Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

सोमवार, २ ऑक्टोबर, २०२३

3 ऑक्टोबर -दैनंदिन शालेय परिपाठ

 ३ ऑक्टोबर

प्रार्थना 

- ॐ असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय...


श्लोक 

- गुणो भूषयते रूपं, शीलं भूषयते कुलम् । सिध्दिर्भूषयते विद्या भोगो भूषयते धनम् ।

-  जय-सावित्री हाला गुणामुळे शोभा येते, शीलसंपन्नतनेने कुलाला शोभा येते, यशामुळे विद्येला शोभा येते. तर उपभोगाने धनाला शोभा येते. 


→ चिंतन साधी राहणी, उच्च विचारसरणी हा गांधीजींनी स्वतःच्या आचारणाने घालून दिलेला आदर्श आहे. ते स्वतः जे कपडे घालीत असत, पदतीचे जेवण घेत असत ते सर्वसामान्य माणसाला परवडणारे साधे असेच होते. गांधीजी स्वतः वकील होते. देशाचे नेते होते, त्यांना कोणतीही नाम वस्तू वापरणे अवघड नव्हते. परंतु या ऐहिक सुखोपभोगापेक्षा मनाच्या, बुध्दीच्या, माणुसकीच्या श्रीमंतीला असणारे महत्व त्यांनी जाणलेले पारतंत्र्याचे चटके, अमानुष वागणुकीच्या यातना यांनी गांधीजी अस्वस्थ झाले आणि त्यातूनच त्यांच्या सत्य, अहिंसा, असंग्रह, असहकार


कथाकथन 

- लालबहादूर शास्त्री (जय जवान जय किसान) – जेमतेम वर्षभरच पंतप्रधानपदावर राहिलेला पण देशाच्या नव्हे, तर जगाच्या सात अजरामर झालेला पंतप्रधान म्हणूनच लालबहादुरांची आठवण राहिली आहे. २ ऑक्टोबर १९०४ साली वाराणसी येथे एका गरीब प्राथमिक शिक्षकाच्या घरी त्यांचा जन्म झाला. ते दीड वर्षाचे झाले तेव्हा त्यांच्या वडिलांचे निधन झाले. माता रामदुलारी आपल्या मुलांना पदराखाली पालून हेरी आली. प्राथमिक शिक्षण मिर्झापूर येथे तर माध्यमिक शिक्षण वाराणसी येथे झाले. तेथे त्यांना विल्कामेश्वर प्रसाद असे पितृतुल्य गुरु भेटले. गांधी, टिळक, लाला लजपतराय यांच्या जीवनदर्शनाचे तत्व त्यांना समजाविले. अशा उच्च तत्वज्ञानाचा उदय झाला. शिकवण दिली. पोरबंदर येथे गांधी पोरबंदरच्या जोडयाची सवय अपराधाची क्षमा शब्दाचे स्पेलिंग मुलगा बिघडेल. सांगितले लागले. पुढे एका न्याय्य हक्क व नामदार गोपाळ इ. कायदेभंगाचा परपदासाठी यांनी राष्ट्रीय आपले विचार वयाच्या अकराव्या वर्षी बनारस हिंदू विश्वविद्यालयाची कोणशिला बसविण्यासाठी आलेले गांधीजी त्यांना दिसते. तेथे त्यांच्या गाजलेल्या भाषणाने ते भारावून गेले. मग त्यांनी गांधीजींची पाठ सोडली नाही. चंपारण्य सत्याग्रह, रौलेट अॅक्ट, जालियनवाला हत्याकांड इत्यादी घटनांचे प्रतिसाद त्यांच्या मनात घर करून बसले. विदेशीवर बहिष्कार, स्वदेशीचा वापर यातच लालबहादूर गुंतले व त्यातून सुटताच पुन्हा विद्यापीठात दाखल ले. काशी विद्यापीठाचे 'शास्त्री' झाले. आडनाव श्रीवास्तव होते ते 'शास्त्री' झाले. 'सर्व्हरस ऑफ दि पीपल्स' सोसायटीचे सदस्य झाले आणि सामाजिक सुधारणा हे त्यांचे ध्येय होते. समानतेचे सूत्र होते. १९२८ साली लाला लजपतराय गेले व पुरुषोत्तमदास टंडन सोसायटीचे अध्यक्ष झाले. ते अलाहाबादला दाखल झाले. त्यांचीच अध्यक्ष म्हणून निवड झाली. विधायक कार्यकर्त्यांची ती पाठशाळाच होती. आचार्य नरेंद्र देव, आचार्य कृपलानी, डॉ. भगवानदास, डॉ. संपूर्णानंद, श्रीप्रकाश यांचा परिचय व मैत्री झाली. नेहरू, शास्त्रींना काँग्रेसचे मवाळ धोरण मान्य नव्हते, १९३७ मध्ये सत्याग्रह करून ते कारावासात गेले. सत्तेची लालसा नव्हती; पण १९४६ साली निवडणुका झाल्या. ते गोविंदवल्लभ पंतांचे सेक्रेटरी झाले. पंत गेल्यावर ते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री झाले. १९५१ साली पं. जवाहरलालजींनी त्यांना काँग्रेसचे सचिव केले. १९५६ साली त्यांना रेल्वेमंत्रीपद दिले. पण एका अपघाताची नैतिक जबाबदारी स्वीकारून त्यांनी त्या पदाचा राजीनामा दिला. १९५७ मध्ये त्यांनी काँग्रेसला निवडणुका जिंकून दिल्या. २७ मे १९६४ ला नेहरू गेले. त्यानंतर लालबहादूर एकमताने पंतप्रधान झाले. पाकिस्तानला ही सुसंधी वाटली. पाकिस्तानने भारतावर आक्रमण केले, 'जय जवान, जय किसान' हा घोषणामंत्र वातावरणात निनादला. भारताने पाकिस्तानात


सुविचार 

• जय जवान जय किसान

• मूर्ती लहान कीर्ती महान

 • असत्य व हिंसा यांचा अवलंब करून खरी लोकशाही कधीही स्थापन करता येणार नाही. 


→ दिनविशेष 

• गांधी सप्ताह : २ ऑक्टोबर ते ८ ऑक्टोबर हा ७ दिवसांचा आठवडा- महात्मा गांधीजींच्या स्मृतीनिमित्त महात्मा गांधी म्हणून पाळण्यात येतो. पारतंत्र्याविरूध्द, शोषणाविरुध्द, असत्य असमानता याविरुध्द गांधीजींनी आयुष्यभर संघर्ष केला. आदानं त्यांना राष्ट्रपिता ही मान्यता भारतीयांनी दिली. गांधीजींनी ज्या नीतीतत्त्वांचा पाठपुरावा केला, ती नीतीतचे आचरणात आणणे ही त्यांच्या स्मृतीची खारी ठरेल. गांधीजी म्हणत, "जितके कायदे, तितक्या पळवाटा आणि चोर दरवाजे ! परंतु व्रत मनुष्य स्वच्छेने स्वीकारतो. त्यामुळे व्रत स्वीकारल्यावर पळवाटा आणि चोरदरवाजे शोधत नाही." गांधीजींनी सत्याग्रहींना व्रते घेण्यास सांगितली. या अकरा व्रतांना विनोबांनी एका श्लोकात गुंफले, आश्रमात सकाळच्या आणि संध्याकाळच्या प्रार्थनेमध्ये हा श्लोक एक अविभाज्य भाग बनला. ती व्रते अशी अहिंसा, सत्य, अस्तेय, बह्मचर्य, असंग्रह, शरीरश्रम, अस्वाद, सर्वत्र भयवर्जन, सर्वधर्मी समानत्व, स्वदेशी, स्पशंभावना, ही एकादश वावी नम्रत्वे व्रतनिश्चये। गांधीजींनी आश्रमालातल्या मुलांना या व्रतासंबंधी पत्रे पाठविली. त्या पत्रांच्या संग्रहाचे 'मंगलप्रभात' या नावाचे पुस्तक प्रसिध्द झालेले आहे.


 मूल्ये 

 • सत्यनिष्ठा, भूतदया

 

 → अन्य घटना 

 • शिवणयंत्र संशोधक होवे एलिअस यांचे निधन - १८६७ 

 • स्वामी रामानंद तीर्थ यांचा जन्म १९०३ 

 • इतिहास - पुरातत्ववेध शास्त्रज्ञ जेम्स बर्डोरप स्मृतिदिन - १९१६

  • पूर्व व पश्चिम जर्मनी एकीकरण- १९९०. 

 

• → उपक्रम 

• महात्मा गांधींचे 'मंगलप्रभात' हे पुस्तक मिळवून वाचा.

•  लाल बहादूर शास्त्रींचे चरित्र वाचा. 


→ समूहगान 

• बलसागर भारत होवो, विश्वात शोभुनी राहो.... -


सामान्यज्ञान

• राष्ट्रध्वजासाठी विशिष्ट प्रकारचेच कापड वापरावे असा नियम असून कर्नाटकात गदग येथे हे कापड तयार करणारी संस्था आहे. चरख्यावर कातलेल्या सुतापासून हातमागावर ते विणले जाते. त्या कापडाची जाडी व प्रत्येक चौरस सेंमीमधील उभ्या आडव्या धाग्यांची संख्या ठराविक असते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा