Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

रविवार, २९ ऑक्टोबर, २०२३

29 ऑक्टोबर-दैनंदिन शालेय परिपाठ

  29 ऑक्टोबर-दैनंदिन शालेय परिपाठ


प्रार्थना - 

मंगलमय चरणि तुझ्या विनंति हीच देवा... 


→ श्लोक 

– प्रथमे नार्जिता विद्या, द्वितीये नार्जितं धनम् । तृतीये नार्जितं पुण्यं, चतुर्थे किंकरिष्यसि ... आयुष्याच्या पहिल्या भागात विद्या संपादन केली नाही, दुसऱ्या भागात (गृहस्थाश्रमात) कष्ट करून धन प्राप्ती केली नाही व तिसऱ्या भागात पुण्य संचय केला नाही, तर चौथ्या भागात (वृध्दापकाळात) काय करणार ? 1 जय-सावित्री जय जिजाऊ वार: 


→ चिंतन 

- आपल्याला मिळालेले स्वातंत्र्य जर टिकवायचे असेल तर आपल्या हाडीमाशी खिळलेला जातीयवाद आपण प्रथम नष्ट केला पाहिजे. आपल्यापुढे हा फार बिकट प्रश्न आहे. तो आपण सोडविलाचं पाहिजे. जातीयतेमुळे समाजाचीच नव्हे तर संबंध देशाची हानी होणार आहे. या जातीयवादाच्या मुळाशी धार्मिक भावना व रूढी यांचे दडपण असल्याने त्या नष्ट करण्याकरिता रोटीबेटी व्यवहार सर्रास सुरू झाला पाहिजे. धर्म हा परिवर्तनीय आहे ही समजूत पटवून देऊन हा जातीयवाद नष्ट केला तरच तरणोपाय आहे. 'माणूस ही एकच जात व माणुसकी हा एकच धर्म आहे' हे नीट समजून घेतले पाहिजे.कथाकथन

 - धोंडो केशव कर्वे हा एकच धर्म आहे' हे नीट समजून घेतले पाहिजे. (स्त्री-शिक्षणाचा मुक्तीदाता) आज जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात स्त्री पुरुषांच्या बरोबरीने, नव्हे काकणभर अधिकच कर्तृत्व दाखवीत आहे. 'स्त्री' ला भारतातील सामाजिक जीवनात, वैदिक काळात फारच महत्त्वाचे स्थान होते. निसगनि स्त्रीला दिलेली दैवी देणगी 'मातृत्व' हेच स्त्रीजीवनाचे साफल्य आहे. आज जे स्त्री-जीवनात स्थित्यंतर घडले आहे ते स्त्री-शिक्षणामुळे, जन्मोजन्मी बंद असलेली स्त्री- शिक्षणाची द्वारे खुले आहेत. ईश्वरचंद्र विद्यासागर, महर्षि कर्वे, आगरकर, फुले या समाजपुरुषांच्या प्रयत्नांचे हे फळ आहे. हिंगण्याच्या माळावर स्त्रीशिक्षणाचे तपोवन उभे करणारा 'पद्मविभूषण' धोंडो केशव कर्वे हा 'अण्णा' नावाचा माणूस शतायुषी झाला. १० एप्रिल १८५८ साली 'मुरूड' या गावी अण्णांचा जन्म झाला. मुरूडला त्यांचे प्राथमिक शिक्षण झाले. ते पुढील शिक्षणासाठी मुंबईत आले. अविश्रांत परिश्रमांनी मेहनत करीत, कधी अर्धपोटी, कधी उपाशी राहून १८८१ साली मॅट्रिक तर वयाच्या सत्ताविसाव्या वर्षी ते बी. ए. झाले. लोकमान्य फर्ग्युसन कॉलेजात गणित शिकवू लागले. राजकारणांमुळे त्यांनी कॉलेज सोडले. अण्णांना ना. गोखल्यांनी त्यांच्याऐवजी नेमले. १८९१ ते १९९४ पर्यंत ते गणिताचे ख्यातनाम प्राध्यापक झाले. त्यांच्या पत्नी राधाबाई त्याच काळात निवर्तल्या, आगरकर, रानडे यांच्या मार्गदर्शनाखाली अण्णांनी एका विधवेशी त्या काळात पुनर्विवाह केला. स्त्रीशिक्षण हेच आपले जीवितकार्य मानले. २१ मे १८९४ साली पुनर्विवाहितांचा कुटुंबमेळा घेतला. अनाथ बालिकाश्रम काढले. विधवा विवाहोत्तेजन मंडळे काढली. त्यांची मिशनरीवृत्तीची स्त्रीसेवा पाहून रावबहादूर गोखल्यांनी त्यांना आपली हिंगणे येथील ६ एकर जागा ३७५० रूपये दान दिले. अण्णांची झोपडी उजाड माळावर उभी राहिली. १९०४ मध्ये आश्रमाची इमारत आली. अनाथ बालिकाश्रमाचे पहिले अध्यक्ष होते रामकृष्ण गोपाळ भांडारकर. अण्णांनी विधवांचे वसतिगृह काढले. अण्णांचा निष्काम कर्ममठ सुरू झाला. पार्वतीबाई आठवले. वेणुताई नामजोशी, काशीबाई देवधर, यमुनाबाई साने, कमलबाई गरूड इत्यादी ख्यातनाम स्त्रिया अण्णांनी तयार केल्या. इंग्लंड, जपान, जर्मनी, अमेरिका देशांना भेटी दिल्या. महिला विद्यापीठाची स्थापना केली. अण्णा शतायुषी होते. त्यांनी खूप पाहिले. खूप अनुभवले, अभ्यासिले दुःख पचविले, अपमान गिळले, जननिंदा सोसली. मानसन्मान मिळविले. भारतरत्न झाले व ९ नोव्हेंबर १९६२ साली त्यांनी जगाचा निरोप घेतला.

 


- सुविचार - 

- • मुलांमध्ये स्वावलंबन निर्माण करण्याच्या दृष्टीने त्यांच्या शिक्षणापलीकडे आईवडिलांनी त्यांची जबाबदारी मुले वयात आल्यावर त्यांच्याशी मित्रत्वाप्रमाणे वागावे - अण्णासाहेब कर्वे. क्रांतीचा उगम हा दुःखी आणि त्रस्त लोकांच्या अंतःकरणातून होत असतो. • 

 

 → दिनविशेष

  ● 'भारतरत्न' मिळण्याचा मान महाराष्ट्रात प्रथम महर्षी अण्णासाहेब कर्व्यांना मिळाला. १९५८- भारतीय नागरिकांचा सर्वोच्च राष्ट्रीय सन्मान करण्यासाठी १९५४ पासून केंद्र शासनाकडून 'भारतरत्न' ही पदवी राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येते. कला साहित्य शास्त्र यातील अपूर्व कर्तृत्व, राष्ट्राची किंवा समाजाची असामान्य सेवा अशा दुर्मिळ गुणांचा सन्मान ही पदवी देऊन केला जातो. सुमारे सव्वादोन इंच लांब, दोन इंच रूंद आणि १/८ इंच जाड असलेल्या पिंपळपानाच्या आकाराच्या ब्रॉन्झ धातूचे हे पदक असते. सूर्यबिबांच्या पार्श्वभूमीवर त्या पदकात भारतरत्न अशी अक्षरे आणि पदकाच्या मानकऱ्याचे नाव कोरलेले असते. समाजसेवेतील पहिले पारितोषिक अण्णासाहेब कर्व्यांना देऊन गौरविले. महाराष्ट्राच्या सन्मानात मानाचा तुरा खोवला गेला. वयाच्या १०० व्या वर्षी कर्व्याच्या जन्मशताब्दीनिमित्त पदक दिले गेले

 

. मूल्ये ज्ञान,

 देशभक्ती, शिक्षणनिष्ठा, समाजसेवा

 

 → अन्य घटना 

 'बाटुमल पुरस्कार, मॅगसेस पुरस्कार' असे अनेक पुरस्कार विजेत्या कमलादेवी चटोपाध्याय यांचा स्मृतिदिन १९८८. - 

 

→ उपक्रम

 • केंद्र शासनातर्फे दिल्या जाणाऱ्या विविध सन्मानांची माहिती मिळवा.

 

 → समूहगान

  • पेड़ों को क्यों काटतें हो, दो पेड़ लगाके देखा ना..... 

 

→ सामान्यज्ञान 

• अंगठ्याएवढ्या जाडीचे बांबू असतात, तसेच ३० से.मी. जाड बुंध्याचेही बांबू असतात. त्याला राक्षसी बांबू म्हणतात. - त्याचे शास्त्रीय नाव डॅड्रो कॅलमस जायगेंटस् असे आहे. हे बांबू ब्रम्हदेशात आढळतात. याचा उपयोग पेराजवळ कापून धान्य किंवा पाणी साठविण्यासाठी करतात. 

• बांबूच्या १२०० जाती जगभर पसरलेल्या आहेत. समुद्रसपाटीपासून ते सुमारे १३३५ मीटर उंचीपर्यंत निरनिराळ्या वातावरणात बांबू वाढतात. कार्ल लँडस्टेनर या अमेरिकन शास्त्रज्ञाने माणसात आढळणारे रक्तगट शोधून काढले. या शोधाने मानवजातीचे रक्तानुसार वर्गीकरण झाले. या शोधामुळे रक्तदान करणे सुलभ झाले. रक्तदान हे याच प्राथमिक तत्वावरच संपूर्णपणे आधारलेले आहे. त्यानंतर वायरन व लेवाइन यांनी रक्तातील 'आरएच' घटक शोधला. या सर्व शोधांचा विविध क्षेत्रात उपयोग होतो. केवळ रक्तदानातच नव्हे तर गुन्हेगारी व वंशशास्त्र यामध्ये या शोधाचा खूप उपयोग होतो.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा