Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

मंगळवार, २४ ऑक्टोबर, २०२३

26 ऑक्टोबर-दैनंदिन शालेय परिपाठ

 २६  ऑक्टोबर-दैनंदिन शालेय परिपाठ→ प्रार्थना

 सृष्टिकर्ता इस प्यारे, एक हो तुम एक हो...

 

 → श्लोक

 - असोनि नसणें संसाराचे ठाई । हाची बोध पाही मना घ्यावा ।। संतांची संगती नामाची आवडी । रिकामी अर्ध घडी जावों नेदी ॥। काम क्रोध सुनेपरी करी दूरी । सहपरिवारी दवडी बापा ॥ चोखा म्हणे सुख आपेंआप घरा । नाही तर फजीतखारा जासी वायां ।। संत चोखामेळा - संसारामध्ये असून नसल्यासारखे वागावे हाच उपदेश बघावा. आपल्या मनाला सांगावा. संतांची सोबत आणि नामाची आवड धरावी. रिकामा बेट व्यर्थ घालवू नकोस. काम, क्रोध शत्रू आहेत. तसेच त्याचा परिवार आशा, तृष्णा, मनीषा व कल्पना इ. यांना दूर ठेवावे. चोखोबा म्हणतात, या पध्दतीन आपण वागल्यास आपोआप सुख आपल्या घरी येईल. अन्यथा आपली फजिती होऊन हा जन्म वाया जाणार आहे. 

 

→ चिंतन

 माणसाला रूपाने, रूपाला गुणांनी, गुणांना ज्ञानाने आणि ज्ञानाला क्षमेने शोभा येते. माणसाला नुसते सुंदर रूप असेल पण त्याच्यात बोचरे दुर्गुण असतील तर त्यामुळे त्याच्या सौंदर्याला उणेपणाच येतो. बाह्य सौंदर्याला अंतःकरणाती प्रामाणिकपणा, उद्योगप्रियता, सचोटी, परोपकारी वृत्ती अशा अनेक सद्गुणांची जोड मिळाली तर 'सोन्याहून पिवळे' होते. गुणांच्या विकासाचा म्हणजे ज्ञानसाधना. ज्ञानी माणसाला, अहंकार असता कामा नये, त्याला ज्ञानक्षेत्राची विशालता समजली तर तो आपोआप क्षमाशील होतो..कथाकथन 

- शबरीची बोरे- एक दिवस शबरी संध्याकाळी रामाची वाट पहात बसली होती. सूर्य अस्ताला चालला होता. तिच्या हातात गोळा केलेली ताजी बोरे होती. फुलांचा कधीही न सुकणारा हार होता. पंपा सरोवरात पाण्यावर तरंग उठत होते. हो ! शबरीला नादमय आवाज आला. पावलांचा सुगंध तर दाही दिशांना पसरला. शबरीने डोळ्यांवर हात ठेवून पाहिले. पपेच्या जलाशयावर तिला दोन आकृत्या दिसल्या. निळ्या | पाण्यात त्या दोन निळ्याभोर छाया पसरल्या होत्या. वल्कलं नेसलेले, हातात धनुष्यबाण घेतलेले दोन अतिशय सुंदर तरूण शबरीला तिच्या आश्रमा येताना दिसले. शबरीचा आनंद गगनात मावेना. होय! श्रीराम आणि लक्ष्मण तिच्या आश्रमाकडे येत होते. काठी टेकीत टेकीत शबरी आश्रमाच्या कृपणाजवळ आली. श्रीरामाने शबरीला पाहिले. तो धावतच आला आणि शबरीला भेटला. शबरी धन्य झाली. शबरीने श्रीरामाच्या पायावर डोके ठेवले श्रीरामाने तिला हलकेच उठवले. शबरीने श्रीरामाच्या पूजेचे सर्व साहित्य आणले, श्रीरामाची तिने पाद्यपूजा केली आणि बोरे प्रसाद म्हणून श्रीरामाच्या पायाशी ठेवली. श्रीरामाने त्या बोरांकडे पाहिले. बोरातल्या बिया शबरीने काढून टाकल्या होत्या. प्रत्येक बोर हलकेच चाखून पाहिले होते. प्रत्येक टफे बोर तिने श्रीरामाला अर्पण केले. शबरीची भक्ती पाहून श्रीराम प्रसन्न झाले. त्यांनी शबरीची उष्टी बोरे खाल्ली. पंपा सरोवरातले निर्मळ पवित्र पार्क |प्यायले. शबरीची भक्ती पाहून श्रीरामांना खूप आनंद झाला. श्रीरामाने शबरीची चौकशी केली. त्यामुळे शबरीला आनंद झाला. “रामा, माझे आयुष्य आज पुनीत झाले. माझ्या तपस्येला आज फळ आले. आज माझ्या पूजेचे सार्थक झाले." शबरीच्या डोळ्यात आनंदाश्रू उभे राहिले. ती श्रीरामाच्या दर्शनाने परमपवित्र झाली. सूर्याचे लाल लाल किरण आश्रमावर सोनेरी वर्षाव करीत होते. शबरी शेवटी श्रीरामाला म्हणाली, “रामा, माझा आनंद माझ्य | शरीरात मावत नाही. तुमच्या दर्शनाने हा आश्रम धन्य झाला. तुम्हा दोघांची वाट पाहत मी कित्येक मास अशी ताटकळत उभी होते. मला आशीर्वाद द्या. मी महर्षी मातंग ऋषींची दासी आहे. आता मी महर्षीींच्या दर्शनाला जाऊ इच्छिते. मला आज्ञा द्या. कारण महर्षीींना नेण्यासाठी देवलोकीहून विमान आते होते. जाताना त्यांनी मला सांगितले होते. 'श्रीराम ह्या आश्रमात येतील त्यांचा आदरसत्कार कर. त्यांची पूजा कर. आणि मगच तू पवित्र होऊन अक्षयलोकी ये.' श्रीरामा, मी धन्य झाले आहे." शबरीच्या डोळ्यात अश्रू उभे होते. श्रीरामांनी तथास्तु म्हटले. श्रीरामांनी तथास्तु म्हणताच मस्तकी उठा आणि शरीरावर चीर तसेच काळे मृगचर्म धारण करणाऱ्या शबरीने स्वशरीराचे होमहवन केले. त्यामुळे तिला प्रज्वलित अग्नीचे तेजस्वी रूप प्राप्त झाले. | दिव्य दिसणारी शबरी विजेसारखी तो संपूर्ण परिसर उजळवून टाकीत स्वर्गलोकी क्षणार्धात निघून गेली. श्रीरामाने तिला हात उंचावून निरोप दिला. माणसाला नुसती सुंदर रूप असेल पण त्याच्यात बोचरे दुर्गुण असतील तर त्यामुळे त्याच्या सांदयाला → सुविचार

 • सहानुभूती, प्रेम, मदत व सहकार्य या गोष्टी दिल्याने दुप्पट होऊन सव्याज मिळतात. 

 • प्रेमाने पाषाणाची फुले होतात, काट्यांचे मुकुट होतात, अन् मरणाचे जीवन होते. 

• 'सौंदर्य - सुस्वभाव यांची बेरीज करा, मैत्रीतून मत्सर वजा करा. प्रेमाला शुध्द अंतःकरणाने गुणा, , परनिर्देचा लघुत्तम काढा, सुविचारांचा वर्ग करा. दया, क्षमा, शांती, परमार्थ यांचे समीकरण सोडवा, हेच आपल्या सुखी जीवनाचे गणित. → दिनविशेष 

-• संत नामदेवांचा जन्मदिन - १२७० - महाराष्ट्राच्या संत परंपरेतील एक नामवंत संत म्हणजे संत नामदेव. ज्ञानदेवांनी नामदेवाच्य | भक्तीचा महिमा ऐकला आणि नामदेवांना भेटायला ते स्वतः पंढरपूरला आले. जणू ज्ञान आणि भक्तीचा संगम झाला. ज्ञानदेव आणि नामदेव तीर्थ करीत देशभर हिंडले. पुढे नामदेव पंजाबपर्यंत जाऊन आले. तीर्थयात्रा करीत असताना विविध भारतीय भाषा ते शिकले. हिंदी व पंजाबी भाषेत त्यांच्या पद्यरचना आजही प्रसिध्द आहेत. पंजाब ही त्यांची कर्मभूमीच बनली होती. वर्णाश्रमाची चौकट मोडून मानवतेच्या दृष्टीकोनातून विचार जागृती करणारे ते आद्य सुधारक. नामदेवानी वारकरी पंथाची पताका स्वतःच्या खांद्यावरून स्वतंत्र नेऊन टाळमृदंग व हरिनामाच्या घोषाने इस जनार्दनाच्या मनाची कवडे उघडली. लोकजागृती व लोकसंघटनेचे कार्य करीत असताना वयाच्या ८० व्या वर्षी ३ जुलै १३५० ला त्यांचे महानिर्वाण झाले


→ मूल्ये 

• भक्ती, मानवता, सौजन्यशीलता, संवेदनशीलता, सर्वधर्मसमभाव. समाचार 


→ अन्य घटना - 

• डोंगरी येथील तुरुंगातून टिळक व आगरकर यांची १०१ दिवसांच्या कारावासातून मुक्तता झाली. - १८८२.

 • रशियाच्या बेरेगोव्हॉय या अंतराळवीराने सोयूझ - ३ हे आपले यान स्वतःच चालवून सोयूझ-२ या मानवरहित यानाजवळ आणले - १९६८

 • व्ही. शांताराम यांचे निधन - १९९०. 


→ उपक्रम 

नामदेवांच्या गोष्टी, अभंग मिळवून संकलित करा व मुलांना सांगा.


→ समूहगान - 

•  ऐ मेरे वतन के लोंगो, तुम खूब लगा लो नारा...


. → सामान्यज्ञान •- 

• साखरेआधी माणसाला माहीत झालेला गोड पदार्थ म्हणजे मध. पूर्वीच्या काळी मध सहजसाध्य नव्हता. पण गेल्या शतकात शोधल्या गेलेल्या आधुनिक मधमाशा पालन पध्दतीमुळे कृत्रिम मोहोळातून हत्या न करता व डंख न बसता

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा