Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

सोमवार, २३ ऑक्टोबर, २०२३

24 ऑक्टोबर-दैनंदिन शालेय परिपाठ

 24 ऑक्टोबर-दैनंदिन शालेय परिपाठप्रार्थना 

- ऐ मातृभूमी तेरे चरणों में सिर नवाऊँ... 

→ श्लोक 

- मांगे बहुतानें हेचि वारिलें । तेणे ते पावले निजधाम ।। तयाचिया वाटे चालू जाता सुख । अवघेंचि दुःख निरसेल ॥ बहुतांचा हाचि आहे उपदेश । तोचि सुखरस सेऊं आता ।। चोखा म्हणे आम्हां सांपडली वाट । मारग हा नीट येतां जातां ।। - संत चोखामेळा वासना, काम, क्रोध, दंभ, अहंकार व माया इत्यादिना ज्यांनी आवर घातला, त्यांनाच स्वर्ग प्राप्ती होते. या रस्त्यांनी जाताना स प्राप्त होते व सर्व दुःखाचे निवारण होते. अनेकांचा हाच उपदेश आहे. आता आपण त्याच सुख रसाचे सेवन करणार आहोत. चोखोबा म्ह आम्हाला मार्ग सापडला असून येण्याजाण्याचा हा मार्ग व्यवस्थित आहे. 

→ चिंतन

 - माणूस अगदी बालपणापासून 'मी' 'माझे' शिकत असतो, ही 'स्व' त्व जाणीव विकसित झाली तर माणसाचा आत्मवि | वाढीस लागू शकतो. मात्र या भावनेचा अतिरेक 'अहंगंडा' त रूपांतरित होतो. माणूस स्वतःला दुसऱ्यांपेक्षा श्रेष्ठ, वरचढ समजू लाग आपल्यापेक्षा दुसऱ्याकडे विशेष वेगळे काही आहे हे त्याला सहन होऊ शकत नाही, तो दुसऱ्याचा द्वेष करू लागतो. हा द्वेष वैयक्तिक पातळी घराणे, वंश, धर्म, पंथ, ग्राम, राज्य, राष्ट्र, आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत कोठेही आढळून येतो, त्याच्या अतिरेकातून वैर, दुफळी, युध्दे निर्माण ह | शकतात हे सर्वांना माहिती आहेच,


→ कथाकथन

 युनो स्थापना - - दुसऱ्या महायुध्दाने जणू सारे जगच होरपळून निघाले. या महायुध्दात प्रचंड मानव संहार झाला आणि वित्तहानीही झाली. साऱ्या जगाला युध्दाची जणू शिसारीच आली. जगात युध्द न होऊ देता शांततामय मार्गानीच राष्ट्राराष्ट्रांतील भांडणे मिटले तरच अखिल मानवजात सुखी होईल, या विचाराने या महायुध्दात विजयी झालेल्या अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स आदी राष्ट्रांच्या प्रमुखांनी एक मानवजातीला सौहार्दपूर्ण जीवनाचा लाभ करून देण्यासाठी एक सनद दि. २६ जून १९४५ रोजी तयार केली. तीच संयुक्त राष्ट्रसंघाची सनद होग सनदेवर प्रथम या राष्ट्रांच्या प्रमुखांनी व अन्य १९ अशा २२ राष्ट्रांच्या प्रमुखांनी सह्या केल्या. त्या सनदेनुसार दि. २४ ऑक्टोबर १९४५ रोजी राष्ट्रसंघांची (युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशन UNO) स्थापना करण्यात आली. या संघटनेचे प्रमुख कार्यालय अमेरिकेत न्यूयॉर्क येथे या दिवसा | सुरू झाले सध्या जगातील १८५ राष्ट्रे या संघटनेचे सदस्य आहेत. कोणतेही राष्ट्र या संघटनेचे सद्स्य होऊ शकते. परंतु १९४५ साली भारत | असताना सुध्दा भारताला या संघटनेचे सदस्यत्व आरंभापासून मिळालेले आहे.. सन १९४५ पासून ही संघटना जगातील आतंरराष्ट्रीय भांडणे शांततेच्या मार्गाने सोडविण्यासाठी प्रयत्न करीत आहे. या संघटनेच्या अनेक स आणि उपसंघटना निरनिराळ्या क्षेत्रात 'एकमेका साह्य करू अवघे धरू सुपंथ' या तत्वाने साऱ्या जगातील त्यांच्या शाखाशाखांतून कार्यक आहेत. 'हे विश्वचि माझे घर' ही संत ज्ञानेश्वरांची उक्ती जणू या संघटनेचे ध्येय आहे. या संघटनेची सुरक्षा परिषद महत्वाची समिती असून अ इंग्लंड, फ्रान्स, रशिया व चीन ही पाच राष्ट्रे तिची स्थायी सदस्य आहेत, अन्य १० राष्ट्रे अस्थायी सदस्य असून दर वर्षानी अस्थायी सदस्य राष्ट्र | निवड केली आहे. वरील पाच स्थायी सदस्य राष्ट्रांना 'नकाराधिकार' हा महत्वाचा अधिकार असून बहुमताविरूध्द सुध्दा ही राष्ट्रे अधिकाराचा उ करू शकतात. सध्या तरी या संघटनेवर अमेरिकेचे वर्चस्व दिसून येत आहे. आपल्या देशात संयुक्त राष्ट्रसंघाचा स्थापनादिन साजरा केला जा विद्यार्थ्यांना या संघटनेच्या विविध क्षेत्रातील कार्याची माहिती या दिवशी शिक्षकांनी करून द्यावी, हा प्रमुख उद्देश हा दिन साजरा करण्यात 


→ सुविचार 

मनुष्यजातीत एकाने दुसऱ्यास विनाकारण भ्रष्ट, अपशकुनी, अमंगल असे मानावे हे अत्यंत लज्जास्पद होय. 

• एकीचे बळ मिळते फळ. 

• एकीने रहा, नेकीने वागा.→ दिनविशेष

 • संयुक्त राष्ट्रसंघटना दिन झालेली प्रचंड हानी, यातून जागतिक अस्थिरता निर्माण झाली. पुन्हा युध्दाची ठिणगी केव्हाही पडू शकते असे स्फोटक वातावरण सर्वसामान्य जनता भीतियुक्त जीवन जगत होती. ही परिस्थिती नाहीशी व्हावी, जागतिक शांतता प्रस्थापित व्हावी, देशादेशात स्नेहभाव लागावा या उद्देशाने २९ लहान मोठ्या राष्ट्रांनी एकत्र येऊन जिनिव्हा येथे आंतरराष्ट्रीय शांतता संघटनेची स्थापना केली. तीच | (युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशन) किंवा राष्ट्रसंघ या नावाने ओळखली जाते. ही एक आंतरराष्ट्रीय संघटना आहे. शांतता व सुरक्षिततेच्या प्रेरित होऊन, जगातील राष्ट्रांनी एकत्र येऊन, परस्पर सहाकार्याने हा संघ स्थापन केला आहे. आंतरराष्ट्रीय संबंधाच्या इतिहासातील विकासामधील हा महत्वाचा टप्पा मानण्यात येतो. हा संघ स्थापन होण्यापूर्वी अशा प्रकारच्या अनेक संघटना निर्माण झाल्या आणि ल गेल्या, तथापि, त्यांनी संयुक्त राष्ट्रसंघांच्या निर्मितीची पार्श्वभूमी तयार केली हे निश्चित. आजपर्यंत जागतिक शांततेसाठी ही संघटना कार्यरत १९५३ मध्ये विजयालक्ष्मी पंडित ह्या तिच्या अध्यक्षा होत्या. 


→ मूल्ये -

 • विश्वशांती, प्रेम.


→ अन्य घटना 

• औरंगजेब बादशहाचा जन्मदिन -१६१८.

 • भारतामध्ये प्रथमच कलकत्ता येथे भुयारी रेल्वे सुरू करण्यात आली - १९८० 


→ उपक्रम 

• युनो या संघटनेबद्दल व तिच्या कार्याबद्दल सखोल माहिती मिळवा व एकमेकांना सांगा. 


→ समूहगान 

• ये देश है वीर जवानों का अलबेलोंका मस्तानोंका. 


→ सामान्यज्ञान

 • 'फायलो स्टॅचीज बांबूसीडीज' या शास्त्रीय नावाने ओळखली जाणारी बाबूंची जात चीन व जपानमध्ये आढळते, हा बांबू ताशी ४ सें.मी. इतक्या वेगाने वाढतो. फुलोरा आला की नामशेष होतो. ५ ते ७ वर्षात बांबूचे मोठे जंगल तयार (१६२)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा