Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

गुरुवार, २६ ऑक्टोबर, २०२३

27 ऑक्टोबर-दैनंदिन शालेय परिपाठ

 २७  ऑक्टोबर-दैनंदिन शालेय परिपाठ



प्रार्थना

 मंगलाम तुझे सतत गाऊ दे... 

 

→ श्लोक

 सत्यं वद । धर्मंचर । सत्यान्न प्रमदितव्यम् । धर्मान्न प्रमदितव्यम् । कुशलान्न प्रमदितव्यम् । - स्वाध्याय प्रवचनाभ्यां न प्रमदितव्यम् । ॐ शांतिः शांति । शांतिः ।। वार : खरे बोलावे, धर्माचरण करावे, सत्याच्या, धर्माच्या, मंगल कार्याच्या, अध्ययनाच्या आणि अध्यापनाच्या बाबतीत कधीही प्रमाद (चूक, अपराध) घडू देऊ नये. सर्वत्र शांतीचे अधिराज्य येवो.. 

 

→ चिंतन

 ज्याप्रमाणे मातीच्या गोळ्यांपासून मनुष्य आपल्याला हवी ती वस्तू बनवू शकतो, त्याप्रमाणे आपले स्वतः चे कर्तृत्वही घडवू शकतो. मनुष्य हा स्वतःच आपल्या जीवनाचा शिल्पकार आहे. दैवावर विसंबून न राहता, किंवा कपाळाला हात लावून न बसता माणसाने प्रयत्नांची कास धरली तर त्याला आपले इच्छित साध्य करता येऊ शकते, मात्र आपल्यामधील गुणांची, मर्यादांची, भोवतालच्या परिस्थितीची नेमकी जाण व्यक्तीला असणे आवश्यक आहे. योग्य मार्गदर्शन, चांगले आदर्श मनुष्याला लाभतील तरच त्याचा योग्य दिशेने विकास होऊ शकेल.

 


कथाकथन -

 मनुष्य आणि वानर एकदा बोधिसत्व वानरयोनीत जन्मला होता. एका पारध्याने त्याला पकडून नेले व वाराणसीच्या राजाला नजर केले. राजाने त्याला राजवाड्यात ठेवले. तो फारच नम्रपणे वागत असे. कोणी कितीही त्याला चिडविण्याचा प्रयत्न केला तरी तो चिडत नसे. त्यामुळे होऊन राजाने त्याला राजवाडयात मोकळे सोडले तरी तो एका कोपन्यात शांतपणे बसून राही. हे पाहून राजाने त्या पारध्यास बोलावून आणले. राजा त्याला म्हणाला, 'अरे तू आणलेला वानर फार सद्गुणी आहे. त्याला राजवाड्यात चैन पडत नाही. ही जागा त्याला तुरुंगाप्रमाणे वाटत असावी. तेव्हा तू याला जिथून पकडून आणले तिथेच परत नेऊन सोड. त्याप्रमाणे पारध्याने बोधिसत्त्वाला त्याच्या अरण्यात नेऊन सोडले. त्याला पाहून कळपातील वासल्या जागी गोळा झाले. त्यांनी त्याचे उत्तम स्वागत केले व त्याची विचारपूस केली. बोधिसत्वाने त्यांना सर्व घडलेली हकिगत सांगितली. तेव्हा म्हणाले, 'तुम्हाला मनुष्य लोकात राहण्याची उत्तम संधी मिळाली. वाराणसीसारख्या सर्व सुधारणेत पुढे असलेल्या शहरात अन् ते देखील राज तेव्हा तिथल्या रीतीरिवाजाची काही माहिती आम्हाला सांगा म्हणजे त्यापासून आमच्या ज्ञानात भर पडेल!' बोधिसत्व म्हणाला, 'तुमची ऐकायचीच इच्छा असेल तर मी सांगतो. पण खरं म्हणजे त्यात सांगण्यासारख काही नाही.'  त्या वानरांनी बराच आग्रह केला म्हणून बोधिसत्व सांगू लागला, "मित्र हो, वाराणसीची आपण फार कीर्ती ऐकत आलो. पण दुरून डोंगर साजरे अशातलाच प्रकार मी अनुभवला. तिथे ज्याच्या तोंडी पैसा आणि धन यांच्याच काय त्या गोष्टी ऐकू येतात. प्रत्येकजण स्वतःच्या धनदौलतीत इतका गढून गेलेला असतो की दुसऱ्याच्या सुखाची त्याला बिलकूल पर्वा नसते. आपल्याला जर एखाद्या झाडावर खूप फळे आढळली तर आपण आपल्या जातभाईंना तिथे घेऊन जातो आणि त्यांनाही त्या फळांचे वाटेकरी करतो. पण हा प्रकार मनुष्य लोकात आढळून येत नाही. एखाद्याला जर उत्तम औषध माहीत अपेल ते लोकांना समजले तर त्याची किंमत कमी होईल, या भीतीने मरेपर्यंत तो ते आपल्या मुलालाही सांगत नाही. एखाद्याला जर संपत्तीचा ठेवा सापडला तर तो दुसऱ्याला त्याचा उपभोग घेऊ देत नाही. एवढंच नाही तर मेल्यावर देखील साप होऊन त्या ठेक्यावर बसतो, अशी ही मनुष्य लोकांची उलटी रीत आहे. त्याची गृहपध्दतीही फार चमत्कारीक आहे. एका घरात दोन दोन माणसं राहतात. इतर कोणी राहिली तर त्याची नोकर चाकर होऊन राहतात. या मुख्य दोन माणसापैकी एकाला मिशा नसतात. त्याचे केस बरेच मोठे असतात. वेणी फणी करून सर्व देह नाना प्रकारच्या अलंकारांनी त्याने मोडत केलेला असतो आणि त्याची वटवट सदा चालू असते. नोकर चाकरांना तर त्याचा इतका त्रास असतो की काही विचारू नका! या माणसाला मनुष्य लोकात बायको असं म्हणतात!' हे सर्व ऐकताच वानरसमुदाय एकदम विटून गेला. मोठ्याने ओरडून म्हणू लागला, 'महाराज हे मनुष्य लोकीचं वर्णन पुरे करा, आम्हाला त्या माणसांच्या वर्तनापासून काही बोध घेण्यासारखे नाही. आमची पोरंबाळं जर अशी वागू लागली तर ती स्वातंत्र्याला आणि परस्परातल्या बंधुप्रेमाला मुकतील अन् वानरजातीवर मोठा अनर्थ कोसळेल ! असे म्हणून सर्व वानर बोधिसत्वासह अरण्यात निघून गेले. ज्या पाषाणावर बसून मनुष्याचे विलक्षण वर्तन ऐकण्यात आले त्या पाषाणाला त्यांनी 'गर्ध पाषाण? असे नाव दिले !' 

 

→ सुविचार 

• खऱ्या शत्रूचे शत्रुत्व धोकादायक नसते, परंतु खोट्या मित्राची मैत्री मात्र धोकादायक असते.दुर्जनांचा दर्प ही एक भयंकर संकटाची सूचना असल्यामुळे सज्जनांनी तीपासून सावध असणे हेच श्रेयस्कर असते.

  • मनुष्य आणि पशू ह्यांतील मुख्य विशेष वाणी व हास्य आहे.



 • दिनविशेष

 •  - • सवाई माधवराव पेशवे यांचा स्मृतिदिन - १७९५ - सवाई माधवराव पेशव्यांची कारकीर्द हा महाराष्ट्राच्या मराठेशाहीतील महत्वाचा टप्पा आहे. इंग्रजांशी युध्द, टिपूवरील मोहिमा, महादजी शिंद्यांचे दिल्लीकडील पराक्रम, खर्चाच्या लढाईतील अपूर्व विजय असे अनेक मानाचे प्रसंग माधवराव पेशव्यांच्या कारकिर्दीत घडले. परंतु व्यक्तीगत आयुष्यातील पोरकेपणाच्या दुःखात या पेशव्यांना जन्म काढावा लागला. या दुःखाने पराक्रमावर मात करून सवाई माधवरावांचा अचानक हृदयद्रावक दुःखद शेवट झाला. २७ ऑक्टोबर १७९५ ला सवाई माधवरावांच्या झालेल्या |निधनाबरोबरच पेशव्यांचे भाग्य दिवसेंदिवस लयाला गेले. 


→ मूल्ये 

• शौर्य, निष्ठा, स्वातंत्र्य. -

 

→ अन्य घटना

  • भा.रा. तांबे यांचा जन्म - १८७३. प्रसिध्द गायक अब्दुल करीम खान यांचे निधन - १९३७. 


→ उपक्रम 

- • सवाई माधवरावांचे चरित्र मिळवून वाचा. • त्यांच्या चरित्रातील महत्वाचे प्रसंग सांगा.


 → समूहगान

  • बालवीर हो सज्ज होऊ जा, गात गात ताल घेत मार्ग काढू या... 


→ सामान्यज्ञान 

- • भारतीय नृत्य प्रकारातील सर्वात प्राचीन व द्रविड संस्कृतीचे नृत्य म्हणून परिचित असलेला प्रकार म्हणजे तामीळनाडूतील 'भरतनाट्यम'. तोंड्यमंगलू, कौरवम्, अलारिपू, जतिस्वरम्, शब्दम्, वर्णम्, पद्म, श्लोक जावळी व तिल्लांना या विभागांत हे नृत्य सादर केले जाते. बासरी, मृदंग, व्हायोलिन, वीणा, तंबोरा, मूरसिंग या वाद्यांचा उपयोग केला जातो. गीते-तामिळ, तेलगू किंवा संस्कृत असतात. • कृत्रिम तंतू - ज्या पदार्थांमध्ये तंतू बनविण्यासाठी लागणारी रेणूमधील अणुंची विशिष्ट मांडणी नाही अशा पदार्थामध्ये ती मांडणी निर्माण करून बनविलेल्या द्रव्यांपासून काढलेल्या तंतूना कृत्रिम तंतू किंवा मानव-निर्मित तंतू असे म्हणतात. कृत्रिम तंतूची वस्त्रे जास्त काळ टिकतात, ती धुणे- वाळविणे सोपे जाते. त्यांच्या कपड्यांना 'वारवार इस्त्री करावी लागत नाही व बुरशी, कृमी, कीटक त्यांचा नाश करू शकत नाही. कृत्रिम तंतूत रेयॉन, नायलॉन, पॉलिएथिलिन, टेरिलीन इत्यादींचा समावेश होतो.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा