Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

गुरुवार, २६ ऑक्टोबर, २०२३

अब्दुल कलाम यांची माहिती

अब्दुल कलाम यांची माहिती

Apj abdul kalam

भारताला घडविण्‍यात व  जगात ख-या अर्थाने व सन्‍मानाने, आत्‍मनिर्भर बनविणा-या काही मोजक्‍या व्‍यक्‍तींच्‍या यादीतील हे एक नाव, भारतातील प्रत्‍येक पिढीला प्रेरीत करणारे त्‍यांचे जीवन व कार्य आहे. म्‍हणूनच डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्याविषयी भारतातील प्रत्येक नागरिकाच्‍या मनात त्यांच्याप्रती आज ही भरपूर आदर आहे

अवुल पाकीर जैनुलाब्दीन तथा एपीजे अब्दुल कलाम हे एक भारतीय एरोस्पेस शास्त्रज्ञ होते. तसेच त्यांनी २००२ ते २००७ या काळात भारताचे अकरा वे राष्ट्रपती म्हणून देखील काम केले होते. कलाम हे तामिळनाडूच्या रामेश्वरम येथे वाढले होते, व  तेथेच त्यांनी भौतिकशास्त्र व  एरोस्पेस अभियांत्रिकीचा अभ्यास केला.

त्यांचा 15 October 1931, रामेश्वरम येथे झाला. 


डॉ. अब्दुल कलाम यांचे प्रारंभिक जीवन:-

त्यांचे वडील रामेश्वरमला येणाऱ्या यात्रेकरूंना होडीतून धनुष्कोडीला नेण्या-आण करण्याचा  व्यवसाय करीत. डॉ. अब्दुल कलाम यांनी आपले शालेय शिक्षण रामनाथपुरम्‌ला पूर्ण केले. लहान वयातच वडिलांचे छत्र गमावल्याने डॉ. अब्दुल कलाम गावात वर्तमानपत्रे विकून, तसेच अन्य लहान मोठी कामे करून पैसे कमवीत व घरी मदत करीत. त्यांचे बालपण खूप कष्टात गेले. शाळेत असताना गणिताची त्यांना विशेष आवड लागली. नंतर ते तिरुचिरापल्ली येथे सेंट जोसेफ कॉलेजमध्ये दाखल झाले होते . तेथे बिएस सी. केल्यानंतर  त्यांनी ‘मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीत प्रवेश घेतला. प्रवेशासाठी लागणारे पैसेही त्यांच्याकडे नव्हते. त्यामुळे  बहिणीने स्वतःचे दागिने गहाण ठेवून त्यांना पैसे दिले . या संस्थेतून एरॉनॉटिक्सचा डिप्लोमा पूर्ण केल्यानंतर, त्यांनी अमेरिकेतील ‘नासा’ या प्रसिद्ध संशोधन संस्थेत 4 महिने एरोस्पेस टेक्नॉलॉजीचे प्रशिक्षण घेतले.

डॉक्टर अब्दुल कलाम यांचे प्राथमिक शिक्षण हे रामेश्वरम या गावात असलेल्या सरकारी शाळेत पूर्ण झाले, त्यानंतर त्यांनी पुढील शिक्षणाचा निर्णय घेतला व रामनाथपुरम येथील हायस्कूलमध्ये त्यांनी प्रवेश घेतल्यानंतर तिरुचिरापल्ली येथील सेंट जोसेफ महाविद्यालयात कलामांनी BSC या कोर्स साठी प्रवेश निश्चित केला.

पण BSC चे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना असे वाटले की ज्या क्षेत्रामध्ये आपल्याला रुची आहे त्या क्षेत्रात पुढे आपले करिअर घडवण्यास BSC  हा कोर्स आपल्यासाठी काही उपयुक्त नाही, त्यामुळे त्यांनी अभियांत्रिकीचे शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला व त्यांनी मद्रास टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट मध्ये प्रवेश घेऊन आपले अभियांत्रिकीचे देखील शिक्षण पूर्ण केले. मृत्यूची तारीख: २७ जुलै, २०१५

मृत्यूस्थळ: shilong

शिक्षण :

 ■मिसाइल मैन कोणाला म्हणतात ?

एपीजे अब्दुल कलाम यांना म्हणतात. संज्ञा, अनेकवचनी मिसाइल•मेन. एक व्यक्ती जी मार्गदर्शित क्षेपणास्त्रे तयार करते, डिझाइन करते, लॉन्च करते किंवा ऑपरेट करते . एक तंत्रज्ञ किंवा शास्त्रज्ञ ज्यांचे कार्य 

जगातील पहिला मिसाईल मॅन कोण आहे?

म्हैसूर रॉकेट भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांनी बंगळुरू येथील टिपू सुलतान शहीद स्मृती व्याख्यानात (३० नोव्हेंबर १९९१) टिपू सुलतानला जगातील पहिल्या युद्ध रॉकेटचा शोधक संबोधले. क्षेपणास्त्राशी संबंधित आहे.

माजी राष्ट्रपती, भारतरत्न, ज्येष्ठ शास्त्रज्ञ, अभ्यासक, आपल्या विचारांनी तरुण पिढीला प्रेरित करणार्‍या  अशा अनेक विशेषणांनी डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचा गौरव केला जात येत असला, तरी त्यांची ओळख होती, ती म्हणजे ‘मिसाइल मॅन’ म्हणून! भारताला संरक्षणसिद्ध करण्यासाठी राबविण्यात आलेल्या क्षेपणास्त्र विकासाचा कार्यक्रम त्यांच्याच नेतृत्वाखाली राबविण्यात आला होता . आंतरखंडिय क्षेपणास्त्रे व  उड्डाणवाहकांची निर्मिती करण्यात मोठा वाटा उचललेल्या कलामांना ‘मिसाइल मॅन’ हे विशेषण आपसूकच जोडले गेले. पुढे त्यांना भारतरत्न या सर्वोच्च नागरी पुरस्काराने गौरविले गेले, ते राष्ट्रपती झाले व  विविध कल्पक उपक्रमांच्या संकल्पनाद्वारे ते मुलांना, तरुणांना प्रेरित करू लागले... पण ‘मिसाइल मॅन’ ही ओळखच कायम राहिली. विज्ञान-तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारताचा ठसा उमटविण्यात मोलाचा वाटा उचललेले कलाम महान देशभक्त होते, गाढे अभ्यासक होते व  अतिशय साधे होते. साधी राहणी, उच्च विचारसरणी ही एरवी घासून गुळगुळीत झालेली उक्ती त्यांनी प्रत्यक्ष कृतीत आणल्या  होत्या . त्यांच्या जाण्याने देश एका शास्त्रज्ञाला, तंत्रज्ञाला, कृतिशील माजी राष्ट्रपतीला मुकलेला  आहे. यापेक्षाही तो एका महान व्यक्तिमत्वाला मुकला आहे.

■एपीजे अब्दुल कलाम यांचे कोणकोणते पुस्तक प्रसिद्ध आहे

डॉक्टर एपी  सायंटिस्ट टू प्रेसिडेंट (आत्मकथन)

● टर्निंग पॉइंट्‌स (याच नावाचा मराठी अनुवाद म्हणजे  : अंजनी नरवणे)

● दीपस्तंभ (सह-लेखक : अरुण तिवारी; मराठी अनुवाद कमलेश वालावलकर)

डॉ. . अब्दुल कलाम यांच्यासंबंधी लिहिली गेलेली पुस्तके

●इटर्नल क्वेस्ट : लाइफ ॲन्ड टाइम्स ऑफ एपीजे कलाम (इंग्रजी, लेखक : एस चन्द्रा)

● डॉ. ए .पी. जे. अब्दुल कलाम – एक मानवतावादी शास्त्रज्ञ. 

● डॉ ए पी जे अब्दुल कलाम : द व्हिजनरी ऑफ इंडिया (इंग्रजी, लेखक : के. भूषण व  जी. कात्याल)

● प्रेसिडेंट ए .पी. जे.  अब्दुल कलाम (इंग्रजी, लेखक :R K  पूर्ती)

● रामेश्वरम ते राष्ट्रपतीभवन- डॉ. अब्दुल कलाम. (मराठी, लेखक : शां. ग.1 महाजन)

■ अब्दुल कलाम शिक्षणाबद्दल काय म्हणाले

कलाम यांच्या दृष्टीकोनाचा उद्देश शिक्षणावर आहे. डॉ. कलाम यांच्या म्हणण्यानुसार, “शिक्षणाचे मिशन” हा एक समृद्ध, आनंदी व  सशक्त राष्ट्र बनवणाऱ्या सुबुद्ध नागरिकांच्या निर्मितीची खात्री करण्याचा पाया आहे . त्याला उद्धृत करण्यासाठी, "जेव्हा शिकणे हे हेतुपूर्ण सर्जनशीलता फुलते, जेव्हा सर्जनशीलता बहरते तेव्हा विचार निर्माण होतो.

■एपीजे अब्दुल कलाम यांचे सर्वोत्तम विचार कोणते?

एपीजे अब्दुल कलाम यांचे काही प्रसिद्ध उद्धरण कोणते आहेत? " जर तुम्ही अयशस्वी असाल तर कधीही   हार मानू नका कारण अपयश म्हणजेच  "शिकण्याचा पहिला प्रयत्न" . " यशस्वी होण्याचा माझा निर्धार पुरेसा मजबूत असेल तर अपयश मला कधीच  मागे टाकणार नाही." "आपल्या सर्वांमध्ये सारखीच  प्रतिभा नाही.

डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांचा जन्म दिवस जगभरात जागतिक “विद्यार्थी दिवस म्हणून पाळला जातो”.


■ए पी जे अब्दुल कलाम पुरस्कार

 1. १९८१ : पद्मभूषण
 2. १९९० : पद्मविभूषण
 3. १९९७ : भारतरत्‍न
 4. १९९७ : इंदिरा गांधी राष्ट्रीय एकात्मता पुरस्कार
 5. १९९८ : वीर सावरकर पुरस्कार
 6. २००० : रामानुजन पुरस्कार
 7. २००७ : किंग्ज चार्ल्स पदक (दुसरा)
 8. २००७ : ब्रिटन येथील वॉल्व्हरहॅम्प्टन विद्यापीठाची डॉक्टर ऑफ सायन्स ही मानद पदवी
 9. २००८  मध्ये  सिंगापूर येथे डॉक्टर ऑफ इंजिनिअरिंग ही मानद पदवी
 10. २००९ मध्ये  अमेरिकन सोसायटी ऑफ मेकॅनिकल इंजिनिअर्सचे हूव्हर पदक
 11. २०१०  मध्ये वॉटर्लू विद्यापीठाची डॉक्ट ऑफिंजिनिअरिंग ही मानद पदवी
 12. २०११ : न्य़ूयॉर्कच्या आयईईई या संस्थेचे सभासदत्व

 13. २०१२ : आऊटलुक इंडियाच्या ‘द ग्रेटेस्ट इंडियन’ या आंतरराष्ट्रीय सर्वेक्षणामध्ये डॉ ए पी जे अब्दुल कलाम दुसऱ्या क्रमांकावर होते.
 14. २०१५ सप्टेंबर : बंगालच्या उपसागरात ओरिसाच्या किनाऱ्याजवळ असलेल्या व्हीलर आयलंडचे  नाव बदलून ते अब्दुल कलाम बेट असे करण्यात आले.

■अब्दुल कलाम यांनी राष्ट्रपती म्हणून काय केले?

अब्दुल कलाम यांनी 2002 ते 2007 पर्यंत भारतीय प्रजासत्ताकचे राष्ट्रपती म्हणून काम केले. राष्ट्रपती म्हणून कलाम यांनी राष्ट्रीय अण्वस्त्र कार्यक्रमाच्या प्रगतीला प्रोत्साहन दिले . कलाम यांनी भारतातील तांत्रिक विकासाद्वारे आर्थिक विकास साधण्यासाठी 20 वर्षांची कृती योजना देखील तयार केली

■एपीजे अब्दुल कलाम कोणत्या क्षेपणास्त्रे विकसित केली?

 DRDO मधील त्यांच्या कार्यकाळात, त्यांनी पृथ्वी, अग्नि, त्रिशूल, आकाश, नाग या पाच वेगवेगळ्या क्षेपणास्त्रे विकसित केली.


FAQ

1)डॉ कलाम यांचे धर्मविषयक विचार कोणी घडवले?

उत्तर-डॉ. कलाम यांच्याशी डॉ. साराभाई व  फादर परेरा यांच्या संवादामुळे त्यांना धर्माबद्दलचे त्यांचे विचार आकार देण्यास मदत झाली.

2)अब्दुल कलाम कोणत्या क्रमांकाचे राष्ट्रपती आहेत?

उत्तर-अब्दुल कलाम 11 व्या क्रमांकाचे राष्ट्रपती आहेत?

3) अब्दुल कलाम शाकाहारी होते का?

उत्तर-हो ते शाकाहारी होते व  निरोगी अन्न व  व्यायामाला महत्त्व देत असत

4) ए पी जे अब्दुल कलाम यांचे पूर्ण नाव काय आहे?

उत्तर-अबुल पाकीर ज़ैनुलाब्दीन अब्दुल कलाम

5)एपीजे अब्दुल कलाम यांच्याकडे किती पदव्या आहेत?

उत्तर-कलाम यांना 40 विद्यापीठांमधून 7 मानद डॉक्टरेट मिळाल्या

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा