२ ऑक्टोबर
→ प्रार्थना -
आई माझा गुरु, आई कल्पतरू, सुखाचा सागरू आई माझी....
→ श्लोक
- आली जरी कष्टदशा अपार । न टाकिती धैर्य तथापि थोर । केली जरी ज्योत वळेचि खाले । ज्वाला तरी ते वरती उफाळे ।।
- वाईट परिस्थिती आली, तरी धैर्यवान पुरुष धैर्य सोडीत नाहीत. ज्योत जरी खाली केली, तरी ती वरच्या दिशेलाच उफाळत असते
-
→ चिंतन - अहिंसा म्हणजे केवळ हिंसा न करणे नव्हे तर येशूने सांगितले त्याप्रमाणे 'शत्रूवरही प्रेम करा, शेजाऱ्यांवर प्रेम रुपाला गुण अत्यंत एकमेकांवर प्रेम करा.' गांधीजी लिहितात, 'आपला पृथ्वीगोल ज्यांचा बनला आहे. त्या अणूंमध्ये जर एकमेकांशी संलग्न होण्याची प्रेरणा आणि शक्ती नसेल गोलाच्या ठिकऱ्या ठिकन्या होऊन कोणाचे अस्तित्व राहणार नाही. जड वस्तुमात्रांत जशी ही संलग्न राहण्याची प्रेरणा आणि शक्ती होते. पार जीवमात्रातही ती असलीच पाहिजे. ती संलग्न होण्याची व राहण्याची शक्ती म्हणजेच प्रेम. कुटुंबातील माणसांत किंवा मित्रामित्रांत आपल्याला दर्शन होते. (यंग इंडिया दि. ६-१०-१९२१) ' करा,
→ कथाकथन '
महात्मा गांधी' - हिंदू-मुसलमानांचे तंटे मिटविण्यासाठी जिवाचे रान केले. असत्य व अन्यायविरूध्द झगडण्याची शिक्षा इतिहासा - हरिजनांच्या उन्नतीसाठी आयुष्य वेचले, ब्रिटिश सत्तेशी निकराने लढा दिला, द. आफ्रिकेतील हिंदी लोकांना न्याय्य हक्क व सवलती मिशिक्षका सत्याग्रह शस्त्राचा अवलंब करून विजय मिळविला. ज्यांच्या तत्त्वज्ञानाने साऱ्या जगाचे डोळे दिले, अशा महात्मा गांधीचा जन्म गुजरातमध्ये माहेरी झाला. २ ऑक्टोबर १८६९ हा त्यांचा जन्मदिनांक. त्यांच्या वडिलांचे नाव करमचंद आणि आईचे नाव पुतळीबाई होते. करमचंद गांधी त्यांनी महाराजांचे दिवाण होते. आई अत्यंत धार्मिक होती. ते शाळेत जाऊ लागले. मित्राच्या नादाने त्यांना वयाच्या अवघ्या ६ व्या वर्षी विडीओ लागली. ही चूक ध्यानी येताच, नादान मित्रांची संगत सोडून देऊन, त्यांनी अभ्यासाकडे मन वळविले आणि वडिलांजवळ केलेल्या अ मागितली. त्यांनी मनाशी खरे बोलण्याचा व चूक सुधारण्याचा निश्चय केला. तो पार पाडला. राजकोटमधील शाळेत असताना 'केटल' शब्द प्रतिस शिक्षकाने त्यांना शेजारच्या मुलाचे पाहून लिहिण्यास सुचविले. परंतु स्पेलिंग येत नसल्याने त्यांनी ते चुकीचे लिहिले, परंतु बघून लिहिले नाही.
१२ व्या वर्षी कस्तुरबाईबरोबर लग्न झाले. सन १८८७ मध्ये मॅट्रिक झाले. पुढील शिक्षणासाठी परदेशात जाऊन आपला मुलगा पि अशी भीती त्यांच्या आईला वाटत होती. तेव्हा त्यांनी आपल्या आईला. "मी वाईट गोष्टीला स्पर्श करणार नाही." असे शपथपूर्वक साि तेव्हा त्यांना परदेशात जाण्यास परवानगी मिळाली. गांधीजी बॅरिस्टर होऊन भारतात परत आले. मुंबई कायकोर्टात वकिली करू लागले. पुढे खटल्यासाठी दक्षिण आफिक्रेत गेले. तेथे भारतीयांवर होणाऱ्या अन्यायाविरूध्द लढा दिला. सत्याग्रह पुकारून हिंदी लोकांना न्याय्य हक सवलती मिळवून दिल्या. भारतीय स्वातंत्र्यासाठी धडपडणाऱ्या राष्ट्रीय सभेच्या कलकत्ता येथे भरलेल्या अधिवेशनात प्रथमच हजर राहिले. त्यांचे राजकीय गुरु नामदार गो कृष्ण गोखले यांनी 'गांधीजीच पुढे भारताचे राजकारण करतील' असे भाकित केले. पुढे तेच खरे ठरले. सत्याग्रह, असहकार, दांडी यात्रा चळवळीद्वारा लोकमत जागृत करण्याचा प्रयत्न केला. ६ एप्रिल १९२१ ला त्यांनी पहिला सत्याग्रह केला. १९३० साली असहकार व कायदेभंगाच कार्यक्रम हाती घेतला. उर्मट व उन्मत्त ब्रिटिश राज्यकर्त्यांनी लाठीहल्ला करून त्या वेळी अनेकांना अटक केली. त्यात गांधीजी होते. पुढेपुढे भारताच्या स्वातंत्र्याचा प्रश्न दिवसेंदिवस तीव्र स्वरूप धारण करीत होता. ब्रिटिश हैराण झाले होते. या संदर्भात गांधीजी गोलमेज परिषदांसाठी इंग्लंडला गेले. स्वराज्यप्राप्तीसाठी सत्य व अहिंसेचा वापर केला. दुसऱ्या महायुध्दात जर हिंदी लोकांचे सहकार्य ब्रिटिशांना हवे असेल तर त्यांनी राष्ट्र सरकारची मागणी पुरी करावी, अशी मागणी केली. ८ ऑगस्ट १९४२ ला मुंबई येथे गांधीजींनी 'चले जाव' ची घोषणा केली. आपले विच मांडण्यासाठी त्यांनी 'यंग इंडिया' साप्ताहिक सुरु केले
सुविचार -
• एकदा गेलेली वेळ पुन्हा कधीही येत नाही, गेलेला 'काल' पुन्हा आणता येत नाही. आणि येणाऱ्या 'उद्या' बद्दल खात्रीपूर्वक काही सांगता येत नाही. म्हणूनच हाती असणाऱ्या 'आज' चे भान ठेऊन आजचे काम आजच पूर्ण करावे.
• मन, मनगट, मेंदूचा सर्वांगीण विकास म्हणजे खरे शिक्षण - म. गांधी.
→ दिनविशेष
- मुंबई दूरदर्शन प्रक्षेपणास सुरुवात - १९७२. - दिनांक १५ सप्टेंबर १९५९ या दिवशी भारतामध्ये प्रथम दिल्ली येथे दूरदर्श सुरुवात झाली. तर हळूहळू प्रसार होत महाराष्ट्रात १९७२ मध्ये मुंबई येथे दूरदर्शन प्रक्षेपण सुरु झाले. हे भारतातील दुसरे दूरदर्शन केंद्र होय. गांधीजयतीक मुहूर्तावर संध्याकाळी ६.३० वा. गानकोकिळा लता मंगेशकर यांच्या पसायदानाने कार्यक्रमास सुरुवात झाली. या केंद्रावरून मराठी, हिंदी, गुजरा इंग्रजी व कोकणी या भाषणांमधून कार्यक्रम प्रसारित केले जातात. या दूरदर्शन केंद्रावरून दुसरी वाहिनीही (चॅनेल) सुरु केलेली आहे. भारतात एशिय खेळांच्या स्पर्धा आयोजित केल्यानिमित्त १९ नोव्हेंबर १९८२ ला त्यावेळच्या पंतप्रधान इंदिरा गांधीनी भारतात रंगीत दूरदर्शनची सुरुवात केली दूरदर्शनचे पहिले प्रक्षेपण लंडनमध्ये बीबीसीने १९३६ मध्ये सुरु केले, तर १९५१ मध्ये अमेरिकेत पहिले रंगीत प्रक्षेपण झाले.
→ मूल्ये
• ज्ञानसाधना, देशप्रेम, राष्ट्रीय एकात्मता
→ अन्य घटना -
• महात्मा गांधी जयंती - १८६९
• पद्मश्री विनायक पांडुरंग करमकर यांचा जन्म - १८९१.
• लालबहादूर शास्त्री जयंती - १९०४.० चित्रकार राजा रविवर्मा स्मृतिदिन - १९०६. पं. नेहरुंच्या हस्ते पंचायत राज्याचे उद्घाटन - १९५९.
• राष्ट्रीय स्वच्छता दिन - १९६०
• मुंबईत दूरचित्रवाणी सुरू- १९७२.
• महाराष्ट्रात प्रौढशिक्षणाचा कार्यक्रम कार्यान्वित - १९७८.
• शिक्षणमहर्षी पंढरीनाथ पाटील स्मृतीदिन - १९७८.
उपक्रम
-• भारतातील दूरदर्शन व आकाशवाणी केंद्रे याबद्दल माहिती मिळविणे.
• महाराष्ट्रातील व इतर राज्यातील 'बालचित्रवाणी' बद्दल
समूहगान -
• सारे जहाँ से अच्छा हिंदोस्ताँ हमारा...
सामान्यज्ञान
- • टीव्ही चा मनोरा खूप उंच असावा लागतो. मुंबईचा मनोरा तीनशे मीटर उंच तर सिंहगडावरच पुण्याचा मनोरा बसविला आहे. जगात सर्वात उंच मनोरा ६२८ मीटर उंचीचा असून तो अमेरिकेत फार्गो, नॉर्थकोट येथे आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा