रवासाला सांगितले. तिने भगवतांना अभिवादन केले, त मनाने ती आपल्या घरात गेली. संपूर्ण विचाराती बौध्द भिक्षु संघात सामील झाली. विवेकाने केलेली एक गोष्ट, धर्म भावनेने केलेली एक कृती भरलेला एक शब्द, आत्मचिंतन करून केलेली कृती, ही अज्ञानमूलक अशा शेकडो गोष्टीपेक्षा महत्वाची असते. अशा कृतीने मनःशांती मिळ प्रक्षोभ दूर होतो. विकारवासनांचे थैमान थांबते. मनातील दुःख, अस्वस्थता, बेचैनी दूर होते. 'धम्मपद' म्हणजे भगवान बुध्दाने गुंफलेली एक मुक्ि माला आहे. व पवित्र फुलांचा गुच्छ आहे. कर्मयोग, साधना आणि निष्ठा या तीन योगांचा समन्वय आहे. निर्वरता, सुशील (आचरण), संतसंगती सर्वांना समान आदराने वागविणे, श्रध्दापूर्ण तत्त्व चिंतन करणे, कर्मात प्राविण्य दाखविणे व नीतीमान सदाचरण या विषयावर भगवान बुध्दांनी खूप ि केले. ते नुसते चिंतन नव्हते तर साधना करून त्याची अनुभूती त्यांनी स्वतः घेतली. ती साधना आपल्या श्रध्दावान भक्तांना शिकविली. त्यांचे सर शीलवंत बनले. सदाचरणी व मनःशांती प्राप्त झालेले बनले. क्रोध, मत्सर, लोभ, प्रेम (मोहा), द्वेष अहंकारविरहित बनले. निर्वाणपदाला जन्ममृत्यूच्या फेन्यातून सुटले. म्हणून बुध्दाने केलेली ही मानसिक परिवर्तनाची क्रांती 'धर्मचक्र' परिवर्तन ठरले.

 

 → सुविचार 

 • या जगातील द्वेषपूर्ण कृत्ये कधीच थांबत नाहीत, प्रेमानेच ती थांबतात हा प्राचीन सिध्दांत आहे. - गौतम बुध्द,→ दिनविशेष

 • कवी केशवसुत यांचा स्मृतिदिन - १९०५ आधुनिक मराठी कवितेचे प्रवर्तक कृष्णाजी केशव दामले हे केशव नावाने कविता लिहित. मालगुंडला ७ ऑक्टोबर १८६६ साली त्यांचा जन्म झाला. विद्यार्थिदशेतच त्यांनी काव्यलेखनास प्रारंभ केला. काव्य है जीवनध्येय असल्याने स्वाभाविकपणे त्यांनी काव्य रचनेच्या नव्या वाटा चोखाळल्या. मराठी कवितेचा विषय, आशय, रचना, कल्पना यात त्यांनी वि प्रयोग केले. मराठी कवितेस नवे वळण लावले. नवा शिपाई, तुतारी, झपूर्झा, आम्ही कोण ? स्फूर्ती इत्यादि कविता आजही लोकप्रिय केशवसुतांना स्वतःच्या कवित्वशक्तीचा अभिमान होता. विचारांचा ठामपणा योग्य शब्दांनी कवितेत व्यक्त करण्यात केशवसुतांचा पुढच्या काळातील कवींच्या काव्यावर केशवसुतांची छाप पडली. इंग्रजी काव्याच्या चिंतन मननातून त्यांनी मराठी कवितेला आत्माविष्काराचे थे। क्रांतिकारक वळण दिले. फक्त ३९ वर्षांच्या आयुष्यात केशवसुतांनी मराठी कविता दालन आपल्या कवितांनी समृध्द केले. प्रामुख्याने सामाजिक विषयांवर त्यांनी काव्यलेखन केले. त्यांच्या सामाजिक विचारसरणीची मुख्य तत्वे स्वातंत्र्य, समता, बंधुता व विशाल मानवतावाद ही आहेत. नोचेंग १९०५ रोजी त्यांचे निधन बळीस झाले. 


→ मूल्ये - 

• वाङ्मयप्रेम, मानवता


 → अन्य घटना 

 • सी. व्ही. रामन यांचा जन्म १८८८

  • मादाम मेरी क्युरी यांचा रेडियमचा शोध १८९८

   • रशियन राज्यक्रांती - १९१७ 

  • सत्यशोधक केशवराव विचारे स्मृतीदिन १९५७


  → उपक्रम

  • केशवसुतांच्या कविता पाठ करा.

   • ऊर्मिला ठाकरे लिखित 'ऊर्मी' काव्यसंग्रह व चारोळी संग्रहांचे वाचन करा. - 


→ समूहगान

 • धरतीची आम्ही लेकरं, भाग्यवान धरतीची आम्ही लेकरं... 


→ सामान्यज्ञान 

• भारतातील सर्वात मोठा आणि जगातील तिसऱ्या क्रमांकाचा मानवनिर्मित जलाशय नागार्जुनसागर हा आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा